बेसन - अर्धा किलो,
साखर - अर्धा किलो,
साजूक तूप - अर्धा किलो,
केसर - २ टी स्पून किंवा १ टी स्पून हळद ,
वेलची पावडर - १ टि स्पून
बुंदीचा झारा. मी कोटीच्या मार्केटमधून विकत घेतला. कुठे ही मिळेल.
१. साखरेत १ पेला पाणी घालून त्यात केशर घालून उकळवायला ठेवा.
२. बेसन चाळून त्यात पाणी घालून मिक्स करून फेटून घ्या. पिठाच्या गुठळ्या चमच्याने मोडून काढा. पिठाची कंन्सिस्टंसी फोटोमध्ये दाखवली आहे.
३. लाडूच पीठ तयार होईपर्यंत दोन तारी पाक तयार होतो.
४. कढईत पाव किलो तूप तापवून घ्या. बुंदीचा झारा पाण्याने धुवून पुसुन घ्या. बुंदीच्या झार्यामध्ये एक चमचा तयार केलेल बेसन पीठ घालून चमच्याने पसरवा. तुपात बुंदी सहज पडतात. बुंदी तळून झाल्यावर गाळून घ्या. आणि तूप निथळल्यावर लगेच पाकात घाला.
५. पीठ संपेपर्यंत झार्याने बुंदी तळून व गाळून पाकात घाला. बुंदी पाकात घातल्यावर चमच्याने थोड हलवा.
६. सर्व बुंदी पाकात घातल्यावर नीट ढवळून घ्या. त्यात वेलची पावडर मिक्स करा. आवडत असेल तर लवंगा, काजू तुकडा लावून एकेक लाडू वळा.
१. डालडा किंवा तेल वापरू नका. चवीत खूप फरक पडतो.
२. बुंदीचा झारा नसेल तर तळायच्या झार्याने करू शकता.
३. मोतीचूर लाडूसाठी पाकातील बुंदी मिक्सरमध्ये एक सेकंद फिरवा. त्याचे लाडू वळा.
४. खारी बुंदी हवी असेल तर बेसन पीठात मीठ, ला.मि.पू. किंचित हिंग घालून तेलात तळा. किंवा नुसत मीठ बेसनमध्ये घालून तेलात तळा.
मस्त .
मस्त .
मस्त दिसतायत लाडू..
मस्त दिसतायत लाडू..
ग्रेट. बुंदी लाडू घरी ! मस्त
ग्रेट. बुंदी लाडू घरी !
मस्त दिसतायत.
मस्त! बुंदी लाडू एवढे सोपे
मस्त! बुंदी लाडू एवढे सोपे असतील असं वाटलं नव्हतं. बुंदी पाकात मुरवायला किती वेळ लागतो? कडक बुंदी लाडवांसाठी पक्का पाक करतात का?
धन्यवाद, स्वस्ति, चनस, ममो.
धन्यवाद, स्वस्ति, चनस, ममो. अश्विनी.
बुंदी पाकात मुरवायला किती वेळ लागतो? <<<< पूर्ण पीठाच्या बुंदी तळून होईपर्यंत बुंदी पाकात मुरते. सर्व मिक्स करून आई लगेच लाडू वळते. कडक बुंदीचे लाडू घरी नाही केले कधी. तेसुद्धा छान लागतात.
ओके आरती
ओके आरती
Great. Gaavaalaa lagnaat
Great. Gaavaalaa lagnaat bundeeche laaDoo ghareech karataat, tech baghitale hote. MoThya pramaNavar karataat. Aachaaree asato.
आरती, _/\_
आरती, _/\_
हाणा हिला मस्त दिस्ताय लाडू.
हाणा हिला
मस्त दिस्ताय लाडू. खारी बूंदी करून पाहीन. थँक्स
ग्रेट. मस्त दिसतायत.
ग्रेट. मस्त दिसतायत.
वाह!! मस्त दिसताहेत
वाह!! मस्त दिसताहेत लाडू.काय?
हे बुंदीचे लाडू आणि मोतिचुराचे लाडू यात फरक काय? मोतिचुराच्या कळ्या नाजूक छोट्या असतात. पण मला वाटायचं की कडक ते बुंदीचे लाडू आणि नरम मऊ ते मोतिचुराचे लाडू.
वॉव, मस्तं.
वॉव, मस्तं.
मस्त दिसतायत लाडू एकदम
मस्त दिसतायत लाडू
एकदम तोम्पासु
आरती लाडू उत्तम जमले आहेत.
आरती लाडू उत्तम जमले आहेत. मस्त अगदी खावेश वाटताहेत. पण एक चुक केलीस.. दिवाळीच्या दिवसात लाडू वगैरे जरा बरे नाही वाटत. एखादा मासाहारी पदार्थ करुन लिहायचे असते. घोर निराशा झाली असेल अनेकांची.
लाडू मस्त बी ह्यांची खडूस
लाडू मस्त
बी ह्यांची खडूस पोस्ट मात्र एकदम फ्लॉप
मंजूडी+१. मलाही सेम असच
मंजूडी+१.
मलाही सेम असच वाटायच.
एकुणातच हे जमण कठीण आहे. पाक म्हणजे फोर्बिडन एरिया आहे
व्वा! मस्त!
व्वा! मस्त!
मस्त एकदम तोम्पासु
मस्त एकदम तोम्पासु
आरती, लाडु एकदम तोपासू आणी
आरती, लाडु एकदम तोपासू आणी सुबक जमलेत.
मस्त पाककृती, बुंदीचे लाडु
मस्त पाककृती, बुंदीचे लाडु अतिशय आवडीचे.
मस्त. आरती झार्याचे पण
मस्त. आरती झार्याचे पण चित्र टाक ना प्लीज....घरातल्या झार्याने काहि जमले नाही..
>>हे बुंदीचे लाडू आणि
>>हे बुंदीचे लाडू आणि मोतिचुराचे लाडू यात फरक काय? मोतिचुराच्या कळ्या नाजूक छोट्या असतात. >> +१ .. मोतीचूराच्या लाडवांचा झारा वेगळा असतो का? मला मोतीचूर प्रचंड आवडतात.
इथे साऊथ इंडियन देवळात प्रसादात मिळणारे लाडू बुंदीचेच पण मऊ असतात.
मस्त ...
मस्त ...
बापरे, हा पदार्थ घरी करत
बापरे, हा पदार्थ घरी करत असतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. किती सोपा वाटतोय करायला खरं तर. धन्यवाद आरती.
एकदम मस्त............... फोटो
एकदम मस्त............... फोटो पाहून एकदम तोंपासु.
मस्त लाडू! झार्याचे फोटो टाक
मस्त लाडू! झार्याचे फोटो टाक ना! बुंदीचा झारा कसा दिसतो माहिती नाही.
बी सर्व धाग्यांवर जाऊन हे यडचप काहीतरी चिरकणार का?
व्वा! मस्तच दिसतायत! घरी
व्वा! मस्तच दिसतायत! घरी केलेत त्याबद्दल _/\_
व्वा! मस्तच दिसतायत! घरी
व्वा! मस्तच दिसतायत! घरी केलेत त्याबद्दल _/\_>>>>+१
आरती. तुस्सी ग्रेट हो.
आरती. तुस्सी ग्रेट हो. _/\_
मस्तच झालेत लाडू
हे प्रकरण खुप अवघड
हे प्रकरण खुप अवघड असतं......... याच्या वाटटेला शाहण्याने जाऊ नये
Pages