Wet grinder

Submitted by स्नेहमयी on 1 December, 2015 - 22:33

नमस्कार
मला wet grinder विषयी माहिती हवी आहे.
१ - सध्या मी इडली चे पीठ साध्या mixer मध्ये वाटते..wet grinder ne फरक पडतो का?? मी brown rice वापरते.
२ वाटायला वेळ कितपत लागतो? mixer च्या तुलनेत जास्त किंवा कमी लागतो का ?
३ - कमीतकमी इतके पीठ एका वेळी लागते अशी minimum requirement असते का काही?
४ भारतात मिळणारे कोणते model छान आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बरोबर आहे मृणाल तुमचं... पण सध्या मिक्सरचं वाटण चालतंय, म्हणजे धावतंय (म्हणजे इडली-डोसे १ नंबर होत आहेत, पण मिक्सरच्या आतून धूर येतो Lol म्हणून त्याला पर्याय शोधायचाय) तीच कन्सिस्टन्सी फुप्रोला आली (आणि त्यातून धूर आला नाही) तर मग काही प्रश्नच नाही ना.

माझ्याकडे भारतातून आणलेला अल्ट्रा चा वेट ग्राइंडर आहे . तो मी इडली , डोसे, मेदुवडे, उत्तप्पा, अप्पे, आप्पम या साठी वापरते.
का नां मधली काही परदेशस्थ धाकली पाती फूड प्रोसेसरचे एस शेप ब्लेड वापरुन (च) बेस्ट इडली / डोसे पीठ होतं असा क्लेम करत असतात . मी कधी केलं नाही अन खाल्लं नाही.

भारतात बहीण, मावशी वगैरे मोठ्या प्रमाणात नारळाचं वाटण असेल तर अल्ट्रा मधे करतात. मस्त गंध वाटण होतं . माझा इथे तितका नारळाचा वापर होतं नाही त्यामुळे ओल्या चट्ण्या मसाले याकरता ऑस्टर झिंदाबाद .

कोरड्या चट्ण्या / मसाले स्पाइस ग्राइंडरमधे .

लक्ष्मी रोडवर जोगदेव कडे मिळेल. हे दुकान नेमकं कुठे मला माहीत नाही पण ब-याच जणांकडून एकमुखानं जोगदेव ऐकलय.

मेधाने कुठेतरी अमेझॉन वर मिळणार्‍या इडली वगैरे भिजवणार्‍या वेट ग्रा. बद्दल लिहिले होते ते सापडत नाहिये. मॉडॅलचे नाव द्याकी पुन्हा प्लिज.

हा असा दिसणारा आहे माझ्याकडे, आईने मुंबैहून आणला होता. यात आटा अटॅचमेंट आहे म्हणताहेत. पण माझ्याकडे ते नाही. मी फक्त इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडे, आप्पम या करता वापरते.

इथे एडिसन वगैरे ठिकाणी भारतीय दुकानात पण मिळतात असे ऐकले होते.

http://www.amazon.com/Ultra-Dura-Grinder-Kneader-110-volt/dp/B00AFR0ILE/...

Pages