कवठाचे आंबील - उपवासाला चालणारे आणि पित्तनाशक

Submitted by हर्ट on 27 November, 2015 - 06:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

# पिकलेले पण भरीव कवठ
# उपवासाला करणार नसाल तर कोंथींबीर
# लाल मिरचीची पावडर अर्थात लाल तिखट
# जिरे
# चिरलेला गुळ कवठाला पुरेल इतका
# भाजलेल्या शेंगदाणे टरफल काढून - कुट अथवा अख्खे सोललेले दाणे चालतील
# मीठ
# तेल

क्रमवार पाककृती: 

१) सर्वप्रथम कवठ दणकण आपटून दोन भागात विभागून घ्यावे म्हणजे कवठाचा गर चमच्यानी खरडून काढता येतो.

२) गुळ चिरुन घ्यावा.

३) स्वच्छ मिक्सरमधे तळात आधी कवठाचा गर घालावा.

४) आणि ह्यात आता थोडी कोथींबीर, मग चिरलेला गुळ, मीठ, दाण्याचा कुट, तिखट हे सर्व घटक घालावे. (मी खालिल चित्रात दाण्याचा कुट नंतर घातला ते चित्र घेतले नाही पण कुट घालायचाच.)

५) हे सर्व मिश्रण मिस्करमधुन वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण खाताना रवाळ वाटायला (जाणवायला) हवे.

६) आता, गॅसवर मातिचे एक भांडे ठेवावे किंवा जाड बुडाची एखादी कढई/पातेलेही चालेल.

७) मातिच्या भांड्यात आता तेल तापवून त्यात आधी जिरे घालावे.

८) जिरे नीट तळल्या गेले की लगेच त्यात मिस्करमधील वाटण घालावे आणि मिक्सरमधे एक ग्लासभर पाणी घालून विसळून तेच पाणी पातेल्यात ओतावे. पळीने सर्वकाही एकजीन करावे.

९) वाढताना थोडी कोंथींबीर चुरडून आंबील वाढावे. ह्या चित्रामधे कोथींबीर बुडालेली आहे म्हणून दिसत नाही. हे आंभील छान दाट होत. पातळ सहसा होतचं नाही. हाच प्रकार थंडीच्या दिवसामधे तिळ घालून करावा कारण तिळ उष्ण असतात.

वाढणी/प्रमाण: 
६/७ वाट्या होतील
अधिक टिपा: 

१) आंबील जर उरले तर ते दुसर्‍या तिसर्‍या दिवशीही खाता येते. उलट चव मुरल्यामुळे ते अजून छान लागते.
२) तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल. अंगावर जर पित्त उठले असेल. लाल लाल गुंथा आल्या असतील तर त्यावर कवठ अगदी रामबाण उपाय आहे.

माहितीचा स्रोत: 
पिंकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवठा मध्ये गुळ घालून करतात ते खूप मस्त लागत.
BTW जे आंबवून करतात ते आंबील ना . म्हणजे नाचणीचे आंबील .
थोडी कन्फुजले आहे

>>>
कवठ आणि बेलफळ वेगळे. नृसिंहवाडीची कवठाची बर्फी प्रसिद्ध आहे. पुण्याला शनिपाराजवळ चितळे या नावाचं लहानसं दुकान आहे. या दुकानात उत्तम कवठाची बर्फी मिळते.
कवट / कवठ हा अंड्यासाठीचा कोडवर्ड होता. अंडं खाल्लं हे घरातल्या ज्येष्ठांना कळू नये म्हणून कवट / कवठ म्हणत. हा शब्द या फळावरूनच आला आहे.<<

चिनूक्स,
कवठ(अंड्यासाठी) हा शब्द ह्या फळावरूनच आलाय कशावरून? काही पुरावा?
हा तर कोकणात वर्षानूवर्षे प्रचलित आहे हे पाहिलेय.
त्यामुळे हे नक्की बरोबऱआहे का?
आणि कवठ फळ कोकणात्ले नाहीच एकलेय.

कन्फुजन आहे राव. तीन वर्षांअगोदर मला एकाने बेलफळ दिले आणि सांगितले की याचा मुरंबा बनव. आणि वरुन हेहे सांगितले की बेलफळ म्हणजेच कवठ.

घरी २-३ बेलफळे आहेत, त्यांच्यापासून अशी आंबील बनवता येईल का?

कोकणाचा विषय जाऊ द्या पण बेलफळ, कवठ आणि अंडे ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

बेलफळातील गर हा फार चिकट असतो. बेलफळ पिकता पिकता कधीकधी खराब होऊन जाते. पिकलेले चांगले बेलफळ मिळत असेल तर फोडून चमच्यानी तो गर मधासारखा चाटून घ्यावा. खूप औषधी गुण असतात त्यात. बेलफळाचे आंबिल वगैरे होत नाही.

काय वाट्टेल त्या शब्दाला अ‍ॅपल लावून इंग्रजांनी जगभरातल्या फळांची नावं बनवलेली आहेत.

पिकलेल्या बेलफळाचा गर व्यवस्थित गाळून घेऊन त्यात दूध व लागेल तशी साखर घालून 'बेल पन्हे' करतात. खास उन्हाळ्याच्या सुरुवातीची रेसिपी.

कवठाची गुळ घालुन चटणीही आवडते. आंबील करुन बघायला हवं. भारी दिसते आहे बी.

रच्याकने लहानपणी आम्ही केळकर संग्रहालयाच्या बाजुला धर्मचैतन्य आहे तिथल्या कवठाच्या झाडाची पानेही खायचो. चव एकदम बडीशेपेसारखी लागते. Happy

हो पूनम मी नेटवर पाहिला तो च्यवनप्राशसारखा डबा. खूप गोड असतो का? बाहेर विकत मिळणारे हे मुरब्बे इतके गोड असतात की आपण मध विकत घ्यावे आणि तो निघावा गुळाचा पाक Happy

हो पूनम, पतंजलीचा मिळतो बेलफळ मुरंबा. आमच्याकडे आहे. नवऱ्याला आवडतो खूप.

बी, खूप गोड नाहीये पण समहाऊ मला नाही आवडत चव.

मानुषीताई मस्त फोटो.

Pages