Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
मी केलेलं
मी केलेलं एखादं पोस्ट delete कसं करता येईल?
सशल, जर
सशल,
जर आपल्या लेखनाला कोणी प्रातिसाद दिला असेल तर सध्या तुम्हाला ते delete करता येणार नाही. मायबोली सपोर्ट ला ईमेल ने कळवलंत तर ते पोस्ट काढुन टाकता येईल.
प्रतिसादा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .. पण प्रतिसाद दिलेला नसताना (माझंच पोस्ट शेवटचं असताना) मी delete कसं करता येईल ते बघत होते .. संपादन वर क्लिक करून सगळं text delete करून पाहीलं पण त्याने काहिच झालं नाही .. error message सारखा prompt आला रिकाम्या मेसेजबद्दल ..
मी माझा
मी माझा रंगीबेरंगी account renew नाही केला. तर सर्व जुने पोस्ट काढून टाकले का?
जनरली कुठे
जनरली कुठे ना कुठे gtg होत असतात, तर त्या gtg च्या आमंत्रणासाठी व वृतांत लेखणासाठी एखादा बीबी उघडता येऊ शकतो का?
आणि त्यात कोणाही मायबोलीकराला नविन थ्रेड ओपन करता आला पाहीजे.
तो विभाग
तो विभाग अजून जुन्या मायबोलीत इथे आहे-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103383.html?1145038973
मराठी
मराठी टायपत असतना मधेच एखादा इन्ग्लिश शब्द कसा लिहावा ? पूर्वी < > वापरून तसे करता येत होते.. आता येत नाही.....
जागोमोहनप
जागोमोहनप्यारे,
प्रत्येक लिखाण करतांना तुम्हाला डाव्या बाजुला एक खिडकी दिसेल तिथे मराठी किंवा इंग्रजी असा बदल करुन (किंवा ctrl + \ दाबुन) दोन्ही भाषेत लिहीता येते.
नविन
नविन स्वतःहाचा ग्रुप्स कसा बनवायचा ?
कॄपया कळवावे ...
नविन
नविन स्वतःहाचा ग्रुप्स कसा बनवायचा ?
कॄपया कळवावे ...
गिरिश
गिरिश पिंगळे/आशा दिक्षीत
सभासदाना सध्या गृप बनवायची सोय नाही आहे. खालिल दुव्यावर जाउन पहा. तिथे बरेच गृप्स आहेत. या व्यतिरीक्त एखादा गृप हवा असेल तर इथे लिहा.
http://www.maayboli.com/hitguj/index.html
मला
मला रंगीबेरंगी मधे पान मिळू शकेल कां? त्यासाठी काय करावे लागेल?
शर्मिला
शर्मिला फडके,
तुम्ही २०$ इतकी वार्षिक वर्गणी भरुन रंगीबेरंगी मधे स्वतःचे पान घेवु शकता.
या संबंधी तुम्ही ऍडमीनना मेल करु शकता.
इथे इतके
इथे इतके भरपूर लिखाण होते आहे, कुठेही सर्च नावाचा ऑप्शन आहे का? मला 'वान्या' नावाचे लिखाण वाचायचे होते. पण ते कुठे असेल? मायबोलीवर सर्च नावाचा ऑप्शन विकसीत नाही का करता येणार?
स्वप्निल म
स्वप्निल
मायबोलीवर सर्च उपलब्ध आहे. प्रत्येक पानाच्या खाली (footer) गुगल सर्च आहे. तिथे जो शब्द तुम्हाला हवा आहे तो देउन web कींवा maayboli.com हा पर्याय निवडा.
लहान
लहान मुलांना ( ३ ते ५/६ वर्ष ) भाषा, गणित, भुगोल इ विषयांची गोडी लागावी ह्या साठी काय करता येईल तसेच वाचनाची गोडी लागावी ह्या साठी काय करता येईल असे विचारायचे आहे, ते कुठे विचारु? का नविन लिंक करता येईल?
तसेच मुलांवरचे संस्कार, पालकत्व, मुलांशी संबंधीत समस्या कुठे विचाराव्यात?
क्रुपया मदत करा.
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.
मुलांचे
मुलांचे संगोपन या विषयावरचं हितगुज इथे टिचकी मारून पहा.
नवीन विषयासाठी नवीन धागा सुरू करा.
हे बी बी
हे बी बी काय प्रकार आहे? इथे गप्पा मारता येतात का? इथे कसे जायचे? क्रुपया मर्गदर्शन करा............
नितीन, बी
नितीन,
बी बी म्हणजे बुलेटीन बोर्ड. इथे 'गृप्स' विभागात जावुन तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर तसेच वेगवेगळ्या गावांच्या गप्पांच्या पानावर जावुन गप्पा मारता येतील. तुम्हाला हव्या असलेल्या गृपचे सदस्य झाल्यावर तुम्हाला अजुन काही सुविधा वापरता येतील जसे नविन गप्पांचे पान किंवा लेखनाचा धागा सुरु करणे.
वाचता येतं
वाचता येतं की !
तुम्ही (लॉगीन केल्यावर) वर डाव्या बाजूला "अजून वाचायचंय" वर टिचकी मारली की ज्या गृपचे तुम्ही सभासद आहात त्या त्या गृपमधले फक्त तुम्ही अजून न वाचलेले संदेश दिसतील.
सगळ्यात वर "नवीन लेखन" वर टिचकी मारली तर सगळं (सगळ्या मायबोलीवरचं) नवीन लेखन दिसेल. जे तुम्ही वाचलं नसेल त्यापुढे "नवीन" असं दिसेल. ते तुम्ही वाचलं असेल पण त्यात नवीन प्रतिक्रीया आल्या असतील तर त्या नवीन प्रतिक्रीयांचा आकडा (फक्त तुमच्यासाठी नवीन असलेल्या प्रतिक्रीया) त्या खाली दिसेल.
मला पुन्हा
मला पुन्हा माझी पोस्ट दोन वेळा आलेली दिसली, या आधी पण असे झाले आहे. शक्यता आहे मी नकळत दोन वेळा हिट केले असेल. मला माझी स्वतः ची नको असणारी पोस्ट पुर्णतः काढुन टाकता येते कां? delete पर्याय नवीन मायबोलीवर नसावा किंवा मला माहीत नाही, हा पर्याय जुन्या हितगुज वर होता. मदती बद्दल धन्यवाद.
मी हा
मी हा प्रश्न जुन्या हितगुज वर विचारला होता, (पण कोणी प्रतिसाद दिला नाही.) ईथे ह्याचाशी संबंधित कोणती लिंक दिसली नाही म्हणून परत विचारत आहे/ ( क्रुपया योग्य ठिकाणी हलवा )
मला 'nutrition & dietetics ' मध्ये एखादा diploma /degree course करायचा आहे आवड म्हणुन. कुठे करता येईल?
ग्रुप चे
ग्रुप चे सभासद कसे व्हायचे ?
जगु, तुम्हा
जगु,
तुम्हाला ज्या ग्रुपचे सभासद व्हायचे आहे त्य ग्रुपमध्ये गेल्यावर डावीकडे वरती "सामील व्हा" असा दुवा दिसेल. तो वापरून सभासद होउ शकता.
admin / madat_samiti /
admin / madat_samiti / somebody else who knows..
नवीन लेखन धागा कसा सुरू करावा? उदा. 'चालवा डोकं' मध्ये नवीन कोडे लिहिण्यासाठी काय करावे?
साजिरा, कुठ
साजिरा,
कुठल्याही गृपमध्ये नविन धागा सुरु करण्याआधी तुम्हाला त्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल. तुम्हाला ज्या ग्रुपचे सभासद व्हायचे आहे त्या ग्रुपमध्ये गेल्यावर डावीकडे वरती "सामील व्हा" असा दुवा दिसेल. तो वापरून सभासद होउ शकता. सदस्यत्व घेतल्यावर डाव्या बाजुला तुम्हाला नविन धागा सुरु करण्याची लिंक सापडेल.
एखादी
एखादी प्रतिक्रिया (स्वत दिलेली) डिलीट कशी करायची? त्याखालच्या संपादन मधे जाऊन पहिले पण कळले नाही. कृपया सांगाल का?
मदत_समिती
मदत_समिती ...
बुलेटिन बोर्ड च्या मेसेजेस ची क्रोनोलॉजी रीवर्स करा !!
लेटेस्ट फर्स्ट ... ओल्ड लास्ट..
सुपरमॉमचा
सुपरमॉमचा प्रश्न मी देखील आधी विचारला होता (नको असणारी पोस्ट काढुन टाकण्या संदर्भात), उत्तराच्या प्रतिक्षेत.
स्वत॑:
स्वत॑: लिहीलेली प्रतिक्रिया पुर्णपणे डीलीट करण्याची सोय अजुन मायबोलीवर नाही.
पण संपादन मध्ये जावुन तुम्ही त्यातला पुर्ण मजकुर काढुन टाकु शकता.
त्यामुळे तुमचे पोस्ट पुर्ण डीलीट न होता तुमची रिकामी प्रतिक्रीया तिथे दिसेल.
Pages