टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )

Submitted by दीड मायबोलीकर on 13 January, 2016 - 12:36
tomato bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)

क्रमवार पाककृती: 

माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.

तर,

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :

टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :

दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा Wink ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.

सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)

चव पाहून मीठ घालून मिक्स करा.

वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.

ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.

फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :

पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक-दोघांपुरतं.
अधिक टिपा: 

माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.

कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.

आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.

फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला, बर झाल आता व्हेज कृती आली आणी ती पण सोपी आणी चटपटीत. फोटो मला तर लय ब्येस वाटले. विशेष म्हणजे पहिला जिन्नसवाला चॉपिन्ग बोर्डावरचा आणी खालचे तयार भरीत जे वाईट वाईट ( आम्ही काही वेळेस व्हाईटला प्रेमाने वाईट म्हणतो, कॄगैन) डिश मध्ये आहे ते पण भारी आलेत

फोटु व त्याच्या प्रेझेन्टेशन साठी १० पैकी १० मार्क..

पुढली पाकृ काय टर्कीची / तितरची हाये का? नाय, फोटुमध्ये दिसु र्हायले म्हणूनशान इचारले.

टोमॅटोचा रस गळून गॅस खराब होत नाही का?
<<
बिल्कुल नाही. माझ्यासारखी जाळी नसेल तर पापड भाजायच्या चिमट्यात धरून डायरेक्ट गॅसवर टमाटे भाजलेत तरी छान भाजले जातात. चुलीवर/शेकोटीत भाजलेत तर डिव्हाईन चव लागते. भरताला राखेची चव नेहेमीच खुलवते.

मस्त. फोटो तर भारीच.
टोमॅटो खुणावत होते वाचून, आता पुढे कोंबडी खुणावेल का असं वाटून गेलं, आणि तुम्ही फोटो टाकलातच. Happy
मयेकर तुमचे मित्र आहेत म्हणून, कोणी चिडलं असतं वरचं वाचून. Wink

मयेकर तुमचे मित्र आहेत म्हणून, कोणी चिडलं असतं वरचं वाचून. डोळा मारा
<<
:कपाळबडवती भावली: 40.gif

थोडा वेळ कळेचना.

अहो, भरीताचे असं नाही म्हणत आमच्यात. भरताची वांगी असंच म्हणतात Lol

मयेकरांचं काही खरं नाही. माबोवर अनेक शेफना भरताची स्वप्नं पडू लागलीत.
( फिरायला जाऊ नका च्या चालीवर पाकृच्या बीबीवर येत जाऊ नका असे सांगावे काय ? )

ऋन्म्या, स्वयंपाक करायला शीक. त्यामुळे,
१. पाकृ वाचूनच चव कळायला लागेल.
२. बायकोच्या कष्टाची किम्मत कळेल.
३. पुढेमागे गेलासच ऑनसाईट, तर स्वतःचं स्वतः करून गिळता येईल Wink

२. बायकोच्या कष्टाची किम्मत कळेल. >>> गर्लफ्रेंडच्या भावी कष्टाची म्हणा ओ, आधीच इथे लोकं टपलेली आहेत तिला माझी बायको बनवायला..
जोक्स अपार्ट ती किंमत आहेच. जे मला करता येत नाही आणि जे माझ्यासाठी ईतर करतात त्या प्रत्येक कष्टाची किंमत आहेच.

@ टमाटा पाकृ
तर टमाट्याचा आंबटपणा मला आवडतोच. शाकाहारी पदार्थांमध्ये हीच एक भाजी आहे जे ईतर काही नसतानाही मी पाच चपात्या न कंटाळता याबरोबर खाऊ शकतो.
याचे मुख्य कारण म्हणजे एक मस्तशी आंबटगोड लाळ सुटते तोंडाला Happy

बिल्कुल नाही. माझ्यासारखी जाळी नसेल तर पापड भाजायच्या चिमट्यात धरून डायरेक्ट गॅसवर टमाटे भाजलेत तरी छान भाजले जातात. चुलीवर/शेकोटीत भाजलेत तर डिव्हाईन चव लागते. भरताला राखेची चव नेहेमीच खुलवते. >> +१
मी डायरेक्ट भाजते.. बॅचलर लोकांना जाळी चे लाड पुरवत नै Lol
तर इकड आम्ही याला घटाला म्हणतो.. सेम बनवतो.. मिरच्या जरा जास्त टाकतो.. म्हणजे ३ टमाट्याला ८ १० मिरच्या असं.. चुलीवर भाजलेल्या भेदराची चव खत्तम असते.. मी बरेच दिवसाचा विचार करत होती रेस्पी टाकाचा पण तुम्ही पयले नंबर लावला राजेहो Happy .. मस्तच फटू सगळे..

सोप्पी आणि मस्त...आवडली पाकक्रुती!

पैकीच्या पैकी मार्क्स.
पण पहिल्या फोटोतली मिर्ची दुसर्या फोटोत मोठी झाल्यासारखी दिसते Proud

टीना, तुमच्या रेसिपीनी माझ्या ताबडतोब इंतेस्तीनी वाकड्या होतील असं वाटतं मला. मला ततडीनं जाऊन पुण्यात त्या सरळ करुन आणाव्या लागतील. Lol (वर्हाडी चिकन खत्तरनाक भारी होतं पण तिखट्याच्या कॉटिटी नी हे अशी अडचण होण्याची भिती वाटते म्हणून मी फोटोच बघून येतो अधून मधून)

छान दिसतंय. टमाटे आणि मिरची भाजताना बघून कांदा आणि लसूण पण भाजला तर मस्त खमंगपणा येईल असं वाटलं. (नंतर 'अधिक टीपा' वाचल्या :)).
एकदा असं करुन पाहीन. नंतर बहुदा अगदीच रहावलं नाही तर कांदा-लसूण भाजून प्रयोग करुन बघणेत येईल Happy

छान दिसतंय फायनल प्रॉडक्ट.

सालसा सारखंच आहे जणू वजा भाजका टो.

Pages