काल आमचा मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. महत्वाच्या विषयावर गाडी आलीच्......जवळपास सर्वच जणींची दुखरी नस्..वाढलेले वजन्...ओघानेच सध्याची जिम्स व त्यांचे बरे वाईट अनुभव कथनही झाले. बर्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. जाहिराती पाहून आपण जिम लावतो व नंतर जर काही कारणाने वजन उतरले नाही तर बरेचदा स्वतःला दोषी ठरवतो व "झाकली मुठ सव्वा लाखाची"..झाकलेलीच रहाते. बर्याच गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. हा धागा तुम्हा-आम्हाला आलेल्या जिम्स्च्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याकरता.....
सध्या बरेच नामांकीत जिमवाले कॉर्पोरेट मेंबरशीप्स देतात. आठ हजारांमधे वार्षिक सभासदत्व मिळते त्यामुळे बरेच जण सभासदत्व घेतातही. पण माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीने सांगितलेला अनुभव म्हणजे सकाळी ६ ला जेव्हा जिम उघडते तेव्हा बाहेर रांग असते सभासदांची. मग पळापळ करून मशिन्स पकडावी लागतात. आणि पहिले मशिन संपवून दुसर्या मशिनवर जाताना परत रांगेतून जावे लागते. अगदी व्यायामाच्या शेवटी शवासन करायला जमिनीवर झोपण्यासाठीचे मॅट पण रांगेतून मिळते व आडवे होण्याकरता जागासुद्धा...अखेर ह्या सगळ्याचा परिणाम जिमला न जाण्यात होतो. ग्राहकाला वाटते की आपण जात नाहीये म्हणून ते चुप व ते आले नाहीत तर आम्ही काय करणार असे सांगून जिमवाले नवीन ग्राहकांना ओढायला व नवीन जाहीराती करायला मोकळे. वास्तविक त्यांनी घेतलेल्या मेंबरशीप्स व सभासदांच्या सोयीच्या वेळा त्यांना माहीत असतात. सकाळी सहा ते नउ पर्यंत आपल्याकडे किती जण व्यवस्थितपणे व्यायाम करू शकतात ही माहीती त्यांच्याकडे असते पण ती लपवली जाते. जर का सभासदसंख्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यांनी त्यावर उपाय शोधायला हवा किंवा सभासदांना ही वेळ उपलब्ध नाही असे तरी कळवायला हवे.
शिवाजी मंदिरमधे हरिभाऊ सानेंनी चालवलेली महिलांची व्यायामशाळा, किंवा ट्रेनींग कॉलेजमधे योगासने शिकवणारे आगशे गुरुजी ही चांगली उदाहरणेही आहेतच....
तू कंपेटिटिवली सायकलिंग करतोस
तू कंपेटिटिवली सायकलिंग करतोस हे माहित असून सुद्धा की तेव्हा सुरवात करत होतास? अर्थात सुर्वात करत असला तरी त्यांना सांगितलच असेल ना की मला सिरियस ट्रेनिंग करायचं आहे म्हणून?
फॅमिली डॉक्टर म्हणे हे खूप
फॅमिली डॉक्टर म्हणे हे खूप जास्त. सिरियस ट्रेनिंग करायचे असे सांगीतल्यावरच त्यांनी स्पोर्ट्स डॉक्टरकडे जा असा सल्ला दिला. पण ते स्पोर्ट्स डॉक्टर ही डेडीकेटेड स्पोर्ट्स डॉक्टर नाहीत. त्यांनी मग अजून एकाकडे जायला सांगीतले. संचेती मध्ये स्पोर्ट्स सेक्शन आहे. तिथे मात्र एकाने सायकलवरच रिसर्च केला होता. त्याच्याकडे मी "perineum nerve damage" वर सल्ला घ्यायला ( व्हायच्या आधी - कारण सिरियस सायकलिंग) गेलो होतो. निदान त्याने भरपूर माहिती सांगीतली. बाकीचे तिघे असेच होते.
त्यांना खायचे विचारल्यावर फार काही सांगता आले नाही.
मग मी नेट वर एन्डुरंस गेम्स / सायकलींग आणि न्युट्रिशनचे खूप सारे रिसर्च पेपर वाचले ज्यातून काय आणि कसे खायचे हे शिकलो.
अजून स्पोर्ट्स डॉक्टर देशात खूप प्रचलित नाहीत बहुदा. (म्हणजे माझ्या शोधात जास्त मिळाले नाहीत.) पण हळू हळू हे चित्र नक्कीच बदलेले. कारण आताशा खूप डिमांड आहे.
हम ओके. म्हणजे मी घेत नाही ते
हम ओके. म्हणजे मी घेत नाही ते योग्यच. मध्यंतरी विचार चालला होता माझा व्हे प्रोटिन घ्यायचा.
आपल्याकडे तशी न्युट्रिशनिस्ट लोकांची दुर्दशाच आहे.
बहुतेक कुठल्याशा इस्पितळात, हृदयतोग तज्ञ अथवा डायबेटिशियन यांच्या हाता खाली त्या रुग्णांना आहाराचे तक्ते देताना आढळतात. अथवा जिम मध्ये पावडर्स विकताना.
लोक सुद्धा वरिल काही झाल्याशिवाय अथवा डॉक्टरांनी आता न्युट्रिशियनला भेटा म्हटल्याशिवाय त्यांना विचारत नाहीत.
छान चर्चा चालली आहे. उपयुक्त
छान चर्चा चालली आहे.
उपयुक्त माहिती मिळत आहे.
केदार, डॉक्टरांबद्दलचे मत बरोबर वाटते. मी सायकलिंग करतोय म्हणल्यावर लिंबि मला घेऊन फ्यामिली डॉक्टरकडे गेली... डॉक्टरांचे मत असेच की रोजचे पाच/दहा किमी ठीक आहे पण १००/२०० किमी म्हणजे "या वयात(?)" अति होतय.
त्यांना ते पटले होते, पण त्यावर गोलमाल उत्तर देणे भाग होते कारण लिंबी समोर होती, व दोघांपैकी कुणालाही न दुखवायची कसरत त्यांना पार पाडायची होती. गम्मत असते सगळी. शेवटी डॉक्टरांनी लिम्बीला असे सांगितले की तो करतोय ना, करु दे की त्याला, त्याचे तो अंग सांभाळूनच करील इतका विश्वास "या वयात" त्याच्यावर ठेवायलाच हवा, नै का?
मग मी लिम्बी समोरच डॉक्टरना काही उलट सुलट प्रश्न विचारित रोजच्या जीवनातिल कृतींची उदाहरणे दिली, अगदी ब्रह्मचर्य पालनाच्या आवश्यकते पर्यंतची !
(डॉक्टर माझे मित्रच आहेत ३० वर्षांपासूनचे त्यामुळे त्यांचेबरोबर बिनधास्त चर्चा करता येते)
तुमच्या वरच्या चर्चेमुळे मला " फूड फिडींग " चे महत्व कळलय, व मागिल दौर्यात काय चुका झाल्या ते देखिल कळतय.
माझ्याकडे डंबेल्स/ बार-थाळ्या
माझ्याकडे डंबेल्स/ बार-थाळ्या असे आहे गेली वीस वर्षे, मी नै फारसे वापरित पण आमच्या इथली मुले वापरतात, त्यांचे बघुन मलाही मधे मधेच हुक्की येते अन करु पाहतो डंबेल्सचे हात.
तर झाले काय एकदा की दंडाचा व्यायाम करताना, ठरविलेल्या संख्येत हातवारे करताना शेवटचे दोनचार वेळा हात वर घेताना मसल्सवर जाम ताण पडला पण् तसेच दातओठ खाऊन श्वास रोखुन ती संख्या पूर्ण केली. तेव्हा विशेष नाही वाटले, डावा दंड थोडा दुखल्यासारखे झाले.
नंतर मात्र पुढचा महिनाभर डाव्या दंडाचे दुखणे मला पुरवले. बरे तर बरे, त्याच वेळेस (२० ऑगस्ट) सायकलने जरा मोठी टूरही केलेली. त्यामुले एकीकडे दंड दुखतोय, दुसरीकडे सायकलिंग हॅन्डल ग्रीपमुळे करंगळी, पंजा बधिर होतात्/मुंग्या येतात वगैरे बाबी, दंड दुखतो म्हणजे नुस्ता एक कोपरा नै दुखत, तो छाती कडून खान्द्यातुन दंडातुन कोपरापर्यंत व त्याचे पुढपर्यंत कळा मारत दुखतोय... तो ही डावा दंड, तशातच दमही लागलेला, सगळी हार्टअॅटॅकची पूर्वलक्षणे.
मग मी ही थोडा घाबरलो होतो, पण मग आठव आठव आठवुन पाहिल्यावर वजनाच्या वेळेसचा स्ट्रेस, सायकलिंग, अन अजुन एके ठिकाणी वर हात उंचावुन फांदीला दोर बांधताना बसलेला ताण असे सगळे लक्षात आल्यावर मनातील भिती थोडी कमी झाली.
सांगायचा मुद्दा असा की जिम मधे गेल्यावरही, आपले वय, मूळची प्रकृती, सहनशक्ति इत्यादी अनेक बाबी विचारात घेऊनच किती आकड्यात व्यायाम करायचा हे ठरवायला लागते. कुठे थांबायचे ते आधीच कळायलाच लागते. बर्याचदा ट्रेनरच्या "चिथावणीमुळे" वा अन्य लोक करताना पाहून त्या इर्ष्येमुळे माणुस तेव्हा तर ते करुन बसतो, स्नायुच्या थोड्याफार दुखण्याकडे दुर्लक्श करतो, पण स्नायु जास्तच दुखावला हे बर्याच उशीरा कळते. हे धोकादायकही ठरु शकते. माझ्या अनुभवानुसार जिम मधील ट्रेनर "वजने घेऊन कसे हातवारे करायचे" हे शिकविण्यात एक्स्पर्ट असले तरी "कोणती व्यक्ती काय कुवतीची" आहे हे ओळखण्यात तरबेज असतातच असे नाही. अशा प्रकारे कुवत ओळखण्यातही तरबेज असलेला ट्रेनर मिळणे महद्भाग्याचे होय. असो.
बर्याचदा ट्रेनरच्या
बर्याचदा ट्रेनरच्या "चिथावणीमुळे" वा अन्य लोक करताना पाहून त्या इर्ष्येमुळे माणुस तेव्हा तर ते करुन बसतो, स्नायुच्या थोड्याफार दुखण्याकडे दुर्लक्श करतो, पण स्नायु जास्तच दुखावला हे बर्याच उशीरा कळते.
माझे असे अनेक वेळा झाले आहे. सतत प्रवास असल्याने व्यायामात खंड पडतो आणि तो खंड कधी कधी महिने चालतो.
मग परत सुरवात केली की पहिल्याच दिवशी जास्तच व्यायाम केला आणि दुस~या दिवशी सकाळी उठल्यावर लक्षात आलं की स्नायु अखडले आहेत असे आता पर्यंत ४ - ५ वेळा झालंय. मग काही दिवस नीट चालताही आले नाही.
पण त्या स्नायु दुखण्यातही एक प्रकारची मजा असते हे खरं.
Pages