कथा
संध्याकाळचे ५ वाजले होते, हॉस्टेल च्या आपल्या रूम मध्ये बेड वर पडून जय बराच वेळ त्याच्या लॅपटॉप वर मायबोली या मराठी वेबसाईट वरच्या भयकथा, थरार कथा गेल्या ३ - ४ तासांपासून वाचत बसलेला. आज शनिवार असल्याने तो जरा निवांतच होता, दुपारच्या अगदी गळ्यापर्यंत येईल अश्या जेवणानंतर डोळ्यावर चढलेली झोपेची धुंदी, फुल्ल असणारा फॅन, डीसेंबर चे दिवस असल्याने हवेतील गारवा आणि त्यात त्याला आवडणाय्रा मराठी भय कथा म्हणजे जयसाठी एक ideal आशी दुपार होती. बराच वेळ पालथे पडुन वाचल्यामुळे त्याची हनूवटी आणि हात सुन्न झाला तसे त्याने आपली पोझीशन बदलली आणि पुन्हा तो वाचन्यात दंग झाला, त्याला असे बरेच वेळा वाटायचे की आपण पण कथा वैगेरे लिहाव्यात त्याला शंकर पाटलांच्या कथा खुप आवडत असत. भय कथा आणि थरार कथा वाचुन त्यानं निश्चीत केल कि आपण पण अश्या एका थरारक trip ला जायला पाहिजे, थ्रील अनूभवायला पाहीजे. तसे त्याचे विचार चक्र चालू झाले कोणाबरोबर जाता येईल आणि कुठे जाता येईल याचा विचार करु लागला.
त्याने नविण टॅब मध्ये गूगल सर्च केले आणि ३०० ते ४०० किमी वरची प्रेक्षणीय किंवा डोंगर कपारे शोधू लागला. जय कर्नाटकात विजापूर मध्ये असल्याने त्याला तिकडच्या रस्त्याची काहीच माहिती नव्हती. शेवटी दहा पंधरा मिनीटे सर्च केल्यानंतर त्याला मनासारखी ३- ४ ठिकाणे मिळाली, बदामी व त्याच्या आजूबाजूचा परिसर त्याने निवडला कारण तिकडे पौराणिक वास्तू भरपूर प्रमाणात होत्या आणि नैर्सगीक सूबत्ता पण होती. त्याने बराच वेळ GPS सर्च करूण एक ट्रॅक बनवला. गूगल मॅप मध्ये location आणि directions मिळ्वल्या. साधारणतः ४०० ते ४५० किमी चा एकून प्रवास होता आणि २ दिवसाचा वेळ त्याना लागणार होता.
जयने त्याचा मोबाइल उचलला आणि त्याच्या अगदी जवळच्या अश्या जिवलग मित्राला म्हणजे अमोलला कॉल लावला . अमोल म्हणजे एक अवलीया, अभ्यास सोडुन, त्याला येत नाही अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. तसा तो खुपच हूशार होता पण त्याच्या उचापती भरपूर होत्या. यावेळी अमोल कोठे असणार जयला चांगलेच माहिती होते. अमोल ने कॉल उचलल्या उचलल्या त्याला अस्सल गावरान शिव्या जयला ऐकयला मिळाल्या कारण आज भारत पाकिस्थान मॅच होती आणि साहेब बेटींग करण्यात बिझी होते. तरीपण जयने त्याला आपला trip चा प्लॅन सांगीतला. अमोलला तर एव्हडेच पाहीजे होते. त्याने मॅच संपल्यावर रुमला येणार असल्याच सांगीतले आणि फोन कट केला. नंतर जयने आकाश ला कॉल केला आणि त्याला trip ची कल्पना दिली तो लगेचच यायला तयार झाला, आकाश त्यांचा वर्गमित्र होता पण तो बाहेर रुम घेउन रहायचा. आणि अमोल आणि जय एकाच रूम मध्ये हॉस्टेलला रहात असत. दोघांनाही कॉल झाल्यावर जय ला आठवले की त्यांच्या कडेतर एकच बाईक होती कारण अमोलच्या बाईकचे रिपेअरीचे मोठे काम असल्याने त्याने बाईक दोन दिवसांकरीता मेकॅनिककडे सोडली होती, म्हणून त्याने आपली बाईक घ्यायचे ठरवले.
मॅच संपल्यावर अमोल रुमला आला तोपर्यंत आकाशही आला होता त्यांनी प्लॅनिंग करायला सुरूवात केली. शेवटी असे ठरले की एकच बाईक घेऊन तिघेजन त्याच्यावरच जायचे, आणि पेट्रोलचे जे काही पैसे होतील ते तिघांनीही भरायच आणि जेवणाखाण्याचे आपलेआपण बघायचे. मग सकाळी शार्प ७ ला जायच त्यांचे ठरले.....
कशी वाटली कथा ते प्रतिसाद
कशी वाटली कथा ते प्रतिसाद देऊन कळवा
छान आहे सुरुवात पु.ले.शु
छान आहे सुरुवात पु.ले.शु
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे काय???
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे काय???
पु. ले. शु. म्हणजे काय??? >>>
पु. ले. शु. म्हणजे काय??? >>> पुढिल लेखणास शुभेछा
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे काय???
थोड़े मोठे भाग टाका हो बाकी
थोड़े मोठे भाग टाका हो
बाकी सुरुवात छान आहे
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे काय???
Thanks..ithun pudhe mothe
Thanks..ithun pudhe mothe bhaag taken..
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे
धन्यवाद... पु. ले. शु. म्हणजे काय???
>>>> हा एकच प्रतिसाद चारवेळा का रीपीट केला?
Kahitari problem aahe..dar
Kahitari problem aahe..dar veli asach hotay..
छान सुरुवात
छान सुरुवात
धन्यवाद...क्रिश्नन्त
धन्यवाद...क्रिश्नन्त
धन्यवाद...क्रिश्नन्त
धन्यवाद...क्रिश्नन्त