Submitted by हर्ट on 2 November, 2015 - 02:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो लाल भोपळा
गोडा मसाला
तेल
ज्वारीचे पिठ
मीठ
क्रमवार पाककृती:
१) भोपळ्याची पाठ आणि बिया काढून घ्याव्या आणि मग भोपळ्याच्या छोट्या फोडी कराव्या.
२) चार चमचे तेल तव्यावर घालावे आणि तेल थोडे तापले की त्यावर भोपळ्याच्या फोडी पसराव्या.
३) भोपळा अरत परत करुन त्यावर मिठ आणि गोडा मसाला घालावा.
४) वर एक झाकण ठेवावे आणि पाच मिनिटे ठेवून फक्त एकच वाफा आणावी. दुसरी वाफ आणली की पाणी आटतेच.
५) झिजलेल्या फोडी लगेच पिठात कालव्यात. त्यासाठी फुलपात्रासारखे एखादे भांडे वापरता येईल.
६) भाकरी थापावी आणि ती खरपूस होऊ द्यावी. मी तवा नंतर धुतला नाही म्हणून असेल पण कधीच न जळणारी भाकरी थोडी जळली माझ्याकडून पण खाताना काहीच जाणवले नाही.
अधिक टिपा:
मीठ आणि गोडा मसाला थोडा अधिक घालावा जेणेकरुन त्याची चव जाणवेल.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यम्म्म... नक्की एकदा करुन
यम्म्म... नक्की एकदा करुन पाहीन.
मस्त !
मस्त !
छान आहे हा प्रकार. भाकरी छान
छान आहे हा प्रकार. भाकरी छान जमलीय.
मस्त प्रकार आहे.
मस्त प्रकार आहे.
छान खाण्याचा प्रकार आहे...
छान खाण्याचा प्रकार आहे... करुन बघायला हवा.
लगेच आलेल्या प्रतिक्रियांसाठी
लगेच आलेल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
मस्त वाटतये. एवढी सुंदर भाकरी
मस्त वाटतये.
एवढी सुंदर भाकरी थापता येते तुम्हाला _/\_
मस्त दिसतेय.. एवढी सुंदर
मस्त दिसतेय..
एवढी सुंदर भाकरी थापता येते तुम्हाला _/\_ >> +१
छान रेसिपी आहे. फक्त लाल
छान रेसिपी आहे. फक्त लाल भोपळ्याची पाठ पटकन कशी काढावी याची युक्ती कोणीतरी सांगा.
छान दिसतेय. मस्त. एवढी सुंदर
छान दिसतेय. मस्त.
एवढी सुंदर भाकरी थापता येते तुम्हाला _/\_ >> +१ >> +११
पेरु, ज्या भाजीवाल्यांकडून
पेरु, ज्या भाजीवाल्यांकडून तुम्ही भाजी घेता त्यांना विनंती करा.
धन्यवाद मंडळी.
हो मला भाकरी छानच जमतात
मस्त दिसतेय अन सोपी पाकृ ...
मस्त दिसतेय अन सोपी पाकृ ...
रिपीट. क्षमा.
रिपीट. क्षमा.
सालकाढण्याने निघेल ना..
सालकाढण्याने निघेल ना.. क्रुती आवडली. गोडसर चवीची बनेल भा. असे वाटल्याने माझ्यासाठी करणार नाही. तरी इतरांसाठी करून पाहिएन.
अनघा पीलर मोडून पडेल ही
अनघा पीलर मोडून पडेल ही काकडी नाही की बटाटे नाही. टणक पाठ असते भोपळ्याची.:)
पीलर ने खुप वेळ लागतो. आमच्या
पीलर ने खुप वेळ लागतो. आमच्या इथला भाजीवाला देत नाही हो अशा सेवा
पेरु, माझ्याकडे मजबुत सुरी
पेरु, माझ्याकडे मजबुत सुरी आहे मी ती वापरली.
तू एक काम करु शकतेस. आधी लहान आणि पपयीच्या फोडीसारख्या लांब फोडी कर. मग फक्त त्यातला गर कापायला सोपे जाईल. एकदम पाव किलोवर चाकू वा विळी चालवू नकोस.
धारदार विळीवर सटासट निघते लाल
धारदार विळीवर सटासट निघते लाल भोपळ्याची साल.
इथे जे लाल भोपळे मिळतात
इथे जे लाल भोपळे मिळतात त्यांची पाठ काकडीच्या सोलटण्याने निघते. परदेशातल्या भोपळ्याची काही माहिती नाही. आमचे भोपळे बरे आहेत, गुपचुप सोलुन घेतात.
जे भोपळे आकारानी अगडबंब असतात
जे भोपळे आकारानी अगडबंब असतात त्यांची पाठ जरा मऊ असते. इथे छोटेखानी भोपळे मिळतात. फार टणक असतात.
छान प्रकार. भोपळा मिळतो इथे,
छान प्रकार. भोपळा मिळतो इथे, करून बघीन.
वाह, मस्तं जमलीय भाकरी.
वाह, मस्तं जमलीय भाकरी.
मस्त
मस्त
इथे जे लाल भोपळे मिळतात
इथे जे लाल भोपळे मिळतात त्यांची पाठ काकडीच्या सोलटण्याने निघते. परदेशातल्या भोपळ्याची काही माहिती नाही. आमचे भोपळे बरे आहेत, गुपचुप सोलुन घेतात >> +१ हेच लिहीणार होते. परदेशी भोपळे निगरगट्ट दिसतात
कित्ती सुबक दिसतेय
कित्ती सुबक दिसतेय पोलपाटावरची भाकरी. छान आहे प्रकार नक्की करुन बघणार.
मला कधी जमेल एवढी सुंदर भाकरी थापायला!
मस्त! आम्ही याला ज्वारीचे
मस्त!
आम्ही याला ज्वारीचे थालिपिठ म्हणतो. मी नेहेमी करते फक्त फरक असा की भोपळ्याची राहिलेली भाजी ढकलते पिठात. परदेशातील भोपळ्याच्या पाठींबद्दल अनेक अनुमोदन
भुक लागली......... मस्त नक्की
भुक लागली.........
मस्त नक्की करण्यात येईल..
हे घ्या. अवनमध्ये कसा भोपळा
हे घ्या. अवनमध्ये कसा भोपळा शिजवावा.
Cut the pumpkin in half and discard the stem section and stringy pulp. Save the seeds to dry and roast. In a shallow baking dish, place the two halves face down and cover with foil. Bake in a preheated 375 degrees F (190 degrees C) oven for about 1½ hours for a medium-sized sugar pumpkin, or until tender.
मी भोपळ्याचे तुकडे थोडे पाणी
मी भोपळ्याचे तुकडे थोडे पाणी घालून मावेत शिजवून घेते. मग साल काढते. पटकन निघते.
छान पाकृ!
छान पाकृ!
Pages