जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.
आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.
त्यानंतर आपण थोडे पुढे जाऊ आणि त्यात चार शक्यता येतात.
(A) समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो -
(1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(2) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.
(B) समजा एक निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो -
(3) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(4) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.
मग A(1) आणि B(4) याना काय म्हणाल? आशावादी कि निराशावादी? आणि का?
A (1) पण उरलेला अर्धा
A (1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही. = समाधानी आशावादी
A (4) आणि B(4) या दोघांची मनोवृत्ती एकच असेल. फारतर आशावादी हा उरलेला अर्धा पेलाही नक्की भरणार असा विचार करून प्रयत्न करेल तर निराशावादी 'च्यायला! इतके प्रयत्न केले त्यात हा अजून एक करून बघू.' असा विचार करून प्रयत्न करेल.
ग्लास भरला तर तर त्या दोघांची रवानगी करायला अजून कॅटॅगर्या लागतील.
जर निराशावादी माणूस प्रयत्न
जर निराशावादी माणूस प्रयत्न करत असेल तर तो निराशावादी कसा??
अर्ध्या भरलेल्या ग्लासाचे
अर्ध्या भरलेल्या ग्लासाचे उदाहरण हे फक्त जे काय समोर दिसते आहे त्यावरुन माणुस पटकन काय विचार करतो, याबद्दलचे आहे.
त्याला जर इतर फाटे फोडले तर, त्याचा अर्थ बदलेल. पण त्यामुळे मूळ जे उदाहरण दिले गेले आहे ते बाद ठरत नाही.
हे बोध कथे सारखे आहे. एक बोध घेण्याच्या दृष्टिकोनातून ती लिहिली असते.
त्याचा आपण तांत्रीक, सामाजीक बाबींतून उहापोह केल्यास वेगळे / विरुद्ध अर्थ सुद्धा निघु शकतात.
जर अर्धा प्याला स्वच्छ
जर अर्धा प्याला स्वच्छ पाण्याने भरलेला आहे, ते सो कॉलड आशावादी वा निराशावादी उरलेला पेला गढूळाच्या पाण्याने भरत असतील तर त्यांना काय म्हणावे?
RO न वापरणारे लोक.
RO न वापरणारे लोक.
B(4) ला A मधे टाका.
B(4) ला A मधे टाका.
का?
का?
मग B(३) ला सुद्धा आशावादी
मग B(३) ला सुद्धा आशावादी म्हणावे लागेल.
कारण जे ग्लास भरायचा प्रयत्न नाही करत ते सुद्धा आशावादीच झाले की कोणीतरी (देव!) येऊन ग्लास भरेल या आशेवर जगणारे
"अर्धा अपूर्ण" मानणारा जर
"अर्धा अपूर्ण" मानणारा जर अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असेल तर तो निराशवादी तुन बाहेर पडत आहे.
>>>>(A) समजा एक आशावादी
>>>>(A) समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो
(B) समजा एक निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो <<<<<
मला वाटते या मध्ये
(A) समजा एक मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो
(B) समजा एक मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो
असा बदल हवा आहे का? म्हणजे पहिल्या कृतीवरुन तो आशावादी की निराशावादी हे न ठरवता पुढल्या पर्यायांवरुन ठरवायचे .... असे तुम्हाला म्हणायचेय, की जे मूळ लिहिले तेच बरोबर आहे?
B(३) समाधानी.त्यांची गरज
B(३) समाधानी.त्यांची गरज अर्धा ग्लासची.
अर्धा तर अर्धा.
मानव पृथ्वीकर, तुमचा सल्ला
मानव पृथ्वीकर, तुमचा सल्ला "कोडे सोडवण्याच्या दृष्टीकोनातून" बरोबर आहे, पण एक ल्क्षात घ्या की प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानणारा मनुष्य हा आशावादीच असतो ना! तो निराशावादी कसा असू शकेल?
यानुसार मी लिहिलेले बरोबर आहे.
ओके. मग A(2) हा आशावादी,
ओके.
मग A(2) हा आशावादी, समाधानी पण महत्वांकांक्षी.
B(4) हा मूळात निराशा्वादी नसून असामाधानी आहे, आणि महत्वांकांक्षी आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे तर
प्रामाणिकपणे सांगायचे तर एखाद्याच्या द्रुष्टीकोणाला आशावादी निराशावादी तसेच एखाद्याच्या वृत्तीला समाधानी वा असमाधानी ठरवणे चूकच.
प्रत्येक जण आपल्या स्टाईलने आपली लाईफ एंजॉय करत असतो.
जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यावर आणि जीवनशैलीवर भाष्य करण्यास उत्सुकता दाखवतो तेव्हा आपले काहीतरी चुकतेय आणि आपण आपल्या आयुष्यात असामाधानी तर नाही ना चेक करावे.
एवढे बोलून या धाग्यावरून मी रजा घेतो
बरंय की सगळे असे समजत नाहीत,
बरंय की सगळे असे समजत नाहीत, नाहीतर मानसशास्त्र नावाचं शास्त्रच निर्माण झालं नसतं ऋन्मेष.
मला "मानव पृथ्वीकर" हे नाव
मला "मानव पृथ्वीकर" हे नाव खूपच creative वाटलं. तुमच्या या creativity ला अभिवादन!
४ गलास फुल संत्रा मारा, मग
४ गलास फुल संत्रा मारा, मग असले फालतू प्रश्न पडणार न्हाईत.
आर्दी पिऊन ऊगा गर्दी करू नका
हो. करतो हं! बरं झालं
हो. करतो हं! बरं झालं सांगितलं!
निमिष्_सोनार, धन्यवाद
निमिष्_सोनार, धन्यवाद
नाहीतर मानसशास्त्र नावाचं
नाहीतर मानसशास्त्र नावाचं शास्त्रच निर्माण झालं नसतं ऋन्मेष.
>>>
निर्माण झाले पण त्यातील फंड्यांना काही आधार नसतो.
असंच असतं. ते खुप व्यक्ती
असंच असतं. ते खुप व्यक्ती सापेक्ष असतं. एक एक फंडा जर वेगळा बघितला तर निरर्थक वाटु शकतो.
ग्लासच्या एका उदाहारणावरुन व्यक्ती आशावादी की निराशावादी, इत्यादि ठरवता येत नाही.
पण असे अनेक नि़कष तपासून स्वतः चिंतन करुन आपण आपली दिशा ओळखु शकतो बद्लु शकतो, तसेच मानसशास्त्रज्ञ इतरांबाबतीत करु शकतात.
फक्त मानसशास्त्रज्ञच नव्हे तर कित्येक लोक हे करत असतात. काही कळत काही नकळत.
ग्लास सारखी उदाहरणे ही अनेक चाचण्यांपैकी एक चाचणी.
प्रत्यक्षात भेटलेल्या व्यक्तीला कोणी अर्धा ग्लास दाखवून, प्रश्न विचारुन त्यावरुन अरे हा आशावादी, अरे हा निराशावादी असं कोणी करत नसतं.
(A)1 - ला आपण 'कळतंय पण वळत
(A)1 - ला आपण 'कळतंय पण वळत नाही ' ही अवस्था म्हणू शकतो. असं एखादा का करतो ह्या मागे अनेक कारणे असू शकतील. पण मुळात त्याची इच्छा होती हे महत्वाचं.
(B)4 - ला यशाची खात्री नाही, तरी प्रयत्न करण्यात काही नुकसान नाही असा विचार करणारे म्हणू शकतो.