चेहरे पुस्तकावरील काही पाने विचार प्रवृत्त करतात. माझ्या नजरेस पडलेले त्यातलेच एक पान.
'वापरा आणि टाकून द्या' च्या काळात हे जगावेगळे / भलते सलते भासू शकेल. तसेच आपल्या वाड-वडीलांना आर्थिक परिस्थितीमुळे जे करावे लागले ते आता पैसे असताना आपण का करावे असा विचार पण मनात नक्की येईल परंतु आपल्या पुढच्या पिढ्यांकरता आपण किती / कोणती नैसर्गिक संसाधने सोडून जाणार आहोत ह्याचा विचार केला असता ही यादी सतत आपल्या नजरे समोर खरेतर मनात / डोक्यात असायला हवी असे वाटते.
मला माहीत आहे की आपण प्रत्येक जण जाणता-अजाणता का होईना, यातल्या अनेक गोष्टी करत असतो.
यातले काय काय केले अथवा करता येऊ शकेल किंवा केले आहे हे इथे मांडावे. जेणे करून इतरांना त्या कल्पनेचा वापर करता येईल.
एकमेकांच्या कल्पनांचे आदान प्रदान करूया आणि नैसर्गिक साधन संपत्तींचा वापर कमी करूया, गैरवापर टाळूया.
सुरूवात म्हणून दिवाळी निमित्त खरेदी-यादी तयार झाली असताना / करताना यातले काही करता येईल का याचा नक्की विचार करा.
आपण काय केले हे लिहीताना ते कोणत्या क्रमांका खाली मोडेल त्याचा संदर्भ द्या. कृपया धन्यवाद. त्याही प्रकारे एक संदर्भ म्ह्णून ही यादी इथे तयार करता येईल.
अशी जीवन पद्धती जाणीवपुर्वक
अशी जीवन पद्धती जाणीवपुर्वक अवलंबणार्या सर्वांचे अभिनंदन.
मलाही बरीच वर्षे झालीत. पण ही अशी मुद्द्यांमधे मांडलेली आज अशी समोर आली आणि इथे शेअर करावीशी वाटली.
प्रघा, इब्लिस आणि फारेण्ड इथे मुद्दा अर्थव्यवस्थेचा नाहीये. एखाद्या किंवा अनेक देशांच्याही पलीकडे जाऊन
समस्त मानवजातीच्या येणार्या पिढ्यांना आपण नैसर्गिक साधन संपत्ती कशा प्रकारे हस्तांतरीत करणार आहोत हा तो मुद्दा आहे.
वर दिलेल्या काही उदाहरणांमधे कोकाकोला पेप्सी सारखी कार्बोनेटेड / एअरेटेड शीतपेये न पिण्याबद्दल लिहिले आहे. त्यांचा पाण्यासारख्या नैसर्गिक साधनस्रोताच्या जमीनीतल्या पातळीशी संबंध येतोच. त्याच कारणांमुंळे केरळ मधे कोकाकोलाच्या प्रकल्पाला विरोध झाला होता.
६. आम्ही देखिल कोकाकोला पेप्सी सारखी कार्बोनेटेड / एअरेटेड शीतपेये तसेच बॉटल्ड पाणी टाळतोच.
अवांतर - मतीमंद मुलांची शाळा
अवांतर - मतीमंद मुलांची शाळा माझ्या माहीतीत जी एक अशी शाळा आहे त्यात वयाने मोठी असलेली मुले / बाप्ये / बाया जातात. त्या खरेतर कार्यशाळाच असतात. त्यांना ठराविक मर्यादेपुढे शिक्षण घेता येणे शक्य नसते आणि अशा वेळी आपल्या कलागुणांचा / कामाचा उपयोग करून घेऊन काही प्रमाणात पायावर उभे रहाता येते अशी जाणीव अत्यंत सुखकर असते.
माझ्या माहीतीतल्या अशा शाळेमधे घरघंटी घेतली आहे आणि ते तयार पीठे / भाजण्या हे देखिल तयार करतात. सगळ्यांनाच कला साध्य होते असे नाही त्यामुळे भेटकार्डे ई. तयार करू न शकणारी मुले / बाप्ये / बाया हे काम मजेत करतात.
भाषांतरीत शब्दांकरता धन्यवाद.
भाषांतरीत शब्दांकरता धन्यवाद. उद्या हे शब्द वरती अपडेट करतो.
मार्कर व पेल्याच्या
मार्कर व पेल्याच्या आयडियेसाटठी धन्यवाद.
मार्कर व पेल्याच्या
मार्कर व पेल्याच्या आयडियेसाटठी धन्यवाद.
जवलपास ह्यातल्या बर्याच
जवलपास ह्यातल्या बर्याच गोष्टी करतो. वॅाशिंग मशीन १५ वर्षे वापरल्यानंतर नविन घेतले नाही पाणी व वीजेची बचत व व्यायाम असे फायदे मिलतात. स्वमग्न /मतिमंदमुलांनी बनवलेल्या दिवे, पणत्या घेतल्या . मार्कर व पेल्याची आयडीया आवडली.
आमच्या बंगलोरमध्ये वॉटर
आमच्या बंगलोरमध्ये वॉटर माफीयांचा सुळसुळाट आहे. कोणी पाच कोटी+ चा व्हिला घेतलात तरीही महानगरपालिकेचे प्यायचे पाणी मिळत नाही. घरांत पाण्याची BWSSBची पाइपलाइनच नाही. परंतु, घर विकत घेताना मात्र वीजेबरोबर पाणी कनेक्षनचे पैसे घेतात. इथे अक्षरशः नजर जाईल तिथे तळी आहेत पण प्यायला पाणी नाही. कुठूनतरी उपसलेले आणि कॉम्प्लेक्सच्या water softening plant मधे drinkable केलेले नळाचे पाणी पिण्याची चैन आम्हांला परवडत नाही, तब्येतीला आणि म्हणून खिशाला. आमचा दुधासारखा बॉटल्ड वॉटरचा रतीब आहे. चुकून घरांबाहेर (उदा. IRCTC's poorly packaged drinking water) योग्यरित्या पॅक केलेले बॉटल्ड वॉटर मिळाले नाही आणि सोबत घेतलेले पाणी संपले असेल तर सॉफ्ट्ड्रिंक्ला पर्याय नाही.
राजसी, काय करू शकाल, काय करत
राजसी, काय करू शकाल, काय करत आहात हेही वाचायला आवडेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिसायकल, अपसायकल हे आपण करत
रिसायकल, अपसायकल हे आपण करत आलोच आहोत काही बाबतीत बर्याच पिढ्या पण कोकणस्थी कंजूषी म्हणून त्याची चेष्टा होते.
जुने, विटलेले कपडे फाडून त्यातून विविध प्रकारची फडकी, पायपुसणी, किचन एप्रन, लहान मूल असल्यास दुपटी-लंगोट वगैरे, गोधड्या हे सर्व काही करण्याची पद्धत आपल्याकडे होते पण हल्ली ते कमीपणाचे मानले जाते. कामवाल्या बायकाही जुना कॉटनचा कुर्ता दिला फरशी पुसायला तर नाक मुरडतात आणि बाजारातून नवीन आणा म्हणून सांगतात. अर्थातच मी ते ऐकत नाही.
मला किचनसाठी, घरासाठी आणि माझ्या कामासाठी अशी मिळून भरपूर फडकी लागतात आणि ती सगळी माझ्या वा नवर्याच्या जुन्या कपड्यांच्यातून बनवलेली असतात. अनेकदा या कपड्यांच्यातले काठ, योक वा तत्सम उत्तम असलेल्या गोष्टी मी वेगळ्या काढून जपून ठेवते. आणि बाकीच्या कपड्याचे फडके करते. जपून ठेवलेल्या वस्तू मग माझ्या रिसायकल क्राफ्टच्या डब्यात जातात.
हॉटेल्समधे गेल्यावर तिथे खाताना वगैरे गरज पडल्यासच्या वेळा सोडल्या तर रोजच्या जगण्यात टिश्यू पेपर्स वापरत नाही.
बाहेर फिरतानाही रूमाल किंवा छोटा पंचा बरोबर असतो. टिपे नाही.
मला वाटतं हे खूप जण करत असतात आणि करावे.
हल्ली क्विकर, फ्रिसायकल किंवा तत्सम सोयींमुळे आपल्याला न उपयोगाची पण इतर कुणाला उपयोगी पडू शकेल अशी वस्तू काढणे वा घेणे सोपे झालेय. सेकण्डहॅण्ड वस्तूंबद्दलचे प्रतिष्ठेचे मुद्देही त्यामुळे हळूहळू मोडीत निघतील.
विविध उपकरणे न वापरता व्यायाम याबद्दल म्हणायचे तर माफ करा पण रोज करायच्या कामाने होणार्या व्यायामापेक्षा शरीराबरोबरच मनालाही फ्रेश वाटेल असा, मोकळ्या हवेवरचा व्यायाम करणे केव्हाही जास्त चांगले असे मला माझ्यापुरते वाटते. व्यायाम हा मी माझ्यासाठी(कुणीही व्यक्ती स्वतःसाठी) करत असते आणि घरातले काम हे मी माझ्यासकट घरातल्या इतर सभासदांसाठी करत असते.. फरक आहे.
असो...
गेले ३ वर्षे कार पुलिंग
गेले ३ वर्षे कार पुलिंग (शेअर) सुरु होइल याची वाट बघतोय. कित्येकदा एका कार मध्ये १-२ लोक असतात आणि प्रवासाचे सुरवातीचे आणि शेवटचे स्थान सेम असते. कित्येकदा यात इनिशिएशन घ्यावे वाटते पण रिस्क फॅक्टर मोठा वाटतो.
एखादी वस्तु विकत घेताना त्याच्याशिवय अडलेय असे झाल्याशिवाय घेत नाही.
कार घेताना कधीच नविन घेइन असे वाटत नाही.
१-२ वर्षे जुनी गाडी खुपच पैसे वाचवते.
मार्कर आणि पेला हा प्रकार खुप हीट होता आणि तु.क. चा कधी संबंध आला नव्हता. ही ४-५ वर्षापुर्वीचे गोष्ट. एका भारतीयानेच त्याच्या घरी पॉटलक्;आ हा प्रकार सुरु केला आणि सगळ्यांनी ती कल्प्ना उचलुन धरली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाता जाता, ज्या पधतीने नैसर्गिक साधनांची, उदा, पाणी उधळपटी होतेय अशी ओरड होते, त्यात बर्याच वेळा तथ्य नसते. पण प्यायच्या क्वालिटीचे पाणी , नॉन पिनेबल होत असेल तर नक्किच.
कोकणस्थी कंजुषी म्हणजे खरेतर
कोकणस्थी कंजुषी म्हणजे खरेतर इको फ्रेंडली जगण्याची उत्तम पद्धत आहे.
हल्ली क्विकर, फ्रिसायकल किंवा तत्सम सोयींमुळे आपल्याला न उपयोगाची पण इतर कुणाला उपयोगी पडू शकेल अशी वस्तू काढणे वा घेणे सोपे झालेय. सेकण्डहॅण्ड वस्तूंबद्दलचे प्रतिष्ठेचे मुद्देही त्यामुळे हळूहळू मोडीत निघतील. >>>>+१
कार घेताना कधीच नविन घेइन असे वाटत नाही. डोळा मारा १-२ वर्षे जुनी गाडी खुपच पैसे वाचवते. >>>> इंटरेस्टिंग
माझे रिसायकल चालू झालेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणजे मी सध्या (सोमवार पासून) घर ते ऑफीस (आणि अर्थातच परतीचा देखील) प्रवास सायकलने करतोय. हे थंडीचे ३ महिने करावे असे म्हणतोय.
निवांत - कार पूलींग करता
निवांत - कार पूलींग करता तुम्हाला हव्ये तशी सेवा पुरवणारी एक वेबसाईट. अजून विश्वासार्हता माहीत नाहीये पण एखादवेळेस तरी आजमावून बघणार आहे.
http://www.blablacar.in/
त्यातल्या त्यात हाच योग्य
त्यातल्या त्यात हाच योग्य धागा सापडला म्हणून इथे विचारतेय.
हल्ली प्लास्टिक बॉटल्स आणि काचेच्या बॉटल्स रद्दीवाले घेत नाहीत. त्यामुळे कचर्यात फेकाव्या लागतात.
प्लास्टिक बॉटल्सचा वापर करायच्या अनेक डिआयवाय कृती नेटवर आहेत. त्यातल्या बहुतेक कृतींसाठी मोठी जागा गरजेची आहे. ज्यासाठी नाही ते मी करतेच आहे. बाकीच्या कचर्यात टाकते आहे.
मला इथे विचारायचंय ते काचेच्या बाटल्यांबद्दल.
आपल्याकडे काचेच्या बाटल्यांसाठी रिसायकल युनिटस किंवा तत्सम काही नाही. पुण्यामुंबईत कुठे असतील तर सांगा मी तिथे नेऊन द्यायला तयार आहे.
दारवांच्या बाटल्याची काच फार उत्तम असते. नेटवर बॉटल्स घरगुती प्रकारे कट करायची कॄती बघितलेय त्यासाठी काही बिअरच्या पाइंट बॉटल्स आणि वाइनच्या हाफ बॉटल्स ठेवल्यात काढून.
काही दारवांच्या फुल बॉटल्स फ्रिजात पाणी भरून ठेवणे वगैरेसाठी करणार आहे. पण फ्रिजात ३-४ बॉटल्सच मावतात.
काही दारवांच्या क्वार्टर्स कोरड्या वस्तू भरून ठेवायला मस्त आहेत. विशेषतः मसाल्याच्या वस्तू. तर त्यासाठी त्या वापरणार आहे. प्लॅस्टिकच्या डब्यांमधे ठेवण्यापेक्षा बरे आणि ट्रान्स्परंट असल्याने दिसतेही.
यापलिकडे जाऊन डिआयवाय रियुज बघितले असता काचेच्या बाटल्यांचे जे काही क्राफ्ट आहे तेही जागाखाऊ तर आहेच पण त्यासाठी बाकी बरीच साधने असायची गरज आहे.
आहेत त्या बहुतेक बाटल्या आयताकृती आकाराला वरती गोल ट्युब अश्या आकाराच्या आहेत. क्वार्टर्स, हाफ बॉटल्स जास्त आहेत. कुणी बॉटल पेंट वगैरे करणारे असेल पुण्यामुंबईत तर मी सर्व बॉटल्स देऊन टाकायला तयार आहे. पण पेंट करायला उपयोगी पडतील अश्या गोल म्हणजे बिअर किंवा वाइन्सच्या कमी आहेत बॉटल्स.
काहीतरी उपाय मिळेल असे म्हणत साधारण ५-६ वर्षांच्या बाटल्या जमल्यात. आता ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. काहीच नाही जमले तर कचर्यात टाकून देणे एवढेच करता येण्यासारखे आहे. म्हणजे लॅण्डफिल.
तर अजून काय करता येईल हे सुचवा.
नी, मला एक दोन बाटल्या हव्या
नी, मला एक दोन बाटल्या हव्या आहेत टेबल लँप करायला. देऊ शकशील का? दामल्यांकडे पाहिले. भारी दिसतात.
हव्या तितक्या घे.
हव्या तितक्या घे.
लॅम्पचे फोटो पाह्यलेत मी
लॅम्पचे फोटो पाह्यलेत मी नेटावर. मस्त दिसतायत ते. पण करणे मला पॉसिबल नाही. तू करून घेणार असशील कुठून तर मलाही एखादा करून घ्यायला आवडेल.
लॅम्पकरता बाटलीचा तळ कापायला
लॅम्पकरता बाटलीचा तळ कापायला लागतो. काचेच्या दुकानात देतात का कापून विचारायला हवे.
खूप छान विचार करायला लावणारा
खूप छान विचार करायला लावणारा धागा. प्रतिसादही उत्तम. वाचतेय.
बाटल्यांचे तुकडे केले तर
बाटल्यांचे तुकडे केले तर त्याच्या कडा बोथट करायचे काही टेक्निक आहे का? ते मिळाले तर मजा येईल. मग मी ते तुकडे कॅब्ज म्हणून वापरू शकेन माझ्या वायरवर्कमधे.
बघीतले असेलच बहुतेक पण तरी,
बघीतले असेलच बहुतेक पण तरी, काचेच्या कडा बोथट करायच्या बद्दल माहीती
http://www.wikihow.com/Smooth-Glass-Edges
तुकड्यांसाठी हे फार किचकट वाटतंय पण कल्पना मस्तच आहे
मी घेणारच आहे ड्रिल आणि बिटस.
मी घेणारच आहे ड्रिल आणि बिटस.
नीरजे, आप्पाबळवंत चौकातले
नीरजे, आप्पाबळवंत चौकातले बाटलीवाल्याचे दुकान अजुनही आहे, त्याच गल्लीत आतिल बाजुस, तिथे ते घेतिल, वर पैशेही देतिल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही चारपाच चौकोनी बाटल्या मिलाल्या तर चालतील... कैतरी करेन मी.
प्लॅस्टिक यायच्या पूर्वी काचेच्या बाटलीमधे आई हळद वगैरे भरुन ठेवायची. वर बुच लावलेले.
भरायचे काम माझ्याकडे, लाम्ब तार वापरुन खोचुन खोचुन गच्च भरायचे. काढताना तारेने वरील भाग ढिल्ला करुन घेऊन ओतुन घ्यायचा...
असो.
लॅम्पकरता बाटलीचा तळ कापायला
लॅम्पकरता बाटलीचा तळ कापायला लागतो. काचेच्या दुकानात देतात का कापून विचारायला हवे.>> मी विचारले होते. पण नाही देत कापून म्हणून मला सांगितलं. डु इट युअरसेल्फ मध्ये बाटली कापायची जी टेक्निक दाखवली आहे ती वापरून घरी बाटली कापून घ्या आणि मग आम्ही कडा घासून देवू असं सांगितलं आहे.
मला कोलाज वर्कसाठी टाइल्सच्या तुकड्यांबरोबर रंगीबेरंगी काचांचे तुकडे वापरायचे आहेत. पण अजून कटर, सेफ्टी गॉगल्स आणि इतर आयुध आणली नाहीत म्हणून राहून गेलंय काम.
लिंब्या, मसाल्याचे पदार्थ
लिंब्या, मसाल्याचे पदार्थ भरून ठेवणार आहेच मी. त्यासाठी काढल्यात वेगळ्या.
आता अजून एका आयड्याही मिळालीये. सध्याच्या पसार्यातल्या दोन तीन बाटल्या ठेवून (+ तुला किंवा स्वातीला हव्या असतील तर त्या) बाकीच्या काढून टाकेन आणि ठेवलेल्या बाटल्यांवर जरा उद्योग करून बघेन. जमल्यास भन्नाट होईल प्रकरण.
तुझ्याकडे जागा असेल तर तुला काहीतरी भन्नाट भन्नाट आयड्या करता येतील बघ.
अल्पना, ग्लासकटर डोमेस्टीक
अल्पना, ग्लासकटर डोमेस्टीक युजसाठी परवडण्यासारखे असते का?
मला ती दोरे बांधून, जाळून कट करायची आयडिया ट्राय करून बघायचीये
काचकलेबद्दलची पुढची चर्चा इथे
काचकलेबद्दलची पुढची चर्चा इथे करूया.
नसतं ना परवडण्यासारखं. मला एक
नसतं ना परवडण्यासारखं. मला एक छोटासा स्टुडिओ करायचाय माझा. एनॅमलींग, काचकाम इ.इ...परवडेल तसं करेन. कदाचीत रिटायर झाल्यानंतर करेन, पण करेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अल्पना.... सेम हिअर... दोरा
अल्पना.... सेम हिअर...
दोरा बांधुन जाळून बघितले होते पूर्वी, काय धड नाही झाले, रिस्की वाटले.
कलर काचांचे तुकडे वापरुन कोलाज नव्हे तर म्युरल केले होते १९८१ मधे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नीरजे, माझ्याकडे जागा आहे, आयडिया सांग.
दोरा बांधून जाळून बघायचंय, पण
दोरा बांधून जाळून बघायचंय, पण लेक बाहेरगावी गेलेला असताना करुन बघेन तो उद्योग ते ही नवर्याला सोबत घेवून.
बर झाल हा विषय निघाला & .
बर झाल हा विषय निघाला & . वेगळा धागा काढला म्हणून निधप धन्यवाद.
पण जे काचेचे तुकडे असतात त्याची विल्हेवाट कशी लावावी .
उदा माझ्याकडे एक बुक शेल्फ होते . त्याची दारे काचेची होती. आता मी नवीन शेल्फ केले. बाकी मटेरियल रिसायकल केले. काचा सांभाळत बसलीये .
सांगा काय करू
Pages