बुंदीचे लाडू - boondiche ladu

Submitted by आरती. on 6 November, 2015 - 02:52
boondi ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन - अर्धा किलो,
साखर - अर्धा किलो,
साजूक तूप - अर्धा किलो,
केसर - २ टी स्पून किंवा १ टी स्पून हळद ,
वेलची पावडर - १ टि स्पून

क्रमवार पाककृती: 

बुंदीचा झारा. मी कोटीच्या मार्केटमधून विकत घेतला. कुठे ही मिळेल.

jhara.jpg.jpg

१. साखरेत १ पेला पाणी घालून त्यात केशर घालून उकळवायला ठेवा.
Kesar Pak.jpg

२. बेसन चाळून त्यात पाणी घालून मिक्स करून फेटून घ्या. पिठाच्या गुठळ्या चमच्याने मोडून काढा. पिठाची कंन्सिस्टंसी फोटोमध्ये दाखवली आहे.

Pitha Chi Consistancy.jpg

३. लाडूच पीठ तयार होईपर्यंत दोन तारी पाक तयार होतो.
Pak.jpg

४. कढईत पाव किलो तूप तापवून घ्या. बुंदीचा झारा पाण्याने धुवून पुसुन घ्या. बुंदीच्या झार्‍यामध्ये एक चमचा तयार केलेल बेसन पीठ घालून चमच्याने पसरवा. तुपात बुंदी सहज पडतात. बुंदी तळून झाल्यावर गाळून घ्या. आणि तूप निथळल्यावर लगेच पाकात घाला.

Talaleli Boondi.jpg

५. पीठ संपेपर्यंत झार्‍याने बुंदी तळून व गाळून पाकात घाला. बुंदी पाकात घातल्यावर चमच्याने थोड हलवा.
God Boondi.jpg

६. सर्व बुंदी पाकात घातल्यावर नीट ढवळून घ्या. त्यात वेलची पावडर मिक्स करा. आवडत असेल तर लवंगा, काजू तुकडा लावून एकेक लाडू वळा.

Boondi Ladu.jpg

वाढणी/प्रमाण: 
साजूक तुपातील लाडू खाल तेवढे. :)
अधिक टिपा: 

१. डालडा किंवा तेल वापरू नका. चवीत खूप फरक पडतो.
२. बुंदीचा झारा नसेल तर तळायच्या झार्‍याने करू शकता.
३. मोतीचूर लाडूसाठी पाकातील बुंदी मिक्सरमध्ये एक सेकंद फिरवा. त्याचे लाडू वळा.
४. खारी बुंदी हवी असेल तर बेसन पीठात मीठ, ला.मि.पू. किंचित हिंग घालून तेलात तळा. किंवा नुसत मीठ बेसनमध्ये घालून तेलात तळा.

माहितीचा स्रोत: 
अम्मा, आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! बुंदी लाडू एवढे सोपे असतील असं वाटलं नव्हतं. बुंदी पाकात मुरवायला किती वेळ लागतो? कडक बुंदी लाडवांसाठी पक्का पाक करतात का?

धन्यवाद, स्वस्ति, चनस, ममो. अश्विनी.
बुंदी पाकात मुरवायला किती वेळ लागतो? <<<< पूर्ण पीठाच्या बुंदी तळून होईपर्यंत बुंदी पाकात मुरते. सर्व मिक्स करून आई लगेच लाडू वळते. कडक बुंदीचे लाडू घरी नाही केले कधी. तेसुद्धा छान लागतात. Wink

Great. Gaavaalaa lagnaat bundeeche laaDoo ghareech karataat, tech baghitale hote. MoThya pramaNavar karataat. Aachaaree asato.

वाह!! मस्त दिसताहेत लाडू.काय?
हे बुंदीचे लाडू आणि मोतिचुराचे लाडू यात फरक काय? मोतिचुराच्या कळ्या नाजूक छोट्या असतात. पण मला वाटायचं की कडक ते बुंदीचे लाडू आणि नरम मऊ ते मोतिचुराचे लाडू.

आरती लाडू उत्तम जमले आहेत. मस्त अगदी खावेश वाटताहेत. पण एक चुक केलीस.. दिवाळीच्या दिवसात लाडू वगैरे जरा बरे नाही वाटत. एखादा मासाहारी पदार्थ करुन लिहायचे असते. घोर निराशा झाली असेल अनेकांची.

मंजूडी+१.
मलाही सेम असच वाटायच. Lol
एकुणातच हे जमण कठीण आहे. पाक म्हणजे फोर्बिडन एरिया आहे Wink

>>हे बुंदीचे लाडू आणि मोतिचुराचे लाडू यात फरक काय? मोतिचुराच्या कळ्या नाजूक छोट्या असतात. >> +१ .. मोतीचूराच्या लाडवांचा झारा वेगळा असतो का? मला मोतीचूर प्रचंड आवडतात.
इथे साऊथ इंडियन देवळात प्रसादात मिळणारे लाडू बुंदीचेच पण मऊ असतात.

बापरे, हा पदार्थ घरी करत असतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. किती सोपा वाटतोय करायला खरं तर. धन्यवाद आरती.

मस्त लाडू! झार्‍याचे फोटो टाक ना! बुंदीचा झारा कसा दिसतो माहिती नाही.

बी सर्व धाग्यांवर जाऊन हे यडचप काहीतरी चिरकणार का?

Pages