भाग १ - http://www.maayboli.com/node/55968
भाग २ - http://www.maayboli.com/node/55978
दुरावा….. भाग ३
रविवारच्या रात्रीपर्यंत मधुराचा ,"अर्धा तास आधी नाही येऊ शकत " असा कोणताही मेसेज किंवा फोन न आल्यामुळे सचिनला त्याचा प्ल्यान यावेळेस यशस्वी होईल याची खात्री झाली. सोमवार उजाडला आणि मधुरा ठरल्याप्रमाणे अर्धा तास आधीच तिच्या बस स्टॉपवर पोहोचली आणि बसची वाट पाहू लागली. तिने सचिनला कळवण्यासाठी फोनही केला पण त्याने तिचा फोन उचललाच नाही. ती बसच्या दिशेकडे पाहत असतानाच एक बाईक एकदम तिच्या समोर येउन थांबली. ती जरा घाबरलीच आणि "नोन्सेन्स" अस पुटपुटत थोडी मागे झाली. त्या बाईकवर बसलेल्याने , "कैसे हो म्याडम ?" म्हणत हेल्मेट काढलं आणि ती उत्तरली, " My God सचिन ... तू बाईक घेतलीस? कधी ? कस काय? आणि सांगीतलही नाहीस. ? CB Shine by Honda ती त्याच्या बाईककडे पाहत म्हणाली. " कस वाटल सरप्राइज ? चल कॉफी शॉप मध्ये बसुयात?. बोलायचं आहे काहीतरी ... " "अरे इथेच बोल ना " तीच आपल बाईक न्याहाळण चालू होत.. " अरे…. अग चल न, सांगायचं आहे काहीतरी " तो पुन्हा म्हणाला. ती मात्र तिच्याच विश्वात आणि थोडीशी रागातच म्हणाली, "हे बघ तू मला बाईक बद्दल का नाही सांगितलस ? मी नाही येणार कुठे इथेच काय ते बोल ... आणि पार्टी मी घेणारच पण असल्या कॉफी शॉप मध्ये नाही ... ओके ??? " आता तोही थोडा वैतागला... , "मधुरा ... I LOVE YOU ... आणि ... I REALLY LOVE YOU " ती त्याच्याकडे पाहतच राहिली. "तू मला प्रपोज करतो आहेस ? तेही इथे ? बस स्टॉपवर? इथे?" आता तोही उत्तरला, "मग काय करू ? बोलावत होतो न कॉफी प्यायला ... ? आता लवकर काय ते उत्तर दे... ओफ़्फ़िशिअलि आज प्रपोज करतोय तुला... मी प्रेम करतो तुझ्यावर... खूप आधीपासून ...तुझ काय मत आहे या प्रस्तावाबद्दल ? तू ओळखतेस मला सगळंच माहितीय तुला.. " त्याचा आवाज थोडा बारीक झाला होता आत्ता ... तो तिच्या डोळ्यात स्वतःला पाहत होता... ती गप्प बसली थोडा वेळ... आधी थोडी होकारार्थी मान हलवली ..मग हसली. खाली नजर झुकवली मग पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहायला लागली. त्याला तिचं उत्तर मिळाल, त्याचा जीव भांड्यात पडला आणि थोड्या मोठ्या आवाजातच तो म्हणाला, "चल मग बस पटकन मागे, पहिली RIDE आज फ्री मध्ये तुला." ती त्याच्या मागे बसतच म्हणाली, "ओये हेल्लो ..म्हणजे उद्यापासून तू बाईक तिकीट लावणार कि काय मला... ? " "अग चेष्टा केली... " "हो मग मी तरी कुठे सिरिअसलि घेतलं तुला? पण प्रपोज तर सिरिअस्लि केलास ना का ती पण चेष्टा होती...? " "ए प्लीज अस काय ... ? " ते दोघे असेच गप्पा मारत पुढच्या प्रवासाला निघाले... मैत्री नंतरचा प्रवास; नवीन नात्याचा… सहवासाचा... प्रवास प्रेमाचा.
बाईकवरून त्या दोघांना येताना सगळ्यांनीच पाहिलं आणि “ह्या पाखरांनी शेवटी सांगितलं एकमेकांना” हे कळून सगळेच आनंदी झाले. मैत्री आणि नंतर जुळवून आणलेलं प्रेम. दोघही एकमेकांच्या जवळ होते आणि आता नवीन नात्याने आणखीन जवळ आले होते. थोडासा एकमेकांवरचा हक्क, विश्वास वाढला होता. बस चा प्रवास थांबून बाईक वरच बेभान फीरण सुरु झाल होत. एकाच ऑफिसात असल्यामुळे बराच वेळ सानिध्यात जात होता. काम आणि मधूनच केलेली छेडछाड. कधीतरी ऑफिसला एकत्र बंक करून मुव्हीला जाण तर कधी हाल्फ डे घेऊन समुद्रकिनारी आडोशाला हातात हात घालून बसण. ह्या सगळ्या प्रेम लीलांमध्ये त्यांनी त्यांचं जॉब वरच प्रेम मात्र कमी होऊ दिलं नव्हत त्यामुळे कधीतरी या दोघांना ढील देण HR लाही परवडत होत.
त्या दोघांचे बंध आत्ता घट्ट होण्याकडे वळत होते. एकमेकांचे गुण आणि अवगुणही हळू हळू लक्षात येत होते, जसे प्रत्येक नात्यात असत तसच राग आणि प्रेम, हसू अन रडू त्यांच्यात होत. मैत्री, प्रेम बहरत असताना दोघ आता करिअर साठी धडपडू लागले होते. मैत्रीची दोन वर्षे आणि प्रेमाचीही दोन वर्षे संपत आली होती त्यातच आता लक्ष वेधले होते ते आर्थिकरित्या अधिक संपन्न होण्याकडे. नोकरीसाठी दिलेली चार वर्ष पाहता प्रमोशन आणि इतर गोष्टी ओघानेच आल्या होत्या.
सचिनची प्रमोशन मिळवण्याकरता खूप धडपड चालू झाली होती. काहीही आणि कसही करून त्याला ते हव होत. करिअरच्या दृष्टीने मधुराही त्याच पोझिशन साठी धडपडत होती पण सचिनची चिडचिड होत होती आणि ती शांतपणे तीच काम करत होती. एक महिना होता त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याकरता. त्या संध्याकाळीच ते दोघ घरी निघण्यापूर्वी ऑफिसमध्ये कामासाठी थांबले होते आणि त्यांच्यात बोलण झाल होत .
तो- मधुरा तू इतकी मेहनत का घेते आहेस? मी करतोय प्रयत्न आणि मला १००% विश्वास आहे कि हि पोझिशन मला मिळेल. तू उगाच नको टेन्शन घेउस आणि जास्त कामाचा व्यापही नको तुझ्यामागे. अग हे प्रमोशन म्हणजे माझ स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईलच. तू निश्चिंत राहा.
मधुराला एक क्षण त्याच बोलण खटकल.
ती- अरे अस का म्हणतोस ? मलाही हि पोझिशन मिळू शकतेच कि. मीही प्रयत्न करतेय. मला काय किंवा तुला काय कोणालाही मिळोत पण मला मेहनत तरी करू देत.
तो- (थोडासा रागात) अरे मला काय आणि तुला काय अस नाहीये हे. माझ करिअर घडणार आहे. आणि त्यानंतरही किती मेहनत आहे. पैसा मिळेल पण वेळही द्यावा लागेल. आठ-नऊ तासांपुरत मर्यादित नसेल त्यानंतर. उद्या लग्न झाल्यावर थोडीच तुला हि पोझिशन टिकवून ठेवता येणार आहे? स्त्रीला पहिले लक्ष संसाराकडे द्याव लागत. कळतंय ना? आणि आमच्या घरी असच आहे बर का म्याडम .... प्लीज मधुरा मला माझ हे स्वप्न साकार करायचं आहे.
तिला मात्र त्याच तिला अस गृहीत धरणं आणि फक्त स्वतःपुरत मर्यादित विचार करण अजिबात पटलं नव्हत. थोडा स्वार्थीच वागला तो , पण त्याची त्या पोझिशनसाठी चाललेली धडपड आणि डोळ्यातलं तेज पाहून तिने गप्प राहाण पसंत केल. शेवटी तिच्यासाठी पोझिशन नाही तर तो आणि त्याची स्वप्न मह्त्त्वाची होती.
प्रमोशनचा दिवस उजाडला. तीन जण सिलेक्ट झाले होते फक्त शेवटची एक मुलाखत कंपनीच्या Director बरोबर होती आणि त्यानंतर सिलेक्शन कळवणार होते. आधी सचिन आणि मग मधुरा असे दोघेही डिरेक्टरला भेटणार होते. दोघांच्या मुलाखतीनंतर सिलेक्शन झाल होत. सचिन. त्याला प्रमोशन मिळाल होत. त्याच स्वप्न त्याने पूर्ण केल... मधुराला आकाश ठेंगण झाल होत. त्या दोघांसाठी तो अतिशय आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा दिवस ठरला होता आणि त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणाराही. दोघांनी एकत्र सेलिब्रेट केल त्यादिवशी. रात्री केक काय , क्यांडल लाईट डिनर काय . कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या हातात हात घालून त्या शांत समुद्राच्या काठावर बसले होते. भावी आयुष्याची स्वप्न बघत.
पुढचे एक दोन महिने नेहमीप्रमाणेच चांगले गेले, पण सचिनने ज्याप्रमाणे अंदाज बांधला होता ते खर झाल होत. फक्त प्रमोशन मिळण महत्त्वाच नव्हत तर ते पद संभाळण हि तेवढंच मेहनतीच काम होत. जबाबदारी होती. त्यामुळे सचिनने स्वतःच सगळ लक्ष कामात घालायला सुरुवात केली. अगदी यांत्रिकपणे तो कामाला जुंपला गेला. जास्तीत जास्त मिटींग्स त्यामुळे कंपनीला होणार प्रोफीट आणि त्याच वाढणार उत्पन्न. हेच त्याच ध्येय ठरलं होत. मधुरा तर दूरच राहिली पण अगदी त्याच्या घरच्यांनाही तो वेळ देऊ शकत नव्हता. त्याच गणित कुठेतरी चुकत होत. कुठेतरी नोकरी आणि नाती याची सांगड घालण त्याला जमत नव्हत, मधुराला हे सगळ कळत होत आणि तीही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मित्र, मैत्रिणी सगळेच दुरावत होते. कधी तरी लंच ब्रेकमध्ये तो वेळेवर यायचा. कधीतरी गप्पा रंगायच्या पण त्याही कामाच्याच. तराजूच एक पारड जड होऊन वर जाताना दुसर मात्र पार रितं होत चाललं होत. त्याची चिडचिड, राग वाढत चालला होता, मधुराच समजावणही, "आता हि आपल्याला अक्कल शिकवतेय " असाच त्याला वाटायला लागल. कधी काळी हसून, समजून घेणारा सचिन पूर्णपणे बदलून गेला होता. मधुरने कधी, "बाहेर जाऊयात?" अस विचारल्यावरही सचिनच उत्तर, "तू तरी समजून घे किती काम असत मला ते.. कसा बाहेर येऊ?" अशा प्रकारच झाल होत. ती समजून घेत होती पण तीच म्हणण समजून घेण त्याला जमत नव्हत. ती सांगायची, " कुणाची तरी मदत घे... मला सांग, आपल्या दोघांच काम एकच आहे फक्त तुझी कामाची पातळी मोठी आहे. " पण का कुणास ठाऊक त्याचा पुरुषी अहंकार मध्ये यायचा. दुसर्या कोणाला सांगितलं तर तो माझी जागा बळकावेल अस त्याला वाटायचं. मधुरा थकत चालली होती.. नात्यातला खेळकरपणा हरवला होता. दडपण वाढत चाललं होत. त्याचं तिला वेळ न देण, दुर्लक्ष करण आणि त्याहूनही जास्त स्पर्धेत उतरल्यासारख श्वास न घेता जीव मुठीत घेऊन सततच धावण तिला पटत नव्हत. कुठेतरी सचिनने थांबावं थोडा वेळ घ्यावा, स्वतःला आणि समोरच्यालाही थोडा वेळ द्यावा अस तीच मत होत आणि हे तिने त्याला सांगीतलही होत पण त्या संध्याकाळी ते जेव्हा भेटले तेव्हा ह्याच विषयावरून त्यांच्यात फार मोठा वाद झाला ... पाऊण- एक तास ती त्याची वाट पाहत ताटकळत उभी होती... आता काम आणि काम हाच एक विषय त्यांच्यात होता आणि त्यातूनच संवाद साधण्याऐवजी वाद निर्माण झाला होता. मधुरा बोलत असतानाच सचिन तिच्यावर जोरात ओरडला, "तू मला नको शिक्वूस काय आणि कस म्यानेज करायचं ते.. मूर्ख नाहीये मी.. हि पोझिशन अशीच नाही मिळवली आणि प्रत्येक वेळी काय ग मला लहान मुल असल्यासारख समजावत असतेस? कळत मलाही .. उलट आता मला तर अस वाटायला लागलाय कि तू जेलस फील करते आहेस... तुझ्याऐवजी मला प्रमोशन मिळाल म्हणून... जळू नकोस माझ्यावर ... " रागाच्या भरात तो काय काय पुढे बोलत राहिला जे मधुराहि ऐकायच्या मनस्तिथित नव्हती. तिचा संयम तुटला ती काही बोलणार इतक्यात तोच म्हणाला, "मला तुझी किरकिर नकोय... आणि आपल हे नातही... मी नाही जमवून घेऊ शकत तुझ्याबरोबर. कोणी काही ताळमेळ साधायची गरज नाही.. आपण वेगळे होऊयात. ब्रेक अप करूयात ... " तिला एकही शब्द पुढे बोलू न देता, काहीही न ऐकता तो तिथून निघून गेला.
ती त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत होती. डोळ्यातल्या अश्रूंनी सगळ अंधुक दिसत होत तिला... मी.. मी जेलस फील करतेय ? ओह्ह्ह... अचानक हसत ती म्हणायला लागली... तुझी पोझिशन..? डायरेक्टर ने मला सांगितलेलं, "अभिनंदन.. हि पोझिशन तुझी.. " मी नाकारली होती ती.. तुझ्यासाठी.. तुझ्या स्वप्नांसाठी. तुझ्यावरच्या प्रेमासाठी... मी जेलस फील करणार तुझ्यावर?.. तुझ्या यशात मी स्वतःला पाहत होते... तुला समजलच नाही कधी... ५ वर्षात मला ओळखू शकला नाहीस तू? हाहाहा ...मी तरी कुठे ओळखल तुला? जेलस फील करतेय मी... माझ करिअर जे तुझ्या कधीच डोक्यात आल नाही ते मी बाजूला ठेवलं आणि आज हे ऐकवून गेलास तू.........? मधुरा तिथे किती तरी वेळ बडबडत बसली.. रडत राहिली. तिला नात्यात आलेला दुरावा जाणवला होता.. तेच तिला त्याच्याशी बोलायचं होत.. पण सचिन ..त्याने तिला न काही बोलू दिल न काही ऐकून घेतलं... नात संपवून टाकल अगदी सहजपणे.
मधुरानेही शेवटी हार मानली.. तिनेही त्याचा निर्णय स्वीकारला. कारण विश्वासच नसलेलं एकतर्फी नात टिकवण्याची तिचीही इच्छा नव्हती.. त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. एकाच ऑफिसमध्ये असल्याने आणि काम करणंही गरजेच असल्याने बोलण बंद होण आणि इतर गोष्टी टाळण शक्य नव्हत . आता ते पुन्हा मैत्रीच नात जोडू पाहत होते.. तेही जमत नव्हत.. त्यामुळे फक्त सहकर्मचारी म्हणून वावरत होते. दुरावलेल नात सचिनलाही खटकत होत.. पण ते त्याला स्वीकारायच नव्हत. नेहमीप्रमाणेच त्याने ते दुय्यम मानत कामाला महत्त्व दिल होत.. पण आज तिच्या रेसिग्नेशनच्या निर्णयामुळे तो थोडा हळहळला होता. सगळंच संपलेलं पण आठवणी कायम होत्या. भले त्या आठवायला त्याला वेळ नव्हता.. न तेव्हा न आत्ता. त्याचा मोबाईल वाजला.. "next meeting Reminder " तो पुन्हा कामात गुंतला.
एक महिना बघता बघता सरला. खूप काही आवरत तिच्या स्यांड ऑफ चाही दिवस आला. ती जाताना डोळे पाणावले.. अश्रू ढळू लागले... पण दुरावा कायम होता आणि तोच पुढेही राहिला... त्याला मिठी मारत तिने एक चिट्ठी त्याच्या हातात दिली.. अन मग निघून गेली ती कायमचीच.. अगदी देश सोडून.. करिअर घडवण्यासाठी, स्वतः स्वतःवर पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी.. तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी... त्याच्यापासून दूर जाण्यासाठी फक्त परदेश हा मार्ग तिने स्वीकारला पण आठवणी तिथेही राहणारच होत्या.. तिच्यासोबत.
सचिन त्याच्या केबिन मध्ये परतला.. चिट्ठी वाचायला सुरुवात केली, काहीच नव्हत लिहिलेलं.. फक्त ४-५ ओळी...
सचिन,
खूप प्रेम केलंय तुझ्यावर आणि तुझ्या स्वप्नांवरही. अगदी स्वतः पेक्षा जास्त.. पण कुठतरी थांबल सगळंच.. तू तुझ्या जागी योग्य, पण माझी बाजू एकदा तरी विचारात घ्यायची होतीस.. हरकत नाही..
नाहीच कळणार तुला माझ कधीही काही ,
कारण तू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस
अबोल मन आणि त्या हळुवार भावना ,
न उमजलेल्या तुला त्या नाजूक संवेदना.
तुझ्या पुढच्या आयुष्याला खूप सार्या शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा आणि जमल्यास तुझ्या भोवतीच्या माणसांनाही जपत जा.
स्वतःची स्वप्न साकार करायला निघालेली..
मधुरा.
(समाप्त.)
……………………………… मयुरी चवाथे-शिंदे.
मि पहिलि
मि पहिलि
ओ ओ छान केलात शेवट तिला त्याग
ओ ओ छान केलात शेवट तिला त्याग न करायला लावता तिच्या इच्छा पुर्ण करु दिल्यात वेगळा पण छान शेवट
छान
छान
चांगली आहे गोष्ट. (या अशा
चांगली आहे गोष्ट.
(या अशा माणसासाठी स्वतःची पोझीशन सोडायला नको होती असं तिला नक्की वाटलं असेल.)
चांगली जमली आहे कथा!
चांगली जमली आहे कथा!
या अशा माणसासाठी स्वतःची
या अशा माणसासाठी स्वतःची पोझीशन सोडायला नको होती असं तिला नक्की वाटलं असेल
>>>
प्रेम बाकी होतं ना तिचं
छान, आवडली.. काही ठिकाणी भावभावनांची बारीकसारीक निरीक्षणे अचूक!
मला माझा पहिला प्रपोजही आठवला वरचे वाचताना, अन थोड्यावेळासाठी श्वास थंड झाले
mala pan aavadala
mala pan aavadala shevat...... Chan aahe purn katha
मस्त
मस्त
मस्त...........
मस्त...........
तिला त्याग न करायला लावता
तिला त्याग न करायला लावता तिच्या इच्छा पुर्ण करु दिल्यात वेगळा पण छान शेवट + १