Inception , स्वर्ग आणि अध्यात्म

Submitted by उडन खटोला on 5 November, 2015 - 00:18

सुमारे दोन वर्षापूर्वी ख्रिस्तोफर नोलान कृत "Inception" पाहिला होता. पाहून झाल्यावर अनेक दिवस मनात घोळत राहिला . त्यातच पूर्वी भारतीय अध्यात्मावर काही पुस्तके वाचले होती . आणि अलीकडेच युट्यूब वर Spirit Science ची व्हिडिओ सिरीज पाहिली . आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -

१ . "परलोक" अथवा spirit world हे प्रत्यक्षात अस्तीत्वात असावे .

२. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या सात पातळ्या असून त्यांनाच भारतीय अध्यात्मात सप्तलोक अथवा सप्तस्वर्ग म्हणत असावेत .

३. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या पातळीवर ज्या घडामोडी होतात ,त्यावर प्रत्यक्षात भौतिक जगात मनुष्याचे जीवन प्रभावित होत असते.

४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एकावर एक Dream-Levels दाखवल्या आहेत ,त्याचप्रमाणे या अंतर्मनाच्या / सप्तलोकांच्या जाणिवेच्या लेवल्स असाव्यात .

५. सिनेमात अनेक ठिकाणी मनुष्याच्या Self-Defense चा उल्लेख येतो. हा Psychic-Self -Defense मनुष्याची तीव्र इच्छाशक्ती व त्याने केलेली "पुण्य"कर्मे यावर आधारित /संबंधित असावा . म्हणजे असे की पुण्य/सत्कर्मांमुळे व्यक्तीची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होते व अशा व्यक्ती भौतिक अथवा आध्यात्मिक दृष्ट्या सहजासहजी संकटांना बळी पडत नाहीत .

६. सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला तरी ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते व बिघडलेल्या गोष्टी ठीक करू शकतो . किंबहुना भौतिक जगातील अनेक समस्यांचे अथवा स्वभावदोषांचे मूळ अंतर्मनातच असल्याने त्यावर उपाय करणे शक्य होते .

७. In other words, We are co-creators of our Reality and Destiny. भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले .

आपणास काय वाटते ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे वरील मुद्दे त्यातिल तथ्यांशासहित बरोबर आहेत. Happy सिनेमा हे निमित्त. चांगले मांडलय.
पण नीट समजुन घ्यायला मला अजुन अभ्यास करायला हवा.
माझे नजरेसमोर काही बेसिक मुद्दे येतात ते असे.
इश्वर चराचरात आहे, तो सजीव/निर्जीव/अवकाश सगळीकडे आहेच, तसा तो तुमच्यातही आहे.
तुमच्यातील त्याला ओळखण्यामधे, भौतिक देहाबद्दलची आसक्ति व त्यातुन उद्भवणारे मनाचे खेळ अडचणीचे ठरतात.
मनाच्या वारुवर काबु मिळवुन, तुमच्यातिलच त्याला ओळखता आले, तर "स्वर्ग" म्हणजे वेगळ काही असण्याची गरज नाही. स्वर्गसुखही तुमच्यामधेच अंतर्भुत आहे. याकरता मी उदाहरण घेतो ते की सुग्रास/आवडिच्या अन्नाच्या पहिल्या घासाला जी सुखाचि अनुभुती प्राप्त होते ती शेवटच्या घासापर्यंत टीकत नाही. यास अनेक कारणे, पण पहिल्या घासाच्या वेळेस जी भौतिक सुखाचि अनुभुती होते, स्वतःतील इश्वराची ओळख झाल्यास अशी गरज पडत नाही की तो भौतिक घास घ्यावा. अन तेच ते स्वर्गसुख, जे निव्वळ कल्पनेनेही प्राप्त होऊ शकते. कारण शेवटी "सुख" वाटून घेणे, सुखावह वाटणे/वाटुन घेणे हा सर्वथैव मनाचाच खेळ असतो. मनाच्या या खेळावर ताबा मिळवण्यासाठि/की मिळविल्यानम्तर इश्वराची ओळख होईल, इतकाच काय तो मूलभूत वैचारिक प्रश्न माझे मनात उद्भवतो आहे.

स्वतःतील इश्वर ओळखण्या करता हिंदु धर्मात अनेक मार्ग/उपाय सुचविलेले आहेत व अमक्याच मार्गाने जा अशी सक्तिही केलेली नाही.

मी वर उल्लेखिलेला सिनेमा पाहिलेला नाही. जमल्यास नक्की बघेन.

धन्यवाद उडन खटोलाजी

भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले .

+१

३ आणि ६ शी सहमत. इतर मुद्द्यांबाबत माहिती नाही आणि चित्रपटही पाहिला नाही त्यामुळे टिपणी करु शकत नाही.

६ बद्दलः फक्त मानसीक बदलच नव्हे, तर ध्यान, अंतर्मनाला सूचना या सहाय्याने gene expressions बदलता येते याबद्दल बरेच संशोधन सुरु आहे. Epigenetics चे इथे कोणी तज्ज्ञ असल्यास यावर अधिक प्रकाश टाकु शकतील.

मी ही सिनेमा पाहिला नाही.

या विषयावर आणखी काही वाचावयाचे असल्यास The Laws Of The Spirit World हे पुस्तक मराठी भाषांतर सुध्दा उपलब्ध आहे. खास म्हणजे हे भारतीय लेखिकेने लिहले आहे जी हिंदु नाही.

सप्तलोक ही हिंदु संकल्पना या पुस्तकात दिसते. पितरयोनी आणि पितरांचे त्यांच्या नातेवाईकांशी संबंध साधणे यावर बराच प्रकाश आहे.

खास म्हणजे या पितरलोकात धर्म ही संकल्पना नाही. सर्व धर्मियांचे पितर एकत्रच असतात म्हणे. मला तरी हे पुस्तक खुप आवडले.

नितिनचंद्र +१.

The Laws of the Spirit World हे पुस्तक खरच फार चांगली माहिती देणारं आहे. खोर्शिद भाववगरी नामक एका पारशी महिलेने लिहिलेले हे पुस्तक आहे. (खरतर Autowriting या प्रकारात हे लेखन मोडते)
त्याचप्रमाणे परलोक आणि इतर लोकांबद्दलची अधिक विस्तृत माहिती देणारा एक पूर्ण अध्याय Autobiography of a yogi (योगी कथामृत) या पू. परमहंस योगानंद यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे. खरंतर ७०० पानांचा हा ग्रंथ फार अद्भूत आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी अध्यात्म आणि 'सद्गुरू' याविषयी फार चांगली माहिती देणारा आहे.
परलोकाविषयी माहिती सांगणारं आणखी एक विश्वसनीय पुस्तक म्हणजे 'परलोक विद्या'.
न.ख.क्षीरसागर हे त्याचे लेखक आहेत. हे गृहस्थ नासिकचे होते तसेच स्वतः शास्त्रज्ञ होते. स्वातंत्र्यपूर्व काळात यांनी यांत्रिक चरख्याचा शोध लावला.
या विषयावरचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी यात बरेच प्रयोगही केले. यांची अध्यत्मिक बैठकही चांगली होती. पू. रामकृष्ण परमहंसाच्या शिष्यांची यांच्या घरी ये जा असे. तसेच लोकमान्य टिळकांचाही यांना बराच सहवास लाभला.

किरुजी,

आपल्याला या विषयाची आवड दिसते. आपण सांगीतलेली सर्व पुस्तके मी वाचली आहेत.

क्षीरसागर यांच्या पुस्तकाने प्रेरीत होऊन प्लँचेट चा प्रयोग करणारी एक व्यक्ती मला भेटली होती.

या व्यक्तीने मला अश्चर्यकारक माहिती सांगीतली ती अशी की एका प्रयोगाला त्यांच्या मते चक्क रामकृष्ण परमहंसांनी तर दुसर्‍या एका प्रयोगात क्षीरसागर यांनी हजेरी लाऊन त्यांना प्रोत्साहन दिले.

क्या बात है!!!

पण एकूण असलेल्या माहितीवरून आणि क्षीरसागरांच्याच मतानुसार प्लँचेटचा प्रयोग धोकादायक ठरू शकतो. त्यापेक्षा माध्यम वापरून परलोकवासियांशी संवाद साधणे अधिक विश्वासार्ह. क्षीरसागरांनी तर बर्‍याच दैवी आत्म्यांशी संवाद साधला होता. साधना मात्र नियमित आणि उच्च होती त्यांची.