आजकाल बर्याचदा हे असं व्हायला लागलंय ....
एखादी खुप पुर्वी ऐकलेली कवित्या मनाच्या गाभार्यात कोणत्यातरी अंधार्या कोनाड्यात खोलवर दडुन बसावी वर्षोनवर्ष..... अन कधीतरी अचानकच जसे रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीवाची सर कोसळुन जावी तशी काहीशी कविता मनाच्या अंगणात भरभरुन बसरावी अन सारेच कसे चिंब चिंब होवुन जावे !
आजकाल बर्याचदा हे असं व्हायला लागलंय
________________________________________________________________________________
चॅप्टर १ :" NOW "
साधारण रात्रीचे साडे नऊ वाजुन गेले होते. नुकतीच दिवाळी उलटुन गेली होती अन आता हवे मधे गारवा चांगलाच जाणवु लागला होता.पुर्वेकडील ब्लुरीजच्या टॉवर्स मागुन आता भुरकट तांबुस रंगाचा चंद्र उगवत होता...ऑफीसमधली लोकं एकएक करुन होमड्रॉप कॅब ने घरी निघाली होती. मी मात्र पार्किंगच्या अगदी टोकाला लावलेल्या माझ्या गाडीला टेकुन उभा होतो, गाडीत भीमसेनजींच्या आवाजातील राग शुध्द केदार चालु होता, आणि माझे जवळपास सारेच काम क्लायंटला डीलीव्हर केले असल्यान आता जवळपास महिनाभर निवांतच होतो. ही अशी थंड हवेची झुळुक , उद्याच्या कामाचे काहीच टेंशन नसणे आणि राग शुध्द केदार हे काहीतरी अप्रतिम रीलॅक्सिंग मिश्रण झाले होते की शब्दात वर्णन करता येणार नाही. मी नेहमीप्रमाणेच खिशातुन मार्लबोरो कढुन शिलगावली अन निवांतपणे झुरके घेत राहिलो.
दुरवरुन आमच्या ऑफीसचे हॉमड्रॉपची लोकं हळुहळु एकेक करुन लिफ्ट मधुन बाहेर पडत होती अन पार्किंग लॉट कडे येताना दिसत होती, सगळ्यांच्या मागुन मैत्रिणींशी निवांत गप्पा मारत हसत खिदळत येत असलेली मला चित्रांगदा दिसली !
ओह्ह्ह चित्रांगदा !!
___________________________________________
चॅप्टर २ : कॉफीमशीन
जवळपास एक वर्ष होवुन गेले ह्या गोष्टीला ... जास्तच , सव्वा वर्ष वगैरे ... नुकताच क्लायंट साईटचा प्रोजेक्ट संपवुन पुण्यात परतलो होतो, तेव्हा पहिल्यांदा चित्रांगदा भेटली होती कॅन्टीन मध्ये ... नुकत्याच जॉईन झालेल्या बॅचमधे तीही जॉईन झाली असावी . कॉफीव्हेंन्डिंग मशीनच्या समोर प्रश्नार्थक चेहरा करुन उभी होती, डाव्या हातात नोट बुक अन उजव्या हातातील पेन अलगद ओठांनी पकडुन .... तीने चेहर्यावर आलेले तिचे केस पेनानेच कानामागे सारले, मशीनची दोन तीन बटने दाबुन पाहिली पण कॉफीमशीन काही केल्या चालेना, नो वंडर , कॉफीमशीनही बहुतेक तिला पाहुन स्टन्ड झाले असावे ... त्याचे माहीत नाही पण मला तरी तिला पाहुन बघता क्षणी कालिदास आठवला होता -
"तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभि:।
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां
या तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:।। "
अगदी तंतोतंत ! नो बेटर वर्ड्स !
मी माझा कॉफी मग घेवुन कॉफी मशीनपाशी गेलो , तिने जरासे दचकुनच माझ्याकडे पाहिले . निळसर घारे टप्पोरे डोळे.
ओह्ह गॉड , हाऊ डिड यु डु धिस !
मी जरासा कॉफी मशीनचा ट्रे हलवला मशीन रीस्टार्ट केले, तेवढाने बहुतेक ते मशीन भानावर आले असावे, त्याने व्यवस्थित कॉफी द्यायला सुरुवात केली. तिने हलकेसे हसल्यासारखे करुन कप उचलला अन टेबलकडे निघाली . मी कॉफी मशीनवर माझा कप ठेवत ठेवत, तिला ऐकु जाईल इतक्या आवाजात म्हणालो
" थ्यँक यु गिरिजासर .... यु आर वेलकम मिस ___"
ती झटकन मागे वळाल्याचे मला जाणवले, मीही जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले . माझा कॉफीचा मग घेवुन मागे वळालो ...
" हॅल्लो " चित्रांगदा म्हणाली
" हाय " मी जमेल तितके दुर्लक्षपुर्वक म्हणालो .
"थ्यॅन्क यु . आय एम अ न्यु जॉईनी, हे मशीन कसे चालते मला काहीच माहीत नाही , थॅन्क्स फॉर युवर हेल्प "
"ह्म्म "
" माय सेल्फ चित्रांगदा " तिने हसत हसत हात पुढे केला
" मी गिरीजा "
"गिरिजा ?" तीने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"गिरिजा अॅज इन गिरिजाप्रसाद . नाईस टु मीट यु " मी हस्तांदोलन केले
तुम्ही कधी पारिजातकचे फुल हातात घेतले आहे का ? नसेल तर तिचा हात किती नाजुक होता हे मी तुम्हाला समजाऊन सांगु शकणार नाही !
_________________________________________________________________________
चॅप्टर ३ : लीप ऑफ फेथ
पुढे पुढे गप्पा वाढत गेल्या, सगळ्यांच्या सारखे तीही 'गिरिजासर' म्हणुनच बोलु लागली होती . मी मात्र वेगळ्याच दुनियेत होतो. माझे क्रश अॅट फर्स्ट साईटचे गणित हळुहळु अवघड होत चालले होते ... तिच्या एक एक सवयी लक्षात येत होत्या , तिचे हसणे, हसता हसता चेहर्यावर आलेली बट हातातील पेनानेच मागे सारणे, दररोज ४ वाजता कॉफी प्यायला येणे , यायच्या आधी अगदी न चुकता मला "कॉफी ? " असे पिन्ग करणे. किंव्वा दर शुक्रवारी कायम भारतीय फॉर्मल वेयर घालुन येणे , तेव्हा अगदी न चुकता बिन्दी लावणे , इरव्ही अगदी ड्रेसकोड असल्यासारखे वेस्टर्न वेयर घालणे, ते घातल्यावर चालताना जणु आपल्याला कालिदासाची व्याख्या पाळायची सक्ती केली आहे असे वागणे. केस कायम मोकळे सोडणे , काम करताना मात्र एखादा साधासा हेयरडु करणे अन त्यात पेन्सील खोचुन ठेवणे... उफ्फ. कधी कधी आमच्या ग्रुपच्या ट्रिपला, ट्रेकला येणे , तिथे अगदी धमाल मस्ती करणे , उगाचच नवशिक्याट्रेकर सारखे लिंबु सरबत पाहुन " ओह्ह लिमोनेड लिमोनेड " वगैरे न करणे , ऑफीसच्या कामाव्यतिरिक्तच्या इतर अॅक्टीव्हीटीज सोबत अगदी आवर्जुन माझ्या अॅक्तीव्हीटीज मधे पार्टिसिपेट करणे वगैरे वगैरे . ती अगदी जुने मित्र असल्यासारखे मिक्स होत गेली... मला खरे तर कलीग्सशी मैत्री करायला आवडत नाही , पण इथे तो नियम कधी सुटत गेला कळालेच नाही ...
आमच्या डोक्यात मात्र " कोई तो रोके कोई तो टोके , इस उम्र मे अब खाओगे धोके , डर लगता है तनहा रहने मे जीं ... दिल तो बच्चा है जी " ह्या गाण्याच्या ओळी रेंगाळत होत्या.
प्रेमात पडण्याचा एकच प्रॉब्लेम असतो तुम्ही नक्की कधी पडलात हेच तुमच्या लक्षात येत नाही !
अजुन आठवते ... सात डिसेंबरची रात्र होती, ऑफीसच्या पार्किंगमधे कॅबची उभा होतो काहीतरी कारणाने आज कॅबचे श्येडुल गंडले होते. आज बहुतेक चित्रांगदा माझ्या कॅब मधे होती, ती लिफ्ट मधुन बाहेर आली, अन माझ्या कडे पाहुन प्रसन्न हसली
" सम प्रॉब्लेम विथ द कॅब्स नो ?"
"ह्म्म " माझे लक्ष तिच्या केसात खोचलेल्या पेन्सिल कडे गेले, मी नुसते डोळ्यांनीच निर्देश केला .
"आह , स्टुपिड मी ! थ्यॅन्क्स ! " असे म्हणत तिने अलगद केसातुन पेन्सिल काढली , मानेने झटकुन केस मोकळे केले !
' ओह्ह.. धिस इज इट . नाऊ ऑर नेव्हर .' मला उगाचच कोणीतरी आतुन काहीतरी सांगतय असे जाणवले, अन मी नकळत बोलुनही गेलो
" लेट्स सिट ऑन दोज बाईक्स, अजुन किती वेळ लागेल काय माहीत !"
काहीतरी फालतु गप्पा मारत आम्ही दुरवर पार्क केलेल्या बाईक्सवर जाऊन बसलो . ती काही ना काही ऑफीसातील विषय काढुन बोलत होती
"चित्रा , मला तु आवडतेस" मी अचानकच तिचे वाक्य तोडत तोडत म्हणालो.
"व्हॉट ? " तिने अगदी ठेचकाळल्यासारखे विचारले " व्हॉट ? आय मीन हाऊ ? "
" आय डोन्ट क्नो , मला माहीत नाही , बस्स मला तु आवडतेस इतकेच !"
"आय मीन ... आय मीन हाऊ इज इट पॉसिबल ? सिन्स व्हेन ?" ती अजुनही धक्का बसलेल्या स्टेटमधेच होती
"आय डोन्ट क्नो ... मे बी कॉफीमशीनपासुन. "
"दॅट लाँग ? कसं शक्य आहे ? हे काय गिरिजासर ? हे हे ह्याने सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील ? व्हाय आर यु कॉम्प्लिकेटेंग थिंग्स? धिस इज नॉट इव्हन पॉसिबल "
" मला तु आवडतेस ...बस्स ... इतकेच मला सांगायचे आहे बाकी काही नाही ." मी एकदम शांत आवाजात बोललो होतो.
"धिस इज नॉट गोईंग टू वर्काअऊट सर. धिस इज नॉट गोईंग टू वर्काअऊट "
मी काहीच बोललो नाही , फक्त तिच्या नजरेतुन नजर काढुन घेतली अन हलकेसे हसलो.
पार्किंग लॉट मधे आता कॅब्स येत होत्या, चित्रांगदा उठुन त्यांच्या कडे चालायला लागली , मी अजुनही बसुनच होतो, तिने चार पावले परत मागे येवुन म्हणाली "व्हाय आर यु डुईंग धिस ? व्हाय आर यु कॉम्प्लिकेटिंग माय लाईफ , व्हाय आर यु स्पॉईलिंग अवर फ्रेंन्डशिप ? धिस इज नॉट इव्हन पॉसिबल "
मी एकदम तिच्या नजेरेला नजर भिडवुन म्हणालो " हे बघ मी फक्त इतकेच म्हणालो आहे की मला तु आवडतेस बस्स, बाकी काहीच नाही "
तिचे डोळे ओलसर झाले होते ... मी नजर हटवली अन शुन्यात नजर लावुन बसलो . मला हलकेसे हसु आले , अशावेळी हसु यायचे काय कारण खरे तर... पण आले ... ती दोन मिनिट स्तब्ध राहिली ...
"आय नीड टाईम . मला वेळ पाहिजे विचार करायला " ती अगदी निश्चयाने बोलली...
" ह्म्म " बस्स इतकेच , बाकी मी काहीच बोललो नाही उगाचच शुन्यात पहात हलकेसे हसत राहिलो.
ती निघुन गेली . मी वळुन पाहिले तेव्हा ती कॅबच्या दाराशी उभी होती माझ्याकडे पहात ... आमची नजरा नजर झाली क्षणएकमात्र.... बस्स इतकेच !
पालखी काळाची थांबली एकदा,
बदलण्या खांदा भोईयांचा |
त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती,
पेटवून ज्योती, अंतरात |
पालखी काळाची गेली निघोनिया,
ज्योत ठेवोनिया तेवतीच |
आता वाट आहे पहायाची फक्त,
'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |
(पालखी)
बारावीत असताना मित्राने जेव्हा ही कविता ऐकवलेली तेव्हा शष्प काही कळाले नव्हते तेव्हा मित्र म्हणालेला " कविता समजुन घ्यायची नसते .... कविता अनुभवायची असते .... कविता जगायची असते"
आज तब्बल ११ वर्षांनी ह्या वाक्याचा अर्थ उमगत होता!
______________________________________________
च्यॅप्टर ४ : अबोला
पुढे ऑफीसात काही दिवस आम्ही अबोला अबोला खेळत होतो . म्हणजे ती ऑफीसात अगदी जाणीवपुर्वक बोलणे टाळायची , येताजाता क्यँटीन मधे नजरानजर व्ह्यायचीच पण बोलणे मात्र प्रकर्षाने कामासंबंधीचेच . इतर कलीग्ज्स सोबत असताना तर अगदी जाणीवपुर्वक नजरानजरही टाळ्ली जात होती
" ये शिकस्त-ए-दीद की करवटें भी बड़ी लतीफ-ओ-जमील थी,
मैं नज़र झुका के तड़प गया , वो नज़र बचा के निकल गये..! "
एके दिवशी असेच आफ्टर ऑफीस अवर्स मध्ये कोणीच नसताना कॉफीमशीनच्या शेजारी ती दिसली, मी अगदी मनाचा निश्चय करुन तिच्या जवळ गेलो, तिने अगदी जाणीवपुर्वक अजिबात लक्ष दिले नाही .
"धिस नीड नॉट बी सो डिफिकल्ट . हे काही इतके अवघड नाहीये चित्रांगदा ! मी फक्त 'मला तु आवडतेस' इतकेच म्हणालो आहे बस्स . आय अॅम स्टिल युवर गुड फ्रेन्ड .... व्हु जस्ट लाईक्स यु ...मोअर दॅन अदर्स डु "
ती गंभीर होवुन म्हणाली " हे इतके सोप्पेही नाहीये , यु क्नो द कॉम्प्लिकेशन्स "
" हो ना . म्हणुन तर फक्त 'आवडतेस' इतकेच म्हणालो ना . "
आता मात्र ती हसत हसत म्हणाली " आय क्नो दॅट अन्ड यु अल्सो क्नो दॅट यु डोन्ट मीन दॅट , यु मीन समथिंग मोअर"
मी काहीच बोललो नाही . रादर मला जे बोलायचे होते ते तीच बोलली होती . आता काय बोलणार ह्याच्या पुढे ?
" आय अॅम स्टिल थिन्किंग, मला अजुन वेळ हवा आहे"
"तोवर काय हे असेच अबोला अबोला खेळत रहायचे का अन जो पहिल्यांदा बोलेल तो हरला ?? "
ती आता मात्र अगदी व्यवस्थित हसली " पेशन्स ...पेशन्स इज अ व्हर्च्यु गिरिजा "
मीही हसलो . त्यानंतर संवाद अगदी आधी सारखाच सुरु झाला .परत केबीन कडे जात असताना , जाता जाता मी नजरेने तिच्या केसातील पेन्सील कडे निर्देश केला , तिने मोठ्ठे डोळे करुन माझ्या कडे पाहिले , अन 'नाही' अशी मान डोलवली अन हसायला लागली ....
बाकी गिरिजा'सर' मधील 'सर' पडुन गेल्याच्या उगाचच आशावाद मला सुखावुन गेला.
_______________________________________________
च्यॅप्टर ५ : Back to NOW
साधारण रात्रीचे साडे नऊ वाजुन गेले होते. नुकतीच दिवाळी उलटुन गेली होती अन आता हवे मधे गारवा चांगलाच जाणवु लागला होता.पुर्वेकडील ब्लुरीजच्या टॉवर्स मागुन आता भ्रकट तांबुस रंगाचा चंद्र उगवत होता...ऑफीसमधली लोकं एकेक करुन पिकअप कॅब ने घरी निघाली होती. मी मात्र पार्किंगच्या अगदी टोकाला लावलेल्या माझ्या गाडीला टेकुन उभा होतो , गाडीत भीमसेनजींच्या आवाजातील राग शुध्द केदार चालु होता, आणि माझे जवळपास सारेच काम क्लायंटला डीलीव्हर केले असल्यान आता जवळपास महिनाभर निवांतच होतो. ही अशी थंड हवेची झुळुक , उद्याच्या कामाचे काहीच टेंशन नसणे आणि राग शुध्द केदार हे काहीतरी अप्रतिम रीलॅक्सिंग मिश्रण झाले होते की शब्दात वर्णन करता येणार नाही. मी नेहमीप्रमाणेच खिषातुन मार्लबोरो कढुन शिलगावली अन निवांतपणे झुरके घेत राहिलो.
लिफ्टमधुन बाहेर पडलेल्या घोळक्याच्या किलबिलाटाने मला परत ह्या क्षणात खेचुन आणले ... चित्रांगदा हसतहसत कॅबपाशी जाऊन मैत्रिणींना काहीतरी ऑफीसचे कागदपत्रे वगैरे देत होती , नंतर मात्र तिने त्यांना काहीतरी सांगितले असावे बहुतेक, उगाचच त्यांचे खिदीखिदी हसणे चालु होते. बाकी नुकताच मित्राच्या लग्नाला जाऊन आलो होतो तेव्हा अगदी वाढवलेली मोठ्ठी दाढी काढुन टाकली होती , त्यामुळे आज ऑफीसात सगळेच हसत होते, सो मला काही जास्त खास वाटले नाही .
चित्रांगदा त्यांना बाय बाय करुन माझ्या कडे यायला लागली. दॅट वॉज सर्प्रायझिंग! मी पटकन मार्लबोरो टाकुन दिली .
" हे काय आहे हे ?" ती माझ्याकडे बघत बघत अगदी मनसोक्त हसत होती "यु लूक लाईक अ कॉलेज किड "
" का ? तुला काय माझ्यापेक्षा मोठ्ठे असल्यासारखे वाटायचा कॉम्प्लेक्स येत आहे का ?" मीही हसलो .
तिने माझ्या कडे पाहुन मान डोलावली "तु ठार वेडा आहेस , कसला एकदम बाळ दिसत आहेस दाढीतच छान दिसत होतास" ते हसत हस्तच म्हणाली .
"हो का ? आम्हाला कोनी सांगितले नाही तें " मी असे बोलत असतानाच अनपेक्षितपणे तिने गाडी जवळ येवुन काचेतुन तिचि पर्स गाडीत टाकली
" अं ?" मला हे सारे अनपेक्षितच होते .
तिने माझ्या गळ्याभोवती हातांनी अलगद मिठी मारली ... " यु आर क्रेझी . तु अजुनही कॉलेजात असल्यासारखेच वागतोस "
हे सगळेच अगदी स्वप्नवत होते , मला हे सारेच अनपेक्षित होते, तिचे केस आता माझ्या चेहर्यावर पसरले होते , मी त्यांच्या आडुन पाहिले तर तिच्या मैत्रीणी अगदी आश्चर्यचकित होवुन आमच्याकडे पहात होत्या ,
" हॅप्पी अॅनिव्हर्सरी " ती अगदी हळु आवाजात माझ्या कानात म्हणाली अन हलकेच तिने माझ्या गालावर ओठ टेकवले...
आता माझ्या लक्षात आले, एक वर्षापुर्वी ह्या इथेच आसपास झालेला आमचा संवाद मला आठवला ... अन कॅबच्या दाराशी उभेराहुन माझ्या कडे पहाणारी चित्रांगदा आठवली ...
मी हलकेसे हसत हसत डोळे मिटुन घेतली अन तिला घट्ट मिठी मारली...
इतके दिवस वाटायचे की क्षण साठवुन ठेवता आले तर किती छान होईन नै , पण आता लक्षात येत होते , की क्षणच मला गुंतवुन ठेवत होते , साठवुन ठेवत होते
आता परत ....
आता वाट आहे पहायाची फक्त,
'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |
____________________________________________________________________________
(काही पात्रे, प्रसंग आणि संवाद काल्पनिक .
अन्यत्र पुर्वप्रकाशित)
मस्त!
मस्त!
छान आहे.. आवडले.. फक्त एक
छान आहे..
आवडले..
फक्त एक करेक्शन..
अजुन आठवते ... सात डिसेंबरची रात्र होती, ऑफीसच्या पार्किंगमधे कॅबची वाट पाहत उभा होतो काहीतरी कारणाने आज कॅबचे..
ते बोल्ड केलेले टायपायचे राहिले आहे बहुतएक..
मस्त.
मस्त.
मस्त!
मस्त!
बरे लिहीले आहे.
बरे लिहीले आहे.
खूपच मस्त आणि ओघवतं लिखाण.
खूपच मस्त आणि ओघवतं लिखाण. कथा आवडलीच.
मस्तच ...खुप च आवडली
मस्तच ...खुप च आवडली
Awwwwww! लाईक्स लाईक्स लाईक्स
Awwwwww!
लाईक्स लाईक्स लाईक्स
एकदम मस्त.... खरच खूप चं
एकदम मस्त.... खरच खूप चं लिहली आहेस...मनाला स्पर्श करून गेली.. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या .... thanks ....+++++१११११११११
मस्त!
मस्त!
खुप आवडली.
खुप आवडली.
मस्त! मस्त! मस्त! अतिशय
मस्त! मस्त! मस्त!
अतिशय आवडली.
आवडली.
आवडली.
खुप आवडली! स्वप्नवत!!
खुप आवडली!
स्वप्नवत!!
कथा आवडली
कथा आवडली
छान!
छान!
सुंदर.....तरल!!
सुंदर.....तरल!!
खुप आवडली! स्वप्नवत!! > +१
खुप आवडली!
स्वप्नवत!! > +१
Chhan Lihali aahe
Chhan Lihali aahe
Superlike
Superlike
मस्त , छान लिहिली आहे
मस्त , छान लिहिली आहे
खूप आवडली आहे,मस्तच एकदम
खूप आवडली आहे,मस्तच एकदम
फक्त<उजव्या हातातील पेन अलगद ओठांनी पकडुन .... तीने चेहर्यावर आलेले तिचे केस पेनानेच कानामागे सारले, >> हे करणे मला काही जमले नाही खूप प्रयत्न करूनही,
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे
"प्रेमात पडण्याचा एकच
"प्रेमात पडण्याचा एकच प्रॉब्लेम असतो तुम्ही नक्की कधी पडलात हेच तुमच्या लक्षात येत नाही !"
अगदी खरं.
सुंदर शब्दरचना आहे.
लेडीजबायकांसाठी गिरीजासरनी
लेडीजबायकांसाठी गिरीजासरनी लिहलेले तरल रोमँटिक वगैरे लेखन का?
चांगलं जमलंय!!
===
> "चित्रा , मला तु आवडतेस" मी अचानकच तिचे वाक्य तोडत तोडत म्हणालो. > याला फक्त "आभारी आहे" एवढे उत्तर चालले असते की!!
> "आय नीड टाईम . मला वेळ पाहिजे विचार करायला " ती अगदी निश्चयाने बोलली...
आता मात्र ती हसत हसत म्हणाली " आय क्नो दॅट अन्ड यु अल्सो क्नो दॅट यु डोन्ट मीन दॅट , यु मीन समथिंग मोअर" >
Thats how woman leads man to commit more than he meant/intended initially
Thats how woman leads man to
Thats how woman leads man to commit more that he meant/intended initially Wink. >>>
Amy, same pinch. कथा वाचताना त्या वाक्यावर exactly हाच्च विचार आला डोक्यात
माझ्या डोक्यावरून गेली. शेवट
माझ्या डोक्यावरून गेली. शेवट नाही कळला. Happy anniversary ? ते already मॅरीड आहेत का ?
Thats how woman leads man to
Thats how woman leads man to commit more that he meant/intended initially >>>>> हे भारीये
प्रपोज करण्याची ऍनिव्हर्सरी
प्रपोज करण्याची ऍनिव्हर्सरी आहे ती
बादवे त्या वाक्यात than ऐवजी that झालेलं ऑटोकरेक्टमुळे ते मी नंतर बदलले आहे
प्रपोज करण्याची ऍनिव्हर्सरी
प्रपोज करण्याची ऍनिव्हर्सरी आहे ती Uhoh >> ohkk
बादवे त्या वाक्यात than ऐवजी that झालेलं ऑटोकरेक्टमुळे ते मी नंतर बदलले आहे>>>>> मी than च वाचलं पण ते
Pages