उंदीरमामाची टोपी हरवली
रामराम मंडळी! काय सगळे एकदम खूश ना? 'ताशाचा आवाज तररारा आला न् गणपती माझा नाचत आला'! तुम्हांला जितकी आतुरता असते बाप्पांना भेटायची तितकीच प्रतीक्षा बाप्पाही करत असतात मायबोलीवर अवतरण्याची! मी म्हटलं, "काय गणराज! तुम्हांला मायबोलीशिवाय चैन पडत नाही? हल्ली तर बघावं त्या बाफावर राजकीय मुद्द्यांवरुन लोक हमरीतुमरीवर येत असतात. काही लोक तर म्हणतात वातावरण गढूळ का कायसं झालंय".( टवकारलेत ना कान? मी उंदीरमामा, तुमच्या इथल्या गप्पाही असेच कान टवकारून ऐकत असतो.) तर एक मिश्कील हसू गालावर आणत बाप्पा मला सांगतात कसे - "अरे, ती वादावादी काय खरी नव्हे! खरी मायबोली तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. गेली १४ वर्षे येतोयस माझ्याबरोबर इथे? इथले काही महत्त्वाचे, प्रसिद्ध धागे वाचलेस का? कितीतरी नवीन ज्ञानवर्धक आणि मनोरंजक माहिती मिळेल. नुसतं या भांडणांवर जाऊ नकोस, शोधलंस तर कित्तीतरी छान छान धागे सापडतील. कधीतरी बुद्धीला खाऊ मिळावा यासाठी धडपड कर!" आता प्रतिष्ठापना झाली आणि म्हटलं लगेच वाचायला चालू करू. एक मस्त धागा सापडला, तो वाचून होतोय तर आमच्या मालकांची हाक आली, आलो लगेच पळतपळत, पण... माझी टोपी पडली की हो तिकडेच कुठेतरी गडबडीत! हो, तीच ती! 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली'वाली जगप्रसिद्ध टोपी माझी! आता मी काय करु? मला त्या धाग्याचं नाव, नंबर काही सांगता येणार नाही, पण तिथं काय चर्चा चालू होती ते मी आठवेल तसं सांगेन. तेवढ्यावर अस्सल मायबोलीकर मला ती टोपी शोधून देऊ शकतील का?
नियम -
१. ही स्पर्धा नाही खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची म्हणजेच त्या धाग्याचे नाव, लिंक द्यायची.
३. उंदीरमामा तुम्हांला त्या धाग्याविषयी काही खुणा, हिंट्स् देतील. थोड्या थोड्या वेळाने एक अशा प्रत्येक धाग्यासाठी पाच खुणा मिळतील.
४. पहिली खूण मिळताच मायबोलीकर शोधाशोध सुरू करून उत्तर देऊ शकतात. पण 'झब्बू'सारखंच, एक आयडी सलग उत्तरासाठी सलग दोन पोस्ट टाकू शकणार नाही.
५. उंदीरमामांसाठी मायबोली म्हणजे जणू परदेश आहे. त्यामुळे त्यांना जसं आठवेल तसे ते खुणा सांगतील. त्यांनी सांगितलेल्या खुणा कधीकधी दिशाभूल करणार्याही असू शकतील बरं!
पहिली टोपी
१. आज एक मस्त धागा वाचत होतो, पण तिकडे गेल्यावर मला जरा घाबरायलाच झालं. सगळेजण श्वास रोखून होते!
२. काटकोनांत निसर्ग कसा काय असेल?
३. सगळा खेळ वेगाशी आणि जीवाशी हो!
उत्तर - http://www.maayboli.com/node/9310
विजेती - मृदुला
दुसरी टोपी
१. डोक्याचा भयानक गुंता झाला. तांत्रिक भानगडींनी डोकं भंजाळलं.
२. वर-खाली, उघड-बंद काय-काय बोलणं चालू होतं - काही समजेना!
उत्तर - http://www.maayboli.com/node/13661
विजेती - विनिता.झक्कास
तिसरी टोपी
१. वरवर वाचलं. अगम्य, क्लिष्ट काहीतरी भलत्याच भाषेतलं!
२. मुख्य स्त्रोतच माहीत नाही, पण केली शेवटी लोकांनी मदत.
३. जमलं सुरेख होतं पण अंकांनी फसगत केली सर्वांची.
४. काय एकेक भेटी!
५. एकात उपहास, दुज्यात कल्पनाविलास!
उत्तर - http://www.maayboli.com/node/7713
विजेती - श्रद्धा
चौथी टोपी
१. सुरीने कापा आणि मेणाने चिकटवायला सांगत होते कुणीतरी.
उत्तर - http://www.maayboli.com/node/46736
विजेती - मामी
पाचवी टोपी
१.काल असाच हिंडत हिंडत कुठेतरी पोचलो तर तिथं इतकी मोठी लोकं एकत्र जमली होती. म्हणजे नुसती वयानं नाही हां.. त्यांचं नाव खूप वेळा ऐकलंय सगळीकडे अशी लोकं. मुसलमानांबद्दल काहीतरी बोलत होते तिथे.
२. तिथे तर कुणी प्रसिध्द नृत्यांगना नाचतही होत्या.
उत्तर - http://www.maayboli.com/node/26679
विजेती - अल्पना
सहावी टोपी
१. एक बाई चिडून वर्तमानपत्रात लेख लिहायला निघाल्या होत्या तिथे!
२. बिचारी छोटी मुलं रडताना बघून मी तर गलबलूनच गेलो.
3. बऱ्याचश्या आया आणि काही बाबा लोक तिथे जमले होते. फारच टेन्शनमध्ये दिसत होते.
४. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है.
उत्तर - http://www.maayboli.com/node/20222
विजेती - राजसी
सातवी टोपी
१. केवढी ती चर्चा! नुसती धुमाळी माजलेली.हे का ते, ते का आणखी काही? प्रत्येकजण पुराव्यासहित आपापली मते मांडत होता.
२. या 'वड्या'चं तेल वांग्यावर काढायला उरतच नाही!
उत्तर - http://www.maayboli.com/node/427337
विजेती - वेका
आठवी टोपी
१.अतिशय मुद्देसूद माहिती लिहीली होती तिथे. पण हे सारं तसं खर्चिक बरं का!
२. महत्त्वाचे मुद्दे ठळक करायची स्टाईल आवडली आपल्याला.
३. पुढे काहीही नवीन आलं तरी त्याच्या मागे जुने तुम्हीच.
उत्तर - http://www.maayboli.com/node/17057
विजेती - राजसी
नववी टोपी
१. सुरुवात, चढ-उतार आणि शेवट सगळचं कसं सुरेख!
२. भांडण ही होतं इथे पण शब्दांत नाही..
३. हा भोपळा काही टुणूक टुणूक जात नाही!
४. बॉलिवूडच्या फेमस त्रयींचा बंधु आहे. पण...
५. नाव घेतानाही कानाला हात लावावा अशी ही माणसं नि त्यांची तपश्चर्या..
उत्तर - http://www.maayboli.com/node/51724
विजेती - मैत्रेयी
दहावी टोपी
१. दोन बायकांचीच गोष्ट ती, एखाद्या सिरीअलसारखी!
२. मन मोठं असलं की सगळं काही सामावता येतं, हे घरच्या सर्वांसाठीच बरं का!
३. झाडूने केली गंमत!
४. गोष्ट ती मायबोलीतूनच, पण जरा गोड, रांगडा लहेजा!
उत्तर - http://www.maayboli.com/node/29872
विजेती - कविन
मामा, बाकीचे पळतील आता
मामा, बाकीचे पळतील आता शोधाय्ला. मी पळते ट्रेन पकडायला
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/50148
काहीतरी तानपुर्याशी संबंधित
काहीतरी तानपुर्याशी संबंधित दिसतंय.
http://www.maayboli.com/node/50909 हे का?
धनश्रीचा नाही मग अमितचा भोपळा
धनश्रीचा नाही मग अमितचा भोपळा का?
http://www.maayboli.com/node/51390
बघा बरं आता काही सुचतंय का?
बघा बरं आता काही सुचतंय का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/26871
चीजांचे शब्द आणि अर्थ
खान??? संगीताशीच संबंधित लेख
खान??? संगीताशीच संबंधित लेख लिहिणारे आशय गुणे आहेत त्यांचा लेख का?
ऊस्ताद राशिद खान - हायझेनबर्ग
ऊस्ताद राशिद खान - हायझेनबर्ग - http://www.maayboli.com/node/53748
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2551?page=1
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/18812
एक चतुर नार, बडी
एक चतुर नार, बडी होशियार.......
उस्ताद अमजद अलि खानांवर काही
उस्ताद अमजद अलि खानांवर काही धागा आहे का? जुगलबंदीचं वर्णन वगैरे असलेला?
शम्मी कपूर किंवा ... अच्छा जी
शम्मी कपूर किंवा ... अच्छा जी मै हारी !
चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओं ना....
नंदिनी ताई कुठे गेल्या?
नंदिनी ताई कुठे गेल्या? त्यांच्याशी बोला बरं एकदा! नाहीतर सरळ स्वित्झर्लंडची तिकीटं काढा!
मामांचा नवा क्लू पण बघून घ्या!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/51724 हा आहे का?
निखिलदा आणि बिलासखानी. - कुलु चा धागा.
तिथे भोपळ्याचं काही सापडलं
तिथे भोपळ्याचं काही सापडलं नाही पण.
नंदिनीशी बोलल्यावर आशय गुणेचा
नंदिनीशी बोलल्यावर आशय गुणेचा हा धागा असेल असं वाटतंय.
अमेरिकन मुलांना दिलेले भारतीय संगीताचे धडे
http://www.maayboli.com/node/30328
अरे माझी टोपी maitreyee ला
अरे माझी टोपी maitreyee ला बरोब्बर सापडली, पण तुम्ही सगळ्यांनी इतके मस्त धागे शोधलेत. आता ते वाचणं आलं .
maitreyee तुम्हाला धन्यवाद आणि हे घ्या..
कुलुचा एखादा धागा वाटलंच होतं
कुलुचा एखादा धागा वाटलंच होतं पण त्याच्या पाखुंमध्ये जाऊन पाहायचा आळस केला. हा बीबी आठवला होता, पण त्यात भोपळे काही आठवेनात. त्या क्लूने रस्ता चुकवला.
मामा परत टोपी हरवणार आहेत का?
अरे असे काय , निखिलदांची सतार
अरे असे काय , निखिलदांची सतार - सतारीचा भोपळा नाही का ? सतारीला पण भोपळाच असतो ना नक्की असा प्रश्न आता मला पडला म्हणून शोधले मी पुन्हा
http://kksongs.org/sitar/parts.html
मामा: काल दिवसभर मी टोपी घट्ट
मामा: काल दिवसभर मी टोपी घट्ट बांधूनच फिरत होतो सारखी पडते म्हणून! म्हटलं आता दोनच दिवस शिल्लक आहेत, मग आमची पालखी निघणार. खूप काय काय वाचले. पण बाप्पा ने सांगितलेला. ट्वेंटी ट्वे्ंटी ट्वेंटी चा मंत्र लक्षात ठेवून बरं! नाहीतर माझी काही धडगत नव्हती. चष्मावाला ड्रायव्हर बाप्पांना काही सूट झाला नसता ना!
पण हाय रे कर्मा. ते इकडे बघा तिकडे बघा करण्यात टोपीची गाठ सुटली आणि कुठे पडली तेच कळेना! मायबोलीकर देतील ना आता फक्त एकदा ही टोपी शोधून?
क्लू कोन देनार??
क्लू कोन देनार??
आठवला क्लू मामांना!
आठवला क्लू मामांना!
Is it "adhunik seeta" by vel
Is it "adhunik seeta" by vel or
" tya doghi" by sanghmitra? Or
Or lalit by mi-anu id -- shruti (?)-kirti? One working mom and one stay at home career girl? Or
Interview of two ladies who run poli-bhaji kendra swayampakghar, aurangabad ?
Or lalit by mi-anu id --
Or lalit by mi-anu id -- shruti (?)-kirti? One working mom and one stay at home career girl? >> हेच जास्त योग्य वाटतंय.
मामा, बरोबर आहे का? अन्यथा अजून क्लू द्या.
Nee chi pan ek katha ahe.
Nee chi pan ek katha ahe.
मामा : बरं, चला सांगतो
मामा : बरं, चला सांगतो क्ल्यू. पण त्याआधी बाप्पांच्या मिरवणूकीत वाजवल्या जाणार्या वाद्यांची नावं सांगा!
ढोल, ताशा , झांज, बँड
ढोल, ताशा , झांज, बँड
ओ द्या की क्लू.
ओ द्या की क्लू.
Befikir - ghar?
Befikir - ghar?
Pages