पारीचे साहित्यः
१ वाटी गव्हाचे पिठ
१ वाटी मैदा
३ चमचे किंवा मळायच्या गरजेनुसार तेल
३ चमचे दही
गरजे नुसार मिठ
काळे किंवा पांढरे तिळ
भाजताना सोडण्यासाठी तुप किंवा तेल
लाटण्यासाठी सुके पिठ (गव्हाचे किंवा मैदा)
सारणाचे साहित्य :
३-४ मध्य आकाराचे बटाटे (उकडून कुस्करून)
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा लिंबू रस
अर्धा चमचा गरम मसाला
१ चमचा साखर
चवीनुसार मिठ
मुठभर चिरलेली कोथिंबीर
१) प्रथम पारीसाठी दोन्ही पिठे, दही, मिठ, साखर घालून हळू हळू गरजे नुसार पाणी घालून जरा सैलसर मळून घ्या. साधारण पुरणपोळीच्या पारीसाठी लागते तसे. हे पिठ दिड ते दोन तास तसेच ठेवा.
२) कुस्करलेल्या बटाट्यामध्ये बटाटे वर लिहिलेले सारणाचे इतर साहित्य घालून चांगले एकजीव करा.
३) पिठाचे हवे तेवढे गोळे करुन ठेवा. तितकेच सारणाचे करा म्हणजे कुठला एक भाग शिल्लक राहणार नाही.
आता पोळीपाटावर पिठाचा गोळा सुक्या पिठात घोळून छोट्या आकारात लाटा. आता त्यावर सारणाचा गोळा ठेवा.
४) आता सारण पिठाने झाकुन घ्या. आता हा गोळा थोडा चपटा करून वर थोडे तिळ लावा.
५) हलक्या हाताने कुलचा लाटा. मधुन मधुन सुके पिठ वापरा म्हणजे चिकटणार नाही.
६) हा कुलच्या गरम तव्यावर भाजा. भाजताना साईडने तेल सोडा. कुलचा मस्त फुगतो.
७) दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या.
८) गरमागरम कुलचा लोणचे किंवा सॉस, चटणी सोबत सर्व्ह करा आणि स्वतः ही खाऊन आनंद घ्या
ओरीजनल पाककृतीमध्ये पारीमध्ये बेकींगसोडा वापरला आहे. पण मी तो नाही वापरला.
लाटताना हलका हात वापरावा पुरणपोळी करताना करतो तसेच.
बटाटे अगदी मऊ पण उकडू नये जेणेकरून ओलसर होतील. कोरडे असले म्हणजे लाटताना त्रास होणार नाही.
व्वाह! यम्म्म्म्मी दिसतोय....
व्वाह! यम्म्म्म्मी दिसतोय.... स्लर्प!!!
आलू पराठ्या सारखाच दिसतोय
आलू पराठ्या सारखाच दिसतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतोय! अवनी +१
मस्त दिसतोय! अवनी +१
मस्त दिसतोय कुलचा
मस्त दिसतोय कुलचा
मस्त
मस्त
छान ..फोटो मस्त!
छान ..फोटो मस्त!
मस्त !
मस्त !
मस्त! आलुपराठ्याच माॅडीफाईड
मस्त! आलुपराठ्याच माॅडीफाईड वर्जन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे कुलचा. आम्ही याला आलु
छान आहे कुलचा.
आम्ही याला आलु पराठा म्हणतो पण तिळामुळे तो कुलचा झाला आहे.
वा...
वा...
मस्त
मस्त
नाय ना हा पराठाच आहे. कुलचा
नाय ना हा पराठाच आहे.
कुलचा एक प्रकारचा बशीएवढा असणारा स्पंजी पाव असतो.
उदा.
https://www.google.co.in/search?q=chole+kulche&espv=2&biw=1366&bih=643&t...
जे काही आहे ते यम्मी.
जे काही आहे ते यम्मी.
हेडरमध्ये ऑब्लिक करुन पराठा
हेडरमध्ये ऑब्लिक करुन पराठा करु का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हॉटेलमधील कुलचाचा शेप लांबडा असतो. थोडा वेगळाच असतो. हा पराठ्यासारखा मलाही वाटला. कदाचीत मी सोडा घातला नाही आणि जरा पातळ लाटला असेल म्हणून असेल.
सोडा घातल्याने कव्हर खुसखुशीत होत असणार.
हो कुलचा साधारण गोल किंवा
हो कुलचा साधारण गोल किंवा लांबुळका (भटुर्याच्या आकाराचा) असतो.
उत्तरे कडे छोले-कुलचे, मटर-कुलचे असा प्रकार मिळतो.
असुद्या की वो. आमाला फकस्त
असुद्या की वो. आमाला फकस्त हादडण्याशी मतबल.:फिदी: लय भारी हाय ! आवडले.:स्मित:
आमचं बी तसच हाय, खायाच्या
आमचं बी तसच हाय, खायाच्या बाबतीत, जागुतायला माहित हाये ते !
छान दिसतोय.. मला असले प्रकार
छान दिसतोय.. मला असले प्रकार करणे सोपे जाते कारण बटाट्याची पावडरच मिळते इथे.
मस्तच, आलू पराठ्या सारखाच
मस्तच, आलू पराठ्या सारखाच दिसतोय.
वॉव..मस्तं.
वॉव..मस्तं.
कुलचा एक प्रकारचा बशीएवढा
कुलचा एक प्रकारचा बशीएवढा असणारा स्पंजी पाव असतो.
>>>
आपल्याकडच्या हॉटेलमध्ये पंजाबी डिशेस बरोबर रोटीशोटीच्या जागी तीळ लावलेला कुलचा मिळतो तो स्पंजी पावासारखा नसतो. हा प्रकार कुठे मिळतो बघायला हवे. ते चिकन शावारामा रोल असतो ते ज्यात लपेटले असते त्याला काय म्हणतात?
बाकी कुलचा असो वा पराठा दोन्ही आवडीचेच. हे ही मस्त दिसतेय. कोणी खाऊ घातले तर आवडेलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू मस्तच! तो तव्यावरचा तेल
जागू मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो तव्यावरचा तेल सोडलेला फोटो मस्त दिसत आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
जे काही आहे ते मस्तच आहे.
जे काही आहे ते मस्तच आहे. आम्ही ह्याला आलु पराठा म्हणतो.
वर वर वाचायला गेले तर नाव आलु
वर वर वाचायला गेले तर नाव आलु कुठचा ( हे वाक्य चावट कुठचा असे वाचावे) असे दिसतय.:फिदी:
(No subject)
शेवटच्या फोटोत तीळ मस्त उठून
शेवटच्या फोटोत तीळ मस्त उठून दिसतायत.
दोन प्रकारचे कुलचे असतात. एक
दोन प्रकारचे कुलचे असतात. एक मटरा, अमॄतसरी छोले यांच्याबरोबर खाण्यासाठी मिळ्णारे मैद्याचे लुसलुशित पावासारखे किंवा पिझ्झा बेससारखे दिसणारे आणि दुसरे स्ट्फ कुलचे ( आलु, पनीर, गोबी इ). हे स्टफ कुलचे म्हणजे स्ट्फ पराठ्यांचे नातेवाईक. फरक फक्त हच की याचं आवरण पण मैद्याचं असतं आणि त्या कणकेमध्ये सोडा घातलेला असतो. सहसा ढाब्यावर मिळ्तात स्टफ कुलचे.
माझ्या समजुतीप्रमाणे - पराठा
माझ्या समजुतीप्रमाणे -
पराठा - कणकेचा असतो. पीठ आंबवलेलं नसतं. तव्यावर भाजतात.
कुलचा - मैद्याचा असतो. पीठ आंबवलेलं असतं. तव्याशिवाय तंदूरमध्येही भाजतात.
जागू,
फोटो मस्त आहेत.
करेक्ट चिनूक्स. आंबबलेल्या
करेक्ट चिनूक्स. आंबबलेल्या पिठाचं लक्षात नाही आलं. खूप पुर्वी साबांकडून ऐकलं होतं की त्या घरी यिस्ट घालून छोट्या तंदूरमध्ये कुलचे करायच्या.
Pages