Submitted by गिरिश सावंत on 24 October, 2015 - 03:40
जगताप भाऊंचा डंका...
मायबोलीवर आपल्या थीम्स आणि छायाचित्रणाने सर्वांनाच भुरळ घालणार्या योगेश जगताप यांची एक संलल्पना सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. दसर्याला दारावर नवे बांधल्यानंतर दुसर्या दिवशी नवं कचर्यात टाकण्याऐवजी घराबाहेर खिडकीला ते एकत्र बांधावे, जेणेकरून बाहेरच्या चिमण्या ते दाणे खाऊन आपले पोट भरतील हा विचार आणि सोबत अशा भाताच्या लोंब्या खिडकीबाहेर बांधल्या असून त्यातून दाणे वेचणारी गोड चिमणी असे छायाचित्र वॉटसप्वर आणि फेसबुकवर व्हायरल झाले आहे.
पहिल्या मॅसेजवेळी ‘चांगला विचार’ म्हणून केवळ वाचला. मात्र फॉर्वड करताना छायाचित्राच्या तळाशी असलेला वॉटरमार्क लक्ष वेधून घेत होता. नेहमीच्या कर्श्यूलिपीत योगेश जगताप असे लिहिलेले नाव डोळ्यात भरले आणि अभिमानाने ऊर भरून आला.
योगेशभाई तुमच्या छायाचित्राला सलाम आणि त्या विचारांनाही!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठी दिग्दर्शक रवी जाधव
मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील फेसबुकवर हेच चित्र शेअर केले आहे
जिप्स्या कमाल का है भाई !
जिप्स्या कमाल का है भाई !
काल या मेसेजने खुप धुमाकुळ
काल या मेसेजने खुप धुमाकुळ घातला... एक अतिशय चांगला मेसेज जो नुसता मेसेज न राहता लोकांनी प्रत्यक्ष आचरणात आणला.
व्वा .... योगेश भाऊ ... असच
व्वा .... योगेश भाऊ ... असच समाज प्रबोधन करित रहा ...
जिप्सी, ग्रेट !!!
जिप्सी, ग्रेट !!!
मस्त रे जिप्सी !
मस्त रे जिप्सी !
छान!
छान!
छान
छान
जिप्सी काल खरंच, तुझ्याशी ओळख
जिप्सी काल खरंच, तुझ्याशी ओळख असल्याचा अभिमान वाटला. बऱ्याच ठिकाणी नुसते विचार होते तिथे मी तुझे विचार आहेत सांगितलं आणि काही ठिकाणी हा फोटो होताच. ज्या ग्रुपवर फोटो नव्हता तिथे मी हा फोटो दिला आणि सांगितलं हा माझा मायबोलीकर मित्र ज्याने विचार मांडलेत हे, आणि हा फोटो. तो उत्तम फोटोग्राफर आहे.
जिप्सी, मलापण आला होता हा
जिप्सी, मलापण आला होता हा मेसेज. फोटो बघताच ओळखला. जिओ मेरे यार.
अरे वा! हे आपले लाडके जगताप
अरे वा! हे आपले लाडके जगताप भाऊ होय? सह्ह्हीच. जियो, जिप्सी!
वा !फोटो मस्त आणि एक चांगला
वा !फोटो मस्त आणि एक चांगला संदेश.
.
सत्कारमुर्ति कुठे आहेत...
सत्कारमुर्ति कुठे आहेत...
मस्त रे जिप्सी..
मस्त रे जिप्सी..
कौतुकाबद्दल मनापासुन धन्यवाद
कौतुकाबद्दल मनापासुन धन्यवाद
मी वेगळं असं काही केलं नाही गेल्या २-३ वर्षापासून एक विचार अमलात आणत होतो तोच फेसबुक/ मायबोलीवर शेअर केला. यावर्षी व्हॉट्सअप /फेसबुकवर व्हायरल झाला. आनंदाची गोष्ट हि की लोकांना हा विचार प्रचंड आवडला आणि त्यांनी लगेच तो अमलात देखील आणला. खिडकीच्या ग्रीलला/गॅलरीत टांगुन ठेवलेल्या भाताच्या लोंब्या आणि पक्षी यांचे फोटो काढुन माझ्यासोबत शेअरसुद्धा केले. मायबोलीकर गोळेकाकांनी तर "हा प्रयोग एवढा प्रभावी ठरेल असे वाटले नव्हते!" अशी कमेंट चिमण्यांच्या फोटोसोबत फेसबुकवर शेअर केली. हे सगळं/वाचुन पाहुन प्रचंड आनंद वाटतोय,
खूप छान संदेश. अभिनंदन जगताप
खूप छान संदेश.
अभिनंदन जगताप भाऊ!
जिप्स्या, आनंद आणि कौतूक तर
जिप्स्या, आनंद आणि कौतूक तर आहेच.. पण एक आठवण आहे.
मालाडला आमच्या दारावर व्हेंटीलेटर्स होती, तिथे चिमण्यांची कायम लगबग असायची. तसेच आमच्याकडे तोरण असे मुद्दाम काढत नाहीत. त्यामूळे चिमण्या त्यावरच यायच्या. मग तोरणातले दोरे पण उचकटून न्यायच्या.
इतकेच कशाला, आई तांदूळ निवडत असली तर न कांडले गेलेले भात, आणि अळ्याही अगदी जवळ येऊन खायच्या.
बाळाची "सांडलेली शिते गोड उचलून" न्यायला अगदी हक्काने यायच्या. पण त्यांचा बाकी काही त्रास नसायचा.
खूप छान संदेश आणि
खूप छान संदेश आणि फोटो
अभिनंदन
तसेच आमच्याकडे तोरण असे
तसेच आमच्याकडे तोरण असे मुद्दाम काढत नाहीत. त्यामूळे चिमण्या त्यावरच यायच्या. मग तोरणातले दोरे पण उचकटून न्यायच्या.>>>>>>दिनेशदा आमच्या इथेही हे अस्संच व्हायच आणि यावरूनच हि कल्पना सुचली.
जिप्सी दि ग्रेट ..........
जिप्सी दि ग्रेट ..........
जियो, जिप्सी! मनःपुर्वक
जियो, जिप्सी! मनःपुर्वक अभिनंदन!!!
फोटो काय भारी आहे.
फोटो काय भारी आहे.
Jipsya jiyo Baas itakach
Jipsya jiyo
Baas itakach
जिप्सी, सो प्राऊड ऑफ यू !!!!
जिप्सी, सो प्राऊड ऑफ यू !!!!
जिप्सी, शाब्बास!हार्दिक
जिप्सी, शाब्बास!हार्दिक अभिनंदन!