Submitted by स्नेहमयी on 1 December, 2015 - 22:33
नमस्कार
मला wet grinder विषयी माहिती हवी आहे.
१ - सध्या मी इडली चे पीठ साध्या mixer मध्ये वाटते..wet grinder ne फरक पडतो का?? मी brown rice वापरते.
२ वाटायला वेळ कितपत लागतो? mixer च्या तुलनेत जास्त किंवा कमी लागतो का ?
३ - कमीतकमी इतके पीठ एका वेळी लागते अशी minimum requirement असते का काही?
४ भारतात मिळणारे कोणते model छान आहे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साऊथ इंडीयन लोक्स सांगु शकतील
साऊथ इंडीयन लोक्स सांगु शकतील याबद्दल. तेच लोक वापरतात.
ELGI ULTRA WET
ELGI ULTRA WET GRINDER
http://www.elgiultra.com/
हे ग्रांईडर भारतात व विदेशात प्रसिद्ध आहेत. क्वॉलिटी चांगली आहे.
Wet grinder मधे पीठ वाटताना
Wet grinder मधे पीठ वाटताना त्यात हवा मिसळली जाते, त्यामुळे पीठ हलके होते. एकीकडे पीठ वाटायला ठेवून इतर कामे करता येतात. माझ्याकडे विजयालक्ष्मी ब्रँडचा सव्वा लिटरचा wet grinder आहे. चौघांच्या कुटुंबाला तो पुरेसा आहे. इतर ब्रँड्सची फारशी माहिती नाही, पण हाही ब्रँड चांगला आहे. मला साधारण अर्धा तास लागतो पीठ वाटायला. पीठ मात्र छान गुळगुळीत वाटले जाते. सुरुवातीला स्वच्छ करायला कटकटीचे वाटू शकते, पण सवयीचा भाग आहे
माझ्या कडे आहे . गिफ्ट
माझ्या कडे आहे . गिफ्ट आल्यामुळे कपनी चे नाव आठवत नाही ( आता असे जडशीळ गिफ्ट कोणी आणि का दिले ते नका विचारू . मोठी कथा आहे )
तर
१. mixer & .wet grinder ne फरक पडतो का - हो पडतो . ते वाटलेले पीठ हात लावून बघितले कि कळते. मला इथे नाही अस सांगता येणार.
२. एकदम जास्त Quantity करता येते. पण धपकन सगळे टाकले आणि लागलो दुसर्या कामाला असे करता येत नाही . हळू हळू फिरवत फिरवत ५-७ मी सगळे मटेरियल टाका . मग शांतपणे तो त्याचे काम करतो आपण आपले काम.
३. जड असते . हलवाहलवी सहज करता येत नाही . म्हणजे वर कुठे तरी ठेवू लागेल तेंव्हा काढू चालत नाही . एक जागा fix लागते.
४ minimum requirement - काही कल्पना नाही . आमच्या कडे कायमच १ किलो तरी लागतेच.
गजाभाऊ, तुम्ही लिंक दिली आहे
गजाभाऊ, तुम्ही लिंक दिली आहे त्या वेट ग्राईंडरमध्ये कोकोनट स्क्रॅपर आहे, शिवाय कणीकही भिजवता येते असं लिहिलं आहे. तुम्ही तो वेट ग्राईंडर वापरला आहे का? त्यात चटणीसारखे पदार्थ होतात का? मसाल्यांची कोरडी पावडर होऊ शकते का?
माझा फुप्रो कम मिक्सर आहे. मिक्सरचा वापर चटण्या आणि इडली डोश्याचे पीठ वाटणे यासाठीच फक्त होतो. पण मिक्सरमधे इडली डोश्याचे पीठ वाटल्यास मोटर खूपच तापते आणि काही वेळा तर जळतेही, धूर येतो बाहेर. त्यावर उपाय म्हणून वेट ग्राईंडर घ्यायच्या विचारात आहे.
मंजुडी, मी वापरत आहे
मंजुडी,
मी वापरत आहे एल्जीअल्ट्रा ड्युरा + छोट्या कुटूंबा साठी उपयुक्त माझा वापर फक्त ईडली दोश्याच्या पिठासाठी
माझ्या wet grinder मधेही
माझ्या wet grinder मधेही coconut scraper आणि कणीक भिजवण्याची accessory आहे, पण मी कधी वापरलेली नाही
चटणी, भाज्या आमट्यांच वाटण
चटणी, भाज्या आमट्यांच वाटण सुद्धा करता येईल ह्यात, म्हणजे पुर्वी आम्ही म्हणजे माझी आज्जी रगडा वापरत असु !! खुप पुर्वी मुंबईतसुद्धा रगडा वापर असु पण ते कालांतराने बंद झाल कारण मिक्सर आलेला,
एल्जी अल्ट्राचे उत्पादन खरच
एल्जी अल्ट्राचे उत्पादन खरच चांगले आहेत.
http://www.elgiultra.com/website/product_detail.php?id=15&name=Wet%20Gri...
मंजुडी, जुन्या पाटा वरवंटा/
मंजुडी,
जुन्या पाटा वरवंटा/ रगडा ला मोटार लावली आहे अस समज. एका fix दगडावर दुसरा दगड रोल होतो.
कोरडी चटणी नाही होणार. ओली होऊ शकेल. पण जास्त प्रमाणात करावी लागेल अस वाटते. मी नाही कधी केली.
कोकोनट स्क्रॅपर आहे पण मी १-२ च वापरलेय.
मी प्रीतिचा वेट ग्राईंडर
मी प्रीतिचा वेट ग्राईंडर वापरते. माझ्याकडे वापर केवळ इडली डोशाचं पीठ आणि ओलं वाटण (खोबर्याचं आणि कांद्याचं)
http://www.preethi.in/smartgrind.asp
मिक्सरपेक्षा वेट ग्राईंडरमधले पीठ अधिक हलकं आणि चविष्ट बनतं. वटायला वेळ मिक्सरपेक्षा बह्रपूर. पण मिस्करसारखं भांड्यावर हात ठेवून घर्रघर्र ऐकावी लागत नाही. ग्राईंडर येड्यासारखा फिरत राहतो. म्मिनिमम रीक्वायरमेंट त्या त्या ग्राईंडरच्या कअॅपेसेटिनुसार असते.
ओके गजाभाऊ आणि मृणाल१. मला
ओके गजाभाऊ आणि मृणाल१.
मला डो नेडिंग आणि कोकोनट स्क्रॅपरची तशी गरज नाहीये. दोन्ही कामं आऊटसोर्स्ड आहेत. घरात ब्लेंडर आहे, मिनी फुप्रो आहे. त्यामुळे फक्त ओल्या/ कोरड्या चटणी (किंवा वाटणं) आणि इडली डोश्याची पिठं (हे आठवड्यातून एक-दोनदा तरी लागतंच) यासाठी एकच कॉमन यंत्र शोधते आहे.
नंदिनी, प्रीतीच्या लिंकमधलं
नंदिनी, प्रीतीच्या लिंकमधलं तुझं नेमकं कुठलं मॉडेल ती लिंक दे ना.
किती जागा घेतो?
किती जागा घेतो?
माझ्या wet grinder मधेही
माझ्या wet grinder मधेही coconut scraper आणि कणीक भिजवण्याची accessory आहे, पण मी कधी वापरलेली नाही>>>>>> वावे या मॉडेलच नाव/ लिंक द्या.
मला coconut scraper असलेल घ्यायच आहे.
पॉवर ग्राईंड पण माझं दीड
पॉवर ग्राईंड पण माझं दीड लिटरच्या कॅपेसीटीचं आहे. ते आता तिथं साईटवर दिसत नाहीय.
ब्रँड विजयालक्ष्मी, capacity
ब्रँड विजयालक्ष्मी, capacity १.२५ लि.
नंदिनी, तुम्ही किती वाटण एकावेळी करता? पूर्ण बारीक होतं का?
व्यवस्थित बारीक होतं. मी दोन
व्यवस्थित बारीक होतं. मी दोन तीन नारळांचं एकदम वाटण करते. मोजून कधी पाहिलं नाही.
कोरडया चटण्या पण झाल्या तर
कोरडया चटण्या पण झाल्या तर मस्तच.मिक्सरला सुट्टीच् देता येईल.
कोरड्या चटण्या होत नाहीत.
कोरड्या चटण्या होत नाहीत.
फुप्रोच्या मोठ्या भांड्यात
फुप्रोच्या मोठ्या भांड्यात इडली-डोशाचं पीठ वाटत नाही का तुम्ही? मी त्यातच वाटते. माझ्याकडे दुसरं काही नाहीचे
आणि मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात चटण्या- कोरड्या आणि ओल्याही.
तेच ना
तेच ना
मी मिक्सरच्या wet grinding
मी मिक्सरच्या wet grinding jar मध्ये वाटते डाळ.
पण जास्त प्रमाणात असेल तर वैतागवाणे होते काम
wet grinder - वाटणे मिक्सर -
wet grinder - वाटणे
मिक्सर - बारीक करणे
हा बेसिक फरक आहे.
आपल्या पिढीने मिक्सरच वापरलाय त्यामुळे आधी फरक कळत नाही. वापरल्यावर लक्षात येते.
फुप्रोच्या मोठ्या भांड्यात
फुप्रोच्या मोठ्या भांड्यात इडली-डोशाचं पीठ वाटत नाही का तुम्ही? >>
पूनम, ह्या नळकांडं असलेल्या भांड्ड्यात इडली-डोश्याचं (स्टीलचं S आकाराचं ब्लेड लावून?) वाटण करायचं असं म्हणतेय्स का तू? नीट 'वाटलं' जातं का?
मी फुप्रो वाटणासाठी कध्धी वापरला नाहीये, ते जर नीट झालं तर मला युरेका होईल
पूनम, ह्या नळकांडं असलेल्या
पूनम, ह्या नळकांडं असलेल्या भांड्ड्यात इडली-डोश्याचं (स्टीलचं S आकाराचं ब्लेड लावून?) वाटण करायचं असं म्हणतेय्स का तू? नीट 'वाटलं' जातं का?>>> मी हा प्रयोग क्रेलाय. प्र चं ड वेळ लागतो आणि बारीक वाटलं जात नाही हा स्वानुभव. पूनमकडे काही टिप्स असतील तर वाचायला आवडतील.
पण... वेट ग्राईम्डरमध्ये पिठाला जी कन्सिस्टन्सी येते ती इतर कशातही येत नाही हे अंतिम सत्य.
होय होय त्याच नळकांडं
होय होय त्याच नळकांडं लावलेल्या भांड्यात एस ब्लेड लावून इडली, डोसे, उत्ताप्पे, मेदूवडेचं पीठ यातच वाटते मी. उत्तम 'वाटलं' जातं. माझ्याकडे तर कधीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. टचवुड! याची कपॅसिटीही भरपूर आहे.
वेळ? नाही बुवा. खूप काही
वेळ? नाही बुवा. खूप काही प्रचंड वगैरे वेळ नाही लागत. वरच्या नळकांड्यातून (हा शब्द भारी आहे :हाहा:) पाणी घालत रहायचं हळूहळू. एस ब्लेड खाली फिरत राहतं. इतका प्रॉब्लेम का येतोय तुम्हाला? उडदाची डाळ तर अगदी पर्फेक्ट कन्सिस्टन्सीने वाटली जाते यात. गंध हवी असेल तर तशी, पण जर्राशी रवाळ हवी असेल तर तशीही.
अर्थातच, दगडी रगडाच बेस्ट असणारच. पण तो असणं, वापरणं सोयीचं नाहीये ना. हा पर्याय उपलब्ध पर्यायांपैकी बेस्ट वाटतो मला तरी. एकाच उपकरणात सर्वकाही भागतं.
ओक्के! प्रयोग करून बघण्यात
ओक्के! प्रयोग करून बघण्यात येईल. यशस्वी झाला तर मग काही प्रॉब्लेमच नाही.
फुप्रो वाटणासाठी कसा वापरता
फुप्रो वाटणासाठी कसा वापरता येयील ? निदान माझ्या कडच्या तरी नाही जमणार .
http://www.philips.co.in/c-p/HL1659_28/food-processor
पण... वेट ग्राईम्डरमध्ये पिठाला जी कन्सिस्टन्सी येते ती इतर कशातही येत नाही हे अंतिम सत्य. +१
Pages