Submitted by पल्ली on 28 August, 2009 - 00:09
श्री चिंतामणी- थेऊर, जि. पुणे
मार्ग- पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासुन २२ कि.मी. अंतरावर. लोणी स्थानकापासून ५ कि.मी.
यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी. रमा-माधव पुण्यतिथी. कार्तिक कृष्ण अष्टमी.
मूर्ती- स्वयंभू. उजव्या सोंडेची.
मंदिर- महाद्वार उत्तराभिमुख पण मूर्ती पूर्वाभिमुख. प्रशस्त आवार. विस्तृत सभामंडप. तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा. या मंदिराची व्यवस्था चिंचवड देवस्थानाकडे आहे.
इतिहास- मोरया गोसावी यांनी इथेही तप केले. इथेच त्यांना सिद्धी मिळाली. त्यामुळे चिंचवड व थेऊर यांचा परस्पर संबंध आहे. मोरया गोसाव्यांचे पुत्र चिंतामणी देव यांनी इथले मंदिर बांधले. सभामंडप श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला. त्यांचे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ह्यांचे हे आवडते स्थान होते. श्रीमंत माधवराव पेशव्यांचा मृत्यूही याच क्षेत्रात झाला.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पल्ली, नेहमीप्रमाणेच
पल्ली, नेहमीप्रमाणेच मस्त!
शेडींग इतकं जबरदस्त आहे की मुर्ती त्रिमितीत असल्यासारखी वाटते.
... खुप खुप सुंदर ...
... खुप खुप सुंदर ...
छानच. चांगली मालिका आहे. या
छानच. चांगली मालिका आहे.
या मूर्तीला 'उजव्या सोंडेची' का म्हटलंय? डावीच आहे ना?
किती सुरेख चित्रं काढते आहेस
किती सुरेख चित्रं काढते आहेस गं पल्ली! मस्त
पल्लि, श्री गणेशाबरोबर त्या
पल्लि, श्री गणेशाबरोबर त्या देवळाच्या परिसराचे पण रेखाचित्र असतं तर !!!
पल्ली. खुप सुन्दर ग!!!
पल्ली. खुप सुन्दर ग!!!