एका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2016 - 02:07

कळ कळीची विनंती - शीर्षकापासून आतला कंटेन्ट काहीही हास्यास्पद वाटला तर जरूर थट्टा मस्करी करा.
पण धागा ईतकाही भरकटवू नका की इथे कोणी दिलेला योग्य सल्ला त्यात हरवून जाईल.
कारण प्रॉब्लेम खरेच फार जेन्युईन आहे.

थेट मुद्द्यावर यायच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो.
लहानपणापासून माझ्या जेवणाच्या कलेचे कौतुक होत आलेय. ताटात हवे तेच आणि हवे तेवढेच घेणार. नासाडी जराही करणार नाही. ताटातले पदार्थ जागच्या जागी सजवून घेणार. हात खरकटे करत कधी डाळभात खाणार नाही. ताटाबाहेर कधी एक शितही सांडणार नाही. ओल्या भाजीचा रस्सा ओघळत लोणच्यात गेलाय, पापड भातावर ओवरलॅप होत नरम पडलाय, एखादा आवडीचा पदार्थ हावरटासारखा पहिल्याच वाढणीत भरमसाठ घेतलाय वगैरे वगैरे प्रकार दिसणार नाहीत. अगदी शेजारी बसलेला अनोळखी व्यक्ती सुद्धा माझी जेवनशैली पाहता स्वताहून कौतुकाचे दोन शब्द बोलायचा.

तर हे वरचे गुण आजही अंगी नांदत आहेत. पण यांची किंमत शून्य करणारा एक दुर्गुण माझ्या ग’फ्रेंडला माझ्यात सापडला आहे. तो म्हणजे, तिच्यामते जेवताना किंवा काहीही खाताना माझ्या तोंडून आवाज येतो.. मचाक मचाक मचाक ..

आधी मला हा ईतका गंभीर प्रकार वाटला नाही. दरवेळी तिने आक्षेप घेताच मी काहीतरी विनोदी कारण सांगून वेळ मारून न्यायचो. पण आता यातील वारंवारता ईतकी वाढलीय की यातील विनोदही संपून गेलाय. अर्थात या कारणावरून लगेच आमचा ब्रेक अप होईल असे काही नाही... पण तसे खात्रीने सांगताही येत नाही. परिणामी तिच्यासोबत हॉटेलमध्ये खाताना काय मागवावे जेणेकरून तोंडाचा आवाज कमी होईल याचा विचार करता मी आजकाल ज्यूस आणि कॉफीवरच भागवू लागलोय. नात्यासोबत तब्येतीचीही हेळसांड होऊ लागलीय.

गर्लफ्रेंडने शेवटचे फर्मान सोडले आहे. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी आता यापुढे खाताना तोंडाचा आवाज करणार नाहीये. प्रॉब्लेम असा आहे, जर मला कुठले बिडीकाडीचे व्यसन असते तर रडत रडत सोडलेही असते. पण तोंडाचा होणारा आवाज सोडण्यासाठी आधी तो निर्माण कसा होतो हे तरी समजायला हवे.

१ जानेवारी उजाडल्यापासून मी फावल्या वेळेत विविध खाद्यपदार्थ खाऊन, कोणत्या पद्धतीने खाताना तोंडाचा किती आवाज होतो आणि तो कश्याप्रकारे कमी करता येईल, हे घरच्या आरश्यात चेक करत आहे. तरी नेमका उपाय सापडत नाही. म्हणून इथे मदत मागत आहे.

तर खालीलप्रकारची मदत अपेक्षित आहे.

१) तोंडाचा आवाज होणे हे शारीरीक जडणघडणीशी निगडीत असते की चर्वणाच्या सदोष पद्धतीमुळे हा आवाज येतो? या ध्वनीनिर्मितीचे नेमके कारण काय?
२) यावर उपाय काय? पहिले कारण असल्यास एखादी सर्जरी वा तोंडाचा व्यायाम सुचवा. दुसरे कारण असल्यास घास कसा चावावा याचे तंत्र सांगा. गप्पकन गिळायचा असले अघोरी विनोदी उपाय नकोत.
३) सर्जरी असल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेम करता येतो का? की ते डोळ्यांच्या लेजर ऑपरेशन सारखे कॉस्मेटीक मध्ये मोडते?
४) काही वेगळेच कारण आणि काही वेगळाच उपाय असतो का? मी माझ्या सायंटीफीक कल्पनाशक्तीला ताण देत आहे पण काही सुचत नाहीये.

सहकार्य कराल अशी अपेक्षा
धन्यवाद
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता "मचाक" "मचाक" खाण्यावर सल्ले विचारतो आहेस . पुढच्या धाग्यात तोषाने सांगितल्याप्रमाणे "घुर घुर्र्र्र्र घुर्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र धर्र्र फुस्स फुस्स " ( अर्थात घोरणे ) कसे बंद करावे म्हणून विचारशील.. इथे जसे तोंड बंद करून खावे असे सल्ले मिळताहेत तेव्हा तिथे नाकं बंद करून झोपावे ( म्हणजे कसे ? )असे सल्ले मिळतील. म्हणजे घोरणे दुसर्याला ऐकू जाणार नाही . आईग कहर Lol

अहो पण मी घोरतच नाही .. धाग्यासाठी खोट्या सवयी का लिहू .. खर्‍या वाईट सवयींना काही कमतरता नाहीये Happy

Rofl घास तोंडात ठेवताना तोंड उघडून मग तोंड बंद करणे आणि तो घास गिळुन झाल्यावर पुढच्या घासासाठी तोंड उघडणे असं म्हणायचे होतं मला.

आवाज काय एव्हढेच असतात काय ?
>>>
नाही, कानात बोट घालून हलवल्यावर चकचकचक आवाज येतो. गंमत म्हणजे आपल्याला तो केवढा मोठा येतोय हे कळत नाही. आपल्याला वाटत असते की तो आतल्या आतच होतोय. पण थोड्यावेळाने गर्लफ्रेंड बोलते, आता बस रे नाहीतर कानातना रक्त काढशील. पण हा आवाज ईतकाही ईरीटेटींग नसावा कारण हे ती थोड्या वेळाने बोलते Happy

मग काढू का धागा डोळा मारा
>>

बिंधास ... गटग प्लांनिंग २, गटग १ आणि नंतर किमान ३ ४ वृत्तांत ... असे साताठ धागे होतील.
मस्त मटेरीअल.

३) तात्या - ज्यूस, प्रोटीन आणि दुध शेक पीत जा. वजनही आटोक्यात राहील >> पौष्टिक माझ्या अंगाला लागत नाही. अशक्तपणा येतो.
४) तात्या - घास तोंडात ठेवतांना कमी बोलणे >> गर्लफ्रेंड बरोबर असताना कमी बोललो तर तूला माझ्याशी बोलायचेच नसते या आरोपावरून जास्त फायरींग होते.

>>

हे फायरिंग पार्ट ऑफ लाईफ असते. कितीही बोललास तरी हे होणारच Wink

१००

राकुंच्या तुलनेत बाळ ऋ मागे पडत आहे असे वाटल्याने मेन्युकार्ड

गर्लफ्रेण्डच्या वाईट सवयी. भाग १, २,३, ..........
गर्लफ्रेण्डच्या चांगल्या सवयी. भाग १, २,३, ..........
एमएनसीतले स्पायडर्स (धागे विणणारे )
एमएनसीतले माझे नेमके काम काय ?
एमएनसीतले आधुनिक वातावरण आणि मी
अगं अगं म्हशी मला कुठं नेशी , (गफ्रे नाही, आंबट सिनेम्यांवरचे धागे )
माझा चरखा, टकळी आणि राकुंची स्पिनिंग मिल...

( येतो पुन्हा )

Pages