Submitted by नीधप on 11 January, 2016 - 01:59
शीर्षकानंतर अजून काही लिहायची गरज आहे का?
गोल्डी आणि त्याच्या सिनेमांबद्दल सर्वकाही...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राम बलराम विजय आनंदचा आहे आज
राम बलराम विजय आनंदचा आहे आज कळले. अजिबातच त्याचा टच नाहीये . कधीतरी लहानपणी बघितला होता आणि पार विस्मरणात गेला. खरतर बहुदा गोल्डीचा हाच एकमेव चित्रपट कि जो थेटरात बघितला आहे . बाकी सगळे आधीचे असल्यामुळे घरीच बघितले आहेत.
अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे खास शो दाखवला होता. रिलीज झाल्यावर बर्याच वर्षांनी .
अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे
अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे खास शो दाखवला होता. <<
आम्हाला पण
बहुतेक सिनेमे टीव्हीवर किंवा
बहुतेक सिनेमे टीव्हीवर किंवा यूट्यूब वर पाहिले. पण कुठल्याशा गणेशोत्सवात ज्वेलथीफ बिगस्क्रिनवर पाहिला होता. सिक्कीम जाम आवडले होते. वैजयंतीमालाची गोंड्या गोंड्याची साडी कुठल्या फ्याशनीत बसते देव जाणे पण मस्त दिसते!!
https://www.youtube.com/watch?v=TYjy6StBg3E
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/17358
ज्या काळात चित्रपट पाहणे हे
ज्या काळात चित्रपट पाहणे हे भिकारधंदे समजले जायचे आणि 'अभ्यास करा अभ्यास , सिनेमा परिक्षेत येणार नै काही' असे डायलॉग ऐकावे लागत . त्या काळात आर के नारायण ( आर के लक्ष्मण यांचे भाऊ) यांची द गाईड ही इंग्रजी कादम्बरी एफ वाय बी ए ला अभ्यासासाठी लावलेली होती. याच कादंबरी वरून गाईड बनवला होता.तेव्हा आमच्या अभ्यासाला आहे असे सांगून गाईड ऑफिशियली घरून पैसे घेऊन पाहता येई ::फिदी:
गम्मत म्हणजे कादम्बरी आणि चित्रपट यात बरीच तफावत होती. सेन्ट्रल थीम वगळता. सिनेमा पुरता बॉलीवूडी होता आणि त्याचा परिक्षेच्या अभ्यासासाठी अथवा साहित्यिक आकलनासाठी काडीचाही उपयोग होत नसे. ( आताही नटसम्राट नाटक कुठेतरी बी ए ला आहे म्हणे. मांजरेकरांचा नटसम्राट पाहून त्याच्या रसग्रहणासाठी किंवा साहित्यिक आकलनासाठी जसा काडीचाही उपयोग होणार नाही, तसेच)
अरे आगाऊ अत्युत्तम लेख. कसा
अरे आगाऊ अत्युत्तम लेख. कसा सुट्ला नजरेतून कुणास ठाऊक. आता काही लिहायची गरजच राहिली नाही.
आगाऊ भारीच.
आगाऊ भारीच.
सहज शेअर करत आहे, 'गाईड'
सहज शेअर करत आहे,
'गाईड' माझ्या मामाने ४० पेक्षा जास्त वेळा पाहिलेला आहे. त्यामुळे मित्रपरिवारात त्याला आजही(तो ६५ वर्षाचा आहे) गाईड म्हणूनच बोलवतात.
खरोखर अप्रतिम सिनेमा आहे!
तुमचे मामा आमच्या फॅमिलीतले
तुमचे मामा आमच्या फॅमिलीतले दिसतात.

माझे आजोबा, बाबा, धाकटा काका आणि मी हे सर्व गाईडफ्यान!
काकाने बहुतेक ४०+ वेळा पाह्यला असावा गाईड.
एकदा टिव्हीवर दाखवला होता तेव्हा काळापांढरा इसी टिव्ही आणि बुशचा टू इन वन आणि काहीतरी वायर जुगाड करून क्यासेटींवर आख्ख्या सिनेमाचा ऑडिओ टेप करून ठेवलेला होता बाबांनी. दोन क्यासेटी पाठपोट भरल्या होत्या. या क्यासेटी मलातरी ५-६ वी पासून आठवतायत. म्हणजे त्या आधी कधीतरी केल्या असणार.
त्यामुळे मी गाईड हा प्रत्यक्ष पाहण्याआधी कैकवेळा ऐकलेला होता.
त्याच्याशी संबंधित एक
त्याच्याशी संबंधित एक गंमत,
मामी लग्न करून नव्याने घरात आलेली होती आणि मामा नेमका बाहेर असताना त्याच्या मित्रांपैकी कुणीतरी एकजणाने घरी येऊन विचारले 'गाईड' आहे का? मामीने डिक्लेअर केले की इथे गाईड म्हणून कुणी राहत नाही
(No subject)
मस्त धागा. पुन्हा पुन्हा
मस्त धागा. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटणारे सिनेमे.
गाइड मध्ये त्यांच्यात दुरावा
गाइड मध्ये त्यांच्यात दुरावा आल्यानंतरचा एक प्रसंग आहे. अप्रतिम सीन घेतला आहे. तो गाइडच्या ड्रेसात घराबाहेर बसला आहे. ती घरातून येते. गाडीत बसते व त्याला म्हनते नाटकं बस्स झाली शो का वक्त हो चुका है. चलो कपडे बदल कर गाडी में बैठो. हे सर्व ड्रायवर शी बोलल्या सारखे.
तर तो खाली झुकतो व दार बंद करतो. दोघांच्या मध्ये काच येउ लागते मग तो म्हणतो. " वक्त हो चुका . शो हो चुका. हम देख चुके. " व तिला सोडून दूर जातो. एका सीन वर जीव कुर्बान.
शेवटी तो मरायला टेकलेला असतो व वहिदा येते. त्याला ती एक क्षण तो प हिल्यांदा तिच्या प्रेमात पडतो तेव्हा ती दिसलेली असते तीच प्रतिमा दिसते. तेव्हा अगदी कासावीस होते. हे एक प्रेम आहे जे सत्यात येउ शकलं असतं दोघे एकमेकांबरोबर सुखी राहु शकले असते पण ते झाले नाही. आता ती वेळ गेली गेलीच. जगाचाच निरोप घ्यायची वेळ आली. I wonder how anyone can live with that sort of pain.
मोसे छल किये जाय. गाण्यात तिच्या नाचाच्या ड्रेस मध्ये एक काळी मधली पट्टी घातली आहे.
आणि ती कशी नाक उडवून निघून जाते. त्याला समजूनच घेत नाही. हर हर. चलो सुहाना भरम तो टूटा. जाना के हुस्न क्या है.... वॉव.
ह्यात अजून एक दिग्दर्शकाची बारकाई आहे. प्रेमात पडतो तो तो. तेरे मेरे सपने अब एक रंग है. हे एकट्यानेच म्हटलेले आहे. तिचा फक्त मूक सहभाग आहे. ती स्वतःच्या डिस्कव्हरीत मश्गुल आहे. हा फक्त तिचा सह प्रवासी आहे. पण हा आपण एकत्र आहोत असे समजून बसतो. फक्त रफीचा आवाज.
आज फिर जीने कि तमन्ना ला फक्त तिचा आवाज. तो मूक आहे. बघतो आहे तिला फुलताना.
मला पण गाइड ४०+ वेळा च्या क्लब मध्ये घाला.
अमा, मस्त पोस्ट आहे
अमा, मस्त पोस्ट आहे
केसांचा भला मोट्ठा फुगा
केसांचा भला मोट्ठा फुगा असलेला शामळू ब्लॅक व्हाईट देव आणि तारुण्याचे सोंग आणलेला १९७५ च्या नन्तरचा देव याच्या मधला देव जो आहे म्हणजे ज्वेल थीफपासूनचा म्हणा हवे तर, खूपच हँडसम दिसत असे. तेरे मेरे सप्ने, प्रेमपुजारी , जॉनी, गॅम्बलर चा काळ. नीरज -एस डी -गोल्डी - देव कॉम्बो असलेली गाणी पाहणं कसला आनन्द आहे....
लिंकबद्दल धन्यवाद सीमंतीनी.
लिंकबद्दल धन्यवाद सीमंतीनी.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Ryh_WBc6eP0
हा घ्या गाईड - यू ट्युब वर
धागा वाहता आहे तो लवकरच थांबवायला हवाय.
धागा वाहता आहे तो लवकरच
धागा वाहता आहे तो लवकरच थांबवायला हवाय.>>
हो ना राव. आमच्या पोस्टी वाहून गेल्या की
अमा
अॅडमिनना विनंती केलीये पण ते
अॅडमिनना विनंती केलीये पण ते अजून पोचले नसावेत या टु डु पर्यंत.
अमा, मस्त लिहिलंत
अमा, मस्त लिहिलंत
नवा लेखनाचा धागा काढून इथे
नवा लेखनाचा धागा काढून इथे वाचलेल्या(survived) पोस्ट तिथे टाकता येतील
केले. हा घ्या न वाहता
केले.
हा घ्या न वाहता धागा
http://www.maayboli.com/node/57155
सध्या थोडी गडबडीत असल्याने आहेत त्या सर्व पोस्टी एकत्र कॉपी पेस्टून ठेवल्यात नवीन धाग्यावर.
मग वेळ मिळाला की ते संपादित करेन.