तुरीच्या दाण्याचे आळण (विदर्भातला लोकप्रिय प्रकार)

Submitted by सायु on 15 December, 2015 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तुरीच्या ताज्या शेंगांचे दाणे = दिड वाटी
छोटे टोमाटो= २ (गावराणी, नसतील तर मग १/२ चमचा आमकुट पावडर)
मध्यम आकाराचा कांदा = १
लसुण = १छोटा गट्टा (१३, १४ पाकळ्या)
हिरव्या मिर्च्या = २
बारिक चिरलेली कोथिंबीर
तेल = १/२ पळी
धणे पुड = दिड चमचा
गुळ = १/२ लिंबा एवढा
फोडणी साहित्य नेहमीचेच.

क्रमवार पाककृती: 

हिवाळा आला की, विदर्भात तुरीच्या शेंगांवर जोर असतो, मग त्याच्या दाण्याचा भात, मुगाची तुर दाणे घालुन फोडणीची खिचडी असो का तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी ..काही नाही तर तुरीच्या उकडलेल्या शेंगा तरी होतातच... Happy असो, अशाच एका भन्नाट आणि इथे आवडणार्‍या पदार्थाची पा. कृ. आज देणार आहे..:)

तर मुळ कृती कडे...

सगळ्यात आधी तुरीचे दाणे धुवुन, एका गंजात दोन वाट्या पाणी आणि थोडे मिठ घालुन १० मि.उकडुन घ्यावे . शिजले की, निथळुन घ्यावे, आणि एका कढईत चांगले भाजुन घ्यावे..(नुसतेच ,तेल नको). भाजुन गार झाले की मिक्सर मधुन फिरवुन घ्यावे..

आता वाटण करायचे आहे, त्यासाठी मिरच्या, कांदे टोमाटो हे सुधा भाजुन वाटुन घ्यावे..
कढईत तेल तापले की, जिर मोहरी घाला आणी हे वाटण, + एक च. तिखट, हळद, धणे पुड घालुन ,कडेला तेल सुटे पर्यंत वाफेवर शिजु द्यावे, आता मिक्सर मधुन काढलेल्या दाणाचे वाटण घालवे..पुन्हा एक वाफ काढावी, दोन वाट्या पाणी (गरम असेल तर उत्तम) आणि मिठ + गुळ घालुन छान उकळी फुटु द्यावी.

बारिक कोथिंबीर घालुन सर्व्ह करा..

गरम भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही छानच लागते.. नुसते सुप सारखे पण घेऊ शकता.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

सग़ळे साहित्य भाजुन केलेले वाटण घातले की वेगळीच छान चव येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, रश्मी, दिनेश दा, जागु सगळ्यांचे आभार...

रश्मी एक सावजी प्रकार असतो खरा पण त्याला लोट म्हणतात का ते माहिती नाही ग..

दिनेश दा, बरोबर कच्चे दाणे कुटुन/ वाटुन देखिल करतात.. पण हे दाणे पचायला जड असतात, म्हणु उकडुन आणि चवीला छान लागतात म्हणुन्भाजुन मग वाटायचे...असे केल्याने शिजवायचा वेळ पण वाचतो..:)

छान वाटतोय हा प्रकार. इथे इंडियन ग्रोसरीत फ्रोजन दाणे असतात तुरीचे. पण ते कसे वापरावे माहित नव्हते. आता या पद्धतीने आळण करेन. धन्यवाद सायु Happy

छान रेसीपी. करून बघेन.
आमच्या घरी शेतात तुर लावली जाते. त्यामुळ ताज्या तुरीचे बरेच प्रकार करतात. वांग्याच्या भाजीमध्ये ताजे तुरीचे दाणे घालून भाजी, तुरीची बेसन लावून पातळ भाजी इत्यादी.

मस्त रेसिपी.
स्वाती२, मी ते फ्रोजन तुरीचे दाणे खिचडीत, घेवड्याच्या भाजीत घालते किंवा त्याची उसळही करते.

यावर्षी तूर फारच महाग आहे, (म्हणतात की लातूर साईडला तर पेरण्याच केलेल्या नाहीत एकरानी शेतजमिनींवर). सांगायचे काय तर पिंपरी बाजारात अजून दिसल्या नाहीत शेंगा.. मिळाल्या की पहिली हीच रेसिपी, इतकी टेम्पटिंग आहे.

छानच. फोटोही मस्त.

बालपण आठवलं, तुरी कोकणात पण शेतात लावायचे. त्या शेतातुन जाताना कीती छान वास यायचा, कोवळ्या शेंगा खातंच जायचो.

मी आणते आता विकत इथे तुरीच्या शेंगा, तेव्हा करुन बघेन. आम्ही उसळ, खिचडी. मीठ घालून नुसत्याच शिजवुन खातो. वांगं घालून भाजीपण छान लागते. तसंच ओले मटार,ओले तूर, ओले पावटे (ऑप्शनल) ह्या सर्वांत उकडलेला बटाटा आणि कांदा घालून करंज्या करतेच हिवाळ्यात. Happy

स्वाती२, सिंडरेला, मृनिश, देवकी, सीमा, सायो, डिविनिता, अन्जु सगळ्यांचे खुप खुप आभार...

वांगं घालून भाजीपण छान लागते. तसंच ओले मटार,ओले तूर, ओले पावटे (ऑप्शनल) ह्या सर्वांत उकडलेला बटाटा आणि कांदा घालून करंज्या करतेच हिवाळ्यात. स्मित++१

भारी पाककृती! नक्की करून बघणार. फोटो आवडले. बघितल्याबरोबर गरम भाताशी आळण ओरपावसं वाटलं.

सोल्यांची आमटी...स्लर्प्प्प्प्प...

मी दाणे भाजुन घेते सोबत हिरव्या मिरच्या सुद्धा..मग त्यांना मिक्सर मधुन काढून त्याची आमटी बनवते... Happy

Pages