Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 23:41
गीत: जयवी (जयश्री अंबासकर)
संगीत/स्वर: सुबोध साठे
शब्दः
धावून ये गणेशा
काळोख पातकांचा
दाही दिशांत झाला
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा
स्वार्थात अंध झाले
सारेच मत्त झाले
वाली कुणी न आता
सारेच माजलेले
उन्माद आवराया
देवा तुझी प्रतिक्षा
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा
जगतावरी फिरुनी
साम्राज्य दानवांचे
धरबंद राहिले ना
कोणासही कशाचे
बेबंद दानवांचा
नि:पात तू करावा
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा
तू पाप, ताप, दु:खा
हरिले सदैव देवा
भक्तांस तारिले तू
अन् रक्षिलेस देवा
विश्वास आमुचा हा
तोडू नकोस देवा
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम जबरद्स्त कविता .......
एकदम जबरद्स्त कविता ....... चाल हि सुंदर आहे, आवाज ही सुरेख आहे, वाह सहीच एकदम......!
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
अगदी सुरेख!! सुंदर शब्दातलं
अगदी सुरेख!! सुंदर शब्दातलं आर्जव / धावा / आर्तता याला चालीनी आणि गायनानी मस्तं न्याय दिलाय यात शंकाच नाही.
जयवी अन् सुबोध मस्तंच.. नक्की याचं प्रॉपर संयोजन आणि रेकॉर्डिंग करून घ्या
छान झालीये आरती सुबोधनी
छान झालीये आरती
सुबोधनी म्हटलीये छानच, पण तुझ्या आवाजाची कमतरता जाणवत्ये.
सही..
सही..
खूप सुंदर कविता.
खूप सुंदर कविता.
शब्द, सूर आणि आवाज यांचा
शब्द, सूर आणि आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम!
आर्त सूर, वेगळी चाल.. छान
आर्त सूर, वेगळी चाल.. छान झालयं.
एकदम श्रवणीय झाले आहे गाणे !
एकदम श्रवणीय झाले आहे गाणे ! अतिशय सुंदर गीत्...अर्थपूर्ण..,जयावि!
जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर. मला
जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर. मला जरा "दुसरा" सुर्य हि कल्पना समजाउन सांगणार का ?
आहे तो सुर्य झाकोळला, निष्प्रभ झाला, असे आहे का ?
जयू, छांछान!
जयू, छांछान!
भारतात असल्यामुळे आणि इंटरनेट
भारतात असल्यामुळे आणि इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे धन्यवाद पोचवायला खूप उशीर झाला त्यामुळे आधी सगळ्यांची माफी मागते.
इतक्या छान छान प्रतिक्रिया आवर्जून दिल्यात.......तहे दिल से शुक्रिया दोस्तांनो
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
जयश्री, सगळीच गाणी,
जयश्री, सगळीच गाणी, नेहमीप्रमाणेच श्रवणीय झालेली आहेत.
गंगाधर, दिनेश......खूप खूप
गंगाधर, दिनेश......खूप खूप धन्यवाद
मागच्या वर्षीचं गाणं आहे हे.
मस्त गं, छान गाण, म्हंटलही
मस्त गं, छान गाण, म्हंटलही सुंदर आहे, वाद्यांची साथ असतीतर.. आहा.. मजा आली असती...
मस्त गं, छान गाण, म्हंटलही
मस्त गं, छान गाण, म्हंटलही सुंदर आहे, वाद्यांची साथ असतीतर.. आहा.. मजा आली असती...
क्या बात है! शब्द, सूर सर्वच
क्या बात है! शब्द, सूर सर्वच सुंदर...