Submitted by suddhir_sonawane on 4 July, 2009 - 10:10
मी मुळचा नगरमधील जामखेड तालुक्यातला...
म्हणुन पक्का नगरी...
ज्यावेळी पहिल्या॑दा पुण्यात आलो ना..
अगदी वेड लागायची पाळी आलेली...
कुणीही ओळखीच॑ नसलेल॑..
अशावेळी कुठल्याही तालुक्यातील..
कुठल्याही गावातील...
एखाद॑ माणुस॑ जरी भेटल॑ ना! तरी फक्त "नगरकर"एवढी ओऴखदेखील पुरेशी होते.
..आणि मनात कुठेतरी आपलेपण जाग॑ होत॑.
म्हणुन मनात एक विचार आला की,
मायबोलीच्या माध्यमातुन आपण सगळे जर एकत्र आलो तर...
ख्ररच नुसती कल्पनादेखील मनाला खुप आन॑द देऊन गेली.
मायबोलीवर असणार्या नगरकरा॑चा
असा एखादा ग्रुप असावा
जिथ॑ त्या॑ना हक्कान॑ भेटता येईल..
असा ग्रुप होऊ शकतो का ?
खर॑तर हे कुठे लिहु हेच कळत नव्हत....
मग वाटल॑ एकमेका॑ना नुसत्या बोलण्यावरुन ओळखणारे आपण
कुठेही लिहल॑ तरी एकमेका॑ना नक्की शोधुन काढु...
काय बरोबर॑ ना !!!!!!
तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय...
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
(No subject)
नमस्कार ..खरतरं मधल्या या
नमस्कार ..खरतरं मधल्या या काळात मायबोलिवर येण सोडलंच होतं,असु द्या ..काहिही झालं तरी गाववाल्यांची आठवण येणारचं कि रावं ...
राम राम नगरकर्स! माबो वरचे
राम राम नगरकर्स!
माबो वरचे नगरकर निवृत्त झाले की काय सगळे?
हाय कृष्णा कसाहेस? कुठे आहेत
हाय कृष्णा
कसाहेस? कुठे आहेत नगरकर्स? कसे आहेत?
म्या बी नगर ची
म्या बी नगर ची हाय...फिरोदिया
ला ११,१२ ला होते..२००० पास आउट...
सुप्रभात स्वप्नाली!
सुप्रभात स्वप्नाली!
सुप्रभात समस्त नगरकर्स! हाय
सुप्रभात समस्त नगरकर्स!
हाय कृष्णा
कसाहेस?>>>
मी मजेत! हल्ली मुक्काम हैदराबाद!
सुप्रभात कृष्णा आणि ऑल
सुप्रभात कृष्णा आणि ऑल नगरकर्स!
व्वा! कृष्णा ...सध्या मुपो मोत्यांचे शहर का? छानच!
हो सध्या मुपो मोत्यांचे शहर!
हो सध्या मुपो मोत्यांचे शहर!
निझामाने अहमदनगर हुन हैदराबाद ला राजधानी हलविलेली ना!
इतर नगरकरांची संख्या रोडावलेलिये फार!
हं...बीझी दिसताहेत! तसेही
हं...बीझी दिसताहेत! तसेही इथे नगरकर्स कमीच आहेत.
राम राम नगरकर्स! मानुषी,
राम राम नगरकर्स!
मानुषी, प्रणाम!
हाय कृष्णा....सुप्रभात! कुठे
हाय कृष्णा....सुप्रभात!
कुठे गेले नगर्कर्स? थंडी कमी झाली.
उद्या हुरड्याचा प्लॅन!
हुरडा, अरे वा! मागच्यावर्षी
हुरडा, अरे वा!
मागच्यावर्षी आम्ही जेजुरीला गेलेलो हुरड्यासाठी!
पण आमच्या तालुक्यात नाही ज्वारी फारशी त्यामुळे हुरडा नसतो!
आणि यंदा तर हैदराबाद त्यामुळे नुसते लांबुनच आस्वाद!
हं ....हैद्राबादेत कुठला
हं ....हैद्राबादेत कुठला हुरडा?
इथे बर्याच ठिकाणी हुरडा पार्ट्या चालू आहेत सध्या.
पांजरापोळ, रानवारा, औ बाद रोड्वरही बर्याच ठिकाणी.
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!
आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984
श्रीमन्नृप शालिवाहन शके
श्रीमन्नृप शालिवाहन शके १९३८.
दुर्मुखनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा!!
नूतन वर्षाभिनंदन!!
हाय आहे का कुणी?
हाय आहे का कुणी?
बोला राहुल.. कसे आहात ..?
बोला राहुल.. कसे आहात ..?
आम्ही मजेत..
आम्ही मजेत..
राम राम नगरकर्स!
राम राम नगरकर्स!
सगळी कडे पाऊस पण आमच्या नगरात कायमच दुष्काळ!
रामराम __/\__
रामराम __/\__
लोकहो, यांनी तर मतदान केलेय!
लोकहो, यांनी तर मतदान केलेय!! तुम्हीही केले नसेल तर लवकर करा!
आपल्या आवडीच्या प्रवेशिकांना विजयी करा!! -- मायबोली गणेशोत्सव २०१७ - मतदान