Top 100 Indian celebrity - सर्वोच्च १०० भारतीय प्रसिद्ध व्यक्ती

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 December, 2015 - 11:31

फोर्ब्सची या वर्षीची टॉप १०० भारतीय सेलिब्रेटींची यादी जाहीर झाली आहे.
गुणांकन पद्धतीनुसार त्या सेलिब्रेटींचे वर्षातील उत्पन्न आणि प्रसिद्दी बघितली जाते. आता प्रसिद्धीला किती वेटेज आणि पैश्याच्या कमाईला किती हे त्यांनाच ठाऊक.
पण हे निकष लावता बॉलीवूडचा बादशाह सुपर्रस्टार शाहरुख खान याने अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान पटकावले आहे.

लोकसत्तातील बातमी - http://www.loksatta.com/manoranjan-news/shah-rukh-khan-tops-2015-forbes-...

फोर्ब्सची संपुर्ण यादी इथे बघू शकता - http://forbesindia.com/lists/2015-celebrity-100/1519/1

टॉप टेन लिस्ट खालीलप्रमाणे (नावापुढे कमाई कोटींमध्ये लिहिली आहे)

१. शाहरुख खान : २५७.५०
२. सलमान खान : २०२.७५
३. अमिताभ बच्चन : ११२
४. महेंद्रसिंह धोनी : ११९.३३
५. आमीर खान : १०४.२५
६. अक्षयकुमार : १२७.८३
७. विराट कोहली : १०४.७८
८. सचिन तेंडुलकर : ४०
९. दीपिका पदुकोण : ५९
१०. हृतिक रोशन : ७४.५०

ईतर उल्लेखनीय नावे क्रमांकानुसार.
११. रणबीर कपूर
१२. रोहीत शर्मा
१३. प्रियांका चोप्रा
१७. करीना कपूर खान
१८. कतरीना कैफ
२२. सोनाक्षी सिन्हा
२३. माधुरी दिक्षित
२७. कपिल शर्मा
२९. यो यो हनीसिंग
३२. सोनू निगम
३८. सानिया मिर्झा
३९. सायना नेहवाल
४५. सनी लिओन
६२. मेरी कोम
६६. चेतन भगत
६९. रजनीकांत
८२. अजय अतुल (२७.५ करोड)

.....................................................................

आता काही मनात आलेले विचार आणि निरीक्षणे.
रोचक आहेत की खोचक आहेत की अगदीच भोचक आहेत हे वाचकांनीच ठरवावे

.....................................................................

१) यू कॅन हेट हिम, यू कॅन लव हिम .. बट यू कॅन्नॉट इग्नोर हिम !! हे शाहरूखने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

२) गेल्यावर्षी सलमान पहिल्या क्रमांकावर होता. यावर्षी घसरण होत दुसर्‍या क्रमांकावर गेला. येत्या वर्षात जर त्याचे काळवीट प्रकरण गाजले किंवा त्याने आणखी एखादे नवीन कांड केले, तर त्याची घसरण होत तो क्रमांक तीन सुद्धा होऊ शकतो. त्याने काळजी घ्यायला हवी.

३) क्रिकेटला राष्ट्रीय खेळ का घोषित करत नाहीत हे अनाकलनीय.

४) चिरतरुण म्हणजे नेमके काय हे अमिताभने मला दाखवून दिले.

५) रणबीर कपूर आणि रणवीर सिंगला काही जण उगवता सुपर्रस्टार समजतात. कदाचित ते असतीलही. पण त्यांच्या दुर्दैवाने आधीचे काही मावळायचे नाव घेत नाहीयेत.

६) रोहीत शर्माने कसोटी क्रिकेटला त्याचे स्थान दाखवून दिले.

७) या पुरुषप्रधान संस्कृतीने नटलेल्या देशात सेलिब्रेटींच्या लिस्टमध्ये आठ पुरुषांनंतर एका स्त्री चा नंबर लागला. ती स्त्री म्हणजे दिपिका पदुकोन.
उगाच नाही मी या धाग्यात खालील विधान केले होते.
"ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा."
आज माझ्या या विधानाला एक अर्थ प्राप्त झाला.

८) करीना कपून खान हिने ‘कपूर आणि खान’ या दोन दिग्गज आडनावांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केले.

९) अजय अतुल हे नाव बघून चटकन अभिमान वाटला. मी प्रांतवादी तर नाही ना, असा विचार मी सध्या करतोय.
असो, पण त्यांच्या नावापुढे २७.५ करोडचा आकडा बघून थोडा चक्रावलो आहे, भल्याभल्यांपेक्षा मोठा आहे.
उदाहरणार्थ - ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा, दर सिनेमात लाखोंच्या गाड्या उडवणारा आणि आजकाल सुपर्रस्टार शाहरूखसोबत काम करणारा स्टार दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या कमाईचा आकडा फक्त ४.५ करोड दिसतोय.

१०) कतरीना कैफने सिद्ध केले. सौंदर्य हीच स्त्रीची खरी ताकद आहे.

११) सोनाक्षी सिन्हाने दाखवून दिले. स्त्री सौंदर्याची व्याख्या बदलत आहे.

१२) आपल्या मराठमोळ्या माधुरीला २३ व्या क्रमांकावर बघून अभिमानाच्या आधीही आश्चर्य वाटले. त्यानंतर मग कौतुक वाटले. तिच्या वयात पोहोचल्यावर कतरीना कैफ कदाचित पहिल्या हजारातही नसेल असा विचार मनात डोकावून गेला.
"सौंदर्य हीच स्त्रीची खरी ताकद" या वाक्यातील ‘च’ मागे घेत आहे.

१३) यो यो हनीसिंगला २९ व्या क्रमांकावर आणि सोनू निगमला ३२ व्या क्रमांकावर पाहून वाह म्हणावेसे वाटले.
जर आतिफ अस्लम भारतीय असता, तर तो या लिस्टमध्ये कुठे असता याचा विचार मी सध्या करत आहे.

१४) सानिया मिर्झा आजही भारतीयच आहे आणि भारतीयच समजली जाते हे बघून बरे वाटले.

१५) सानिया आणि सायना या दोन नामसाधर्म्य असणार्‍या खेळाडूंचे क्रमांक या यादीत पाठोपाठच आहेत हा एक योगायोग. मात्र या दोघींनी महिलांच्या खेळाला ग्लॅमर मिळवून दिलेय हे अधोरेखित झाले.

१६) सनी लिओन.. ऊप्फ.. काय बोलावे हिच्याबद्दल.. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत एमआयएम या पक्षाला महाराष्ट्रात तीन जागा मिळाल्यावर जसे चरकलो तसेच सनी लिओनला या यादीत बघून चरकलो.
सध्या ती ४५ व्या क्रमांकावर आहे. इथून पुढे तिचा क्रमांक आणखी आणखी सुधारणार यात मला शंका नाही.
सौंदर्य ही स्त्रीची ताकद आहे की नाही यावर आता मला भाष्य करायचे नाही. पण स्त्रियांचे सौंदर्य ही पुरुषांची कमजोरी आहे याबाबत मी आता ठाम झालो आहे.

१७) प्रियांका चोप्रा आणि मेरी कोम यांचा व्हॉटसपवर फिरणारा एक मेसेज आठवला. मेरी कोमने पुर्ण कारकिर्दीत जेवढे पैसे कमावले नाही तेवढे प्रियांका चोप्राने तिच्यावर एक चित्रपट करून कमावले वगैरे वगैरे.
मेसेजमागील भावना तेव्हाही पटल्या नव्हत्या. पण आज दोघींनाही या लिस्टमध्ये बघून बरे वाटले.

१८) चेतन भगत लेखक म्हणून काय चीज आहे हे त्याचे एकही पुस्तक वाचले नसल्याने सांगू शकत नाही. मात्र त्याने भारतात लेखकांना ग्लॅमर मिळवून दिले हे मान्य करावेच लागेल.

१९) रजनीकांत हे एक आदर्श व्यक्तीमत्व आणि कलाकार आहेत. पण सुपर्रस्टार म्हणून ते प्रादेशिकच आहेत.

२०) कपिल म्हटले की आम्हाला कपिल देवच आठवतो. पुढच्या पिढीला बहुधा कपिल शर्मा आठवेल.

२१) महाराष्ट्रातील सेलिब्रेटींची लिस्ट काढली, मराठी चित्रपट आणि मालिकांतील कलाकारांचा याच निकषांवर क्रम लावला, तर टॉप टेन कसे दिसेल, असा विचार मनात येतोय. यात स्वतंत्र धाग्याचे मटेरीअल तर नाही..

२२) गेल्या चार वर्षांच्या लिस्ट चाळल्या. तीच तीच नावे टॉप टेन मध्ये दिसत आहेत. चारपैकी तीन वेळा नंबर वन शाहरूखच होता. सो, यू कॅन हेट हिम, यू कॅन लव हिम .. बट यू कॅन्नॉट इग्नोर हिम !! हे आता पुर्णपणे सिद्ध झाले आहे.

ता.क. - काही विधाने उपरोधाने नटलेली आहेत. ती स्वताहून ओळखण्यातच खरी गंमत आहे.
कु > ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीकू ओके,
माझे मराठी कच्चेपक्के असल्याने नेमके काय लिहावे समजत नव्हते, म्हणून ईंग्रजीतही लिहिलेले.
असो आता बदल घडवतो.

भरत मयेकर, हो नुसत्या लोकप्रियतेत बच्चन साहेब टॉपला आहेत. माझ्या पोस्टमध्ये मी त्यांचे कौतुकही केलेय. >>> Rofl

कौतुक आणि प्रशंसा ह्यातला नेमका फरक काय कु.ऋ?

Pages