तृतीय विश्वयुद्ध होणार का?

Submitted by उडन खटोला on 25 October, 2015 - 13:47

सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फक्तं दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ...

एकीकडे अमेरिका आणि रशिया एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुंतागुंतीच्या क्षेत्रीय हितसंबंधा मुळे या युद्धाचे स्वरूप अमेरिका विरुद्ध रशिया असे बनेल की काय ? अशी भीती वाटते . त्यातच इस्लामीक राष्ट्रांकडील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडणे आणि विश्वयुद्ध भडकल्यास दक्षिण कोरियाची आणि चीनची भूमिका काय असेल ? भारतावर या सगळ्याचा काय ,कसा व किती परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ...

आपणास काय वाटते ? खरोखर तिसरे विश्वयुद्ध होऊ शकते का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो वरचे,

त्या दुस-या धाग्यावर तुम्ही त्यांचीच (लटकी ?) बाजू घेतली होतीत का ? आता थट्टा करताय. एक काही तरी धोरण ठेवा ना ! की आपल्या मनातलं समोरच्याला बोलायला लावायचं असं काही आहे तुमचं ?

Pages