यावेळी गणेशोत्सवाच्या वेळी जगाच्या अशा कोपऱ्यात होतो जिथे सार्वजनिक गणपतीची स्थापना तर झाली पण अगदी आरतीचा आवाजदेखील त्या खोलीच्या बाहेर पोचत नव्हता. लाउड स्पिकर, गाणी वगैरे कसलाच गोंधळ नव्हता.
ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी "शांताबाई" चे २-३ विनोद व्हाटस-अप वर आले आणि मला ओ की ठो काहीच संदर्भ लागला नाही. नंतर अचानक माझी ट्यूब पेटली आणि मी यु-ट्यूब वर ते गाणं ऐकलं. मजा आली ऐकायला. मनात विचार आला की या गाण्यावर विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचायला किती मजा आली असेल.
मुंबईत चुनाभट्टीच्या सार्वजनिक गणपती आणि तिथल्या गाण्यांवर वाढलेल्या मला माझं बालपण आठवलं. आमच्या घरी खिडकी उघडली की एक गाणं ऐकायला यायचं आणि दरवाजा उघडला की दुसरंच गाणं भसकन आत घुसायचं. बाकीच्या मुंबईवरचा मराठीपणाचा ठसा पुसट होत गेला तरी चुनाभट्टी मधली मूळ आगरी संस्कृती अगदी आत्ता आत्ता पर्यंत टिकून होती. हळद, लग्न, बारसं, सत्यनारायणाची पूजा, गणपती, नवरात्री, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा असंख्य निमित्ताने लाउड स्पिकर लावला जायचा. "मेंदीच्या पानावर" सिरीज तर असायचीच पण त्याचबरोबर हटकून असायची टिपिकल आगरी-कोळी गाणी. हुच्चभ्रू लोकांनी कितीही नाकं मुरडली तरी विशिष्ट आवाजात गायली जाणारी गाणी खूप लोकप्रिय व्हायची.
तर या शांताबाई च्या निमित्ताने अशी काही धमाल, धतिंग, धुमाकूळ , धिंगाणा अशी "ध" गाणी आठवायचा प्रयत्न केला पण पोपट आणि नागिन सोडली तर आठवणारी गाणी फारशी जुनी नव्हती. तुम्हाला जर काही आठवली तर सांगा. मी इथे मूळ लेखात यादी वाढवत जाईन.
१) जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलाया
(https://www.youtube.com/watch?v=sg3EB4XtXOw)
२) बिलनशी नागीन निगाली, नागोबा डूलाया लागला
(रिमिक्स : https://www.youtube.com/watch?v=dioSgASlRCI)
३) रेतीवाला नवरा पाहिजे
(https://www.youtube.com/watch?v=4mF6Wp20lvA)
४) धनगर वाड्यात घुसला
(https://www.youtube.com/watch?v=Q1haEG_zf-0)
५) नवरी नटली सुपारी फुटली
(https://www.youtube.com/watch?v=ROLKFIAqM9M)
६) बग बग अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय
(https://www.youtube.com/watch?v=iDoKEov5DAM)
७) नाखवा बोटीने फिरवाल का
(https://www.youtube.com/watch?v=87ygaAYCWqY)
८) बाबा लगिन, ढिंच्याक ढिच्याक
(https://www.youtube.com/watch?v=ig7vvhfgLKY)
९) ये ग ये, ये मैना... पिंजरा बनाया सोनेका
(https://www.youtube.com/watch?v=0FBzaGdtzCs)
१०) ही पोरी साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
(https://www.youtube.com/watch?v=pYV19ENqDgs)
११) वाट माजी बगतोय रिक्षावाला
(https://www.youtube.com/watch?v=PE1crsM2WkY)
१२) पोरी जरा जपून दांडा धर
(https://www.youtube.com/watch?v=VYq4GRO2A5Y)
१३) कल्लूळाचे पानी कशाला ढवळीलं... नागाच्या पिल्याला तू का ग खवळीलं
(https://www.youtube.com/watch?v=xBHJZrb1ito)
१४) शांताबाई
(https://www.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM)
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. मी मला माहित असलेली निवडक गाणी वरच्या यादीत टाकली आहेत. अजून इथे असलीच पाहिजेत अशी गाणी असतील तर नक्की सांगा.
धागा वाहता असल्याने खूप चांगल्या प्रतिक्रिया वाहून जाताहेत. admin च्या विपु मध्ये विनंती केलीय बांध घालायला. बघू कधी त्यांना वेळ मिळतोय.
आनंद शिंदे मिलिंद शिंदे शोधा
आनंद शिंदे मिलिंद शिंदे शोधा यूटयूब वर
सगळी 'ध'सनीय गाणी बदबदा गळतील...
डोकं फिरलंया बयेचं
तुझा झगा ग वार्यावर उडतो
मी बाबुराव बोलतोय
मी सखूबाई बोलतीय
बाबा लगीन
हुंडा नको मामा फक्त पोरगी दया
पप्पी दे पप्पी दे पारुला
जव्हा या आंटीची घंटी मी वाजवली
बघ बघ अगं सखे कसं बुगु बुगु वाजतय
चला जेजुरीला जाऊ
तुझा गं पापलेट बारीक हाय हात लावताच ब्वॉट
काय राव तुम्ही धोतराच्या सोग्यात भरपूर
भारुनि लिंबू मला मारीला
सध्या एवढीच.....
गणपती आणि
परण्या, वराती, धेडवा नाचू नाचू म्हातारा झालेला शिंदे बंधू फॅन
काय राव तुम्ही धोतराच्या
काय राव तुम्ही धोतराच्या सोग्यात भरपूर
>>
काय राव तुम्ही धोतराच्या सौद्यात भरपूर कमावलं...
असं आहे ते . पुढं 'पण लुगड्यात गमावलं ' असं आहे बहुधा..
शांताबाई गाणं ऐकले आज आणि
शांताबाई गाणं ऐकले आज आणि सिंगरला पण पाहिला टि व्ही वर.
विश्वासच बसत नव्हता याने गाणं गायले असेल म्हणुन.
बाईच्या नादानं विसरलात रॉहू
बाईच्या नादानं विसरलात रॉहू
पहिल्या दोन शब्दांभोवती कोट्स टाकून वाचा वरचे वाक्य
हे शांताबाई गाणं
हे शांताबाई गाणं अशोककुमारच्या रेलगाडी (आशिर्वाद) गाण्याच्या टेंपोच्या जवळ्पास जाणारं आहे...
Lyrics dya na plz Shantabai
Lyrics dya na plz Shantabai che
ho... jevha pahila hila, ye
ho...
jevha pahila hila, ye dil hilla hilla.
sara jilla hilla hua re jaljalaa
gharachya samori najarechi shala hi roj roj bharawachi hay
laila ni majnu chi sad wali lovestory aplyala badlaychi hay
hay hay
hi surekha aapalyala pataleli hay
hay
are khidaki madhun kashi lajun hasaleli hay
hay
are hasli hasli digya fulltoo fasleli haay,
hay
hasleli hay ha, fasleli hay ha
digyala patleli hahay
खुप गाणी वाहून गेली. आता या
खुप गाणी वाहून गेली.
आता या गांण्यांची यादी मी
काय ऐकताय येथे टाकून ठेवतो आहे.
http://www.maayboli.com/node/55861
>>>या धाग्याला बांध घाला वेमा
>>>या धाग्याला बांध घाला वेमा पिलीज्ज्ज्ज्ज...<<
कप्पाळ..! निम्मी गाणी वाहून गेलीत..
Shantabai special
Shantabai special
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
रूपाची दिसती छान,
लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमाण मारीती चकरा तुझा ग नखरा,
इकडुन तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
तेरा ये जलवा,
माहीमचा हलवा,
जिवाचा कालवा,
मनाला भूलवा,
मामाला बाेलवा,
"कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा"
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
अटक मटक चवळी चटक,
लटक मटक वा-यानं उडती केस झटक,
"लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक"
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
गिरकी घेतीया गरा गरा,
पदर उडताेय भरा भरा,
हिराेनी दिसती जरा जरा,
तरर रारी रराररा,
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
खटापटा हीचा नटापटा,
आहाे पटापटा कसा झटापटा,
जीव लटापटा आहाे लटापटा,
हीचा नटापटा बघा पटापटा,
"कसा-नटापटा, कसा लटापटा,कसा-नटापटा, कसा लटापटा"
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
ह्या गाण्याने संस्कृती बुडाली
ह्या गाण्याने संस्कृती बुडाली असे काही महिलांनी टीव्ही वर संगितले बुवा...
स्त्रियाना अपमानास्पद गाणे आहे असाही सूर आहे. काही सभ्य महिला असेही म्हणाल्या की मुन्नी , शीला या परम्परेतले हे गाणे आहे . खखोदेजा
बाफचे शिर्षक वाचुन वाटले
बाफचे शिर्षक वाचुन वाटले "शांता शेळके" यांच्याबद्दल काही आहे का..पण हे काहीतरी भलतेच निघाले
धाग्याला बांध घातला गेला आहे
धाग्याला बांध घातला गेला आहे की नाही हे कसे कळणार?
@ me S M, thanks for d
@ me S M, thanks for d lyrics. Nidan gaane kase aahe te swata purte tari tharavata yeil ata.....
गाण्यात संस्कृती बुडेल असे
गाण्यात संस्कृती बुडेल असे काही वाटत नाही.
शांताबाई गाण्याचा इतिहास इथे
शांताबाई गाण्याचा इतिहास इथे वाचा.....
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/shantabai/articleshow/4...
आत्ता हे गीत "शांताबाई"
आत्ता हे गीत "शांताबाई" ऐकले.
अतिशय सपक आहे. गीत, संगीत, इ. च्या दर्जाबाबत फारच आनंदी आनंद आहे.
लोकांची गीते बनविण्याची आणि ती आवडण्याची क्षमता एवढी खालावली असेल असे वाटले नव्हते.
यापेक्षा शिंदे कंपनीची कितीतरी गीते लाख पटीने चांगली आहेत (काही वाह्यात असली तरी)
कमी वाद्य सामग्री
कमी वाद्य सामग्री वापरल्यामुळे सपक बनले असावे.
मराठी गाण्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहुन बरे वाटले.
***
***
सपक म्हणजे?
सपक म्हणजे?
सपक म्हणजे बेचव.
सपक म्हणजे बेचव.
शांताबाई नन्तर आता 'शांताराम
शांताबाई नन्तर आता 'शांताराम 'हे त्याचे विडम्बन आले आहे. शंताराम नावाच्या बेवड्याची त्यात स्टोरी हय. तू नळीवर सर्च द्यावा.