तुरीच्या ताज्या शेंगांचे दाणे = दिड वाटी
छोटे टोमाटो= २ (गावराणी, नसतील तर मग १/२ चमचा आमकुट पावडर)
मध्यम आकाराचा कांदा = १
लसुण = १छोटा गट्टा (१३, १४ पाकळ्या)
हिरव्या मिर्च्या = २
बारिक चिरलेली कोथिंबीर
तेल = १/२ पळी
धणे पुड = दिड चमचा
गुळ = १/२ लिंबा एवढा
फोडणी साहित्य नेहमीचेच.
हिवाळा आला की, विदर्भात तुरीच्या शेंगांवर जोर असतो, मग त्याच्या दाण्याचा भात, मुगाची तुर दाणे घालुन फोडणीची खिचडी असो का तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी ..काही नाही तर तुरीच्या उकडलेल्या शेंगा तरी होतातच... असो, अशाच एका भन्नाट आणि इथे आवडणार्या पदार्थाची पा. कृ. आज देणार आहे..:)
तर मुळ कृती कडे...
सगळ्यात आधी तुरीचे दाणे धुवुन, एका गंजात दोन वाट्या पाणी आणि थोडे मिठ घालुन १० मि.उकडुन घ्यावे . शिजले की, निथळुन घ्यावे, आणि एका कढईत चांगले भाजुन घ्यावे..(नुसतेच ,तेल नको). भाजुन गार झाले की मिक्सर मधुन फिरवुन घ्यावे..
आता वाटण करायचे आहे, त्यासाठी मिरच्या, कांदे टोमाटो हे सुधा भाजुन वाटुन घ्यावे..
कढईत तेल तापले की, जिर मोहरी घाला आणी हे वाटण, + एक च. तिखट, हळद, धणे पुड घालुन ,कडेला तेल सुटे पर्यंत वाफेवर शिजु द्यावे, आता मिक्सर मधुन काढलेल्या दाणाचे वाटण घालवे..पुन्हा एक वाफ काढावी, दोन वाट्या पाणी (गरम असेल तर उत्तम) आणि मिठ + गुळ घालुन छान उकळी फुटु द्यावी.
बारिक कोथिंबीर घालुन सर्व्ह करा..
गरम भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही छानच लागते.. नुसते सुप सारखे पण घेऊ शकता.
सग़ळे साहित्य भाजुन केलेले वाटण घातले की वेगळीच छान चव येते.
मस्त!
मस्त!
धन्स ग मंजु ताई, पहिलाच
धन्स ग मंजु ताई, पहिलाच प्रतिसाद विदर्भातुन...
मस्तं!
मस्तं!
आवडले. सायु, तुरीचे लोट हा पण
आवडले. सायु, तुरीचे लोट हा पण एक प्रकार आहे ना? त्यात सावजी मसाला घालुन करतात असे वाचलय.
छान प्रकार. तूरीचे दाणे
छान प्रकार. तूरीचे दाणे कच्चेच कुटून पण करतात ना, हा प्रकार ?
सायु छान आहे ग रेसिपी.
सायु छान आहे ग रेसिपी.
साती, रश्मी, दिनेश दा, जागु
साती, रश्मी, दिनेश दा, जागु सगळ्यांचे आभार...
रश्मी एक सावजी प्रकार असतो खरा पण त्याला लोट म्हणतात का ते माहिती नाही ग..
दिनेश दा, बरोबर कच्चे दाणे कुटुन/ वाटुन देखिल करतात.. पण हे दाणे पचायला जड असतात, म्हणु उकडुन आणि चवीला छान लागतात म्हणुन्भाजुन मग वाटायचे...असे केल्याने शिजवायचा वेळ पण वाचतो..:)
छान वाटतोय हा प्रकार. इथे
छान वाटतोय हा प्रकार. इथे इंडियन ग्रोसरीत फ्रोजन दाणे असतात तुरीचे. पण ते कसे वापरावे माहित नव्हते. आता या पद्धतीने आळण करेन. धन्यवाद सायु
फोटो मस्त. स्वाती२ +१
फोटो मस्त. स्वाती२ +१
फोटो मस्त.. प्लेट च डिझाइन ही
फोटो मस्त.. प्लेट च डिझाइन ही छान आहे
मस्त!
मस्त!
छान रेसीपी. करून बघेन. आमच्या
छान रेसीपी. करून बघेन.
आमच्या घरी शेतात तुर लावली जाते. त्यामुळ ताज्या तुरीचे बरेच प्रकार करतात. वांग्याच्या भाजीमध्ये ताजे तुरीचे दाणे घालून भाजी, तुरीची बेसन लावून पातळ भाजी इत्यादी.
मस्त रेसिपी. स्वाती२, मी ते
मस्त रेसिपी.
स्वाती२, मी ते फ्रोजन तुरीचे दाणे खिचडीत, घेवड्याच्या भाजीत घालते किंवा त्याची उसळही करते.
यावर्षी तूर फारच महाग आहे,
यावर्षी तूर फारच महाग आहे, (म्हणतात की लातूर साईडला तर पेरण्याच केलेल्या नाहीत एकरानी शेतजमिनींवर). सांगायचे काय तर पिंपरी बाजारात अजून दिसल्या नाहीत शेंगा.. मिळाल्या की पहिली हीच रेसिपी, इतकी टेम्पटिंग आहे.
सायो, उसळ करायचे डोक्यातच आले
सायो, उसळ करायचे डोक्यातच आले नाही. मटारची करतो तशीच करायची का?
स्वाती, विपुत लिहितेय.
स्वाती, विपुत लिहितेय.
धन्यवाद सायो
धन्यवाद सायो
छानच. फोटोही मस्त. बालपण
छानच. फोटोही मस्त.
बालपण आठवलं, तुरी कोकणात पण शेतात लावायचे. त्या शेतातुन जाताना कीती छान वास यायचा, कोवळ्या शेंगा खातंच जायचो.
मी आणते आता विकत इथे तुरीच्या शेंगा, तेव्हा करुन बघेन. आम्ही उसळ, खिचडी. मीठ घालून नुसत्याच शिजवुन खातो. वांगं घालून भाजीपण छान लागते. तसंच ओले मटार,ओले तूर, ओले पावटे (ऑप्शनल) ह्या सर्वांत उकडलेला बटाटा आणि कांदा घालून करंज्या करतेच हिवाळ्यात.
आई बनवते पन गुळ घालत नाहि
आई बनवते पन गुळ घालत नाहि माझि फेवरेट आहे
स्वाती२, सिंडरेला, मृनिश,
स्वाती२, सिंडरेला, मृनिश, देवकी, सीमा, सायो, डिविनिता, अन्जु सगळ्यांचे खुप खुप आभार...
वांगं घालून भाजीपण छान लागते. तसंच ओले मटार,ओले तूर, ओले पावटे (ऑप्शनल) ह्या सर्वांत उकडलेला बटाटा आणि कांदा घालून करंज्या करतेच हिवाळ्यात. स्मित++१
सायु, पहिल्यांदाच ऐकली ही
सायु, पहिल्यांदाच ऐकली ही रेसिपी. मस्त वाटतेय, नक्की करणार.
भारी पाककृती! नक्की करून
भारी पाककृती! नक्की करून बघणार. फोटो आवडले. बघितल्याबरोबर गरम भाताशी आळण ओरपावसं वाटलं.
मयी, धन्स.. ओरपण्या सारखच होत
मयी, धन्स.. ओरपण्या सारखच होत हे आळण.. नक्की करुन बघा आणि झब्बु पण द्या..:)
मस्त पाकृ इकडे उत्तरेत तुरी
मस्त पाकृ
इकडे उत्तरेत तुरी मिळण्याची शक्यता शून्य पण रेसिपी मार्क करून ठेवतो.
मस्त....
मस्त....
अमेय.. सॄष्टी धन्स..
अमेय..
सॄष्टी धन्स..
छान रेसेपी. आवडली.
छान रेसेपी. आवडली.
ईकडे, तुरीच्या, मुगाच्या
ईकडे, तुरीच्या, मुगाच्या शेंगाचे असे प्रकार नित्याचेच आहेत.
पाकॄ आवडली !
सोल्यांची
सोल्यांची आमटी...स्लर्प्प्प्प्प...
मी दाणे भाजुन घेते सोबत हिरव्या मिरच्या सुद्धा..मग त्यांना मिक्सर मधुन काढून त्याची आमटी बनवते...
वा मस्त आहे रेसिपी..
वा मस्त आहे रेसिपी..
Pages