Submitted by चैतन्य दीक्षित on 23 October, 2015 - 11:39
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या एका काव्याचा मराठीत अनुवाद करण्याचा हा प्रयत्न.
ओ जोनाकी-
सांग काजव्या कसल्या आनंदाने इवले पंख पसरिशी?
सांजेला अंधारवनांतुन उल्हासाने कसा विहरिसी?
तू न दिवाकर वा रजनीकर
आनंद तुझा कमी न कणभर
स्वतः उजळुनी जीवन अपुले पूर्णत्वा नेसी |
तुझ्याजवळि जे, तुझेच ते धन
नसे शिरी तव कोणाचे ऋण
राहतोस अंतरातल्या शक्तीच्या आदेशी |
तमोघटाची शकले करिसी
वामन तू परि 'वामन' ठरसी
अपुल्याशा केल्यास जगातिल तेजाच्या राशी |
सांग काजव्या कसल्या आनंदाने इवले पंख पसरिशी?
सांजेला अंधारवनांतुन उल्हासाने कसा विहरिसी?
-चैतन्य दीक्षित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख.
सुरेख.
चांगली आहे. वामन तू परि
चांगली आहे.
वामन तू परि 'वामन' ठरसी
याचा अर्थ काय?
सुंदर.. गायली असेलच ना, मग
सुंदर.. गायली असेलच ना, मग तेही ऐकवा कि साहेब !
वा, चैतन्या - सुरेखच .....
वा, चैतन्या - सुरेखच .....
धन्यवाद मंडळी! मानव, काजवा
धन्यवाद मंडळी!
मानव, काजवा आकाराने लहान असला तरी अंधराची शकले करतो म्हणून मूळ कवितेत टागोरांनी 'तू लहान आहेस पण लहान नाहीस'
(तुमि छोटो होई, नोउ गो छोटो) असं म्हटलं आहे.
मला अनुवाद करताना चटकन वामनावतार डोळ्यांसमोर आला.
दिनेशदा, गायली नाहिये अजून, गायली की एकवेन नक्की!
ओह! छानच जमली आहे ही उपमा.
ओह!
छानच जमली आहे ही उपमा. मस्त.
अप्रतीम जमली आहे.
अप्रतीम जमली आहे.
मस्त..
मस्त..
छान जमलिये
छान जमलिये
पियू, पणती, जाई, मन:पूर्वक
पियू, पणती, जाई,
मन:पूर्वक धन्यवाद_/\_
वा! अप्रतिम जमलाय. वामनाची
वा! अप्रतिम जमलाय.
वामनाची उपमा चपखल बसलीये.
वामन तू परि 'वामन' ठरसी >>
वामन तू परि 'वामन' ठरसी >> वामन तू परि ना 'वामन' ठरसी
असं लिहायच होत का?
बाकी छान अनुवाद आहे, अनुवाद न वाटता ती स्वतंत्र कविता वाटते यातच सगळ आलं .. फार सुंदर
मामी, सत्यजित प्रतिसादाबद्दल
मामी, सत्यजित
प्रतिसादाबद्दल धन्यवाद _/\_
वामन तू परि ना 'वामन' ठरसी>>
सत्यजित, तसेच काहीसे (जर 'वामन' या शब्दाचा केवळ 'लहान' असा अर्थ घेतला तर)
वामन तू (म्हणजे तू लहान आहेस) परि 'वामन'(वामनावतारासारखा) ठरसी
म्हणून तर दुसर्यांदा आलेल्या वामन या शब्दाला एकेरी अवतरणात लिहिलंय