सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

नितीनचद्र माझे प्रतिसाद पूर्ण वाचा.
काँग्रेसच्या अधिवेशनात भ्रष्टाचार निर्मूलनाच्या शपथा घेतल्या जातात, यावरून काँग्रेस भ्रेष्टाचाराविरुद्ध लढणारी संघटना आहे यावर तुम्ही विश्वास ठेवावा.

बाबासाहेब , गांधीजी असे संघाशी संबंधित नसलेल्या लोकांबद्दल संघाला प्रेम१९२५ पासूनच आहे की आत्ता जाणवायला लागले ?

उतम पोस्ट नितीनचंद्र (आंबेडकरांबद्दलची).

आता दुसरा मुद्दा- 'आमच्याकडे सग्गळं सग्गळं होतं' (पुलंच्या 'आमचा पोपट सग्गळं सग्गळं बोलतो' च्या चालीवर) हे मूर्ख स्टेटमेन्ट आहे. प्लास्टिक सर्जरी काय, विमानशास्त्र काय- अचाट आणि अतर्क्य दाव्यांची लोक खिल्ली उडवणारच.
पण याच्याच दुसर्‍या टोकाला जाऊन आमच्याकडे काहीच नव्हतं असं म्हणायचं का?

आज अमेरिकेत योगा व transcendental meditation ची हवा आहे. अनेक स्टडीजमधून त्या लोकांनी योगा व मेडिटेशनचे माईन्ड बॉडीसाठीचे बेनिफिट्स तपासले आहेत. हे स्टडीज modern research methodologies वापरुनच केलेले आहेत. त्याचप्रामणे आपल्याकडे पारंपारिकरित्या वापरल्या जाणार्‍या गोष्टींचीही तिथे आज चलती आहे- हळद, मेथी, साजुक तूप, नारळाचे तेल वगैरे. याचेही फायदे तिथे तपासून घेतले गेले आहेत. तर 'हळदीचं पेटंट' टाईप गोष्टींपासून सावध राहण्याइतपत तरी फोकस या गोष्टींवर देण्यात काय हरकत आहे?
हेच करा किंवा यावरच फोकस ठेवा असं म्हणणं आत्मघातकीच आहे व ते संघाचं नक्कीच चूक आहे. पण दुसर्‍या बाजूने ही खबरदारीही घेण्यात यावी की आपल्या पूर्वजांचं संचित (wisdom) उदया आपल्याला एखाद्या अमेरिकन कंपनीकडून डॉलर मोजून विकत घ्यावा लागणार नाही.

सनव,

<दुसर्‍या बाजूने ही खबरदारीही घेण्यात यावी की आपल्या पूर्वजांचं संचित (wisdom) उदया आपल्याला एखाद्या अमेरिकन कंपनीकडून डॉलर मोजून विकत घ्यावा लागणार नाही.>

हे होत नाही, असं तुम्हांला का वाटतं?
पूर्वी काय होतं आणि काय नाही, याची अनेकांना व्यवस्थित कल्पना आहे.

तुम्हांला कदाचित हा पेपर वाचायला आवडेल - http://www.currentscience.ac.in/Volumes/108/04/0471.pdf

<<इस्रो, DRDO सारख्या संस्थांचे प्रमुख पद सांभाळलेल्या व्यक्ती देखील आहेत. त्याची लिस्ट येथे मिळेल.>>

------ सन्स्था प्रमुख पदावरची व्यक्तीचा फार मोठा कार्यकाळ administrative कामासाठीच जातो. सर्व शास्त्रज्ञाना विज्ञानात रुची असते असे मी मानतो, पैकी काही शास्त्रज्ञाना विज्ञानापेक्षाही प्रशासनात जास्त रुची असते. प्रशासनाचे हे काम कुणाला तरी करावेच लागणार (म्हणुन ते काम मी कमी लेखत नाही)...

पुन्हा Director हा मोठ्या काळासाठी प्रशासक आणि छोट्या काळासाठी शास्त्राचा अभ्यासक असतो. दुर्दैवाने विज्ञानासाठी त्यान्ना इच्छा असुनही हवा तेव्हढा वेळ देता येत नाही.

'हाडाचा शास्त्रज्ञ' अशा जबाबदार्‍या घेण्यास उत्सुक नसतो (हाडाचा म्हणजे ज्याला अभ्यास करताना खायचे पण भान नसते - passionate) कारण आयुष्याचे ध्येय पद नसते केवळ विज्ञान आणि विज्ञानाचा ध्यास असतो.... अर्थात अपवाद CNR आहेत.

चिनूक्स, त्या रिपोर्टसाठी धन्यवाद. खूप चांगली माहिती आहे.. एकदा वाचला पण शांतपणे पुन्हा नीट वाचणार आहे. त्यातील दोन वाक्यं इथे उद्धृत करत आहे-

One claims that our ancients knew all about many branches of modern science and technology, ranging from relativity and quantum mechanics to stem cell biology and aerospace technology.
The other camp sarcastically dismisses any claim about past achievements as dubious, if not absurd.
I believe both camps have gone too far.

माझ्या प्रश्नाचा रोख या दुसर्‍या कँपवर होता (sarcastically dismisses any claim about past achievements as dubious, if not absurd.). हे नक्कीच होतं आहे आणि त्यामागे दुसर्‍या टोकाची राजकीय भूमिका, चुकूनही आपल्याकडून हिंदू धर्माबद्दल काही चांगलं म्हटलं जाऊ नये असा हट्ट आणि एक प्रकारचा अग्रेसिव्ह विखार जाणवतो.

पुन्हा तेच conclusion निघतं की दोन्ही बाजूचे extremism टाळायला हवेत आणि in the spirit of true bipartisanship, सरकार कोणाचंही आलं तरी याबाबतीत एक consistent policy असायला हवी.

सनवजी,

काही लोकांना असा दुराग्रह असतो. सर्वच समाजात अशी माणस असतात. संघाने अश्या माणसांना कधी प्रोत्साहन दिल नाही. कधी त्यांचे म्हणणे खोडुनही काढले नाही. काही दुराग्रही व्यक्तींनी संघाच्या माध्यमाचा गैरफायदा घेतला असेल. पण संघ संस्कृती जतनाबाबत आग्रही आहे. असले दुराग्रही दावे आपल्या सारख्या माणसांनी तर्कावर्/पुराव्यावर घासुन पहावेत. जे खर आहे ते टिकेल.

प्रार्थेनेने रोग बरे होतात या श्रध्देवर केरळमधला एक ख्रिशन माणुस सार्वजनिक प्रार्थनांचे आयोजन करतो. पुण्याजवळ खडकीला अश्या प्रार्थना सभा होतात. विरोधाचे कारण नाही. खरच अस घडत असेल तर लोक जातील. नाहीतर हा दावा आपोआपच संपेल.

जिज्ञासा, तात्या
काही गैरसमज झालेत असे दिसतय.
मी ज्योतिषशास्त्राचा समर्थक आजीबातच नाही ना संघ त्याचे समर्थन करतो. त्यावर संशोधन करण्याकरता labs वापराव्यात हे तर अगदीच बरोबर नाही.
मी ती पोस्ट लिहिली त्यातून मला केवळ हे सांगायचे होते कि पुरातन विज्ञान पूर्णपणे टाकाऊ नाही. तरीसुद्धा ज्योतिषचे उदा येथे घेणे चुकलेच. असो. ज्योतिषशास्त्र येथेच सोडवे अशी मी विनंती करतो.
माझा मुद्दा सनव ने अधिक योग्य रीतीने स्पष्ट केला.
जसे योगासनाचे योगा झाले तेव्हा आपण त्यामागे धावलो तर हे फर्स्ट hand आपल्या पर्यंत आले तर बरेच आहे ना.

संघ नेहमी बरोबर नसतो >> हे अर्थात मान्यच. फक्त तुम्हाला जितक्या पट्कन दिसेल तेवढी पट्कन मला हि चूक दिसणार नाही/ अथवा दिसलेली गोष्ट चूक वाटणार नाही. पण मी सर्वच गोष्टींचे समर्थन करत सुटेल असे नाही Happy

----

चिनुक्स,
आपण स्वतःच वैज्ञानिक आहात तेव्हा आपल्याला त्यातले अधिक माहिती आहे. आपण विरोध करणे सुद्धा बरोबरच आहे. पण हा विरोध केवळ संघाच्या तिथे आहे म्हणून होतोय का अशी माझ्या मनात शंका येते (तसे नसल्यास कृपया माफ करा.)
<< काकोडकर किंवा माधवन नायर यांची मतं, कार्यपद्धती अजिबात प्रतिगामी नाही आणि त्यांनी देहरादूनला निघाला तसला जाहीरनामा निघूच दिला नसता. >>
मला यातल्या 'देहरादूनला निघाला तसला' जाहीरनामा हे कळाले नाही. मी तो जाहीरनामा पुन्हा वाचला. त्यात काय वाईट आहे हे कळाले नाही. सरकारच्या काही योजना राबवण्यासाठी संशोधन व्हावे अशी अपेक्षा येथे स्पष्ट करण्यात आलेली आहे..
याने मुलभूत संशोधनास बाधा पोहोचेल असे आपण म्हणता आहात हे माझ्या लक्षात आले पण त्यात मुलभूत संशोधन करू नका असा अर्थ तरी कुठे निघतो ते कळत नाहीये.
आता मा. काकोडकर, नायर, भटकर यांच्या सारख्यांना घेऊन काही केले तरी आतमध्ये त्यांच्या मताला किंमत नसेल असे आपल्याला वाटते हे माझ्यामते बरोबर नाही. यांना आत डावलण्यात येत असेल तर ते तिथे राहतील का.? त्यांच्यासारख्या लोकांना असल्या पदाचा राजीनामा देणे हि काही मोठी नाही.
ते तिथे आहेत याचा अर्थ देशहिताचे काही काम होईल असा त्यांना विश्वास वाटतो म्हणून आहेत असा अर्थ मी काढतो. आपल्या मताप्रमाणे कदाचित ते सरकारी दबावामुळे तेथे असावेत. Happy

चिनुक्स आपण स्वतः वैज्ञानिक आहात आणि मी वैज्ञानिक नाही. त्यामुळे तुमच्या मनातल्या असलेल्या भीतीचे मला पूर्ण आकलन होत नाहीये असे मला वाटते. आपले काही मुद्दे खरोखरच योग्य असतील. तेव्हा आपण ते विभा मधील वैज्ञानिकांकडे मेल केल्यास उत्तम होईल. Happy

प्रार्थेनेने रोग बरे होतात या श्रध्देवर केरळमधला एक ख्रिशन माणुस सार्वजनिक प्रार्थनांचे आयोजन करतो. पुण्याजवळ खडकीला अश्या प्रार्थना सभा होतात. विरोधाचे कारण नाही. खरच अस घडत असेल तर लोक जातील. नाहीतर हा दावा आपोआपच संपेल.

अरे बापरे! मी असल्या गोष्टींचं नाही समर्थन करत..उगाच गैरसमज नको. मी फक्त इतकंच म्हणत आहे की ज्या गोष्टी (योगा, मेडिटेशन) modern research methodology वापरुन केलेल्या शेकडो प्रयोगांत टिकून राहिल्या आहेत त्या मान्य करायला अडचण नसावी. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

उदय, बरोबर आहे
<< सन्स्था प्रमुख पदावरची व्यक्तीचा फार मोठा कार्यकाळ administrative कामासाठीच जातो. >>
इकडेही त्यांची जबाबदारी जवळजवळ तशीच आहे असे मला वाटते

अरे बापरे! मी असल्या गोष्टींचं नाही समर्थन करत..उगाच गैरसमज नको. माझा गैरसमज अजिबात नाही. तुम्ही अतिशय संयतपणे लिहल आहे.

अनेक स्तरावर असे दावे असतात. फक्त संघाच्या स्तरावर झाले की त्यावर कडाडुन टिका होते याकडे लक्ष वेधले जावे म्हणुन हा भाग लिहला होता इतकेच.

व्हॅटीकन सिटी चकत्काराला मानते.संतपद देते. हे खुपत नाही. पण संघाच्या माध्यमातुन एखादा व्यक्ती काही बोलत असेल तर तो दुराग्रह दिसतो.

व्हॅटीकन सिटी चकत्काराला मानते.संतपद देते.>>> ते ज्यांचे धार्मिक प्रमुख
आहेत त्या देशांची एकंदरीत प्रगती विसरून हेच बरे आठवले ?

नितिनचंद्र, कृपया इथे असे टॉपिक नकोत. 'संघ चूक करतंय तीच चूक व्हॅटिकन करतंय' अशा प्रकारचे मुद्दे इथे आले तर हाही चांगला चाललेला धागा नको त्या वळणावर जाईल. फक्त संघाच्या चुकांबद्दल बोलूया..इतरांचं काय ते त्यांचं ते बघून घेतील.

सनव,

मूळ धाग्यात हे एक विधान आहे. Happy

>>>या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा.<<<

ते ज्यांचे धार्मिक प्रमुख
आहेत त्या देशांची एकंदरीत प्रगती विसरून हेच बरे आठवले ? >>कपोचे, दोन्ही बाजुंनी सभ्य भाषेत "सर्व" मुद्द्यांवर योग्य ते प्रतिवाद चालु आहेत. त्यामुळे एकाच बाजुला टार्गेट करुन "तेव्हा...." थीम टाळता आली तर बरे.
जसे पगारेंनी विचारलेले मुद्दे बरोबर आहेत तसेच सर्वांना सर्व मुद्द्दे मांडण्याचा हक्क आहे.

जसे पगारेंनी विचारलेले मुद्दे बरोबर आहेत >>>

स्पॉक इग्नोर करणार होतो, पण..
तुम्हाला काय म्हणायचेय हे एकदा कळूद्या. पगारे माझ्या आदेशानुसार लिहीतात का ? त्यांचं म्हणणं त्यांचेपाशी. नितीनचंद्र यांना मी लिहू नका असे म्हटलेय का ? हक्क बिक्क काय भानगड आहे ?
कि मी खटकलेल्या बाबी विचारू नयेत असं म्हणायचंय तुम्हाला ?

कि माझे प्रतिसाद असभ्य आहेत हे सांगायचेय ? तुमच्या पोस्टचे प्रयोजन कळाले नाही. तुम्हाला माझा प्रश्न अड्चणीचा वाटला असेल, अडाणीपणाचा वाटला असेल किंवा समजलाच नसेल तर तो माझा प्रॉब्लेम नसावा ही अपेक्षा आहे. थीम कसली आणि काय ? आणि ज्यांच्या साठी भांडताय ती पोस्ट कुठ्ल्या टाईपची आहे.

विचार करून लिहीलेत तर बरं होईल.

व्हॅटीकन सिटी चकत्काराला मानते.संतपद देते. हे खुपत नाही. पण संघाच्या माध्यमातुन एखादा व्यक्ती काही बोलत असेल तर तो दुराग्रह दिसतो.
>>

अहो पण व्हेटीकन कुठ कोणत्या देशाच्या पोलीश्या मध्ये घुसतय?

कापोचे हे दिसण्याचे एक कारण आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छीतो,
मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आहे हा वरवर पाहता आपला विषय नाहीच. त्यांच्या धर्मपीठाने केलेली ती गोष्ट आहे पण यावेळी ते ज्या पध्ततीने झाले त्यामुळे शंका उपस्थित करण्यात येत आहे.

व्हेटीकन कडून संतपद बहाल करण्यात येथे त्याकरता काही क्रायटेरीया आहेत ते असे,
१. ज्याला संतपद बहाल करायचे आहे त्याच्या मृत्यू नंतर ५ वर्षाने हि प्रक्रिया चालू करण्यात येते. >> जी मदर तेरेसा यांच्या बाबतीत मृत्युच्या एका वर्षाच्या अगोदर चालू करण्यात आली.
२. या प्रक्रीयेमध्ये एक 'सैतानाचा वकील' म्हणून सदस्य असतो जो त्या व्यक्तीची नेमणूक बरोबर आहे का पडताळत असतो >> मदर तेरेसांच्या बाबतीत हा वकील नेमेलेला नव्हता.
३. यामध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्याच्या नावाने किमान दोन (अगोदर हि संख्या ५ होती) चमत्कार सिद्ध व्हावे लागतात. >> मदर तेरेसांच्या बाबतीत हे चमत्कार असे आहेत कि ओरिसातील कुण्या एका महिलेच्या पोटात गाठ होती. मदर तेरेसा यांचा फोटो त्यांनी त्या जागी स्पर्श केला आणि गाठ निवळली. हे चर्च कडून वैज्ञानिक निकषांवर तपासून घेतले गेले आहे असे सांगण्यात येते. जब कि(मराठीक काय म्हणाव यावेळी) त्या महिलेच्या पतीने टाईम्सला मुलाखत देताना तिच्यावर दीर्घकाळ वैद्यकीय उपचार चालू होते असे सांगितले.
दुसरा त्यांचा दावा ब्राझील मधल्या एका इसमासंबंधित आहे. त्या इसमाची माहिती उपलब्द नाही जेणेकरून पडताळणी करता येऊ शकेल.

आत्ताचे जे पोप आहेत त्यांना येऊन २ वर्षाच्या आसपास कालावधी झालेला आहेत. या कालावधी मध्ये त्यांनी संतपद बहाल केलेल्या लोकांची संख्या मागच्या ३०० वर्षांत संतपद बहाल करण्यात आलेल्यांच्या संख्ये इतकी आहे.

या नियुक्त्या बऱ्याच प्रमाणात आफ्रिका आणि आशिया खंडातील लोकांच्या आहेत.

यावरून असे दिसून येते कि यामागे जास्तीत जास्त लोकांना ख्रिस्ती बनवण्यासाठीचे प्रयत्न यामार्गे सुरु आहेत.
आशिया आफ्रिका या लोकसंख्या भरपूर असलेल्या भागांना टार्गेट केले जात आहे.

यामध्ये पुन्हा त्यांनी त्यांच्या धर्माचा विस्तार करावा यात गैर काहीच नाही. पण ते गरीब हिंदू लोकांना आमिषे दाखवून हे करून घेत असतात याला आक्षेप आहे. धर्म समजाऊन सांगून, समजून घेऊन कोणी त्या धर्मात प्रवेश करू इच्छित असेल तर काहीच हरकत नाही. पण असे कपटाने धर्मांतर घडवून आणले जाते हे बरोबर नाही.

ज्यांचे असे धर्मांतरण होते ते त्या धर्मातील मूळ लोकांपेक्षा अधिक कट्टरपंथी झालेले पाहवयास मिळते ज्यामुळे समाजामध्ये दुही पसरण्याची शक्यता असते.

याउलट परिस्थिती हिंदूमध्ये आहे. हजारोंच्या संख्येने परदेशी लोक विवध आश्रमांमध्ये येतात कोणालाही कधीही धर्म बदलण्याबद्दल प्रवृत्त केले जात नाही.

तेव्हा हा जो आक्षेप सद्ध्या घेतला जात आहे तो त्या मागच्या हेतूवर हा आहे. कारण त्यामुळे आपल्या देशाच्या एकतेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रक्रियेवर वगैरे आक्षेप नाही. यांच्या हेतूवर आहे.

ते गरीब हिंदू लोकांना आमिषे दाखवून हे करून घेत असतात
>>

काय हरकत आहे? हिंदूंनी किंवा त्यांच्या संघटनांनी काउन्टर ऑफर द्यावी.

तेव्हा हा जो आक्षेप सद्ध्या घेतला जात आहे तो त्या मागच्या हेतूवर हा आहे. कारण त्यामुळे आपल्या देशाच्या एकतेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रक्रियेवर वगैरे आक्षेप नाही. यांच्या हेतूवर आहे.
>>
हे नाही झेपल.

बाकी आमचे प्रश्न राहिलेत अजून Wink

प्रकु

व्हॅट्कन सिटीची काळजी वाटत नाही. जिथे मिशनरी गेलेत तिथल्या लोकांची प्रगतीच झालेली आहे. धर्म कोणता का असेना. कोणे एके काळी युरोपात धर्मसत्ता होती, तिचे नामोनिशाण उरलेय का आता ? हा मुद्दा नेहमी संघिष्टांकडून येतो म्हणून लिहीतोय.

ख्रिस्ती धर्माला विरोध असेल तर बहीष्कार टाकायचे आदेश द्या कि सरकारला . उलट त्याच राष्ट्रांमधे आपले प्रधानसेवक जात असतात ना ? धर्मसत्ता असती तर आज या देशांकडे तंत्रज्ञानासाठी आपण गेलो असतो का ? ख्रिस्ती नसतानाही तिथे भारतियांना रोजगार मिळतो हे खरे आहे का ? असेल तर का ?

हे सगळं सोडून ज्यांना अजिबात महत्व उरलेलं नाही त्या व्हॅटिकनची उदाहरणे देऊन त्याचा इश्यु केल्याने कोण अशा मुद्यांना महत्व देईल ?

जर तुमचा धर्म माणसा माणसात भेद करत नसेल तर भीती कशाला बाळगायची इतरांची ? अमेरीकेत जाताच ना नोकरीसाठी ? हिंदू धर्मप्रसार करा कि, नाही कोण म्हणतेय ? बघा यश मिळतेय का ?

कि मी खटकलेल्या बाबी विचारू नयेत असं म्हणायचंय तुम्हाला ?
>>
तुमच्या ,
ते ज्यांचे धार्मिक प्रमुख
आहेत त्या देशांची एकंदरीत प्रगती विसरून हेच बरे आठवले ? >>
या वाक्यावरुन असा समज होतो आहे की, "त्यांनी" काहीही करावे. जोपर्यंत "ते" आपल्यापेक्षा जास्त प्रगती करत आहेत तोपर्यंत त्यांच्याबद्दल ब्र ऐकुन घेतला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलतान फक्त त्यांच्या प्रगतीच्या चांगल्या गुणांबद्दल बोलावे.
कोणत्याही वाईट गुणाबद्दल बोलुच नये.

यात तुम्हाला स्वत:ला काही वावगे वाटत नाही का?

>>>काय हरकत आहे? हिंदूंनी किंवा त्यांच्या संघटनांनी काउन्टर ऑफर द्यावी.<<<

प्रकुंच्या म्हणण्यातून मला समजले ते असे की धर्माचा प्रसार हा 'धर्माच्या उजवेपणाची उदाहरणे' सांगून व्हावा. (प्रत्येक धर्मियाच्यामते त्याच्या त्याच्या धर्मात अशी उदाहरणे असणारच). धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याशिवाय कोणतेही उपाय योजू नयेत असे त्यांचे म्हणणे आहे असे मला वाटते आणि माझेही मत तसेच आहे. जबरदस्ती, आमीष हे उपाय कोणीच योजू नयेत. विचारांचा प्रसार करत राहावे. ज्याला जे विचार आवडतील तो त्या धर्मात प्रवेश करेल.

तात्या, वनवासी कल्याण आश्रमाचा मुद्दा आपल्या कडून आला होतं त्याची थोडी माहिती देतो.
डिसेंबर १९५२ मध्ये स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब(रमाकांत केशव) देशपांडे यांनी तत्कालीन मध्यप्रदेशच्या जशपुर भागात ५-६ वनवासी विद्यार्थ्यांना घेऊन लहान वसतिगृह सुरु केले. येथून वनवासी कल्याण आश्रमाची सुरुवात झालेली आहे. यासाठी देशपांडे यांनी गांधीजींचे शिष्य ठक्कर बाप्पा आणि गुरुजींची मोठी प्रेरणा होती.
आज देशातील ३७५ वनवासी बहुल जिल्ह्यांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे काम सुरु असून एक लाखाहून अधिक मुले कल्याण आश्रमाच्या शाळांमध्ये शिकत आहेत. सुमारे ७००० हून अधिक मुले कल्याण आश्रमाच्या वसतिगृहात राहत आहेत.

बेफिकीर,

अहो, असा होत नाही धर्माचा प्रसार. काहीतरी कारण लागते. विचार म्हणाल तर काय, सगळेच धर्म मेल्यानंतर परमेश्वराच्या राज्यात पोचवून देतात.

पण ह्या जीवनाच काय?

ज्याला जे विचार आवडतील तो त्या धर्मात प्रवेश करेल. >> जर गरीब हिंदूना ख्रिस्ती धर्माचे विचार पटत असतील आणि त्यामुळे त्यांनी धर्मांतर केले असेल तर?

तात्या, सगळेच धर्म एकाच ठिकाणी पोचवतात हे ठीक असले तरी माणूस जिवंत असताना विशिष्ट धर्मातून कसा वागू शकतो ह्यात बराच फरक पडतो. माझे म्हणणे इतकेच आहे की धर्म स्वीकारण्याची कारणे धर्मविचारातच पुरेशी असायला हवीत. बाह्य कारणांची गरज भासू नये.

गरीब ह्या शब्दाची आवश्यकताच भासू नये. कोणालाही कोणत्याही धर्माचे विचार (फक्त 'धर्माचे विचारच') आवडत असतील तर त्याने त्या धर्मात जावे की? एखाद्या धर्मात गेल्यामुळे माझ्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळणार आहे किंवा एखाद्या धर्मात गेलो नाही तर माझे दोन्ही हात तोडले जाणार आहेत अशी कारणे नसावीत.

(ही कमेंट स्ट्राँग वाटली तर दिलगीर आहे पण नेमके हेच म्हणायचे आहे म्हणून तसे लिहिले.)

व्हॅट्कन सिटीची काळजी वाटत नाही. जिथे मिशनरी गेलेत तिथल्या लोकांची प्रगतीच झालेली आहे. धर्म कोणता का असेना. कोणे एके काळी युरोपात धर्मसत्ता होती, तिचे नामोनिशाण उरलेय का आता ? हा मुद्दा नेहमी संघिष्टांकडून येतो म्हणून लिहीतोय. >>>>> युरोपातील धर्मसत्ता हा विषय कळला नाही मला.
तेथे धर्मसत्ता आहे मी कुठे म्हणालो वरती Uhoh

<< ख्रिस्ती धर्माला विरोध असेल तर बहीष्कार टाकायचे आदेश द्या कि सरकारला . उलट त्याच राष्ट्रांमधे आपले प्रधानसेवक जात असतात ना ? धर्मसत्ता असती तर आज या देशांकडे तंत्रज्ञानासाठी आपण गेलो असतो का ? ख्रिस्ती नसतानाही तिथे भारतियांना रोजगार मिळतो हे खरे आहे का ? असेल तर का ? >>
ख्रिस्ती काय कोणत्याही धर्माला विरोध नाही. पुन्हा या देशात धर्मसत्ता आहे याचा संदर्भ कळला नाही.
फक्त हिंदू लोकांना फसवून त्यांचा धर्म बदल करून घेणे याला विरोध आहे. स्वधर्माचे संरक्षण का करू नये.?

<< हे सगळं सोडून ज्यांना अजिबात महत्व उरलेलं नाही त्या व्हॅटिकनची उदाहरणे देऊन त्याचा इश्यु केल्याने कोण अशा मुद्यांना महत्व देईल ? >> तिथे व्हॅटिकनला महत्व उरलेले नाही म्हणून त्यांचे इकडे धर्मप्रसार करण्याचे काम चालू आहे.

<< जर तुमचा धर्म माणसा माणसात भेद करत नसेल तर भीती कशाला बाळगायची इतरांची ? अमेरीकेत जाताच ना नोकरीसाठी ? हिंदू धर्मप्रसार करा कि, नाही कोण म्हणतेय ? बघा यश मिळतेय का ? >>
मला एकंदर हि गोष्ट कळत नाहीये, अमेरिकेत नोकरी साठी जातो मग काय.? म्हणजे मुद्दा माझ्या लक्षात येत नाहीये. मी वर जे काही भाष्य केलय ते पोप वगैरे त्यांच्या बद्दल आहे. त्यामध्ये ख्रिश्चन 'लोकांना' आजीबात दुषणे लावलेली नाहीत.

आणि भेदभाव तर आपल्या धर्मात आहेतच हे जगजाहीर आहे. यावर हा भेदभाव काढून टाकणे हा उपाय आहे.

Pages