उंदीरमामाची टोपी हरवली
रामराम मंडळी! काय सगळे एकदम खूश ना? 'ताशाचा आवाज तररारा आला न् गणपती माझा नाचत आला'! तुम्हांला जितकी आतुरता असते बाप्पांना भेटायची तितकीच प्रतीक्षा बाप्पाही करत असतात मायबोलीवर अवतरण्याची! मी म्हटलं, "काय गणराज! तुम्हांला मायबोलीशिवाय चैन पडत नाही? हल्ली तर बघावं त्या बाफावर राजकीय मुद्द्यांवरुन लोक हमरीतुमरीवर येत असतात. काही लोक तर म्हणतात वातावरण गढूळ का कायसं झालंय".( टवकारलेत ना कान? मी उंदीरमामा, तुमच्या इथल्या गप्पाही असेच कान टवकारून ऐकत असतो.) तर एक मिश्कील हसू गालावर आणत बाप्पा मला सांगतात कसे - "अरे, ती वादावादी काय खरी नव्हे! खरी मायबोली तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. गेली १४ वर्षे येतोयस माझ्याबरोबर इथे? इथले काही महत्त्वाचे, प्रसिद्ध धागे वाचलेस का? कितीतरी नवीन ज्ञानवर्धक आणि मनोरंजक माहिती मिळेल. नुसतं या भांडणांवर जाऊ नकोस, शोधलंस तर कित्तीतरी छान छान धागे सापडतील. कधीतरी बुद्धीला खाऊ मिळावा यासाठी धडपड कर!" आता प्रतिष्ठापना झाली आणि म्हटलं लगेच वाचायला चालू करू. एक मस्त धागा सापडला, तो वाचून होतोय तर आमच्या मालकांची हाक आली, आलो लगेच पळतपळत, पण... माझी टोपी पडली की हो तिकडेच कुठेतरी गडबडीत! हो, तीच ती! 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली'वाली जगप्रसिद्ध टोपी माझी! आता मी काय करु? मला त्या धाग्याचं नाव, नंबर काही सांगता येणार नाही, पण तिथं काय चर्चा चालू होती ते मी आठवेल तसं सांगेन. तेवढ्यावर अस्सल मायबोलीकर मला ती टोपी शोधून देऊ शकतील का?
नियम -
१. ही स्पर्धा नाही खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची म्हणजेच त्या धाग्याचे नाव, लिंक द्यायची.
३. उंदीरमामा तुम्हांला त्या धाग्याविषयी काही खुणा, हिंट्स् देतील. थोड्या थोड्या वेळाने एक अशा प्रत्येक धाग्यासाठी पाच खुणा मिळतील.
४. पहिली खूण मिळताच मायबोलीकर शोधाशोध सुरू करून उत्तर देऊ शकतात. पण 'झब्बू'सारखंच, एक आयडी सलग उत्तरासाठी सलग दोन पोस्ट टाकू शकणार नाही.
५. उंदीरमामांसाठी मायबोली म्हणजे जणू परदेश आहे. त्यामुळे त्यांना जसं आठवेल तसे ते खुणा सांगतील. त्यांनी सांगितलेल्या खुणा कधीकधी दिशाभूल करणार्याही असू शकतील बरं!
पहिली टोपी
१. आज एक मस्त धागा वाचत होतो, पण तिकडे गेल्यावर मला जरा घाबरायलाच झालं. सगळेजण श्वास रोखून होते!
२. काटकोनांत निसर्ग कसा काय असेल?
३. सगळा खेळ वेगाशी आणि जीवाशी हो!
उत्तर - http://www.maayboli.com/node/9310
विजेती - मृदुला
दुसरी टोपी
१. डोक्याचा भयानक गुंता झाला. तांत्रिक भानगडींनी डोकं भंजाळलं.
२. वर-खाली, उघड-बंद काय-काय बोलणं चालू होतं - काही समजेना!
उत्तर - http://www.maayboli.com/node/13661
विजेती - विनिता.झक्कास
तिसरी टोपी
१. वरवर वाचलं. अगम्य, क्लिष्ट काहीतरी भलत्याच भाषेतलं!
२. मुख्य स्त्रोतच माहीत नाही, पण केली शेवटी लोकांनी मदत.
३. जमलं सुरेख होतं पण अंकांनी फसगत केली सर्वांची.
४. काय एकेक भेटी!
५. एकात उपहास, दुज्यात कल्पनाविलास!
उत्तर - http://www.maayboli.com/node/7713
विजेती - श्रद्धा
चौथी टोपी
१. सुरीने कापा आणि मेणाने चिकटवायला सांगत होते कुणीतरी.
उत्तर - http://www.maayboli.com/node/46736
विजेती - मामी
पाचवी टोपी
१.काल असाच हिंडत हिंडत कुठेतरी पोचलो तर तिथं इतकी मोठी लोकं एकत्र जमली होती. म्हणजे नुसती वयानं नाही हां.. त्यांचं नाव खूप वेळा ऐकलंय सगळीकडे अशी लोकं. मुसलमानांबद्दल काहीतरी बोलत होते तिथे.
२. तिथे तर कुणी प्रसिध्द नृत्यांगना नाचतही होत्या.
उत्तर - http://www.maayboli.com/node/26679
विजेती - अल्पना
सहावी टोपी
१. एक बाई चिडून वर्तमानपत्रात लेख लिहायला निघाल्या होत्या तिथे!
२. बिचारी छोटी मुलं रडताना बघून मी तर गलबलूनच गेलो.
3. बऱ्याचश्या आया आणि काही बाबा लोक तिथे जमले होते. फारच टेन्शनमध्ये दिसत होते.
४. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है.
उत्तर - http://www.maayboli.com/node/20222
विजेती - राजसी
सातवी टोपी
१. केवढी ती चर्चा! नुसती धुमाळी माजलेली.हे का ते, ते का आणखी काही? प्रत्येकजण पुराव्यासहित आपापली मते मांडत होता.
२. या 'वड्या'चं तेल वांग्यावर काढायला उरतच नाही!
उत्तर - http://www.maayboli.com/node/427337
विजेती - वेका
आठवी टोपी
१.अतिशय मुद्देसूद माहिती लिहीली होती तिथे. पण हे सारं तसं खर्चिक बरं का!
२. महत्त्वाचे मुद्दे ठळक करायची स्टाईल आवडली आपल्याला.
३. पुढे काहीही नवीन आलं तरी त्याच्या मागे जुने तुम्हीच.
उत्तर - http://www.maayboli.com/node/17057
विजेती - राजसी
नववी टोपी
१. सुरुवात, चढ-उतार आणि शेवट सगळचं कसं सुरेख!
२. भांडण ही होतं इथे पण शब्दांत नाही..
३. हा भोपळा काही टुणूक टुणूक जात नाही!
४. बॉलिवूडच्या फेमस त्रयींचा बंधु आहे. पण...
५. नाव घेतानाही कानाला हात लावावा अशी ही माणसं नि त्यांची तपश्चर्या..
उत्तर - http://www.maayboli.com/node/51724
विजेती - मैत्रेयी
दहावी टोपी
१. दोन बायकांचीच गोष्ट ती, एखाद्या सिरीअलसारखी!
२. मन मोठं असलं की सगळं काही सामावता येतं, हे घरच्या सर्वांसाठीच बरं का!
३. झाडूने केली गंमत!
४. गोष्ट ती मायबोलीतूनच, पण जरा गोड, रांगडा लहेजा!
उत्तर - http://www.maayboli.com/node/29872
विजेती - कविन
वाण नाही पण गुण लागणार नाही
वाण नाही पण गुण लागणार नाही का रीया त्यांना दहा दिवसात?
बरोबरेय
बरोबरेय
मामा हरवा की आता टोपी
मामा हरवा की आता टोपी
परत हरवली की टोपी.
परत हरवली की टोपी.
ओ मामा, कथा-बिथा असेल तर कठीण
ओ मामा, कथा-बिथा असेल तर कठीण आहे. आमचा पास.
ट्रेकिंगचा धागा आहे का ?
ट्रेकिंगचा धागा आहे का ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/45599?page=2
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/29578
हा का???
उंदीरमामांनी नविन क्लू दिलाय,
उंदीरमामांनी नविन क्लू दिलाय, बघा बरं!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30416 ही लेखमालिका किंवा
http://www.maayboli.com/node/50746 ही लेखमालिका...
हितगुज ग्रूप: धन्य ते गायनी
हितगुज ग्रूप: धन्य ते गायनी कळा वरचा एखादा गाण्यांवरचा धागा किंवा एखाद्या मैफीलीच्या वर्णनाचा धागा?
दादची 'गानभुली' ही लेखमालिका
दादची 'गानभुली' ही लेखमालिका किंवा त्याच मालिकेतला http://www.maayboli.com/node/19138 हा झाकीरवरचा लेख?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/29910 स्टीव आणी त्याचे बाबा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/29941 डमरु महोत्सव
http://www.maayboli.com/node/2973 लावणी सवाल जवाब
देताय ना टोपी शोधुन मामांची
देताय ना टोपी शोधुन मामांची .. तिसरा क्लु आठवलायं त्यांना..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/51390?page=1 इथे आहे का टोपी?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21097
http://www.maayboli.com/node/1154
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/31197?page=1
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/26871?page=13 चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
http://www.maayboli.com/node/2302?page=7 शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/50909 तानपुरा
कविन कशाची लिंक दिली आहेस ते
कविन कशाची लिंक दिली आहेस ते लिहि की. क्लिकत बसायला लागतंय.
कुलूचा एखादा लेख आहे का?
कुलूचा एखादा लेख आहे का?
कदाचित संगिताबद्दल नसावं
कदाचित संगिताबद्दल नसावं नाहीतर आत्तापर्यंत मामांच्या वतीने संयोजकांनी सांगितलं असतं की ट्रॅक योग्य आहे
भोपळा = गणित, तानपुरा/वाद्य,
भोपळा = गणित, तानपुरा/वाद्य, भाजी, हॅलोविन
चढ उतार = ट्रेक, प्रवास, गाण्याची मैफल...
शब्दाशिवायचं भांडण = सूर, ताल, सुरी काटे चमचे..
चल आता मिळून भर घालू आणि शोधू नंदिनी, मामांची टोपी
संयोजक? किधर है.... मागच्या
संयोजक? किधर है....
मागच्या काही पोष्टी पाहता मीच मामांना क्लू देतेय. मछली जल की रानी है नर्सरी र्हाईम हे सांगितलं पण बीबी काय अस्मादिकांना शोधता आला नाही!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/8235?page=1 लहानपणीच्या खेळांमधल्या भोपळ्याच्या खेळात हरवलेय का मामांची टोपी
आज आपण दोघीच की काय टोपी शोध
आज आपण दोघीच की काय टोपी शोध मोहीमेवर
नंदिनी, कविन पळा पुढे पटापट.
नंदिनी, कविन पळा पुढे पटापट. टोपी टप्प्यात आलीये नजरेच्या!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/6812 बडबडगीत ऐकायला गेलेला का मामा?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46110?page=1 हेलोवीन...
http://www.maayboli.com/node/38882 क इथे कविता वाचायला गेलाय मामा
Pages