Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 December, 2015 - 04:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
प्रत्येकी पाव वाटी मुगडाळ, चणाडाळ, मसुर डाळ, उडीदडाळ किंवा आपल्याला आवडतील व उपलब्ध असतील त्या डाळी. (मी हिरव्या सालीची मुगडाळ घेतली आहे).
२ कांदे चिरून
थोडे हिंग
१ चमचा हळद
२-३ मिरच्या
मुठभर चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ
२ चमचे लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा:
लिंबाचा रस घातल्याने चवही येते व डाळींचा वास मोडला जातो. पण तो प्रमाणात घालावा मिश्रण आंबट होई पर्यंत घालू नये.
ह्या भज्या लहान मुलांना खुप आवडतात.
माहितीचा स्रोत:
स्वतःचे प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उम्मा! स्लर्प! टमटमीत,
उम्मा! स्लर्प! टमटमीत, चटकदार! जागुले थॅन्क्स.
अहहा... पटकन उचलुन तोंडात
अहहा... पटकन उचलुन तोंडात टाकाव वाटतय...मस्त
मस्तच. मी करते पण मी मुगडाळ
मस्तच.
मी करते पण मी मुगडाळ जास्त त्यापेक्षा कमी उडीदडाळ मग चणाडाळ मग इतर डाळी अजून कमी असे प्रमाण घेते. कांदा आणि लिंबूरस नाही टाकत, आले लसूण मिरची टाकते आणि मिरपूड मस्ट. जिरं आणि ओवाही टाकते.
मिश्रण दळल्यानंतर साधारण दोन तासांनी भजी करते.
छान आहेत वडे मी मुग डाळ व
छान आहेत वडे मी मुग डाळ व थोडी चना डाळ घेते कडिपत्त्याची पाने पण छान लागतात.
मिश्र डाळीचे पण करुन बघते.
हा तर दालवडा जागु
हा तर दालवडा जागु दालवड्यात कांदा आत न घालता वरून कांदा नि मिरची खावयास घेतात .
डाळवडा करताना फक्त चणाडाळ
डाळवडा करताना फक्त चणाडाळ घेते मी आणि कांदा त्यातच टाकते. एका डाळवडावाल्यानेच ही रेसिपी सांगितली. इथे डाळवडा मिळतो त्यात कांदा आतच घालतात.
छान आणि फोटोंमुळे कृती चटकण
छान आणि फोटोंमुळे कृती चटकण समजली आणि आवडली.
अंजू मी गुजराती दालवड्याबदल
अंजू मी गुजराती दालवड्याबदल लिहील आहे. ते ना सालीमुगदाल, चना अन उडीद दाल असे घेतात. खूपच फेमस आहे इथे ही डिश. खीरू (अर्थात ओले पीठ) ही सर्रास मिळते. पिठात ते मिरच्या, आलेलसूण, को. घालतात आणि बरोबर कांदा उभा कापलेला अन तळलेली मिरची. भन्नाट लागते.
ओके ओके अनघा . इथे मद्रासी
ओके ओके अनघा . इथे मद्रासी दालवडा मिळतो ना.
असं पण गुजराथमध्ये सालवाली मुगडाळ फेमस आहे, आई गुजराथची असल्याने बरेचदा खिचडी तशीच मुगडाळ घालून करते.
ती सालवाली मुगडाळ मी नेहमी
ती सालवाली मुगडाळ मी नेहमी आणते. चविष्ट असते ती.
रश्मी, अंकु, बी धन्यवाद.
अन्जू मुगडाळ जास्त घेतलेलीच चांगली त्यामुळे वडे थोडे पचण्यास हलके होतात.
सकुरा हो कढीपत्याची पानेही छान लागतील. पण आमच्या बच्चे कंपनीला आवडत नाहीत म्हणून नाही घातली.
अरे वा गुजराती डाळवडा असा असतो का छान. इथे डाळवडा मिळतो तो फक्त चणाडाळीचा असतो.
मस्तच..
मस्तच..
मस्त पा.कृ.. आणि छान टप्प्या
मस्त पा.कृ.. आणि छान टप्प्या टप्प्याने फोटो दिलेत..
मस्तं चटपटीत पाककृती.
मस्तं चटपटीत पाककृती.
आह जागू... काय सॉलिड दिसताहेत
आह जागू... काय सॉलिड दिसताहेत भजी.. तोंपासु!!
मस्त. जागू, तिखटाकरता काहीच
मस्त. जागू, तिखटाकरता काहीच घातलेलं नाहीस की लिहायला विसरलीस?
वाह!! मूगवड्याचं एक्स्टेंशन
वाह!! मूगवड्याचं एक्स्टेंशन मस्तंय..
मी थोडं आलं,हिरवी मिरची वाटून घालते, थोडी मूग डाळ भरड, ऑलमोस्ट अक्खी च घालते , खडबडित टेक्श्चर करता, बाकी कृती तुझ्यासारखीच.. फक्त वाटलेल्या डा ळींचे मिक्शचर दोनेक तास तसेच राहू देते.
नुसत्या चण्याच्या डाळीचे वडे गरम गरम खाल्ले तर छान लागतात, नाहीतर फारच कोरडे होतात आतून..
मस्त ग
मस्त ग
खमंग !!
खमंग !!
लई तोंपासु दिसिंग. तेल कमी
लई तोंपासु दिसिंग.
तेल कमी खायचं असल्याने याच पिठाची थालिपिठं/धिरडी/डोसे करण्यात येतील.
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!
सायो, मिरच्या आहेत ना घटक
सायो, मिरच्या आहेत ना घटक पदार्थांमध्ये.
मस्त दिसतायत भजी.
आह जागू... काय सॉलिड दिसताहेत
आह जागू... काय सॉलिड दिसताहेत भजी.. तोंपासु!! >>>> +१
वा वा! प्लेट सरकवा ती ईकडे !
वा वा! प्लेट सरकवा ती ईकडे ! कढईतल्या भज्याचा फोटो फार भारि!
डअळीचा फोटो मस्त आहे.
डअळीचा फोटो मस्त आहे.
मस्त फोटो. आत्ता खावीशी
मस्त फोटो. आत्ता खावीशी वाटतायत.
मस्त रेसिपी जागू . कढईतल्या
मस्त रेसिपी जागू . कढईतल्या भज्यांचा फोटो कातिल आलाय.
जागू, भजी सॉल्लिड
जागू, भजी सॉल्लिड दिसतायत!
दीमा, नविन प्रथेप्रमाणे आप्पेपात्रात करा. कमी तेलात होतील. करुन पहा, चांगली लागली तर इथे सांगा. मग मी पण करीन
जागूताई, छानच पा.कृ. आहे, हे
जागूताई, छानच पा.कृ. आहे, हे वेगळं लिहायची गरज नाही. पण हा फाऊल आहे. ईतक्या दिवसांनी तुम्ही पा.कृ. पोस्ट केलीत आणी ती परमेश्वराच्या प्रथमावताराची नव्हती.
दीमा, नविन प्रथेप्रमाणे
दीमा, नविन प्रथेप्रमाणे आप्पेपात्रात करा. कमी तेलात होतील. करुन पहा, चांगली लागली तर इथे सांगा. मग मी पण करीन>> >अवो ताई इथे पहा - http://www.maayboli.com/node/42022
मस्तरेसिपेी. आईकडी फॉरवर्ड
मस्तरेसिपेी. आईकडी फॉरवर्ड केली.
Pages