प्रतिसादांमधून संकलित झालेली माहिती मुख्य भागात आणून ठेवली आहे..
---
शिवशक्ती संगमची संपूर्ण व्यवस्था फारच प्रचंड होती. मला जेवढी आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
इतर स्वयंसेवकांनी हवी तसे वाढवावे आणि सुधारणा सुचवाव्या..
हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा होता. या कार्यक्रमाची तयारी अडीच वर्ष आधीपासून सुरु होती. यात एकूण सात शासकीय जिल्हे सहभागी होते.
प्रत्येक जिल्ह्यातून स्वयंसेवक संघस्थानावर आले त्यांच्याकरता बसची व्यवस्था होती. सर्व मिळून एकूण साधारणतः दोन हजार बसेस लागल्या.
आल्यानंतर स्वयंसेवकांना विश्रांतीसाठी सिद्धता केंद्रे होती. एक सिद्धता केंद्र साधारण १ एकर एवढे होते. जवळच स्वच्छता गृहाची व्यवस्था होती. एकूण ४५ ते ५० सिद्धता केंद्र होते. सर्व स्वयंसेवकांना त्यांच्या सिद्धता केंदाचा क्रमांक येताना बसमध्ये कळवण्यात आला होता. एका सिद्धता केंद्रा मध्ये ३००० स्वयंसेवक याप्रमाणे नियोजन होते.
भोजन व्यवस्था : सिद्धता केंद्राच्या एका भागात भोजन व्यवस्था होती. भोजनामध्ये पोळी, भाजी, लोणचे, ताक आणि खिचडी होती. १ लाख लोकांसाठी खिचडीची व्यवस्था इस्कॉन कडून करण्यात आली होती. पदार्थांची गुणवत्ता सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्तम राहील याची विशेष काळजी घेण्यात आली.
या कार्यक्रमाकरता खास इको फ्रेंडली प्रकारची सुपारीच्या पानांची ताटे आणि वाट्या बनवून घेण्यात आल्या होत्या. त्या धातू प्रमाणे कडक आणि उत्तम प्रतीच्या होत्या.
१०, १२ टेबल्स मांडून बफे टाईप जेवण घेऊन जायचे होते. पुढे बसायला खुर्च्या आणि भारतीय बैठक होती.
एका स्वयंसेवकाला जेवण घेण्यासाठी १५ सेकंद पुरतील अशी व्यवस्था होती. त्यामुळे ३ हजार लोक असून आजीबात ताण आला नाही किंवा रांगा लाऊन उभे राहावे लागले नाही. (मी भोजन व्यवस्थे मध्ये होतो म्हणून सविस्तर माहिती आहे)
याव्यतिरिक्त प्रत्येक सिद्धता केंद्रामध्ये सुरक्षा विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग असे विभाग होते.
स्वच्छता विभागात ताटे वाट्या ताकाचे कंटेनर सेपरेट करून गोण्यांमध्ये भरले जात होते.
एकुणात असे अनेक विभाग होते. मला सगळ्यांची माहिती नाही. वाहतूक व्यवस्थापन आणि नियमन हा के प्रमुख विभाग होता. यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली. यात १० हजार स्वयंसेवक होते.
भोजन झाल्यावर गणवेश परिधान करून स्वयंसेवक भारत मत कि जय , शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देत संघस्थानाकडे रवाना झाले. सर्व विभागांचे घोष (band) पथके संचलन करीत संघस्थानावर आले. सगळ्यांचे संचलन पाहण्यासारखे होते.
संघस्थानामध्ये येण्यासाठी एकूण १३ दरवाजे होते. कोणी कोणत्या दरवाज्यातून यायचे याची माहिती देण्यात आलेली होती. सर्व जिल्ह्यानिहाय जागा ठरवलेल्या होत्या. लांबून आपला जिल्हा दिसण्याकरता प्रत्येकाला एक रंग ठरवून त्याप्रमाणे त्यांच्या बाउन्ड्रीवर ते झेंडे लावलेले होते. स्थिरस्थावर झाल्यावर ते काढून घेण्यात आले..
एलईडी स्क्रीन ठिकठिकाणी लावलेले होते व त्यावरून प्रक्षेपण चालू होते.
सिद्धता केंद्रामधील स्वयंसेवकांना कार्यक्रम पाहण्याकरता ४ सिद्धता केंद्र मिळून एक असे एल ई डी स्क्रीन्स होते.
२ ड्रोन आकाशातून आकाशातून परिस्थिती वर लक्ष ठेऊन होते. त्यांच्यातून आलेले प्रचि अप्रतिम आहेत पण मला इथे ते कसे टाकावे माहित नाही .
पुढे मा सरसंघचालकांचे आगमन, प्रार्थना , घोषपथकाचे संचलन , समूहगीत गायन ,मा सरसंघचालकांचे भाषण असा कार्यक्रम झाला.
भाषण अप्रतिम होते. यु tube वर समर्थक आणि विरोधकांनी सुद्धा जरूर ऐकावे.
कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दान करण्याचे आव्हान करण्यात आले. जाण्याच्या रस्त्यात यासाठी कुंभ ठेवलेले होते. तसेच संघाच्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा फोन नंबर देण्यात आला. त्यावर मिस्ड कॉल केल्यास ते इच्छुकांना संपर्क करणार होते..
याशिवाय संघाचे इतर सामाजिक उपक्रम दाखवणारी प्रदर्शनी होती.
साधारण दिड लाख गणवेशातील स्वयंसेवक आणि एक लाख सामान्य नागरिक तसेच १० हजार विशेष अतिथी होते. बाबासाहेब पुरंदरे, मुखमंत्री इ होते. काही मंत्री गणवेशात होते.
शिदोरी संकल्पना :
यामध्ये एका शिदोरीच्या पाकिटात १० पुऱ्या, १ चटणीचे पाकीट आणि एक तिळगुळाच्या वडीचे पाकीट असे पदार्थ होते. पुणे पिंची भागातून एक लाख घरातून शिदोरी गोळा करण्यात आली होती.
जनसंपर्क वाढवा याकरता मुद्दाम हि संकल्पना राबवण्यात आली.
जे शिदोरी देणार होते त्यांच्या घरी दहा पुऱ्या बसतील असे कंटेनर पोहोचते करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या
आदल्या दिवशी त्यांच्या कडून ते एकेक करून गोळा करण्यात आले.
चटणी आणि वड्यांच्या झिपलॉक असलेल्या पिशव्या आम्हाला मिळाल्या होत्या (यांची व्यवस्था कोणी आणि कशी केली माहित नाही)
या पिशव्या आम्ही लोकांकडून आणलेल्या कंटेनर मध्ये ठेवल्या. असे दहा कंटेनर बसतील अश्या प्रकारचे खोके आम्हाला मिळाले होते (हे पण कसे आले वगेरे माहित नाही) त्यात ते कंटेनर भरून प्रत्येक विभागात ठरलेल्या जागी ते जमा करण्यात आले.
आदल्या दिवशी संध्याकाळी एक गाडी आली होती जी सर्व विभागातून हे खोके घेऊन गेली.
यापुढचे शिदोरी व्यवस्थापन वेगळ्या विभागाने केले. त्याचे तपशील माहित नाहीत परंतु बाहेरगावी जाणाऱ्या सर्व बसेस मध्ये हि खोकी पोहोचलेली होती. सर्वांना आग्रहपूर्वक देता येतील इतकी होती असे कळाले.
आमच्या औंध विभागाला १००० पाकिटे जमा करायचे ठरले होते. प्रत्यक्षात प्रतिसाद इतका सकारात्मक होता कि १७००/ १८०० पाकीटं जमले..
यामध्ये समितीच्या माता भगिनींचे विशेष प्रयत्न होते.
......................
प्रतिसादांमधून मधून आलेली माहिती येथे add करत आहे
आपत्ती व्यवस्थापन :
आपत्ती व्यवस्थापनाकरता विशेष विभाग स्थापन करण्यात आलेला होता. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले होते. (सर्व विभागातल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण होते) अजून सविस्तर माहिती मिळाल्यास सांगतो.
अग्निशामक दलाच्या गाड्या तयार ठेवण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक सिद्धता केंद्रामध्ये दवाखाना होता आणि एक मोठा दवाखाना संघस्थानाजवळ उभारण्यात आलेला होता.
संघस्थानावर कार्यक्रमाच्या वेळी संघ गणवेशात डॉक्टर्स stethoscope सहित विशिष्ट अंतरावर उपलब्ध होते.
--
नोंदणी व्यवस्था :
नोंदणी केलेल्या सर्व स्वयंसेवकांना रजिस्ट्रेशन नंबर एस एम एस केलेला होता. दोन एक आठवडे अगोदर सगळ्यांना ओळखपत्र देण्यात आले होते. ज्यावर एक बारकोड होता.
तो बारकोड सिद्धता केंद्रावर आल्यावर android मोबाईलवर द्वारे स्कॅन केला जात असे. यासाठी एक अल्युमिनियमचे (बहुतेक) मॉडेल बनवलेले होते ज्यावर हे मोबाईल लावलेले होते आणि आलेल्या स्वयंसेवकाचे ओळखपत्र ठेवायला जागा होती. तेथे ओळखपत्र ठेवले कि स्कॅन होत असे. हे मोबाईल शिवशक्ती संगमसाठी असलेल्या फाय लं जोडलेले होते.
स्कॅन झाल्यावर हाताला एक band बांधला जात असे. हा band असलेल्यांनाच फक्त भोजन व्यवस्था तसेच संघस्थानावर प्रवेश दिला जात असे..
मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये बरेच अंतर होते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांसाठी शटल्सची व्यवस्था होती.
यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे एक १०२ वर्षाचे स्वयंसेवक देखील उपस्थित होते.
ज्यांना काही गोळ्या वगेरे चालू आहेत त्यांना गोळ्या वगेरे बद्दल माहिती आय कार्ड च्या मागच्या बाजूला लिहिण्यास सांगण्यात आले होते..
स्वयंसेवकांना रांगेत उभे करण्यासाठी असलेली व्यवस्था :
दिड लाख स्वयंसेवक ठरल्याप्रमाणे रांगेत उभे करायला फक्त आर्धा तास लागला..
त्याचे व्यवस्थापन असे होते :
संपूर्ण मैदानावर एक ठराविक अंतर सोडून छोट्या छोट्या अधिक (+) च्या खुणा करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये मध्ये सोडलेला मार्ग वगेरेच्या जागा मोकळ्या ठेवल्या होत्या. सर्व स्वयंसेवकांना अगोदर त्या अधिकांवर बसवण्यात आले होते.
बरेच जण जमल्यावर मग उभे करून सर्वांना मागे सरकण्यास लावले. एक आड एक अधिक सोडून स्वयंसेवक उभे होते. हे सगळ पार पडण्या साठी त्या त्या विभागाचे शिक्षक यामध्ये लक्ष घालून आपापल्या स्वयंसेवकांचे व्यवस्थापन करत होते.
तसेच माईक वरून देखील त्यांना विभागवार सूचना मिळत होत्या.
सर्व स्वयंसेवक व्यासपीठाकसे तोंड करून उभे असतील अशा प्रकारे अरेंजमेंट होती..
==
पाणी भोजन आणि इतर व्यवस्थांची सविस्तर माहिती लीम्बुजी यांच्या पोस्ट मधून साभार :
सिद्धता केंद्राचे शामियाने रचतानाही, दिशा, उत्तरायण/दक्षिणायनामुळे येणारी सावली याचा विचार केल्याचे जाणवले जेव्हा सध्या सूर्य नुकताच दक्षिणायन संपवुन उत्तरायणास सुरुवात केल्याने अजुनही जास्तीत जास्त दक्षिण बाजुकडूनच पूर्वपश्चिम फिरतोय, तेव्हा टेन्टच्या नेमक्या उत्तरेकडे कायम सावली रहात असल्याने तिथे सावलीत पाण्याची व्यवस्था केली होती, व जिथे ही दिशा पाळणे शक्य नव्हते तिथे पाण्याच्या साठ्यावर सावली राहील याची व्यवस्था होती. यामुळे दिवसभर थंडगार पाण्याचा पुरवठा झाला.
पाणी व्यवस्थेमधे, आलेल्या स्वयंसेवकांना पाण्याच्या मोठ्या भरलेल्या बाटल्या मोजुन देऊन, संध्याकाळी परत रिकाम्या व भरलेल्या अशा मोजुन घेतल्या गेल्या. स्टीलचे ग्लास ठेवले होते, प्लॅस्टीकचे ग्लास नव्हते. कुणालाही वेगळे सांगावे लागत नव्हते की ग्लास उष्टा न करता पाणी ग्लासने वरुन प्या. एका तंबुतील ३,००० स्वयंसेवकांचे जेवण झाल्यावर तितके लोक पाणी पिण्यास येऊनही, तिथे चिखल झाला नव्हता व प्रत्येक स्वयंसेवक पाणी विनाकारण सांडेल अशा पद्धतीने वागत नव्हता.
स्वच्छता व्यवस्थेकरता स्वतंत्र टीम होत्या. त्यांचेकडे, तंबुतील कचरा (असल्यास) गोळा करण्यापासुन ते उष्टीखरकटी ताटवाट्यांची योग्य रितीने विल्हेवाट लावणे, संडास/बाथरुम, हात धुण्याचे नळ येथिल व्यवस्था बघणे अशी कामे होती.
जेवण वाढपात (वितरण) साधारणतः दहा टेबल लावलेली असुन प्रत्येक टेबलवर ४ जण वाढायचे काम करीत होते, याशिवाय दोन स्वतंत्र टेबल्स वर रिफिल/ अन्न पुन्हा: घेण्यासाठी व्यवस्था होती. ज्यास जितके हवे तितके घेऊन खावे, कमी नको की जास्त नको. फक्त घेऊन टाकू नये अशी प्रेमळ सूचना होती व सर्वजण तिचे कसोशीने पालन करीत होते.
जेवण व्यवस्थेतच, भटारखान्यापासुन वितरण व्यवस्थेपर्यंत अन्नाचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र टीम "पुरवठा व्यवस्थेत" कार्यरत होती.
कुठेही आरडाओरडा, गडबड गोंधळ, हमरातुमरी वा तत्सम घडत नव्हते. विशेष म्हणजे अनेक केंद्रांवर आलेल्या प्रतक्रियांमधे अनेकवार उल्लेखनिय प्रतिक्रिया अशाही होत्या की "वाढप व्यवस्थेतील स्वयंसेवक" अतिशय प्रसन्नचित्ताने हसतमुखाने वाढीत आहेत. ही प्रतिक्रिया मला भावली कारण अहो साधे घरात देखिल बरेचदा जेवणाचे ताट समोर "आदळले" जाते सख्या नातेवाईकांकडुन, इथे तर सर्वस्वी अनोळखी माणसे एकमेकांसमोर आहेत.
सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक होती. तसेच, ३००० स्वयंसेवकांच्या सिद्धता केंद्राच्या एका तंबु करता साधारणतः १०० चे आसपास व्यवस्थेतील स्वयंसेवक होते. (नेमका आकडा मला माहित नाही). व हे सर्व विविध विभागातुन आलेले, व सहसा एकमेकांशी ओळखदेख नसलेले होते. अन तरीही, कार्यस्थानी आल्यावर प्रत्येक्जण वेळेत नेमुन दिलेले काम करु लागला. तिथे "डोक्यावर " वा हाकायला कोणीही नव्हते. (म्हणजे संघाच्या व्यवस्थे प्रमाणे अधिकारि होते, पण ते अरे "करा रे, उठा रे, बसलाय काय आळशासारखे" अशा प्रकारची आरडाओरड करायला नव्हते, तशी ओरड करावीच लागत नाही. तर अधिकार्यांचे काम काही तृटी रहात असतील, तर त्या दूर करणे, व बाकीच्यांनी अधिकार्याच्या आदेशाप्रमाणे काम करीत रहाणे.
पार्किंग
इतक्या हजारोंच्या संख्येने लहानमोठी वाहने येऊनही, कुठेही गडबड गोंधळ नाहीच, उलट ती वाहने "पार्क" करुन घेण्यासही स्वतंत्र व्यवस्था/नियोजन होते. इतकेच नव्हे तर वाहनतळाच्या जवळच, ड्रायव्हर/कंडक्टर/क्लिनर अशांसाठीही दुपारच्या भोजनाची व शिदोरीची व्यवस्था केलेली होती.
पोलीस इ. :
व्हीआयपी गेस्टबरोबरचे सोडले, तर बाकी आख्ख्या संघस्थानावर कुठेही "पोलिस" वा तत्सम यंत्रणेची उपस्थिती नव्हती. इतकेच नव्हे तर संघस्थानापासुन अंदाजे वीस किलोमीटर दुरवरुनच रस्त्यांवर/चौकाचौकात संघस्वयंसेवक बाहेरगावाहुन येणार्या वाहनांना दिशादिग्दर्शन करण्यास उपस्थित होते. यामुळे पोलिस यंत्रणेवर "व्हिआयपि गेस्ट" च्या व्यतिरिक्त कसलाही ताण नव्हता.
/=========
सरसंघचालकांच्या वास्तव्याचा शेतकरी कुटुंबासाठी संस्मरणीय ठेवा (हि माहिती मला wats अप वर आलेली आहे)..
मारुंजी गावातील एका शेतकरी कुटुंबात सरसंघचालक मोहन भागवत एक दिवस वास्तव्याला होते...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शिवशक्ती संगम’च्या निमित्ताने मारुंजी गावातील एका शेतकरी कुटुंबात सरसंघचालक मोहन भागवत एक दिवस वास्तव्याला होते आणि या काळात त्या घरातील सर्वाशी ज्या आत्मीयतेने सरसंघचालकांनी नाते जोडले, त्या आठवणी आता आधुनिक शेतकरी अशी ओळख असलेल्या राजेश भुजबळ यांच्या कुटुंबीयांसाठी मनात सदैव जपून ठेवाव्या, अशा ठरल्या आहेत.
हिंजवडीजवळील मारुंजी येथे संघाच्या प. महाराष्ट्र प्रांताचे महासंमेलन निश्चित झाल्यानंतर गेले सहा महिने सुमारे सात हजार स्वयंसेवक विविध व्यवस्थांमध्ये काम करत होते. सरसंघचालक भागवत यांची निवासाची व्यवस्था करण्यासाठी कार्यक्रम स्थळाजवळच घर असलेल्या भुजबळ यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली होती. तेव्हा त्यांच्या घराचे काम अर्धवट होते आणि त्यांना एवढय़ात ते पूर्णही करायचे नव्हते. मात्र, भागवत यांच्या वास्तव्यासाठी ती वास्तू देण्याचे ठरल्यानंतर भुजबळ यांनी १५ लाख रुपये खर्चून तीन महिन्यांत उर्वरित सर्व कामे मोठय़ा घाईने पूर्ण करून घेतली.
कार्यक्रमाच्या दिवशी, ३ जानेवारीला सकाळी दहाच्या सुमारास भागवत यांचे तेथे आगमन झाले. भुजबळ परिवारातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. या वेळी त्यांच्यासमवेत सरकार्यवाह भय्याजी जोशी हेही होते. घरात येताच त्यांनी प्रवेशद्वाराजवळील गणपतीच्या छायाचित्राला नमस्कार करून तेथे दिवा लावला. बैठकीच्या खोलीत आल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेतली. काही प्रश्न असतील तर मनमोकळेपणाने विचारा, असे मुलांना सांगितले. तेव्हा, या वयातही कामाचा व्याप आणि इतका प्रवास कसे करता, असा प्रश्न एका लहानग्याने विचारला. तेव्हा इच्छा असल्यास सर्वकाही करता येते. पहिल्यांदा एक वीट लावावी लागते, त्यावर एकेक वीट लावली की भिंत तयार होते, असे उत्तर भागवत यांनी दिले.
घरगुती जेवण असावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने ज्वारीची भाकरी, मटकीची उसळ व बटाटय़ाची भाजी, खर्डा आणि वरणभात असा जेवणाचा बेत होता. जेवणासाठी टेबलवर न बसता ते सतरंजीवर भारतीय बैठकीत बसले. राजेश यांचे वडील मुरलीधर भुजबळ यांना त्यांनी शेजारी बसवून घेतले. जेवणानंतर त्यांनी त्यांच्याशी शेतीवर चर्चा केली. शेती सर्वोत्तम असून हीच काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीवर भर दिला पाहिजे. भारतीय माती उपयुक्त असून आपल्याकडे सगळे पिकते, अशी चर्चा या वेळी झाली.
दुपारी विश्रांतीनंतर ते कार्यक्रमासाठी रवाना झाले. जाताना त्यांनी भुजबळ कुटुंबीयांनी तेथे उपस्थित राहावे, असा आग्रह केला. कार्यक्रम संपल्यानंतर रात्रीच्या जेवणात वांग्याची भाजी, भेंडीची भाजी आणि भाकरी हा बेत होता. राजेश यांची कन्या ऋतुजा वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तिच्याशी त्यांनी आहारविषयक चर्चा केली. घरातील सदस्यांशी चर्चा करताना देशहिताचे काही ना काही काम करा, असेही त्यांनी सांगितले. रात्री गादीवर न झोपता ती बाजूला ठेवून सतरंजी अंथरून ते जमिनीवरच झोपले.
मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी न्याहारीसाठी भुजबळ परिवाराने खास मिसळीचा बेत केला, तो भागवतांना खूपच आवडला. या भेटीची आठवण म्हणून घरासमोर भागवत यांच्या हस्ते फणसाचे झाड लावण्यात आले. झाड लावून पुन्हा घरात आल्यानंतर त्यांनी सर्व महिला सदस्यांना व मुलांना बोलावून घेतले. गप्पांमध्ये एका दानशूर राजाची गोष्ट सर्वाना सांगितली. त्यानंतर, सर्वाचा निरोप घेताना सर्वाना नागपूरला येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले आणि येताना त्या झाडाचे फणस आणि बागेतील पेरू आणण्याची सूचनाही त्यांनी गमतीने केली.
अविस्मरणीय क्षण
मोहन भागवत यांची भेट हा आमच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याची भावना राजेश भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सोमवारी व्यक्त केली. अतिशय साधी राहणी व उच्च विचार असणाऱ्या या व्यक्तीसोबतचा हा सहवास आमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण ठेवा आहे असे ते म्हणाले.
- See more at: http://www.loksatta.com/pune-news/memorable-stay-sarasanghacalak-family-...
पुढे भाषणाबद्दल लिहायचे होते थोडे. पण जौद्या आता.. भानगडी न् मारामाऱ्या नको उगाच..
भिन्न भिन्न जातित लग्न लावणे
भिन्न भिन्न जातित लग्न लावणे हा जातिअंताचा उपाय आहे संघाला हा विचार झेपेल? >>>.
पगारेजी मला या प्रश्नाला उत्तर द्यायचे नव्हते .. उगाच काहीतरी नव्या वादाला तोंड फुटेल म्हणून,
पण आत्ता तुम्ही हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारलात सो..,
तुम्हाला वाटतो तितका संघ काही मागासलेल्या विचारांचा नाही. संघाचा विस्तार इतका आहे कि संघात असा विवाह केलेले लोक सुद्धा नक्कीच असतील.
एकतर विवाह हि वैयक्तिक बाब आहे. कोणी आंतरजातीय विवाह केला तर संघाने त्याला विरोध करण्याचे काही कारणच नाही. कारण कोणत्या 'जातीचे' लोक काय करतायेत वगेरे हा संघाचा विषयच नाही..
दुसरे म्हणजे मला वाटते 'उपाय' म्हणून 'आंतरजातीय विवाह संघाने 'घडवून' आणावेत' असं तुम्ही म्हणता आहात. पुन्हा तीच गोष्ट आहे. संघाने कोणत्या जातीला काय करावे काय नाही हे सांगण्याचे प्रयोजन काय.? संघात कोणत्याही एका जातीचे लोक नाही. सर्वच आहेत.
माझ्या मते असे विवाह 'घडवून आणणे' औघड आहे. कारण कोणी कोणाला विवाहासारख्या वैयक्तिक गोष्टीबद्दल कसा काय सल्ला देईल आणि तो ऐकून कोण घेईल.?
एक मात्र होऊ शकते कि आंतरजातीय विवाह स्वेच्छेने करायचे झाल्यास फक्त 'दुसऱ्या जातीचा' म्हणून विरोध होता कामा नये याकरता प्रबोधन केले जाऊ शकते.
तस आता काळ बऱ्याच प्रमाणात बदललेला आहे.. आंतरजातीय विवाह खूप चांगल्याप्रकारे स्वीकारले जात आहेत.
या निमित्ताने मला एक जुने वाचलेले आठवले. सावरकरांनी अंदमानहून परतल्यावर जे जाती निर्मूलनाचे कार्य हाती घेतले होते त्यात एका जातीच्या (कुठल्या ते लक्षात नाही) मेळाव्यामध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आले होते. त्या वेळी त्यांना असाच काहीसा प्रश्न विचारण्यात आला होता. (पूर्ण तपशील लक्षात नाही.)
सावरकर त्या वेळी ज्यांना मंदिर प्रवेशाचा अधिकार नाकारण्यात आला होता अशांकडून सामूहिकरीत्या सत्यनारायण पूजन करवून घेत असत.
दुसरे म्हणजे मला वाटते 'उपाय'
दुसरे म्हणजे मला वाटते 'उपाय' म्हणून 'आंतरजातीय विवाह संघाने 'घडवून' आणावेत' असं तुम्ही म्हणता आहात. पुन्हा तीच गोष्ट आहे. संघाने कोणत्या जातीला काय करावे काय नाही हे सांगण्याचे प्रयोजन काय.? संघात कोणत्याही एका जातीचे लोक नाही. सर्वच आहेत.}}}}}{{{ ह्या जातीच नष्ट करण्याबाबत संघाने पुढाकार घ्यावा असे माझे म्हणणे आहे.
मी संघाचा समर्थक वगैरे नाही
मी संघाचा समर्थक वगैरे नाही पण अगदी ठरवून भिन्न जातीय विवाह केलेले संघाचे लोक पहाण्यात आहेत. संघात जातीवाद पाळला जात नाही व उलट विविध जातीच्या मुलंच्या घरी "सहज" जाऊन पाणी पिणे, त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावणे वगिअरे चालते.
आरे हो.. मी मागेच हे लिहिणार
आरे हो.. मी मागेच हे लिहिणार होतो तुम्हालाच पण राहून गेले..
मला वाटते तुम्ही सुरुवातीपासून धागा फॉलो करत नव्हतात, त्यामुळे तुमच्याकडून काही पोस्टी मिस झाल्या..
आता त्या वाहून गेल्यात म्हणून मी थोडक्यात पुन्हा लिहितो..
संघाच्या आत्ताच्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांनी समाजात समरसता आणणे जातीभेद नष्ट करणे याच मुद्द्यांवर भर दिला होता.
त्यात ते म्हणाले कि जातीभेद हा केवळ कायद्याने नष्ट होणार नसून तो मनातून उखडून टाकणे गरजेचे आहे. त्याकरिता संघाचे पूर्वीपासून काही उपक्रम सुद्धा चालू आहेत.
त्यातील एका उपक्रमाची सुरुवात करताना संघाने ती कशा प्रकारे केली ते त्यांनी उदाहरणादाखल भाषणात सांगितले ते असे, काळाराम मंदिरात ज्यांना एके काळी प्रवेश नाकारण्यात आला होता, ज्याकरता डॉ. आंबेडकरांना संघर्ष करावा लागला, त्या मंदिरात त्यांच्या हाताने पूजा करून त्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
भाषणाचा व्हिडियो मिळाल्यास बघा.
तात्पर्य, संघ जातीनिर्मूलनावर अगोदरपासून काम करीत आहे. संघाचे एक लाखाहून अधिक सामाजिक उपक्रम चालू आहेत. ते आपापले शांतपणे काम करत असतात त्यामुळे कुठे बोलबाला होत नाही न् सामान्य जनतेपर्यंत ते फारसे पोहोचत नाहीत.
पगारे मी आता संघाशी संबंधित
पगारे मी आता संघाशी संबंधित नाही. पण माझ्या पाहण्यात कित्येक संघाचे शिक्षक कार्यकर्ते आंतरजातीय विवाह केलेले आहेत. माझाच वर्गमित्र बहुतेक कानडी ब्राह्मण असावा जो संघ शिक्षक होता याची बहिण दुसरे एक तालुका प्रमुख कुंभार होते त्यांच्याशी झाला आहे.
प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हे अजून एक उदाहरण. मुद्दाम उत्तेजन देऊन संघ कार्यकर्ते आंतरजातीय विवाह करताना पाहिले आहेत.
माझ्या नात्यातले अनेक लोक ज्यांचा संघाशी काडीचा संबंध नाही ते जातेयवाडी आहेत. मी ज्या भागातून आलो आहे तिथले राजकारण मराठा समाजाच्या हातात आहे. त्यातले अनेक शेती व इतर कामामुळे जवळून संबंधित आहेत. कुणीही संघाशी दुरुऊन संबंधित नाही. त्यांची जात या विषयावरील मते अत्यंत प्रतिगामी आहेत. आंतरजातीय विवाह ही विचारसुद्धा करण्याच्या पलीकडील गोष्ट आहे.
तेव्हा संघ हा जातीव्यवस्थेला मान्यता देणारी संघटना आहे हा विचार सोडा. शत्रूची विरोधी विचाराच्या लोकांची माहिती अचूक असावी. संघ हिंदू सोडून भारत म्हणू लागला तर पुरोगामी होईल
यावर बरीच चर्चा झाली, बऱ्याच
यावर बरीच चर्चा झाली, बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या ज्यातून आपल्याला चित्र अधिक स्पष्ट झाले असते. पण ते वाहून गेले.. असो..
संघस्वयंसेवकांमध्ये जो अप्रतिम बंधुभाव असतो (मग डायरेक्ट ओळख असो वा नसो) त्याला काही तोडच नाही पगारेजी. यामध्ये आमच्या मनात समोरच्याची जात कोणती याचा नुसता विचार येणे हेहि केवळ अशक्य आहे. कित्येकदा वेगवेगळ्या भागातील स्वयंसेवकांची भेट होते त्यांचे आम्हाला पूर्ण नाव देखील माहित नसते. तरीही त्याच्याशी तेवढ्यात बंधुभावाने गप्पा चहा, पाणी अगदी घरी जाऊन जेवण सुद्धा होते..
संघ हा ६०,७० लाख कदाचीत एक कोटी सदस्य संख्या असलेले एक कुटुंबच आहे..
उत्तम माहितीसाठी धन्यवाद
उत्तम माहितीसाठी धन्यवाद प्रकु, राजसी, टण्या, विजय कुलकर्णी.
आणि सकुरा व पगारे यांचे विशेष धन्यवाद- त्यांनी प्रश्न विचारल्यामुळे संघाच्या चांगल्या कार्याविषयी इथे सर्वांना लिहिता आलं..संघाची भूमिका सकारात्मकरित्या मायबोलीच्या वाचकांपर्यंत पोचली.
@प्रकु- कापोचेंनी तुम्हाला लिहिलं होतं नवीन धागा काढण्याबद्दल. कुठेतरी ही सर्व माहिती एकत्र कायमस्वरुपी राहिल्याशी मतलब. तुम्ही फोटो टाकणार होता ना..मे बी त्या धाग्यात ही माहिती टाकता येईल?
होय सनव, मी ते वाचले होते
होय सनव, मी ते वाचले होते परंतु मला नक्की कशावर धागा काढावा ते पट्कन लक्षात आले नाही. विचार करून काढतो. अथवा तुम्हाला सुचल्यास सांगा.
फोटो टाकतो लवकरच. कामाच्या गडबडीमुळे ती प्रोसेस पाहणे शक्य झाले नाही..
पुन्हा एकदा सनव च्या प्रतिसादास संपूर्ण अनुमोदन. त्यात नमूद केलेल्या सगळ्यांचे आभार ..
सुचले. काढतो नवीन धागा आता..
सुचले. काढतो नवीन धागा आता..
.
.
टण्याला अनुमोदन. मी
टण्याला अनुमोदन. मी संघपरिवारात वाढले. असंख्य कार्यकर्त्यांशी बोलणे झाले, ऐकले. एकदाही जातीवर कोणी काही म्हटले नाही. पगारे, मोगा त्यांच्यापेक्षा तुम्हीच जातजात जास्त करता असे माझे एकुण मत झाले आहे. इथेपण आम्ही शाखेत जातो. मस्त वाटते.
टण्या, मुंडे महाजन विवाहाचा
टण्या,
मुंडे महाजन विवाहाचा इतिहास वेगळा आहे. त्याला उत्तेजन वगैरे काहीही नव्हते. याबद्दल आधी ऐकले होते, नंतर कधीतरी सकाळ मधे पंडीतराव मुंडेंच्या गुंडगिरीबद्दल एक लेख आलेला त्यात उल्लेख होता. त्याबद्दल इथे लिहीणे योग्य होणार नाही.
मी संघाशी अजिबात संबंधीत
मी संघाशी अजिबात संबंधीत नाही. किंबहुना दोन अडीच वर्षापूर्वी संघाबद्दल मला काहीच माहिती ( असलीच तर थोडी निगेटीव्ह) नव्हती. पण पूर्वांचलात प्रवास करताना संघाचे लोक कसे काम करतात आणि कशी सगळ्यांनाच मदत करतात. समोरच्या माणसाला पहिल्यांदाच भेटत असले तरी संघाचे असल्यावर किती बंधुभावाने वागतात हे पाहीले आहे. पूर्वांचला च्या आदिवासी आणी अतिदुर्गम भागातही गेले साठ एक वर्ष यांचे कार्य सुरु आहे. जन्मत:च प्रतिकुल परिस्थिती आहे म्हणुन त्याला तोंड देणे वेगळे आणि सगळं सोडुन तिथल्या प्रतिकुल परिस्थितीतही वर्षानुवर्ष कार्यरत रहाणे वेगळे. हे मी फक्त एकाच ठिकाणी पाहिले, पण सगळ्या भारतभर यांचे कार्य चालते असे मला तेव्हा लक्षात आले. त्यासाठी मला त्यांचा फार आदर वाटतो. ( बाकी काही प्रतिगामी मतेही आहेतच जी मला पटत नाहीत, पण त्यामुळे त्यांचे काम छोटे होत नाही)
संघस्वयंसेवकांमध्ये जो अप्रतिम बंधुभाव असतो (मग डायरेक्ट ओळख असो वा नसो) त्याला काही तोडच नाही >> याचा अनुभव आला आहे.
संघ जातपात मानत नाही,
संघ जातपात मानत नाही, आंतरजातिय विवाह त्यांच्यात करतात हे चांगले आहे पण मुळ प्रश्न बाजुलाच राहिला ते जात निर्मुलनाचा प्रश्न का घेत नाहीत का जाती राहण्यातच त्यांचा फायदा आहे?
या सगळ्या प्रश्नांचा त्या
या सगळ्या प्रश्नांचा त्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनेशी काय संबंध आहे लोकहो?
संघाची वैचारिक भूमिका काय किंवा संघ काय करतो इत्यादीवर चर्चा करायला वेगळा धागा आहे.
इथे त्यादिवशी कार्यक्रम कसा आयोजित करण्यात आला त्यावरच चर्चा झाली असती तर बरं झालं असतं.
ते गेलं ना सगळे वाहुन
ते गेलं ना सगळे वाहुन त्यामुळे आता वर जे उरलय त्याबद्द्लच बोलणे सुरु झाले. दुसर्या धाग्यावर कोणी काहीच बोलत नाहिये बहुतेक.
यापुढे इकडे प्रतिसाद घालू
यापुढे इकडे प्रतिसाद घालू नका.
http://www.maayboli.com/node/57107 >> इथे या.
अर्थात व्यवस्थे बद्दल असतील तर इथे टाकू शकता. फक्त हा धागा वाहत झाला आहे तेव्हा ते राहतीलच असे नाही..
>>>>> संघ जातपात मानत नाही,
>>>>> संघ जातपात मानत नाही, आंतरजातिय विवाह त्यांच्यात करतात हे चांगले आहे पण मुळ प्रश्न बाजुलाच राहिला ते जात निर्मुलनाचा प्रश्न का घेत नाहीत का जाती राहण्यातच त्यांचा फायदा आहे? <<<<<
पगारेजी, तुम्ही पुन्हा पुन्हा दळण त्याच एका मुद्यावर आणुन संघ का करत नाही असे "जाबयुक्त" विचारत आहात, तर मग मीच तुम्हाला म्हणतो की तुम्हीच का नाही जात काल परवाच्या त्या "सोलापुरच्या" आंतरजातिय विवाहामुळे खून झालेल्या केस बाबत जात निर्मुलन अन समाज प्रबोधन करायला ? सोलापूर लांब वाटत असेलच, तर जवळच कोल्हापुरही आहे.... नै का? तुम्हीच जावा ना, त्याकरता तुम्हाला जाणून बुजुन "संघच" कशाला हवाय ?
अन या सगळ्याचा संबंध "संघाच्या एका कार्यक्र्माच्या व्यवस्थेच्या/शिस्तीच्या" वर्णनात ओढुन ताणून परत परत का आणताय?
लिंबुदा, ते मा. सचिनजी
लिंबुदा, ते मा. सचिनजी पगारेजी कपडे सांभाळाणार्यांपैकी आहेत.