पारीचे साहित्यः
१ वाटी गव्हाचे पिठ
१ वाटी मैदा
३ चमचे किंवा मळायच्या गरजेनुसार तेल
३ चमचे दही
गरजे नुसार मिठ
काळे किंवा पांढरे तिळ
भाजताना सोडण्यासाठी तुप किंवा तेल
लाटण्यासाठी सुके पिठ (गव्हाचे किंवा मैदा)
सारणाचे साहित्य :
३-४ मध्य आकाराचे बटाटे (उकडून कुस्करून)
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा लिंबू रस
अर्धा चमचा गरम मसाला
१ चमचा साखर
चवीनुसार मिठ
मुठभर चिरलेली कोथिंबीर
१) प्रथम पारीसाठी दोन्ही पिठे, दही, मिठ, साखर घालून हळू हळू गरजे नुसार पाणी घालून जरा सैलसर मळून घ्या. साधारण पुरणपोळीच्या पारीसाठी लागते तसे. हे पिठ दिड ते दोन तास तसेच ठेवा.
२) कुस्करलेल्या बटाट्यामध्ये बटाटे वर लिहिलेले सारणाचे इतर साहित्य घालून चांगले एकजीव करा.
३) पिठाचे हवे तेवढे गोळे करुन ठेवा. तितकेच सारणाचे करा म्हणजे कुठला एक भाग शिल्लक राहणार नाही.
आता पोळीपाटावर पिठाचा गोळा सुक्या पिठात घोळून छोट्या आकारात लाटा. आता त्यावर सारणाचा गोळा ठेवा.
४) आता सारण पिठाने झाकुन घ्या. आता हा गोळा थोडा चपटा करून वर थोडे तिळ लावा.
५) हलक्या हाताने कुलचा लाटा. मधुन मधुन सुके पिठ वापरा म्हणजे चिकटणार नाही.
६) हा कुलच्या गरम तव्यावर भाजा. भाजताना साईडने तेल सोडा. कुलचा मस्त फुगतो.
७) दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या.
८) गरमागरम कुलचा लोणचे किंवा सॉस, चटणी सोबत सर्व्ह करा आणि स्वतः ही खाऊन आनंद घ्या
ओरीजनल पाककृतीमध्ये पारीमध्ये बेकींगसोडा वापरला आहे. पण मी तो नाही वापरला.
लाटताना हलका हात वापरावा पुरणपोळी करताना करतो तसेच.
बटाटे अगदी मऊ पण उकडू नये जेणेकरून ओलसर होतील. कोरडे असले म्हणजे लाटताना त्रास होणार नाही.
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अल्पना, चिनुक्स पराठा आणि कुलचाचा गुंता सोडवलात धन्यवाद.
नमस्कारम् उत्तम जमलि. सर्व
नमस्कारम्
उत्तम जमलि. सर्व कृति १ #. तुम्हा सर्वाना कोटि कोटि धन्यवाद . उद्या प्रवासासाठि स्पेशाल मागणी आहे. तुमच्या शुभेच्छा असु द्या.! Merry Christmas
त्या भाजलेल्या कुलच्यावर ते
त्या भाजलेल्या कुलच्यावर ते पांढरे तिळ खतर्नाक दिसताय..व्वाह..
जागु, आता परत भुक लागली पाहुन.. पोटात कोंबडी खिदळून राहिली .. म्हणत असेल चला ज्या दिवशी हि कुलचा करेल त्या दिवशी आपल वय एक दिवसाने वाढेल
मस्त. आजच काळे तीळ घालून
मस्त.
आजच काळे तीळ घालून कुलचा आणि राजमा भाजी केलेली.
ए जागु आहेस का? मला आत्ताच तू
ए जागु आहेस का? मला आत्ताच तू किन्वा बाकी कोणी असेल त्यानी सान्गीतले तरी चालेल. हे कुल्च्याचे पीठ ( कनीक्+मैदा) भिजवताना थोडे दही पण घातलेय असे पाकृत लिहीले आहे, तर अशी कणिक उरली ( भिजवलेला गोळा) तर दुसर्या दिवशी चान्गली टिकते/ रहाते का? सर्व साधारणपणे साधी भिजवलेला गोळा ( कणिक वा मैदा) फ्रिझमध्ये दुसर्या रात्रीपर्यन्त चान्गला रहातो. पण यात दही घातले आहे मग हे टिकेल का?
अरे कुणालाच माहीत नाही का?
अरे कुणालाच माहीत नाही का?:अओ:
रश्मी फ्रिजमध्ये राहील ग
रश्मी फ्रिजमध्ये राहील ग चांगले.
जागु धन्यवाद ग. कुलचे मस्त
जागु धन्यवाद ग.:स्मित: कुलचे मस्त झाले होते, कणीक पण टिकली आज सकाळ पर्यन्त.
हे हे. छान रश्मी.
हे हे. छान रश्मी.
Pages