मोमोज हे प्रकरण भारतीय बाजारात कधी आले, याची मला नेमकी कल्पना नाही. पण मी पहिल्यांदा खाल्ले ते दोन महिन्यांपूर्वीच. तसे कुठे मॉल वा फूडकोर्टमध्ये जाणे झाले (अर्थातच गर्लफ्रेंडबरोबरच) तर वरचेवर नजरेस पडायचे, मात्र कधी खाणे झाले नव्हते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडच्या ते नावडीचे आणि आम्ही दोघे बरोबर असताना मी स्वतासाठी काही स्पेशल घेऊन खाणे अशी पद्धत नाही आमच्यात. तसेच एकटे असतानाही मी वडापाव आणि दाबेली पासून चायनीज भेल ते अमेरिकन चॉप्सी पर्यंत सारे खातो, पण उकडीच्या मोदकासारख्या दिसणार्या पदार्थाला मुद्दाम पैसे खर्च करून विकत घ्यावे असे धाडस कधी झाले नाही.
असो, तर दोन महिन्यांपूर्वी पहिल्यांदा मी हे खाल्ले आणि ते चक्क आवडले!
झाले असे, मुंबईच्या ज्या उपनगरात मी कामाला आहे त्या रेल्वेस्थानकाजवळ एक फूडकोर्ट आहे. वरचेवर माझे तिथे अरबट चरबट खाणे होत असते. चायनीज पासून सौथेंडीयन अन वेजपासून नॉनवेजपर्यंत सारे काही तिथे मिळते. चारेक महिन्यांपूर्वी तिथे एक मोमो काऊंटर सुद्धा उघडला. पहिल्या दिवसापासून चांगला रिस्पॉन्सही मिळाला. पण मी मात्र सुरुवातीचा काही काळ मोमोज आपल्यासाठी निषिद्ध आहेत असे समजून त्यापासून दूरच राहिलो. तरीही तरुणवर्गात, आणि त्यातही खास करून मुलींमधली त्याची लोकप्रियता बघून माझा हा संयम फार काळ काही टिकला नाही. साधारण दोन महिन्यांपूर्वी एका बेसावध क्षणी अंडे खावे आणि संकष्टीचा उपवास तुटावा त्याप्रकारे मी मोमोज खायचा निर्णय घेऊन टाकला.
वेज मोमोज - हाफ (ईंग्रजी हाल्फ मधील ‘ल’ सायलंट) ३० रुपये आणि फुल्ल ६० रुपये.
चिकन मोमोज - हाफ ४० रुपये आणि फुल्ल ८० रुपये.
पहिल्यांदाच मी तिथला भाव काढला. नाहीच आवडले तर नासाडी नको म्हणून हाफच घेण्याचे ठरवले. वेज मोमोजमध्ये कुठल्या भाज्या टाकतात याची कल्पना नसल्याने आणि ते विचारणे अप्रशस्त वा अज्ञानाचे प्रदर्शन वाटत असल्याने चिकन मोमोजनेच सुरुवात करायचे ठरवले. कूपन सिस्टीमचा मान ठेवत ४० रुपयाचे कूपन घेतले आणि मोमोज काऊंटर वर दिले. समोरच्या वाफाळलेल्या पात्रातून एकेक करून मोमोज पार्सलच्या डब्यात भरायला सुरुवात झाली. अचानक मला सुचले वेज मोमोची देखील चव चाखून बघूया, म्हणून त्याला एका चिकन मोमोच्या जागी एक वेज मोमो द्यायला सांगितले. अर्थात, वेजची किंमत कमी असल्याने पैश्यांचा विचार करता यात माझे नुकसान आणि त्यांचाच फायदा होता. त्यामुळे माझी मागणी हरकतपात्र नक्कीच नव्हती. तरीही तो पोरगा थोडासा गोंधळलाच. पण ऐकले मुकाट.
५ चिकन मोमोज आणि १ वेज मोमो. म्हणजे एकूण ६ मोमोज!
एका वेज मोमोची किंमत ३०/६ = ५ रुपये, आणि एका चिकन मोमोची किंमत ४०/६ = ६ रुपये ६६ पैसे. ढोबळमानाने दोन अडीज मोमोज म्हणजे एक वडापाव. माझा मध्यमवर्गीय स्वभाव असले हिशोब मांडत मोमोज खायचा आनंद उचलू लागला. एका चिकन मोमोच्या जागी एक वेज मोमो घेतल्याने मी माझे १.६६ पैश्यांचे नुकसान केलेले, मात्र चवीला चेंज म्हणून हे नुकसान ठिक आहे म्हणत नकळत माझा मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय असा प्रवास सुरू झाला होता.
त्यानंतर पुढच्या महिन्याभरात साधारण ५ ते ६ वेळा माझे मोमोज खाणे झाले. प्रत्येकवेळी असेच, ५ चिकन आणि १ वेज या पद्धतीनेच ऑर्डर करत खाल्ले. अश्यातच एकदा गणपतीच्या दिवसांत मोमोज खायची लहर आली. मात्र आईने, ‘किमान हे पाच दिवस तरी शाकाहार कर रुनम्या’ अशी विनंतीवजा ताकीद दिली होती. त्यामुळे आयुष्यात पैल्यांदाच मी मनाची तयारी करत संपुर्णपणे वेज मोमोज खायचा निर्णय घेतला. वेज मोमोजसाठी कूपन घेताना वा काऊंटरवर ऑर्डर करताना नाही म्हटले तरी जरा शरमेचेच वाटत होते. नेहमीचा शिरस्ता मोडत मोठ्या संकोचानेच त्या पोरग्याकडे मी फक्त वेज मोमोज मागितले. त्यातल्या त्यात एक चांगले होते की वेज असो वा चिकन, बाहेरून सारे मोमोज सारखेच दिसत असल्याने मी आज वेज मोमोज खाणार आहे हे ट्रेनमध्ये कोणाला समजणार नव्हते. माझी नेहमीची जागा पकडत मी पार्सलचा डब्बा उघडला, आणि बघतो तर काय ...................
विश्वासघात !
त्या काऊंटरवरच्या पोरग्याने माझी बावळटांत गिणती करत मला मोमोजच्या गिणतीत फसवले होते. फक्त पाचच मोमोज दिले होते. मोमोजचा आकार आणि भूकेचा विचार करता चारही पुरेसे होते पण अश्यावेळी म्हणतात ना, भूक उगाचच वाढते.
असो, चरफडण्याव्यतिरीक्त माझ्या हातात काहीही नव्हते. आता दुसर्या दिवशीच काय ते याचा सोक्षमोक्ष मी लाऊ शकणार होतो, आणि तो मी लावलाच.
तर मिळालेले उत्तर त्यापेक्षाही अनपेक्षित होते.
एका हाफ प्लेटमध्ये फक्त ५ मोमोजच येतात. मला दरवेळी माझ्या अजब फर्माईशवर तो जो सहावा वेज मोमोज द्यायचा तो त्या ५ चिकन मोमोजच्या व्यतिरीक्त द्यायचा. त्याच्या त्या गोंधळण्याच्या मागचे कारण मला आता समजत होते. मात्र त्याच्या या अव्यावहारीक साधेपणाला चांगुलपणा म्हणावे की बावळटपणा हे समजत नव्हते.
काही का असेना. मी जवळपास पाच ते सहा वेळा अश्या प्रकारे एकेक अतिरीक्त मोमो खात जवळपास एक एक्स्ट्रा प्लेट हादडली होती. उगाचच माझा आत्मसन्मान जागा होऊ लागला. त्या काऊंटरवरच्या पोरग्याच्या नजरेत मी एक फुकट मोमो खाणारा आहे असे मला वाटू लागले. तसेच नकळतपणे मी त्या फूडकोर्टवाल्यांचे एक प्लेट मोमो फुकट खाल्ले होते. अचानक माझ्या प्रामाणिकपणालासुद्धा कधी नव्हे ते जाग आली. आणि मी त्या एक्स्ट्रा प्लेट मोमोजचे पैसे चुकते करण्याचा निर्णय घेतला. जे काही घडले ते सांगून चुकते केलेही..
चारेक दिवसांनी घरचे गणपती गेले आणि मला चिकन मोमोज पुन्हा खुणावू लागले. पुन्हा चिकन मोमोजचे कूपन काढले आणि काऊंटरवरच्या पोरग्याच्या हाती सोपवत पुन्हा एकदा माझी अजब ऑर्डर केली. यावेळी स्वताहूनच त्याला चार चिकन आणि एक वेज मोमोचा हिशोब समजवायच्या आधी तोच म्हणाला,
"साब उस दिन आपने शेट को ये सब क्यू बोला? चिल्लाया वो मेरे उपर. हात भी उठाया. भाई बीच मे नही आता तो वापस गाव जाना पडता था .."
क्षणभर मला काय बोलावे हे सुचेनासे झाले. त्याला सॉरी बोलायलाही जीभ धजावली नाही. कारण मी जे केले त्याला प्रामाणिकपणा की बावळटपणा म्हणावे हे माझे मलाच समजेनासे झालेले.
छान आहे गोष्टं.
छान आहे गोष्टं.
नेहमीप्रमाणे मस्त.
नेहमीप्रमाणे मस्त.
मस्तं लिहिलंय.
मस्तं लिहिलंय.
चांगलं लिहिलयस!!
चांगलं लिहिलयस!!
छान लिहिलय!
छान लिहिलय!
मस्त.. मराठी भाषेला एक
मस्त..
मराठी भाषेला एक उत्कृष्ट खुसखुशीत लेखकु मिळाला. मायमराठीची कूस धन्य झाली.
मनापासून लिहिलंयस अगदी!! खरंय
मनापासून लिहिलंयस अगदी!!
खरंय कठीणै निर्णय.. हाऊ अबाऊट प्रामाणिक बावळटपणा...
वा , मस्त लिहिलय. शेवट हा
वा , मस्त लिहिलय. शेवट हा होईल असे खरंच वाटलं नाही.
भुक लागली. मला सॉल्लिड
भुक लागली. मला सॉल्लिड आवडतात.
मला वाटतं प्रत्येकाकडे काही
मला वाटतं प्रत्येकाकडे काही गोष्ट असतेच सांगण्यासाठी...
प्रत्येकाला इतक्या सुंदर पध्दतीने मांडता येईलच असे नाही.
(२०१५ हे मराठी सिनेमासाठी "अंकुश चॉधरी वर्ष" म्हणून जाहिर करावं.. असं निलेश साबळे म्हणालेत.
२०१५ हे मायबोली साठी "ऋन्मेऽऽष वर्ष" म्हणून जाहिर करावं काय?)
ऋन्मेष, कित्ती छान लिहीलयसं
ऋन्मेष, कित्ती छान लिहीलयसं रे. साधासा प्रसंग पण किती सुंदर फुलवलायस !!!
छान ! साधेपणाने आणि ओघवतं
छान ! साधेपणाने आणि ओघवतं लिहीलंय.
शेवट वाचून चुटपुट लागली मनाला.
असं होतं खरं बरेचदा, नकळतपणे आपल्या वागण्याचा / बोलण्याचा आपली इच्छाही नसताना कुणालातरी त्रास होतो.
२०१५ हे मराठी सिनेमासाठी
२०१५ हे मराठी सिनेमासाठी "अंकुश चॉधरी वर्ष" म्हणून जाहिर करावं.. असं निलेश साबळे म्हणालेत
निलेश साबळे हा पोरगा क्युट आहे. मला आवडतो.
छान लिहिलं आहेस. असं होतं खरं
छान लिहिलं आहेस.
असं होतं खरं बरेचदा, नकळतपणे आपल्या वागण्याचा / बोलण्याचा आपली इच्छाही नसताना कुणालातरी त्रास होतो.>>> +१
साधना, गल्ली चुकलीस काय?
साधना, गल्ली चुकलीस काय?
मोमो + १ ऊप्स ममो + १
मोमो + १
ऊप्स ममो + १
मनीमोहोर
साधासा प्रसंग पण किती सुंदर
साधासा प्रसंग पण किती सुंदर फुलवलायस !!!+ १
असं होतं खरं बरेचदा, नकळतपणे
असं होतं खरं बरेचदा, नकळतपणे आपल्या वागण्याचा / बोलण्याचा आपली इच्छाही नसताना कुणालातरी त्रास होतो.>>> +१
हर्पेन, सही !!!
हर्पेन, सही !!!
ऋन्मेष, कधी कधी खुप छान
ऋन्मेष, कधी कधी खुप छान लिहितोस. हे एकदम मस्तंच लिहिलंयस............ अश्याच चांगल्या लिखाणाची तुझ्याकडून अपेक्षा आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छानच लिहीलेय. शेवटचा परिच्छेद
छानच लिहीलेय.
शेवटचा परिच्छेद वाचे पर्यंत प्रामाणीक लिहिलय अशी प्रतिक्रिया लिहीणार होते पण शेवटचे वाचून त्या मुलाबद्दल अरेरे आणि तुमच्या लिखाणाला लय भारी.
ऋन्मेष,खूप छान लिहलयस तुझ अस
ऋन्मेष,खूप छान लिहलयस
तुझ अस हे साध लिखाण खूप आवडते .
निलेश साबळे हा पोरगा क्युट
निलेश साबळे हा पोरगा क्युट आहे. >>> निलेश साबळे या धाग्यावर येईल याची कल्पना नसल्याने मला पटकन वाटली की कोणीतरी मला क्यूट पोरगा म्हणत आहे.
हाऊ अबाऊट प्रामाणिक बावळटपणा >> हा हा, हो. हा शब्द चालेल, फक्त याचा त्रास आपल्यामुळे तिर्हाईतांना होऊ नये. तिर्हाईतांना मुद्दाम म्हटले, कारण जवळच्यांना नेहमी हा त्रास होतो, आणि ते तो सहन करायची तयारी ठेऊन आपल्याबरोबर असतात.
ऋन्मेष बोअर झालेय रे,
ऋन्मेष बोअर झालेय रे, चवीबद्दल मोमोज मधील सारणाबद्दल लिहायला हवे होतेस.
छान लिहिलंय. >> असं होतं खरं
छान लिहिलंय.
>> असं होतं खरं बरेचदा, नकळतपणे आपल्या वागण्याचा / बोलण्याचा आपली इच्छाही नसताना कुणालातरी त्रास होतो.+१
दिल्लीच्या कोणत्याही
दिल्लीच्या कोणत्याही कोपर्यात जा कुठे तरी आपले ते मोमोज शिजवायचे अॅल्युमिनिअमचे भांडे स्टोव्ह बरोबरीने
वेगळ्या वेगळ्या चवीच्या चटण्या आणी सॉस असलेल्या स्क्वीज बॉटल्स.
दोन प्रकारचे मोमोज ठेवतात जनरली, व्हेज आणी नॉनव्हेज. चवीत आणी किंमतीत पण चांगलाच फरक.
साधारण २० रु. व्हेजचे ८ मोमोज तेव्हढेच नॉन व्हेजचे ३० रु.
काही ठिकाणी तर व्हेजमोमोज मधे कोबी-गाजर ऐवजी नुसत्या हिरव्या मिरच्या कुटुन भरल्यात की काय अस वाटतं.
सरोजिनी नगर मार्केट्च्या सगळ्यात उजव्या कोपर्यात , इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या अपोझिट एक टिपीकल उत्तरपुर्वीय विक्रेता असतो, छान बनवतो, चवही मस्त, पुन्हा अजुन एक प्लेट घ्यावी या विचाराने तिथेच रेंगाळत असतो.
छान लिहिलय. ऋन्मेष.. (अबाऊट
छान लिहिलय.
ऋन्मेष.. (अबाऊट प्रामाणिक बावळटपणा >> हा हा, हो. हा शब्द चालेल, फक्त याचा त्रास आपल्यामुळे तिर्हाईतांना होऊ नये. तिर्हाईतांना मुद्दाम म्हटले, कारण जवळच्यांना नेहमी हा त्रास होतो, आणि ते तो सहन करायची तयारी ठेऊन आपल्याबरोबर असतात.) हे आवडलं.
छान लिहिलय, शेवटची कलाटणीपण
छान लिहिलय, शेवटची कलाटणीपण छान.
मस्त!!
मस्त!!
Pages