मायबोली दिवाळी अंक २०१५

Submitted by हर्ट on 22 October, 2015 - 00:55

ह्यावर्षी आपल्या माबोचा दिवाळी अंक नाही. इथले बरेच लेखक माबोबाहेर अनेक दिवाळी अंकात लिहित आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. पण सोबत आपल्या माबोचा दिवाळी अंक नाही ह्याची कमालीची खंत आहे. का नाही ह्याची कारणेही माहिती आहेत. आणि ती कारणे खरी वाटतात.

ज्यांचे माबोच्या दिवाळी अंकावर प्रेम होते .. आहे अशांनी मिळून आपण दिवाळीच्या दिवशी आपण लिहिलेले साहित्य पोस्ट करायचे का? मी जसा आता धागा उघडला तसाकाहीसा एक धागा उघडून त्यावर आपले साहित्य लिहित जायचे. फक्त ते एकाच पोस्टीत असायला हवे.

ही कल्पना तुम्हाला कशी वाटली ते कळवा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी , चांगली,कल्पना आहे.
पण मायबोली दिवाळी अंक यावर्षी नाही हे ऑफिशीयली डिक्लेअर झाले का?
कुठे? कधी?

साती, धन्यवाद.

इथे वाचः http://www.maayboli.com/node/55886

मराठी भाषा दिवस हा उप्रकम ह्यावेळी आपण राबवला नाही.. पण ऑफिशीयली त्याबद्दलही कुणी काही बोलले नाही. तसेच दिवाळी अंकाचे आहे. दिवाळी अंक काढायला ३/४ महिने सहज लागतात. जर माबोबाहेरचे लेखक किंवा इथलेच काही निवडक लेखक मिळून पडद्यामागे दिवाळी अंक तयार करत असतील तर माहिती नाही पण असे जर झाले तर बहुतेकांची मने दुखतील.

बी,

तुम्हाला असे वाटते का की दिवाळी अंक काढला जाणार आहे की नाही हे अ‍ॅडमीन टीमला विचारावे? म्हणजे नक्की कळेल बहुधा!

बेफी, विचारले केंव्हाचे पण काही उत्तर नाही आले. तुम्हीच विचारुन बघा आणि मला कळवा. अथवा दिवाळीच्या दिवसापर्यंत वाट बघा.

बी, मला कल्पना आवडली. एक अनौपचारीक अंक निघू शकेल. त्याला मायबोलीचा दिवाळी अंक हे नाच द्यायचे का, ते मात्र अ‍ॅडमिनला ठरवू दे.

अरे हो.. नाहीये, नसणार यावेळी अंक .. चुकचुकल्यासारखे वाटतेय खरे .. अंकच नाही तर अंकनिर्मितीची धमालही गेली .. पण बी आपली आयडीयाही कमाल आहे, ऑफिशिअल दिवाळी अंक नसला तरी प्रत्येक जण त्या काळात दिवाळी स्पेशल नाव देत आपले लेख, प्रवासवर्णन, प्रचि, पाकृ वगैरे प्रकाशित करू शकतो. त्यातही जर अ‍ॅडमिननी शक्य असल्यास "दिवाळी २०१५" नावाचा एक ग्रूप उघडून दिला तर सोयच झाली..