Submitted by हर्ट on 2 November, 2015 - 02:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो लाल भोपळा
गोडा मसाला
तेल
ज्वारीचे पिठ
मीठ
क्रमवार पाककृती:
१) भोपळ्याची पाठ आणि बिया काढून घ्याव्या आणि मग भोपळ्याच्या छोट्या फोडी कराव्या.
२) चार चमचे तेल तव्यावर घालावे आणि तेल थोडे तापले की त्यावर भोपळ्याच्या फोडी पसराव्या.
३) भोपळा अरत परत करुन त्यावर मिठ आणि गोडा मसाला घालावा.
४) वर एक झाकण ठेवावे आणि पाच मिनिटे ठेवून फक्त एकच वाफा आणावी. दुसरी वाफ आणली की पाणी आटतेच.
५) झिजलेल्या फोडी लगेच पिठात कालव्यात. त्यासाठी फुलपात्रासारखे एखादे भांडे वापरता येईल.
६) भाकरी थापावी आणि ती खरपूस होऊ द्यावी. मी तवा नंतर धुतला नाही म्हणून असेल पण कधीच न जळणारी भाकरी थोडी जळली माझ्याकडून पण खाताना काहीच जाणवले नाही.
अधिक टिपा:
मीठ आणि गोडा मसाला थोडा अधिक घालावा जेणेकरुन त्याची चव जाणवेल.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मान्य आहे पण अशा पद्धतीने
मान्य आहे पण अशा पद्धतीने भाजीचा रस निघणारच नाही.
ह्या भाकरीला भाजीचाच रस वापरून भिजवावे लागते.
मी भोपळ्याचे तुकडे थोडे पाणी
मी भोपळ्याचे तुकडे थोडे पाणी घालून मावेत शिजवून घेते. मग साल काढते. पटकन निघते.>>>>> असंच कुकरमधे पाणी न घालता भोपळा शिजवून घेऊन,कुस्करून त्यात ज्वारीचे पीठ मिसळून वरची भाकरी होईल.
कशी होईल??? भाजीला पाणी सुटण
कशी होईल??? भाजीला पाणी सुटण भाग आहे ह्या भाकरीसाठी.
ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद.
छान दिसतेय भाकरी .
छान दिसतेय भाकरी .
भाजीला पाणी सुटण भाग आहे ह्या
भाजीला पाणी सुटण भाग आहे ह्या भाकरीसाठी.>>>> कुकरमधे झाकलेल्या भोपळ्याला, वाफेमुळे पाणी सुटते.
छान आहे कृती,पण ही भाकरी
छान आहे कृती,पण ही भाकरी सारखी फुगत नाही का?
जळगावकडे करतात अशी भाकरी,
जळगावकडे करतात अशी भाकरी, आम्ही साल काढत नाही, शिजतं चांगलं.
बटरनट, इंग्रोमधला साधा पंपकिन, एकॉर्न स्क्वाश तर शिजतात सालासकट.
भोपळा कापण्याऐवजी किसला तरी चालतो, अमेरिकेतले भोपळे सालासकट चांगले किसले जातात, फुप्रोत तर छानच किसले जातात.
छान रेसिपी आहे. मनीमोहर, भाकरीला पोपडा सुटतो छान.
मस्तच ! फक्त फरक असा की
मस्तच !
फक्त फरक असा की भोपळ्याची राहिलेली भाजी ढकलते पिठात.>>> +१
मस्तं! खमंग दिसतेय. मी नेहमीच
मस्तं! खमंग दिसतेय. मी नेहमीच भाकरी, थालिपिठ जरा करपवते. आवडतं मला
छान रेसिपी, नक्कीच करुन
छान रेसिपी, नक्कीच करुन पाहीन.
Pages