वयाच्या १५ व्या वर्षी अचानक आंधळेपण आले तर तुम्ही काय कराल? आणि सोबतच आई कर्करोगाने आजारी आणि वडिलांची तुटपुंजी कमाई ही संकटे ह्याच काळात उभी ठाकली तर?
एकुन कदाचीत धक्का बसेल पण ही खरी गोष्ट आहे अश्याच एक अवलियाची ज्याला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या अस्मानी संकटांचा सामना करावा लागला, आणी त्यातुन खचुन न जाता जोमाने उभा राहुन आज करोडा रुपयांचा व्यवसाय आणी सोबत शेकडो अंध लोकांना रोजगार देउन त्याने आपले जिवन सार्थकी लावले. अशा या अवलियाचे नाव आहे श्री. भावेश भाटिया.
श्री. भाटिया यांचा जन्म झाला महाबळेश्वर हया थंडहवेच्या गावी. किशोरवयीन जीवनापर्यंत आपल्या पुढ्यात काय वाढुन ठेवलय याची कल्पना कदाचीत भावेश ला नसावी. असच सामान्य आयुष्य जगत असताना आपल्याला शाळेतील फळ्यावरच काही दिसत नाही अस हळुह्ळु भावेशला जाणवु लागल आणि काही दिवसातच संपुर्ण द्रुष्टी नाहिशी झाली. अचानक आलेला हा धक्का कमी कि काय, ह्यातच आपल्या आई ला दुर्धर कर्करोगाने ग्रासलय हे भावेश ला समजले. दुखा:चा जणु डोंगरच भाटिया कुटुंबावर कोसळाला.
वडलांच्या तुटपुंज्या कमाई मुळे शिक्षण आणि ईलाज ह्यात खुपच कसरत होत होती तरिही नेटाने अभ्यास करुन भावेशने आपले शिक्षण पुर्ण केले. मधल्या काळात आईचे निधन झाले.
शिक्षण पुर्ण केल्यावर पोटापाण्याच्या कामाची चिंता समोर होती म्हणुन भावेश ने NAB ह्या अंधलोकांच्या संस्थेत प्रवेश घेतला, सदर संस्था ही अंधांसाठी अनेक व्यवसाय पुरक शिक्षणअभ्यासक्रम चालवते. भावेश ह्यांना मेणबत्ती शिकयची खुप इच्छा होती मात्र NAB ने त्या आधी कधिही पुर्णांध लोकांना मेणबत्ती शिकवण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते त्यामुळे भरभक्कम अंगकाठी असलेल्या भावेश ला मसाज चे प्रशिक्षण घ्यावे लागले. मसाज चे प्रशिक्षण घेत असताना मेणबत्ती शिकवणारया शिक्षकांना मोफत मसाज करुन त्यांच्या त्यांनी कडुन मेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसात केले. त्यानंतर काही काळ मुबंईमधे वास्तव्य करुन महाबळेश्वर ला परतुन ५००० रु. भांडवलावर श्री. भाटिया यांनी "सनराईज कॅन्डल्स" ह्या आपल्या मेणबत्ती व्यवसयाची मुहुर्तमेढ रोवली. सुरवातीला एका हातगाड्यावरुन विक्री ची सुरवात करुन रोवलेल्या ह्या व्यवसायाचे आज एका वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
महाबळेश्वर मध्ये निर्मिती आणि संपुर्ण देश, मध्य पुर्व देशात निर्यात यातुन श्री. भाटियानी आपल्या व्यवसायाला एक प्रचंड मोठ्या उंचीवर नेले आहे आणी यातुन सुमारे ३०० अंध बांधवाना त्यांनी रोजगार दिला आहे.आज ग्रँड हयात, रिलायंस सारख्या अनेक कंपन्या ह्या त्यांच्या ग्राहक आहेत.
भाटिया ह्यांचे जिवन हे सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे, आंधळेपणा ला कोणताही अडथळा न मानता श्री भाटिया यांनी आपल्या व्यवसायासाठी कोणत्याही संस्था अथवा ट्र्स्ट च्या नोंदणी चा आधार घेतला नाही, तर एका प्रा.लि. कंपनी ची स्थापना केली. जिची संपुर्ण धुरा त्याचीं अंध कामगार बघतात. निर्मिती, विक्री, विपणन अश्या ह्या सर्व गोष्टींची ह्यात समावेशा आहे.
याच बरोबर श्री. भाटिया ह्यांच्या जिवनाचे अनेक पैलु आहेत जस, ते स्व:ता रोज ५०० पुशअप्स, वेट लिफ्टिंग सारखे व्यायम करतात आणी ते १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मेडल्स चे मानकरी आहेत त्याच बरोबर २०१६ मधे पॅरा ऑलंपिक मधे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेहनत घेताएत.
श्री. भावेश भाटिया यांच्या कॅंडल्स तुम्ही इथे बघु आणि खरेदी करु शकता.
http://sunrisecandles.co.in/
आणि त्यांच फेसबुक पेज आहे:
https://www.facebook.com/SunriseCandles?fref=ts
त्यांचा संपुर्ण प्रवास हा तुम्ही इकडे बघु शकता.
https://www.youtube.com/watch?v=onS1-fZgLgk
धन्यवाद या माहितीसाठी. खूपच
धन्यवाद या माहितीसाठी. खूपच प्रेरणादायी आहे हे.
महाबळेश्वरमधील काही हॉटेल्समधून त्यांच्या संस्थेची लोकं मेणबत्त्या विकावयास बसलेली असतात. हे ही अंधच असतात. त्यांना प्रतिसादही छान मिळतो.
अफलातून प्रेरणदायी
अफलातून प्रेरणदायी व्यक्तिमत्व !
ह्या लेखाबद्दल धन्यवाद.
__/\__
__/\__
खुप प्रेरणादायी !
खुप प्रेरणादायी !
अफलातून प्रेरणदायी
अफलातून प्रेरणदायी व्यक्तिमत्व !
ह्या लेखाबद्दल धन्यवाद. >>>>> +१११११११
लेखासाठी धन्यवाद. खरच
लेखासाठी धन्यवाद. खरच प्रेरणादायी. महाबळेश्वरला चक्कर होईल तेव्हा नक्कीच इथे भेट द्यायला आवडेल. त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे.
अफलातून! हेच खरे हीरो. खुप
अफलातून! हेच खरे हीरो.
खुप प्रेरणादायी.
__/\__
अफलातून प्रेरणदायी
अफलातून प्रेरणदायी व्यक्तिमत्व !
ह्या लेखाबद्दल धन्यवाद. >>>>> +१११११११
महान आहे हे! टोटल रिस्पेक्ट!
महान आहे हे! टोटल रिस्पेक्ट!
मस्त ओळख. _/\_
मस्त ओळख. _/\_
बापरे, जबरदस्तच ! _/\_
बापरे, जबरदस्तच ! _/\_
_/\_
_/\_
महान. छान ओळख.
महान. छान ओळख.
अफलातून प्रेरणदायी
अफलातून प्रेरणदायी व्यक्तिमत्व !
ह्या लेखाबद्दल धन्यवाद.
केवढा आत्मविश्वास, केवढी
केवढा आत्मविश्वास, केवढी भरारी, केवढी उद्दीष्ट, आणि सगळी साकारून दाखवली.अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व. खरच तेथे कर माझे जुळती. सहचारीणीपण तेवढीच प्रेरणादायी.
Respect!
Respect!
खूप प्रेरणादायी आहे ह्या
खूप प्रेरणादायी आहे ह्या फिनिक्सची भरारी...
असाच एक अवलिया चिंचवडला
असाच एक अवलिया चिंचवडला रहातो. वय २५ असेल. भुषण नाव आहे. हा अंध युवक सी.ए. झाला आहे. ह्याने गाणे शिकले आहे. डोळस माणसाला धक्के देणार्या पी एम पी एम एल ने प्रवास करत दररोज चिंचवड हुन पुण्याला जातो.
ग्रेट. खूप कौतुक आहे.
ग्रेट. खूप कौतुक आहे.
खुप प्रेरणादायी.
खुप प्रेरणादायी.
असे लोक खरे हीरो ! त्यांची
असे लोक खरे हीरो !
त्यांची आमच्याशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या बारीकसारीक गैरसोयींबद्दल आपण कुरकुरतो त्याची लाजच वाटते.
_/\_
_/\_