Submitted by नीलम बुचडे on 18 October, 2015 - 04:26
*****माझा गाव*****
हिरव्या डोंगराच्या
कुशीत विसावणारा !
खळखळणार्या नद्यांच्या,
काठावर वसणारा !!
मंदिरातील घंटानादातून,
चैतन्य फुलवणारा !
साग्रसंगीत पूजेच्या,
सुगंधात रमणारा !!
परंपरांची कास धरणारा,
रिवाजांचा मान ठेवणारा !
नव्या युगाचे स्वागत ,
उत्साहाने करणारा !!
निसर्गाचे उपकार मानणारा,
निसर्गाचा ठेवा जपणारा !
मुक्या जीव-जनावरांना,
प्रेमाने वाढवणारा !!
सत्याचा मान राखणारा,
अन्यायाला ठेचणारा !
आणि उदार मनाने,
क्षमा करणारा !!
स्वाभिमान जपणारा,
मान - सन्मान देणारा !
दुःखितांच्या वाटेवरही,
फुले पसरवणारा !!
*****----------******-------------
Written by - Nilam Buchade.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आवडली कविता. शुभेच्छा!
मस्त आवडली कविता.
शुभेच्छा!
छान आहे कविता. आवडली.
छान आहे कविता.
आवडली.
छान आहे.
छान आहे.
नारायण राणेंचे गाव.
नारायण राणेंचे गाव.
मस्त... आवाडली कविता... येयत
मस्त... आवाडली कविता...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येयत र्हवा वरचेवर 'गजालि'वर... तर आमच्या लक्षात र्हवतलास...
असो...
@मोगा... नारायण राणेंचा गांव 'कांदळगाव' ना?...
धन्यवाद.. प्रसाद, अवि, अंजू,
धन्यवाद.. प्रसाद, अवि, अंजू, मोगा आणि विवेक देसाई.
मा. श्री. नारायण राणे यांच्या पूर्वजांचे गाव कांदळगाव, पण त्यांचे गाव वरवडेच आहे.
छान कविता, आवडली. लिहित रहा.
छान कविता, आवडली.
लिहित रहा. शुभेच्छा!
धन्यवाद प्रसाद.. आमचा गावच
धन्यवाद प्रसाद.. आमचा गावच छान आहे ना!!!!!!!!!
खूप छान कवीता. आवडली.
खूप छान कवीता. आवडली.
मस्त आहे कविता!
मस्त आहे कविता!
धन्यवाद पद्मावती..
धन्यवाद पद्मावती..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद Nidhii..
धन्यवाद Nidhii..