"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्र. ४

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 02:50

कोडं क्रमांक ४ :

खाली चार चित्रे आहेत. याच मालिकेतले पाचवे चित्र काय असेल ? पाचवे चित्र द्या.

quiz4_a.jpgquiz4_b.jpgquiz4_c.jpgquiz4_D.jpgकोडं क्रमांक ४ च्या हिंटस् :

पहिल्या चित्रासाठी : डेहराडूनचा ओरांगउटान

दुसर्‍या चित्रासाठी : सर्दीसाठी उटी

तिसर्‍या आणि चौथ्या चित्रासाठी :

hint4_c.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले चित्र वगळता बाकि चित्रात नदी हा कॉमन फ्याक्टर आहे
तर चौथे चित्र सरस्वती देवी, अर्थात पुन्हा एका नदीचेच सूप्त रूप Happy
पहिले चित्र ऐतिहासिक्/पुराणकाळ दर्शविते, मानवाची उपस्थिती दर्शविते
मानवाचि उपस्थिती व वस्ती आदिम काळापासून नदीच्या तीरावरच जास्त होती
दुसर्‍या चित्रात नदीकिनारी वस्तीचे उदाहरण दिसते, तसेच कालौघाचे प्रतिक म्हणून दोन चाके दिसतात
तर तिसर्‍या चित्रात, अवकाशातून घेतलेले नदीचे चित्र जी सागरास मिळते ते दिसते
चौथ्या चित्रात नदीबद्दल भरतखण्डातील मानवाने दिलेली देवीरुपातील मान्यता दिसते

अर्थात चौथे चित्र हे नदी जिथे जाऊन मिळते त्या सागराचे हवे Happy
रामसेतूचे देखिल चालू शकेल Wink
नसल्यास, गन्गानदीचा उगम शन्कराच्या जटेतून होतोय असे मानून शन्कराचे चित्र हवे
नदीकिनारी असलेल्या मन्दिराचे चित्र देखिल चालू शकेल असे वाटते

लिंब्या आणि चिउ छान लॉजिक लावले आहे... हे कोडे अवघड आहे..

मला तर हे श्री गणेश पंचायतनाशी संबंधित वाटते आहे..

हा घ्या श्री लक्ष्मी चा फोटो.

Laxmi.jpg

चार
चार या आकड्याशी देखिल सम्बन्ध लागतोय
कवटीस चार सूळे
अष्टकोनी घराच्या चार बाजू दिसताहेत, नॉर्मली घर चौकोनीच अस्ते
नदीचा चतुर्भुजप्रदेश दिस्तोय
देवीला चार हात आहेत
आता एक नुस्ते चौकोनाचे चित्र टाकले पाचवे तरी चालेल Wink
किन्वा चार पाय असलेला कोणताही प्राणी
चारचाकी गाडी देखिल चालायला हरकत नाही Lol

कवटीस चार सूळे
>> लिंबू अरे मला तो कुठलातरी अर्धवट बनलेला साचा वाटतोय.. आता तू मुर्तीकार आहेसच.. तुच याच्यावर थोडा प्रकाश टाक (आणि चित्र पण Proud )

लिंब्या.. नदीच्या मुखाशी.. त्रिभुज प्रदेश असतो .. चतुर्भुज नाही..
रच्याकने.. तसा जर विचार केला तर पहिल्या चित्रात एकच मुखवटा आहे. दुसर्‍या चित्रात दोन चाकं दिसतायेत.. तिसर्‍या चित्रात त्रिभुज प्रदेश आहे. आणि चवथ्या चित्रात चार हात असलेली सरस्वती देवी आहे.. म्हणजे पाचव्या चित्रात.. पाच असलेले कोणतेही चित्र चालेल बहुतेक.. पंचानन.. किंवा पंचकोन.. किंवा पाच टोके असलेला तारा...

चित्र क्र.१ मानव निर्माण झाला.
चित्र क्र.२ जमिनीवर घर बांधलं.
चित्र क्र.३ पाण्यावर पण वर्चस्व निर्म्माण केलं.
चित्र क्र.४ सरस्वतीची उपासना केली.
चित्र क्र.५ भाषा. अर्थात आपली मायबोली. Happy

परफेक्ट हिम्या Happy हे लॉजिकपण बरोबर वाटतय......
आयला, पण त्रिभुज ची दुरुस्ती कशी करू? Wink ती केली तर माझ लॉजिक बिघडतय ना Lol

पहिले चित्र वगळता बाकि चित्रात नदी हा कॉमन फ्याक्टर आहे
>>>>>>>>>>>>
लिंबुदा दुसर्‍या चित्रातपण नदी नाहिये.
मला वाटतय, पहिली तीन चित्रे पूथ्वीतलावरील आहेत. चौथे चित्र स्वर्गातले आहे.
पाचवे चित्र अवकाशाचे पाहिजे.

चित्र क्र.१ मानवाने टोळीयुध्द केल. बळी तो मिशी पिळी या तत्वाने अस्तित्व निर्माण केलं.(जे मेले त्यांचे सांगाडे सदरच्या चित्रात दिसतात)
चित्र क्र.२ जे दोन चक्र दिसतात त्याच्या सहाय्याने मानवाले प्रगती केली. ( पहा: आउद्योगिक क्रांती).
चित्र क्र.३ समुदावर स्वारी करुन, देशोदेशीच पाणी प्याला.
चित्र क्र.४ सरस्वतीची उपासना केली. ज्ञान मिळवलं. अनेक भाषा शिकला.
चित्र क्र.५ ज्ञानाच्या बळावर जगावर हुकुमत गाजविनार्‍या अमेरीकेच चित्र पाहिजे. Wink

सेनापती, आहे, चित्र सेव्ह करुन एन्लार्ज करुन बघा, उजवीकडील झाडान्ना समान्तर असे नदीचे पात्र मला तरी दिसते आहे
चु.भु.दे.घे.

सरसेनापती :), असो अजून कुणी ५ या अंकाविषयीचा फोटो नाही टाकला..

मी टाकतो.. घ्या ऑलिंपिक चे बोध चिन्ह

five.jpg

बर सेनापती, पण आता मला वेगळच सुचतय Happy
कवटीला कवळ्यान्चे (दातान्चे) दोन थर
बन्गल्याला मजले दोन
खाली दिसणार्‍या नद्याही दोनच
फक्त देवी एक, तिला चार हात Happy
मग आता सहा हातवाल कोण त्याच्या फोटू टाका पाचवा Wink हा.का. ना.का.

नकाशाचा भूप्रदेश हा आंध्रप्रदेश च्या समुद्रकिनार्‍याचा आहे असे दिसते. विजयवाडा, राजमहेन्द्रीच्या आसपासचा. आणि नध्या कृष्णा व गोदावरी असाव्यात .त्यावरून काही ताणता येईल का?

हे नद्यांशी संबंधीत दिसतय.
सिंधू (मोहेनजोदडो संस्कृति), ??(दुसर्‍या चित्रात कालवा) , कृष्णा-गोदावरी, सरस्वती,.
उत्तर - गंगा- कावेरी प्रकल्प.?

मला पहिला फोटो श्री विष्णुच्या वराह अवतारातला वाटतोय. प्रूथ्वी तोंडावर तोलुन धरल्यासारखा.

सध्या डोकं दोन दिशेने चाललेलं आहे,
१. १ डोळा, २ चाकं, त्रिभुज प्रदेश आणि चतुर्भुज देवी.. हिम्सकूलाने दर्शविल्याप्रमाणे.
पण मग १ अंकच दर्शवायचा असेल तर शिवापिथेकसचा डोळा दाखवायची गरज काय असा प्रश्न आहे.

२. वर विक्रमने म्हंटलं आहे तसा नद्यांशी संबंध,
पहिलं मोहेंजोदाडो नाही, हे सिंधू खोर्‍यात सापडलेले (ओरांगउटान सदृश) आदिमानवाचे अवशेष. त्याला शिवापिथेकस (किंवा रामापिथेकस) म्हणतात. दुसरं चित्र उटीचं आहे .. टेलिस्कोप टॉवर का काहीसं नाव आहे. त्याचा संबंध कळला नाही पण.. तिसरं गोदावरी खोर्‍याचं आणि चौथं सरस्वतीचं.. असं असेल तर यांत गंगा नाही. म्हणजे गंगेचं चित्र पाचवं असू शकेल.

पण हे काही पटत नाहीये...

क्ष, तू म्हणतोस ते बरोबर वाटतय!
पण हूडाने सान्गितल्या तर्काला धरुन थोड वेगळ
"प्राचिनता" हा दुवा असू शकतो
पहिली कवटी, एकतर आदिमानवाचीच वाटते, नाकाच्या ठेवणीवरुन
नद्यान्चा फोटो देखिल प्राचिनतम भूप्रदेशाची/नद्यान्च्या प्रवाहाची जाण करुन देतो
सरस्वतीचा फोटो तर "सरस्वती देवी" या पुरातन सन्कल्पनेशीच निगडीत आहे
रहाता राहिला दुसरा फोटो, यातिल दोन चाके, शो करता लावलेली, हा देखिल प्राचिन काळाशी दुवा दाखवतो
तसेच अष्टकोनी रचाना देखिल प्राचिन भारतीयच Happy
तेव्हा असच काही "प्राचिन" म्हणून पाचव दाखवा Happy हव तर हिमालयाचा फोटु टाका

क्ष, तुमचे बरोबर आहे. नं २ उटीचे टेलिस्कोप हाउस आहे. म्हणजे कावेरी खोरे.
सिंधु खोरे, कावेरी खोरे, कृष्णा- गोदा खोरे, गंगा खोरे.
राहता राहिले नर्मदा खोरे. कुणीतरी नर्मदेचा फोटो टाका, पटकन.

क्ष, आपण पहिली ३ चित्र बरोबर ओळखली आहेत.
सरस्वतीच्या चित्रावर अजून अगदी सरळ, सहज विचार करा.

कोडं क्रमांक ४ च्या हिंटस् :

पहिल्या चित्रासाठी : डेहराडूनचा ओरांगउटान

दुसर्‍या चित्रासाठी : सर्दीसाठी उटी

तिसर्‍या आणि चौथ्या चित्रासाठी :

hint4_c.jpg

माझा अतर्क्य तर्क... Proud
चित्र १: चेहरा... दात... घासा (नाहीतर दात पदतिल आणि चेहरा असा दिसेल)
चित्र २: अंगाला उटी लावा...(सर्क्युलर मोशन मधे (चाक) म्हणजे रक्ताभिसरण वाढेल)
चित्र ३: नदीवर जाऊन पाण्याने अंघोळ करा...
चित्र ४: सरस्वती ची उपासना करा...
चित्र ५: आता फलाहार करा...... Rofl Rofl Rofl

MonkeyBanana_HUGE.jpg

Pages

Back to top