कलाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली अन सगळीकडे एकाच धूळवड चालू झाली . सगळ्या राजकीय पक्षांचे नेते अन इच्छुक उमेदवार तिकितवाटपाच्या धांदलीत बुडाले. मग एकदाची तिकीट वाटपाची यादी जाहीर झाली ,आणि मग उमेदवारी अर्ज भरून प्रचाराचे धुमशान सुरू झाले.
सुभानराव खंडू –पाटील हे जिल्ह्यातील मोठ प्रस्थ . साखर कारखाना अन दूध डेअरी त्यांच्याच ताब्यात ,गावातील मुख्य चौकात बंगला अन गावाच्या एका टोकाला त्यांचं भलमोठ फार्महाऊस होते .. 150 एकर शेती होती . त्यांनी हजार भानगडी करून, थेट दिल्लीपर्यंत जॅक लावून झेड पी चं तिकीट पदरात पाडून घेतलं .आणि आता त्यांच्या जनशक्ती पक्षाच्या प्रचाराला सुरुवात झाली होती .
पण अडचण अशी होती की त्यांच्या विरोधात जनसेनेची एक महीला उमेदवार होती , मनालीताई सावंत . मनालीताईंचे यजमान मोरेश्वर सावंत गेली 10 वर्षे जनसेनेचे आमदार होते आणि मागच्याच्च वर्षी मोरेश्वर सावंत यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता . त्यामुळे लोकांच्या सहानुभूतीच्या जोरावर मनालीताई नक्की निवडून येणार असे चित्र स्पष्ट दिसत होते.
आशा परिस्थितीत सुभानरावाने आपला खास माणूस जग्गुदादा उर्फ जगदीश साळवे याला मुंबईहून गावी बोलावले. जग्गुदादाला सर्व परिस्थिति सांगितली . सध्याच्या परिस्थितिमध्ये प्रचाराची कितीही धूम उडवली अन कितीही पैसा ओतला ,तरीही विरोधी पार्टी ची बाजू स्ट्रॉंग आहे , हे सत्यच होते. मग जग्गुदादाने एक शक्कल लढवली .
गावात सिद्धूमहाराज म्हणून एक नावाजलेला मांत्रिक होता. सुभानराव व जग्गु सिद्धू महाराज कडे गेले. आणि सर्व परिस्थिति सांगितली . सिद्धू महाराज ने मग ध्यान लावले आणि 15-20 मिनिटांनी डोळे उघडले जगगुला म्हणाला ,” बघ बाबा , परिस्थिति कठीण आहे ,पण एक उपाय आहे. आपल्या गावाबाहेर एक कबर आहे , ३ दिवसांनी आमावस्या आहे , तू तिथे जा आणि अकरा बोकडांचा नवस बोल . कबरीत झोपलेला सैतान तुझी नक्की मद्द करेल, त्याला कसा आणि कधी उठवायचा ते मी बघतो .तू ११ बोकडांचा बंदोबस्त कर “
सुभानराव आणि जग्गुदादा अमावास्येच्या रात्री त्या कबरीवर त्च्या दिशेने गेले , गावाबाहेर जंगलात झाडाझुडपात झाकली गेलेली ती कबर. कोणाची कबर आहे , कधीची कबर आहे कोणाला काहीच माहिती न्हवतं . पण सहसा गावातला कोणीही जाणकार माणूस इथे फिरकत नसे. घाबरत घाबरत सुभानराव कबरीजवळ गेला आणि जावून नवस बोलला .
" येत्या निवडणुकीत माझा विजय झाला पाहिजे , मी तुला ११ बोकडांचा प्रसाद देईन "
सुभानराव आणि जग्गुदादा तिथून उठले आणि तिथून झपाट्याने पावलं टाकत गावात पोहोचले. मांत्रिकाने दोघांना सक्त ताकीत दिली होती , भूतं उठतील पण मागे वळून बघू नका .....दोघांनी एकदा हि मागे वळून बघितलं नाही .
निवडणूक अजून पंधरा दिवसांनी होती . आणि मग सुभानराव ने प्रचार जोरात सुरू केला , प्रचंड पैसा ओतला ... शेवटी अटीतटीची निवडणूक झाली अन सुभानराव फक्त 200 मतांनी विजयी झाले . मग त्या दिवशी गावात सुभानरावची भव्य विजयी मिरवणूक निघाली , रात्री जंगी पार्टी झाली . सगळेजण आनंदात होते . सुभानरावाने जग्गुला एक अल्टो कार बक्षीस म्हणून दिली .
आत्ता वेळ आली नवस फेडायची,आणि ठरल्या प्रमाणे पुढच्या अमावास्येला रात्री ट्रक मधून बळी चढवायला बोकड आणले गेले. ट्रक खाली टेकडीच्या खालीच उभा होता .ट्रक च्या सोबतीला जग्गुची अल्टो उभी केली. सुभानराव अन जग्गु त्या बेनाम कबरीवर गेले, सिद्ध महाराज् अगोदरच तिकडे बसून मंत्र तंत्र बोलत होते. त्यांच्या पुढ्यात त्यांनी शेणक्या पेटवलेल्या आणि हातात एक सुरा ,त्याच्या टोकाला लिंबू खोचलेला. सुभानराव आणि जग्गू येताच सिद्ध महाराजाने विचारलं
" बरोबर ११ बोकड आनलेत ना, आनी शिजवलेला भात ....??? त्याचं काय रं ?
"महाराज सगळं समान आणलंय , ११ बोकड आणि टोपलीभर शिजवलेला पांढरा भात बी आणलाय " जग्गू ने शांतपणे हळू आवाजात उत्तर दिलं.
सुभानराव ने इकडे तिकडे बघितलं, घनदाट जंगलात आत्ता त्या झाडांच्या आकृत्या पण कोणीतरी उभं असल्यासारख्या वाटत होत्या. कुठे कसला फांदीचा आवाज झाला कि सुभानराव दचकायचे.
महाराजांनी पुन्हा ताकीत दिली .....
" काही झालं तरी घाबरायचं नाय, आपन जे बोललो ते आपन करनार, इथला सैतान आपल्या बाजूने हाय. ११ बोकडाचा प्रसाद ह्याला दिला कि आपला नवस संपला ,भिऊन पलू नका "
आणि साधारण १ तास महाराजाने मंत्र मारले, आत्ता त्या कबरीतून आवाज यायला लागले. सिद्ध महाराज ने डोळे उघडले, जग्गुला बोलला ....
" तो टोपला आन , सैतान आलाय, आनी आत्ता मी सांगतो तसा एक एक करून बोकड आनायचा "
जग्गुने बाजूचं भाताचं टोपलं उचलून महाराजाच्या फुड्यात ठेवलं. बोकड घेऊन आला ...सुभानरावला सांगितलं ...." बोकड पकडा " आणि महाराजाने एका खटक्यात बोकडाचं मुंडकं वेगळं केलं, बाजूला पडलेल्या बोकडाच्या शरीरातून रक्ताची धार लागली , सिद्ध महाराजाने ते रक्त त्या भातात पकडलं. मेलेला बोकड कबरीच्या बाजूला ठेवला आणि मुंडकं त्या दगडावर.
आत्ता जे होणार होतं त्याची कल्पना सुभानराव आणि जग्गुला अजिबात न्हवती........ सिद्ध महाराजाने टोपल्यातला भात हाताने कालवला ...आणि मुठीत धरून ते तो भात हवेत उडवायला लागले .......सैतान जागा झाला, रानातली भूतं उठली आणि कबरीच्या दगडावर ठेवलेलं मुंडकं अचानक हवेत उडवून नेलं गेलं ,बाजूला पडलेला बोकड आपोआप बाजूच्या झुडपात खेचला जात होता .....हाडं चावल्याचे आवाज कानावर पडत होते.
हे सगळं बघून सुभानराव घाबरले, त्यांचे हात पाय लटपट कापायला लागले आणि डोक्यावर हात ठेवून ते जमिनीवर बसले. जग्गू हे सगळं बघत होता....
" महाराजाने दुसरी हाक दिली ....."दुसरा बोकड आन " जग्गू ताबडतोब दुसरा बोकड घेऊन आला ....." या सुभानराव पकडा ह्याला " सुभानराव ने बोकड पकडला आणि डोळे मिटले ......पुन्हा खटका पडला आणि पुन्हा महाराजाने तेच केलं, मुंडकं कबरीवर ठेवलं आणि धड बाजूला ...पुन्हा तेच घडलं ......
हे जे काही होत होतं ते खूप अघोरी होतं,....एक दोन तीन चार ..बघता बघता खटके पडत होते ,बोकड कापले जात होते आणि सैतान आणि तिथली भूतं त्या अमावस्येची रात्र जागवत होते.
बघता बघता आत्ता १० बोकड कापले गेले , महाराजाने हाक दिली " जग्गू शेवटचा प्रसाद घेऊन ये "
जग्गू चाचपडला ....कारण बोकड सगळे संपले, जग्गू ने ट्रक ड्रायवर रविला फोन लावला, तो खालीच थांबलेला ट्रक जवळ. "रव्या एक बोकड गाडीतच राहिला बघ आन तो इकडे लवकर "
" साहेब , १० च व्हते बोकड, पोरांनी एक बोकड मला उतरवायला लावला गावात, त्यांची आज पार्टी व्हती "
" रव्या बेअक्लीच्या ............"
महाराजाने जोराने आवाज दिला " शेवटचा प्रसाद लवकर घेऊन ये जग्गू"
जग्गू ने सुभानराव च्या कानात घडला प्रकार सांगितला , सुभानराव ना काय बोलायचं समजेना .
"महाराज .... १० च बोकड आणले म्हणतोय,पोरांनी एक बोकड गावात उतरवला, माहिती न्हवतं महाराज आमाला बी "
महाराज ने दोघांकडे बघितलं ....."अरे मूर्खांनो मरा आत्ता ,सैतान उठवला आत्ता ह्याला आवरायचा कसा हा काय आज आपल्याला सोडत नाय"
ह्या संभाषणात वेळ निघून जात होता ........आत्ता कबरीवरचा दगड हलायला लागला ......हवेतून आवाज यायला लागले.............
" मास दे, मास घेऊन ये .....मास दे लवकर " आत्ता ती भूतं जवळ जवळ यायला लागली , जग्गू आणि सुभानराव तर भीतीने कापायला लागले , सिद्ध महाराजाला एवढा घाबरलेला बघून आत्ता हे दोघं तिथून पाळायच्या तयारी ला लागले, हळूच चप्पल काढून हातात घेतल्या , आणि अचानक कबरीवरचा दगड thermocol सारखा हवेत भिरकावला गेला....
सिद्ध महाराज जोराने ओरडले ....." आत्ता खपलो आपन, पला आत्ता पला इथून ....जीव वाचवा पला " आणि जग्गू आणि सुभानराव ने तिथून जीव घेऊन बोंबलत धडपडत टेकडीवरून खाली उतरायची सुरवात केली. इकडे सिद्ध महाराजाने भाताची टोपली हातात उचलली आणि मुठी मुठी ने तो रक्तात कालवलेला भात ते मागे फेकत धावत सुटले........ मागून भूतांचा कल्ला चालू झाला .....चित्र विचित्र आवाज काढत ती भूतं थैमान घालू लागली.
सुभानराव आणि जग्गू खाली आपल्या गाडीपाशी पोहोचले आणि रव्याला हाक दिली...
" रव्या गाडी काढ रव्या पळ ...... गावात भेटू "
आणि जग्गू ने आपल्या अल्टो ला स्टार्टर मारला आणि गाडी बेफाम वेगात पळवायची सुरवात केली ......
इकडे सिद्ध महाराज एकटा पडला, हातातल्या टोपल्यातला भात संपला हे लक्षात येताच त्यांनी ते टोपलं फेकून दिलं आणि जीवाच्या आकांताने ओरडत किंचाळत ते धावत सुटले .....पण भात मिळायचा बंद होताच त्या भुतांनी त्यांना दाबलं ...त्या टेकडीच्या खाली आणि त्या जंगलात आत्ता एकच भयाण शांतता पसरली .......... कीर्रर्रर्र किर्रर्र्र किर्रर्र फक्त आणि फक्त रातकिड्यांचा आवाज.
इकडे सुभानराव आणि जग्गू बेफाम वेगाने गाडी पळवत गावात पोहोचले. पाठोपाठ रावि पण पोहोचला......जग्गू ने रवीला कोपऱ्यात घेतलं रव्या कोणाला काय सांगू नकोस, तिकडे आपण कशाला गेलो होतो काय झालं कोणाला काहीच सांगू समजता कामा नये ........" नाय सांगनार साहेब , तुमी कालजीच करू नका" आणि रवी आपल्या घरी गेला.
नक्की तिथे काय झालं हे त्याला पण माहिती न्हावतं, पण हे दोघे जीव टाकून पळत आले , म्हणजे नक्की काहीतरी घडलं तिकडे. आणि ते बोकड बिकड घेऊन तिकडे रानात हे काय करत होते.....ते बी " १० बोकड ".......रवीच्या डोक्यात चक्र फिरायला लागली.
रवीने रात्री झोपण्याआधी सगळं आपल्या बायकोला सांगितलं , आणि सकाळी उठून तिने गावभर बोंब केली. बातमी वाऱ्यासारखी पसरली...सिद्ध महाराजाचा शोध चालू झाला , महाराज घरात आणि गावात कुठेच सापडेना , गाव निघाला सिद्ध महाराजाला शोधायला. जग्गू आणि सुभानराव शेवट पर्यंत हेच बोलत होते, आम्हाला काहीच माहिती नाही , आम्ही तिकडे गेलोच न्हवतो...." हा रव्या बेवडा प्यायला असेल रात्री "
आत्ता गावकरी त्या टेकडीवर पोहोचले, रवीने जागा दाखवली...इकडे तिकडे बघता बघता गावातल्या एका माणसाला , झुडपात सिद्ध महाराजांचे पिवळे कपडे दिसले , लोकं जवळ गेले, कापडाला हात लावला तर तो फक्त त्यांचा उजवा पाय होता. बाकी शरीर गायब ......
" अरे रे रे रे महाराजाला प्राण्याने खाल्ला वाटतंय, नखाने पाय कसा वर्बडलाय बघा..... "
तिथे त्या रात्री काय घडलं हे शेवटपर्यंत कोणालाच समजलं नाही.....सुभानराव आणि जग्गू आयुष्यभर आपलं तोंड बंद ठेवून आहेत. आत्ता दोघेपण म्हातारे झालेत. जग्गू आपल्या पोरांसोबत मुंबईत राहतो आणि सुभानरावांना लखवा गेला आहे...ते खुर्चीतच पडून असतात.
भूतकथा -" निवडणूक "
Submitted by Mandar Katre on 16 November, 2015 - 08:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
tharaarak.....
tharaarak.....
*
*
hi katha Facebook var my
hi katha Facebook var my horror experience page var prasiddh kara.
मस्त!
मस्त!
बापरे...
बापरे...
.
.
मस्तच.
मस्तच.