मोगलीचं स्टेटस अपडेट.
(तेचबूक सर्वरवर जास्तं लोड येत असल्याने लाईक डिसलाईक ची सेवा काही काळापुरती बंद करण्यात आलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
मोगली फीलिंग लॉस्ट नवीन पंजा बनवायला लाकूड शोधायला आलोय. कळतच नाहीय कोणते घेऊ ते. फ्रेंड्स, मदत!!!!!! (थंडी पण खूप लागतेय) अॅट आल्प्स जंगल
बघीरा - एंजॉय किडो!
भालू - जरा जपून रे पोरा!
अकडू-पकडू - आमाला का नाय सांगितलस? आमी पण आलो असतो ना रे!
लीला - ओह, तुम्हाला नव्हतं का माहीत? मला सांगून गेला होता!
पप्पूपांडा - मी पण येणार होतो ना रे! तिथे किवी मिळतात का रे? इथल्या दुकानांमधे नाही मिळाले. इथे काय म्हणतात किवीला? आमच्या ताडोबाच्या जंगलात मिळतात, पण इथले लोक नाही खात बहूदा. थांब मी स्टेटस टाकतो "इथल्या जंगलात किवीज कुठे मिळतील" असं!
शेरखान - बsssssर
तबाखी - अहो, वॉट्सअॅप बघा
शेरखान - ह्ह्म्म्म
तबाखी - चड्डी पिवळी झाली असेल त्या पोराची! हा हा हा.
चमेली - तुम्ही आजकालची पोरे ना, जरा उठल्या-बसल्याला पण स्टेटस अपडेट करता. "फक्तं मित्रांसाठी" तरी करायचं, मित्रांच्या मित्रांना नी सगळ्या जगाला कशाला? मी लीलाकडून आधी ते सगळं शिकून घेतलं बाई! आणि स्वेटर न्यायला काय झालं होतं?
चील - वहीनी, काळजी नका करू, मी लक्ष ठेऊन आहे.
मोगली - तू काळजी नको करू आई.माझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. हा पंजा वाकडा आहे कारण बूमरँग वाकडंच असावं लागतं. सो चील! म्हणजे चील पण आहे इथे
का - मी पूर्णच वाकडातिकडा की रे!
बघीरा - का, मोगली जसा चड्डी धुताना ती धरून दगडावर आपटतो तसे तुला पण शेपटीला धरून आपटू काय रे? मस्तं सरळ करतो
का -
बंदरोंकी टोली - मोगली चड्डी धुतो पण का? हे हे हे, तसं करताना केळीची पानं गुंडाळत असेल तर येऊ का सगळे पानं खायला
भालू - येऊ काय रे, येऊ?
का - बघीरा, मला सरळ करण्यापेक्षा भालूला शांतं कर.
बघीरा - शांत हो बलशाली भालू, शांत.
राधा - अय्या, मोगली, तू आल्प्स मधे आहेस? तिकडे युरोपात माझे काका राहतात. ते मदत करतील तुला काही लागलं तर. पेजिंग युरोपवाले काका.
युरोपवाले काका - मोगली, तुझे इथले स्थिती अद्ययावतीकरण (स्टेटस अपडेट) वाचले. शास्त्रोक्तं पद्धतीने उडता पंजा कसा बनवायचा याबद्दल मी माहीती देऊ शकेन. नंतर सविस्तर लिहीतो.
भालू - ओ युरोपवाले काका, त्या बूमरँगचं शास्त्रं असतय. सायन्स सायन्स. त्यात कसली आलीय डोंबलाची शास्त्रोक्तं पद्धत. झोपा जावा गप गुमान!
सरपंच - माझ्याकडे एक रोगी यायचा पूर्वी पंजासदृश्य वस्तूने जख्मी झालेला. मी त्याला औषधोपचार नी पथ्यपाणी सांगितलं होतं. पण त्याच्या झुंडीने त्याला सांगीतलं की माचूपिचूच्या देवाला जाऊन ये, बरा होशील, तर गेला निघून. अर्ध्या रस्त्यातून खंगून खंगून शेवटी आलाच माझ्याकडे. म्हटलं हवं तर इथून माचूपिचूची पूजा कर पण ही औषधं नक्की खा.
भोलाबाबा - बूमरँगचा शोध २५-३० शतकांपूर्वीच लागला होता. पूर्वी मनुष्यप्राणी नुसत्या काठ्या स्वसंरक्षणासाठी वापरत असंत. परंतु त्याचा अवाका फार कमी पडत होता. दूरवरील शत्रूला मारण्यासाठी तसेच फळे तोडण्यासाठी अशा शस्त्राची गरज पडू लागली व बूमरँगचा शोध लागला. आता हाताशी पुस्तके नाहीत नाही तर सनावळ्या नी संशोधकांची माहीती दिली असती. नंतर लिंका देतो.
अॅमेझॉनच्या जंगलातले काका - बुमरँगसाठी बेस्ट लाकूड आमच्या जंगलातच मिळते. अगदी चिवट आणि तितकेच हलके. त्याच्या कुर्हाडीही छान होतात दगडी पाती लावून. खरंतर कुर्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा जन्मही इथलाच!
मिसिसिपीच्या जंगलातली मावशी - आलं का नवीन झाड? चढा म्हणावं झाडावर!
मिसिसिपीच्या जंगलातले आजोबा - काय गरज आहे चांगली भारतातली जंगले सोडून बाकी ठिकाणी भटकायची? मिसिसिपी नी र्हाईनच्या खोर्यात असं काय मिळतं जे गंगेच्या खोर्यात मिळत नाही? पण आजकाल फॅशनच आलीय बाहेर पळायची. दुरून डोंगर, आपली ती जंगलं, साजरी. माझं म्हातार्याचं कोण ऐकतय!
मोगली - अरे वा! राधाचे बरेच नातेवाईक तेचबुकवर आहेत की! फ्रेंडरिक्वेस्ट पाठवलीय हां सगळ्यांना!
राधा - चोssssss च्वीssट
बघीरा - इथे पण केलाच मनुष्यप्राण्यांनी कब्जा!
मोगली - बघीरा, मी आपल्या जंगलातच परत येणार आहे. माणसांच्या गावात नाही जाऊन रहाणार! तुम्हा लोकांना सोडून कुठे जाईन का मी?
चमेली - निघण्याचं स्टेटस अपडेट टाकशील तर याद राख. अज्जीबात चेक-इन करायचं नाही कुठंही.
मोगली - हो गं आई. नाही करत, बास!
राधा - कित्ती रे तू आज्ञाधारक! उग्गाच नै कै.....!
मोगली - पुढं बोल ना गं!
राधा - वॉट्सअॅप बघ
शेरखान - बsssssर
(सर्व प्रचि आंतरजालावरून साभार)
मस्तच! आणि फोटू गिटू
मस्तच! आणि फोटू गिटू घातल्यानं एकदम तेचबूकचा फील आलाय.
सहीच
सहीच
मस्त यूरोपातले काका आले हो
मस्त
यूरोपातले काका आले हो लक्षात
मस्त जमलय !!!!!
मस्त जमलय !!!!!
बरेच काका नातेवाईक आणि हो,
बरेच काका नातेवाईक आणि हो, सरपंच पण लक्षात आले.
मस्तच!
मस्त जमलंय!........फेसबुकचा
मस्त जमलंय!........फेसबुकचा फील >>>+१००
एक नंबर...
एक नंबर...
मस्त.. लाइकची सोय पाहिजे होती
मस्त.. लाइकची सोय पाहिजे होती पण
लई भारी ! फेसबुकचा फील >>>>
लई भारी ! फेसबुकचा फील >>>> + १
हे मस्त जमलंय !
हे मस्त जमलंय !
हे मस्त झालंय. मेहनत
हे मस्त झालंय. मेहनत केलीय.
काका, आजोबा सही
मस्त!
मस्त!
जंगल जंगल बात चली है पता चला
जंगल जंगल बात चली है
पता चला है,
मोगली तेचबूकपे छा गया है, छा गया है
इसको बोलते है, आॅथेंटीक
इसको बोलते है, आॅथेंटीक तेचबुक ! मस्त.
मजा आली वाचायला.
मजा आली वाचायला.
जबरी!
जबरी!
हे एकदम जबरी ! मस्त जमलय !
हे एकदम जबरी ! मस्त जमलय !
मस्त जमलय..
मस्त जमलय..
शेरखान बेश्ट आहे!! आवडलं
शेरखान बेश्ट आहे!! आवडलं
भारी जमलंय हे ! फोटोंनी आणखी
भारी जमलंय हे !
फोटोंनी आणखी मजा येतेय.
भारंभार आभार सर्वांचे काल
भारंभार आभार सर्वांचे
काल सुचल्यावर लगेच लिहून काढलं आणि आज वेळ मिळल्यावर चित्रं वगैरे डकवली. खाजगी जागेत लेखन अप्रकाशित ठेवायला जमलं नाही म्हणून एक धागाही निघाला चुकून एका चित्राची लिंक घेऊन वर्ड मधे जिथे सगळं लिहून ठेवलं होतं तिथे ती चिकटवली आणि इमेजनेम्स बदलत बदलत गेले. मग ते सगळं लिंकाचलिंका दिसणारं बाड परत माबोवर टाकलं आणि सगळी चित्रे हवी तशी दिसायला लागली. मग शेवटचा हात फिरवला. वर्डवाल्या आयडियेच्या कल्पनेने बरेच कष्टं कमी झाले. तुमच्या कौतुकाने त्याचं पण चीज झालं तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद.
बेस्ट!!
बेस्ट!!
हे फार आवडले! मस्त जमलयं!
हे फार आवडले! मस्त जमलयं!
वावा.
वावा.
मस्त लिखाण.
मस्त लिखाण.
वावा ! यूरोपवाले काका पण कळले
वावा !
यूरोपवाले काका पण कळले आणि डॉक् पण
भारी लिहिलंय..
भारी लिहिलंय..
(No subject)
भारी जमलंय!!
भारी जमलंय!!
(No subject)
Pages