बसंती : आता धन्नोचं वय झालंय तिच्या लग्नासाठी बाजूच्या बेलापुर गावातल्या काशीरामचा रामू घोडा उमदा वाटला. काल मी आणि वीरू दोघे धन्नोला घेऊन गेलो होतो तिथे. धन्नोला रामू आणि रामूला धन्नो पसंत आहेत. पुढच्या महिन्यात लग्नाचा बार उडवून द्यायचा विचार आहे. एकदा धन्नोचे चाराचे आठ पाय झाले की मी आणि वीरूसुध्दा त्याच मांडवात दोनाचे चार हात करून घेऊ.
लाइक : १००१ (वीरू, जय, ठाकूर, काशीराम, धन्नो, रामू आणि समस्त रामगढवासी)
डिसलाइक : १ (मौसी)
मौसी : अगं भवाने! धन्नोचे लग्न लावून दिल्यावर खायचे काय?
बसंती : मौसी त्याची चिंता नको करूस. डबल प्रॉफीट होणार आहे. ते सिक्रेट हाय.......
मौसी :
वीरू : कोणता मुहूर्त काढला आहेस?
बसंती : ते तर पंडितजी सांगतील.
वीरू : पंडितजींचा पत्ता दे लवकर मुहूर्त काढून घेतो.
जय : हा लवकर दे याला पत्ता हा तर वाटच बघतोय कधी एकदा धन्नो जातेय म्हणजे हा ह्याच्या कामासाठी मोकळा......;)
ठाकूर : बसंती, चांगली बातमी आहे. धन्नोच्या आणि तुझ्या लग्नाच्या खर्चाची काळजी नको करूस तो मी करेन.
लाईक : ६ (बसंती, वीरू, मौसी, राधा, रामूकाका आणि गब्बर)
बसंती : धन्यवाद ठाकूर साहेब!
ठाकूर : गब्बर तु मला फॉलो करतोस?:राग:
गब्बर : तुला फॉलो करायला मी काय येडा हाय काय? सांभाने एक नविन अॅप आणलेय लग्नाची बातमी कोणीही तेच बुकवर टाकली की मला लगेच समजते. खुप दिवसात लग्नाची वरात नव्हती लुटली. आता एकसाथ दोन-दोन वराती लुटायला भेटणार म्हणून बरं वाटतंय ते पण तुझ्या पैशाने होणार्या.
लाइक :३९ (सांभा, कालिया आणि समस्त डाकूगण)
डीसलाइक :२००२ (बसंती, मौसी, काशीराम, राधा आणि समस्त रामगढ आणि बेलापुरवासी)
ठाकूर : तु येच गब्बर तुझी वाट बघतोय. जय आणि वीरू अशी संधी पुन्हा येणार नाही. लोहा गरम है मार दो हथोडा.
लाइक : २ (राधा आणि रामूकाका)
डीसलाइक : १ (वीरू)
मौसी : बसंती ते सिक्रेट काय आहे? माझा नुसता जीव वर खाली होतोय. त्यात गब्बरनी पण धमकी दिलिए.
बसंती : यु तो...... सिक्रेटला सिक्रेट ठेवायला पाहिजे पण आता तु विचारतेच आहेस तर सांगते. धन्नोच्या रामूला आपण घरजावई बनवायचे. म्हणजे धन्नो आणि मी एक टांगा चालवू आणि वीरू आणि रामू एक टांगा चालवतील आहे की नाही डबल कमाई.
लाइक :५ (जय, मौसी, ठाकूर, राधा, रामू)
डीसलाइक : २ (वीरू आणि काशीराम)
जय :
वीरू : हसू नकोस कितीही झालं तरी माझी मुलं तुझ्याकडेच गोष्टी ऐकायला येणार.
जय : साला नौटंकी कधीच सुधारणार नाही.
बसंती : लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे ह्या वीरूची काडीची मदत होणार नाही. सर्व मलाच करावं लागणार आहे. मुहुर्त कळताच सर्वांना रितसर कुकुंमपत्रिका पाठवेनच पण सर्वांनी लग्नाला यायचं हं!
भारीये हे!
भारीये हे!:फिदी:
छान आहे.
छान आहे.
मस्त
मस्त
भारीय !
भारीय !
मस्तच हं माने!!!!!
मस्तच हं माने!!!!!
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
छान यु तो...... सिक्रेटला
छान
यु तो...... सिक्रेटला सिक्रेट ठेवायला पाहिजे>>>>