एका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2016 - 02:07

कळ कळीची विनंती - शीर्षकापासून आतला कंटेन्ट काहीही हास्यास्पद वाटला तर जरूर थट्टा मस्करी करा.
पण धागा ईतकाही भरकटवू नका की इथे कोणी दिलेला योग्य सल्ला त्यात हरवून जाईल.
कारण प्रॉब्लेम खरेच फार जेन्युईन आहे.

थेट मुद्द्यावर यायच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो.
लहानपणापासून माझ्या जेवणाच्या कलेचे कौतुक होत आलेय. ताटात हवे तेच आणि हवे तेवढेच घेणार. नासाडी जराही करणार नाही. ताटातले पदार्थ जागच्या जागी सजवून घेणार. हात खरकटे करत कधी डाळभात खाणार नाही. ताटाबाहेर कधी एक शितही सांडणार नाही. ओल्या भाजीचा रस्सा ओघळत लोणच्यात गेलाय, पापड भातावर ओवरलॅप होत नरम पडलाय, एखादा आवडीचा पदार्थ हावरटासारखा पहिल्याच वाढणीत भरमसाठ घेतलाय वगैरे वगैरे प्रकार दिसणार नाहीत. अगदी शेजारी बसलेला अनोळखी व्यक्ती सुद्धा माझी जेवनशैली पाहता स्वताहून कौतुकाचे दोन शब्द बोलायचा.

तर हे वरचे गुण आजही अंगी नांदत आहेत. पण यांची किंमत शून्य करणारा एक दुर्गुण माझ्या ग’फ्रेंडला माझ्यात सापडला आहे. तो म्हणजे, तिच्यामते जेवताना किंवा काहीही खाताना माझ्या तोंडून आवाज येतो.. मचाक मचाक मचाक ..

आधी मला हा ईतका गंभीर प्रकार वाटला नाही. दरवेळी तिने आक्षेप घेताच मी काहीतरी विनोदी कारण सांगून वेळ मारून न्यायचो. पण आता यातील वारंवारता ईतकी वाढलीय की यातील विनोदही संपून गेलाय. अर्थात या कारणावरून लगेच आमचा ब्रेक अप होईल असे काही नाही... पण तसे खात्रीने सांगताही येत नाही. परिणामी तिच्यासोबत हॉटेलमध्ये खाताना काय मागवावे जेणेकरून तोंडाचा आवाज कमी होईल याचा विचार करता मी आजकाल ज्यूस आणि कॉफीवरच भागवू लागलोय. नात्यासोबत तब्येतीचीही हेळसांड होऊ लागलीय.

गर्लफ्रेंडने शेवटचे फर्मान सोडले आहे. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी आता यापुढे खाताना तोंडाचा आवाज करणार नाहीये. प्रॉब्लेम असा आहे, जर मला कुठले बिडीकाडीचे व्यसन असते तर रडत रडत सोडलेही असते. पण तोंडाचा होणारा आवाज सोडण्यासाठी आधी तो निर्माण कसा होतो हे तरी समजायला हवे.

१ जानेवारी उजाडल्यापासून मी फावल्या वेळेत विविध खाद्यपदार्थ खाऊन, कोणत्या पद्धतीने खाताना तोंडाचा किती आवाज होतो आणि तो कश्याप्रकारे कमी करता येईल, हे घरच्या आरश्यात चेक करत आहे. तरी नेमका उपाय सापडत नाही. म्हणून इथे मदत मागत आहे.

तर खालीलप्रकारची मदत अपेक्षित आहे.

१) तोंडाचा आवाज होणे हे शारीरीक जडणघडणीशी निगडीत असते की चर्वणाच्या सदोष पद्धतीमुळे हा आवाज येतो? या ध्वनीनिर्मितीचे नेमके कारण काय?
२) यावर उपाय काय? पहिले कारण असल्यास एखादी सर्जरी वा तोंडाचा व्यायाम सुचवा. दुसरे कारण असल्यास घास कसा चावावा याचे तंत्र सांगा. गप्पकन गिळायचा असले अघोरी विनोदी उपाय नकोत.
३) सर्जरी असल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेम करता येतो का? की ते डोळ्यांच्या लेजर ऑपरेशन सारखे कॉस्मेटीक मध्ये मोडते?
४) काही वेगळेच कारण आणि काही वेगळाच उपाय असतो का? मी माझ्या सायंटीफीक कल्पनाशक्तीला ताण देत आहे पण काही सुचत नाहीये.

सहकार्य कराल अशी अपेक्षा
धन्यवाद
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैताई,
भारतीय माणसांचा हाच प्रॉब्लेम आहे बघा!
एखाद्याला शारिरीक व्याधी आहेत असे सुचवून इलाज घ्यायला सजेस्ट केले तर काही वाटत नाही पण मानसिक व्याधी असू शकतात असे म्हटले तरी आपल्याला राग येतो.

आता मी आपली फक्त म्हणत्येय की ही अमुक तमुक आजाराची सुरूवात असू शकेल तर इवॅल्युएशन करून घ्या.
तर लगेच तुम्ही दोघी परदेशस्थ भारतीय आणि हे एक इथलेच भारतीय लगेच वैतागले.

(म्हणजे तुम्ही समजून इमजून खोट्या खोट्या वैतागलात हे माहित आहे. Happy )

सातींतैँ चे दोन्ही प्रतिसाद अगदी अनुमोदन.
घास चावताना येणारा आवाज न आवडणे आणि सवय बदलण्या साठी सांगणे दोन्हीटी फरक आहे अस वाटत.
घास चवतांना आवाज आला काय न आला काय...काय फरक पडतो राव.काहीही नखरे असतात आजकाल. Happy

तिला होणाऱ्या खऱ्या त्रासाचा उपाय म्हणून आपण काल्पनिक गोष्टीबद्दल तक्रार करावी हा उपाय रोगापेक्षा गंभीर आहे. कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये.

बाकी मायबोलीवरचे सगळे धागे वाचलेच पाहिजेत अशी काही जबरदस्ती नाही. ज्यांना वेळ आहे ते वाचतील, ज्यांना अजून वेळ आहे ते प्रतिसाद देतील आणि जे खूप बिझी असतील ते इग्नोर मारतील.

अरे देवा! सातीच्या पोस्टचा असा अर्थ निघु शकतो?:अओ:

१) एक तर मला सातीची ही पोस्ट चान्गल्या उपहासाने ( उपहास हा खवचट पद्धतीनेच असतो असे काही नाही, एखाद्याचे भले व्हावे किन्वा त्याने नाण्याची दुसरी बाजू पण पहावी असा असतो. समजणार्‍याला ते समजले म्हणजे झाले) लिहीलेली वाटते.

हो, शारीरीक व्याधी दिसुन येतात, पण मानसीक व्याधी अजीबात दिसत नाहीत, आणी ते दु:ख कुणीही स्पष्टपणे व्यक्त करत नाही. एखाद्या सायकॉलॉजीस्ट कडे गेले म्हणजे जाणारी व्यक्ती वेडीच आहे किन्वा असेल किन्वा असु शकते असे का समजले जाते? जवळचाच माणुस काही नीट सुचवत नसेल तर डॉक्टर ते सुचवु शकतात की. उगाच त्याचा अभ्यास होतो का? मला पण कधी कधी डॉ कडे जाऊन मनातले बोलावेसे वाटते, पण तेवढा वेळही ( तशा सिटिन्ग्ज् ) देऊ शकत नाही.

ऋन्मेष, लहान मुलासारखे प्रश्न विचारु नकोस, तू नोबिता जास्त पहात असावा असे मला वाटते. तो नोबिता आणी डोरेमॉन खाताना सारखे उम्मा उम्मा असे आवाज काढत असतात.

अरे वा! कधी प्रत्यक्ष न भेटलेल्या व्यक्तीस (गफ्रेचा मायबोली आयडी नसल्याने इथे तर वर्चुअल ओळख सुद्धा नाहीये, फारच डिफिकल्ट केस) मानसिक उपचारांची गरज आहे असं सांगितलेलं चालतं वाटतं मायबोलीवर. मोठीच क्रांती म्हणायची ही.

तर ऋन्मेष, जेवताना मचमच आवाज करू नयेच. घास घेतला की तोंड मिटून चावावा/खावा. तोंडात घास असताना बोलू नये. या सगळ्या सवयी तुमच्या गर्लफ्रेंडला असाव्यात असे वाटते. तुम्ही पण लावून घ्या. आणि काय हो ऋन्मेषभाऊ, आरशात बघण्याऐवजी किंवा इथे येउन धागा काढून सल्ला विचारण्याआधी तिलाच विचारायचेत ना, कमीत कमी निरिक्षण तरी करायचेत ती काही खाते तेव्हा.

बोटंच चालेनाशी झालीत. अनेक सल्ल्यांचे काहूर बोटांमधे उठलेले आहे.

सर्वात पहिला सल्ला असा आहे की जेवण बंद करून टाक. किंवा डॉक्टरकडे जाऊन पोटाला उघडता बंद करता येईल असे दार बसवून घे. जेवण आत ढकललं की दार बंद करायचं.

आता ते लिव्हरवालं कुलूप असलेलं करायचं, लॅचचं करायचं की करायचं हे तुझं तू ठरव बाबा. माबोकरांनाच सर्व विचारायचे असेल तर मग अवघड होईल ...

(नाजूक विषय म्हटल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की बायकोला न कळवता गर्लफ्रेण्डबरोबर मधुचंद्राला गेलास आणि काही अडचण आलीय की काय, खरं म्हणजे या विषयावरही आधी बायकोचंच मत घ्यायचं होतं. तिने हा प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवला असता. तुझ्या गर्लफ्रेण्डला जेवतानाचाच काय कसलाही आवाज नसता आला पुढच्या आयुष्यात )

>>>अरे वा! मग आता कधी न भेटलेल्या व्यक्तीस मानसिक उपचारांची गरज आहे असं सांगितलेलं चालतं वाटतं मायबोलीवर. मोठीच क्रांती म्हणायची ही.<<<

Lol

.

आणखी एक पर्याय असा..

टूमचऑरनॉटटूमच हे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करून घे. भिकबळीप्रमाणे एक छोटं उपकरण जीभेवर बसवून देतात जे ब्ल्यूटूथ द्वारे चालते. जेवताना अ‍ॅप चालू केल्यास जीभ पिरगाळली जाऊन मच मच असा आवाज होत नाही. आपल्याला सुरूवातील टू मच असे वाटते खरे पण नंतर हे मच मच आवाजापेक्षा ते टू मच नॉट असेच वाटते.

नोबिता आणी डोरेमॉन खाताना सारखे उम्मा उम्मा असे आवाज काढत असतात <<<

हो तिथे जपान मधे एक पदार्थ खातान आवाज करुन खातात आणि तसा आवाज करणे चांगले समजतात.
म्हणजे तो पदार्थ आवडला टेस्ट आहे असा काहिसा अर्थ होतो.
पदार्थाचे नाव विचारुन उद्या सांगते.
तुझ्या गफ्रे ला सांग मागच्या जन्मी मी नोबिता होतो.

ऋन्म्या लेका धाग्याच नाव असं काहीतरी विचित्र ठेवतोस, गैरसमज होतात ना.
वर बर्‍याच जणांनी उपाय सुचवले आहेत तर लगे हात मी पण सुचवतो Proud
तोंडात दोन स्टील बॉल साधारण २० mm चे( काचेचे नको नाहीतर चावुन भुग्गा करशील ) दोन्ही साईडना ठेव जेवताना , (गिळु नकोस नाहीतर सगळचं बंद होईल Proud ) बॉलच्या प्रेझेंसमुळे आपोआप हळु हळु घास खाऊ लागशील आणि मचाक मचाक आवाज बंद होईल. Proud

आता पर्यंत आलेल्या सर्व सल्ल्यांचे धन्यवाद.
वाचायला, त्याचे आकलन व्हायला, आणि शक्य तिथे प्रतिसाद द्यायला थोडा वेळ द्या.

समस्या इथे का मांडली ती एक गंमत आहे पण जाऊ द्या, त्याला काही उपाय नाही. ऋ भौंचं धागे काढण्याचे अ‍ॅडिक्शन ते स्वतःही मान्य करतात त्यामुळे तो विषय काढून उपयोग नाही.
बाकी समस्या सांगितल्यावर त्यावरुन डायरेक "मात्र ही समस्या तुझी नसून तुझ्या गर्लफ्रेंडची आहे." हे असं कन्क्लुजन अचाट आहे टोटली!
ह्या वरच्या वाक्यामध्ये कुठेही पुढच्या पोस्टीतला "आता मी आपली फक्त म्हणत्येय की ही अमुक तमुक आजाराची सुरूवात असू शकेल तर इवॅल्युएशन करून घ्या." अविर्भाव प्रकट होत नाहीये. ही समस्या तुझी नसून कदाचित गर्लफ्रेंडची असू शकते असं काहीसं लिहिलं असतं तर ठीक होतं.

एनिवे, गर्लफ्रेंड सोडून अजून एक दोन नॉर्मल जणांना समोर बसून जेवलात आणि त्यांना विचारलं तरी कळेल की खरच आवाज जास्त आहे की गर्ल फ्रेंडचे कान खुपच सेन्सिटिव आहेत.

सातीआक्का रुन्म्याचे लाड करण्यात वाहवत जातात. ओ तुमी डॉक्टर आहात ते या प्रेमात विसरू नका. तुमी लिवलेलं लोकं शिरियश घेऊन र्‍हायल्याती.

पहिले कारण असल्यास एखादी सर्जरी वा तोंडाचा व्यायाम सुचवा>> हे वाचून दिमांनी पण काय जोकवाला उपाय लिवला तर त्या उपायाचं पन ऑपरेशन व्हयीलच की!

भोगा आपल्या प्रेमाची, आपलं ते लाडाची, म्हंजे कर्माची फळं!

सर्वांचे धन्यवाद ..

१) जयंत - तु चुईंगम चघळ >> चुईंगम चघळण्याचा उपाय करून झालाय. मचाक मचाक ऐवजी पचाक पचाक आवाज येण्यास सुरुवात झालेली ईतकाच काय तो फरक.

२) हर्षल - लाळ कमी गळेल असे जेवण जेव >> मी मांसाहारच करतो आणि मांसाहाराच्या नावानेच अर्धा वाटी लाळ जमा होते.

३) तात्या - ज्यूस, प्रोटीन आणि दुध शेक पीत जा. वजनही आटोक्यात राहील >> पौष्टिक माझ्या अंगाला लागत नाही. अशक्तपणा येतो.
४) तात्या - घास तोंडात ठेवतांना कमी बोलणे >> गर्लफ्रेंड बरोबर असताना कमी बोललो तर तूला माझ्याशी बोलायचेच नसते या आरोपावरून जास्त फायरींग होते.

५) अग्निपंख - ताक नेहमी प्रमाणे जिलबी वाचलेली नाही >> ताक नेहमीप्रमाणे प्यायलो, जिलेबी चावलेली नाही. असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यात काही ऊपाय लपलाय का? ताक प्या, जिलेबी चावू नका चघळा, वगैरे वगैरे..

६) साती - मात्र ही समस्या तुझी नसून तुझ्या गर्लफ्रेंडची आहे >> पुढे दिलेल्या सल्यावरून उगचच गदारोळ झाला आहे. समस्या माझ्या गर्लफ्रेंडची असेल तर धागा ती काढेल ना Happy

७) दक्षिणा - हा धागा इयत्ता दुसरीच्या मुलाचा वाटतोय >> त्यादिवशी शिवीगाळीच्या धाग्यावर मी पंचवीसचे वय बावीस केले तर एकादोघांनी आक्षेप उठवला. आपण ईयत्ता दुसरीचा म्हणजे दहाच्या आत कराल तर गदारोळ उठेल. जोक्स द अपार्ट, या आधी आपण सुचवलेले उपाय कामी येतील.

८) बादशहा - सोपा उपाय आहे. तोंड बंद ठेऊन जेवायचे >> कुठून?

९) बेफिकीर - गर्लफ्रेंडची एखादी अशी (काल्पनिक) गोष्ट शोधा जिच्याबद्दल तुम्ही असे म्हणू शकाल की ती (गोष्ट) तुम्हाला इर्रिटेटिंग वाटते >> काल्पनिक कश्याला? ढिगाने अश्या गोष्टी सापडतील. पण आपल्या पुरुषांचा जन्मच झाला आहे तडजोड करायला Happy

१०) मी अनु - ऋन्मेष, प्रेम करताय ना? छोटी गोष्ट आहे, सुधारता आली तर बघा. >> हो प्रेम करतो. सुधारायचा प्रयत्न आहे. पण सुधारणे तितकेही सोपे जात नाहीये ईतकेच.
११) मी अनु - हळूहळू एक एक पाऊल चालत जवळ या(उपमा अलंकार. दो कदम तुम चलो वगैरे...नहितर मग एक एक पाऊल चालत राहिलो टक्कर झाली डोकी आपटली म्हणून मला दोष द्याल) >> नाही, तसे नाही होणार. शाहरूखचा फॅन आहे. दिल तो पागल है अठरा वेळा पाहिलाय. `और पास, और पास' कसे कुठवर यायचे मला माहीत आहे Happy

१२) रश्मी - तू नोबिता जास्त पहात असावा असे मला वाटते >> नोबिता मुलीचे नाव आहे का? असल्यास प्लीज भलते सलते आरोप करू नका. मी माझ्या गर्लफ्रेंडला सोडून ईतर कुठल्याही मुलीला जास्त पहात नाही. थोडंसच पहातो, लिमिटमध्ये.

१३) कापोचे - डॉक्टरकडे जाऊन पोटाला उघडता बंद करता येईल असे दार बसवून घे. जेवण आत ढकललं की दार बंद करायचं >> हा हा Proud पण ग्यारंटीवाला प्रॉडक्ट असेल तर सुचवा, अन्यथा उद्या त्या दाराचा उघडबंद होताना किर किर आवाज होऊ लागला तर त्यासाठी वेगळा धागा काढावा लागेल.

१४) वैद्यबुवा - गर्लफ्रेंड सोडून अजून एक दोन नॉर्मल जणांना समोर बसून जेवलात आणि त्यांना विचारलं तरी कळेल की खरच आवाज जास्त आहे की गर्ल फ्रेंडचे कान खुपच सेन्सिटिव आहेत >> जर सेन्सिटीव कान हा गुण मानला तर माझ्यातील दोष नष्ट करण्याऐवजी तिच्या गुणावर ठपका ठेवायचे हे मला तत्वत: पटत नाही.

जर सेन्सिटीव कान हा गुण मानला तर माझ्यातील दोष नष्ट करण्याऐवजी तिच्या गुणावर ठपका ठेवायचे हे मला तत्वत: पटत नाही.>>>> व्हॉट?!!!! अरे भौ, इतर काही लोकांना (ज्यांना होपफुली तुझ्या तोंडाच्या आवाजाची सवय झाल्यामुळे तो जाणवत नाही अशी नको) जर समोर बसवलं आणि ते सुद्धा म्हणाले की बाबा तू खरच जास्त आवाज करतोस खाताना तर मग सवय बदलण्याकडे लक्ष देता येइल. जर त्यांना आजिबातच तसं काही जाणवलं नाही तर मग कदाचित (जी खुप फार फेच्ड पॉसिबिलिटी आहे) तुझ्या गर्ल फ्रेंडला काहीतरी त्रास असेल.

चुईंगम चघळण्याचा उपाय करून झालाय. मचाक मचाक ऐवजी पचाक पचाक आवाज येण्यास सुरुवात झालेली ईतकाच काय तो फरक.>>>:हाहा:

नोबिता मुलीचे नाव आहे का? असल्यास प्लीज भलते सलते आरोप करू नका. मी माझ्या गर्लफ्रेंडला सोडून ईतर कुठल्याही मुलीला जास्त पहात नाही. थोडंसच पहातो, लिमिटमध्ये.>>>>ए येड पान्घरुन पेडगावला कामुन जाऊ र्हायला बे?:फिदी::दिवा: ऋन्मेष, तुला नोबिता माहीत नाही असे असणे शक्य नाही. चल, तुझ्या गफ्रेला विचार मग.

हि बस्स एक सवय आहे आणि ती प्रयत्नपूर्वक सराव केल्यास बंद होऊ शकते (इतर अनेक सवयीप्रमाणेच) पण त्यासाठी अनेक दिवस लागतील (कमीत कमी २१ दिवस असे कुठेतरी वाचले आहे).

पण त्या आधी "हि अतिशय किरकोळ गोष्ट आहे आणि यापेक्षा मोठ्या समस्या/गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत" असा तुमच्या गर्लफ्रेंडचा तुम्ही समज करून देणे आवश्यक आहे. (आता ते कसे करायचे ते तुम्ही पहा. ते मी तुमच्यावर सोपवतो)

एकदा का हे झाले कि जेवताना नेहमी त्या मोठ्या समस्येवर/गोष्टीवर चर्चा होत राहील. मग जेवताना होणारा आवाज हि किरकोळ गोष्ट ठरेल. तुमचेही पोट भरेल. चुकून जर तिने आवाजाचा विषय काढलाच तर "ते जाऊ दे ग" असे म्हणून विषय बंद करा. हि दुसरी मोठी गोष्ट/समस्या जोवर तिच्या मनात अस्तित्वात आहे त्या दरम्यानच्या काळात हळूहळू तुमची हि सवय सरावाने बंद करा.

Pages