न्याशनल जिअॉग्राफीवर एक 'ब्रेन - गेम्स' नावाचा कार्यक्रम पाहिला.
यात सकारात्मक विचार आपल्या व्यक्तिमत्त्वार किती परिणाम करतात, याचे विवेचन प्रयोगासहित दाखवले गेले.
एका मैदानावर एक मुलगी बास्केटबॉल खेळत होती.
सुरूवातीला तिला १० वेळा बॉल गोलपोस्ट मध्ये टाकायला सांगितला. तिचा बॉल एकदाही रिंग मधून गेला नाही कारण ती चांगली खेळाडू नव्हती. नंतर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला पुन्हा बॉल टाकायला सांगितले गेले, परंतु यावेळी तिचा हा खेळ बघायला ८-१० प्रेक्षक ही बोलावले गेले. त्या प्रेक्षकांना आधीच सांगून ठेवले होते की बॉल कसाही गेला तरी आनंदाने जल्लोष करायचा ः-))
पण हे त्या मुलिला माहित नव्हते. तिने डोळे बंद केलेल्या अवस्थेत २ वेळा बॉल टाकला.... अर्थातच तिचा बॉल रिंग मधून गेला नाही.
पण प्रेक्षकांच्या जल्लोषामुळे तिला ते कळले नाही.
उलट तिचा उत्साह वाढला, प्रोत्साहन मिळाले अन् जेव्हा तिला पुन्हा डोळे उघडून बॉल टाकायला सांगितलं गेलं तेव्हा १० पैकी ४ वेळा तिचा बॉल रिंग मधून गेला.
भारी ना!!!!!! खरंच सकारात्मक विचारांचा आपल्यावर किती सकारात्मक परिणाम होतो..
(खरंतर हा सर्व प्रकार मला पूर्वनियोजित आहे असं वाटलेलं , पण यानंतरच्या प्रयोगामुळे माझा विश्वास बसला की 'सकारात्मक दृष्टिकोन' ही केवळ पुस्तकी कल्पना नाही.. विज्ञान आहे. तो प्रयोग नंतर लिहिते आणि त्यामागचे वैज्ञानिक कारणही!!!)
शुभ रात्री ः-)
ब्रेन गेम्स- बी पॉजिटीव
Submitted by नीलम बुचडे on 2 November, 2015 - 14:04
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकारात्मकतेबाबत सहमत. मलाही
सकारात्मकतेबाबत सहमत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही माझ्या अनुभवाबद्दल लिहायला आवडेल.
पण त्या आधी तुमचा पुर्ण लेख वाचायला आवडेल.
पुढचा प्रयोगही लवकर लिहा.
तुर्तास, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
Maza positively war purn
Maza positively war purn wishwas ahe..
Experience pan ahe mhanala..
Thanks for this bb..
I hv lot of experience to share
संपूर्ण ब्रेन गेम्स सेरिजच
संपूर्ण ब्रेन गेम्स सेरिजच मस्त आहे बघायला. मुलांना पण खूप आवडते.
नमस्कार, मी येथे नवीन आहे.
नमस्कार, मी येथे नवीन आहे. सकारात्मकतेवरचे अनुभव वाचायला आवडतील.
तुम्ही लेख जेव्हा लिहाल
तुम्ही लेख जेव्हा लिहाल तेव्हा लिहा. माझे मत मी आत्ताच मांडतो. कारण मी मा.बो. वर अत्यंत अनियमित आहे.
जेव्हा एखादा विचार आपल्या मनात येतो, किंवा आपण प्रयत्नपूर्वक मनात घालतो ('प्रयत्नपूर्वक' या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे. समजा आपल्यापुढे ५-६ ऑप्शन्स आहेत; त्यांचा सखोल अभ्यास करून एखादी ऑप्शन आपण निवडतो; तेव्हा आपण प्रयत्नपूर्वक त्या ऑप्शनचा विचार मनात घालतो.) तेव्हा शरिराचा प्रत्येक भाग, प्रत्येक सेल त्या विचाराचा पाठपुरावा करतो. आणि म्हणूनच सकारात्मक विचार मनात ठेवला की त्याचे फळ चांगलेच मिळते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरीही चांगलेच रिझल्ट मिळतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शरद + १०० सगळ आपल्या विरोधात
शरद + १००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ आपल्या विरोधात असेल आनि फक्त आपले सकारात्मक विचार आप्ल्यासोबत असतील तर आपण आलेल्या परीस्थितीतुन नक्की बाहेर पडु शकतो.
या विषयावरच " द सिक्रेट"
या विषयावरच " द सिक्रेट" नावाचा चित्रपट आणि पुस्तक आहे. अतिशय उत्कृष्ठ. जालावर शोधा.
निलम ताई खरं आहे. खूप चांगले
निलम ताई खरं आहे.
खूप चांगले परिणाम होतात सकारात्मकतेचे. नुसते मानसीक नाही तर शारिरिक सुद्धा.
सकारात्मकतेचाच एक चमत्कार म्हणजे Placebo.
तुमच्या पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
मला सुद्धा इथे काही उदाहरणं / प्रयोग द्यायला आवडतील, तुमची परवानगी असल्यास.
या विषयावरच " द सिक्रेट"
या विषयावरच " द सिक्रेट" नावाचा चित्रपट आणि पुस्तक आहे. अतिशय उत्कृष्ठ. जालावर शोधा. +१
मस्त धागा
मस्त धागा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांच्या प्रतिक्रियांशी
सर्वांच्या प्रतिक्रियांशी सहमत..
सर्वांच्या अनुभवांचे व मताचे स्वागत आहे..
मी नवीन धागा सुरू करतेय.
सकारात्मक दृष्टिकोन.. या नावाचा.
तिथे तुम्हा सर्वांची वाट पाहतेय...
शरद +१ यू कॅन हिल यूअर लाईफ
शरद +१
यू कॅन हिल यूअर लाईफ पुस्टक पण वाचा.
काही काही गोष्टी पटत नाहीत पण पॉझिटिव्हिटीचा फूल डोस नक्की मिळतो.
धन्यवाद रीया
धन्यवाद रीया
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/56287
वरील लिंकवर नवीन धागा
वरील लिंकवर नवीन धागा "सकारात्मक दृष्टिकोन "
वाचायला मिळेल...