गणपती बाप्पा मोरया!
सोशल नेटवर्किंग हा शब्द सध्या मायबोलीसारख्या संकेतस्थळांपुरता मर्यादित राहिलेला नसून फेसबूक, ट्विटर वगैरेंच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण आहे. हल्ली टीव्हीवरही ब्रेकिंग न्यूजमध्ये कुण्या प्रसिद्ध व्यक्तीने त्याच्या फेसबूकवर, ट्विटरवर काय विधान केलं, त्याचे काय पडसाद उमटले याचीही चर्चा असते. चटपटीत गॉसिपसाठी लोकांना हे एक नवीन खाद्य मिळालेलं आहे. हीच संकल्पना वापरून आपण यंदा मायबोलीवर गणेशोत्सवात धमाल करणार आहोत.
साहित्य, सिनेमा, नाटक, टीव्हीमालिका वगैरे माध्यमांतून अनेक व्यक्तिरेखा आपल्या मनात घर करून बसल्या आहेत. मग तो पुलंचा गटणे असो वा शोलेचा गब्बर! आपल्याला त्यांची नुसती तोंडओळख नाही तर अमूक प्रसंगात ती पात्रं कशी वागतील याचाही आपण कल्पनाविलास करू शकतो. आता हे लोक आपल्याशी संवाद साधतील त्यांचं 'तेचबूक' अकाऊंट उघडून! ही पात्रं त्यांचं तेचबूक स्टेटस अपडेट करताना काय लिहितील, एखादा फोटोही टाकू शकतील (प्रताधिकारमुक्त!), 'चेक्ड ईन अॅट' लिहू शकतील, कुणाला टॅग करु शकतील, फीलिंग नॉटी, बॅड, फॅन्टास्टिक म्हणतील... थोडक्यात तुम्ही आम्ही जे जे आपापल्या फेसबूकवर करतो ते सगळं ही काल्पनिक मंडळी त्यांच्या 'तेचबूक'वर करतील! हे इथेच संपत नाही.. थांबा, खरी मजा तर पुढेच आहे! यांच्या अपडेट्सवर त्यांना किती लाईक्स् आले हे तर तुम्ही लिहालच. पण त्यांची दोस्तमंडळी, अर्थात फ्रेंड्लिस्टमध्ये कोण असेल हेही तुम्हीच ठरवून टाकायचं आहे. आणि ही दोस्तमंडळी आपल्या मित्राला काय काय गंमतीशीर कमेंट्स् देतील, तेही लिहायचं आहे! लक्षात ठेवा, ही दोस्तमंडळीही अशीच काल्पनिक परिचयाची असायला हवीत, एवढीच अट! त्यांचे हावभाव दाखवण्यासाठी मायबोली स्मायलींचा वापर तुम्ही मुक्तहस्ते करु शकता!
कल्पना येण्यासाठी पुढील प्रवेशिकेचं उदाहरण वाचा बरं!
तेचबूक! - फास्टर फेणे
स्टेटस अपडेट :
काल रात्री पुण्याला मामाकडे आलो खरा, पण सकाळी लक्षात आलं की, बाबांचं पार्सल काहीही करुन साहित्य सहवासला पोहोचवायचंच आहे आज. बाहेर निघालो, तर चपला बन्या जोशी घालून गेलेला. मग काय सरकवल्या घरमालकांच्या चपला पायात आणि मारली सायकलला टांग!
२७ लाईक्स.
विश्वासराव सरपोतदार :हा शुद्ध हलकटपणा आहे फेणे.
मोगॅम्बो :मोगॅम्बो खुश हुआ!
इन्स्पेक्टर महेश : डॅम इट! ते पार्सल साहित्य सहवासला पोचता कामा नये!
धनंजय माने : अर्रर! दोन्ही चपला सारख्या आहेत का? मालक काल देवळात गेले होते.
..
नियमावली -
१) ज्या पात्राच्या नावाने प्रवेशिका आहे ते पात्र खर्या आयुष्यात कधीही अस्तित्वात असायला नको. तुम्ही पुस्तक, चित्रपट किंवा मालिका यांमधले कोणतेही पात्र निवडू शकता, फक्त ते काल्पनिक पात्र हवे. (उदा. 'आय डेअर' पुस्तकातल्या 'किरण बेदी' किंवा 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातले मिल्खाजी किंवा राऊ मालिकेतले 'बाजीराव पेशवे' ह्या व्यक्तिरेखा चालणार नाहीत. 'गारंबीचा बापू'मधला 'बापू', 'झपाटलेला' चित्रपटातला 'तात्या विंचू' किंवा 'होणार सून मी या घरची'मधली 'जान्हवी' या व्यक्तिरेखा चालतील.)
१.अ) रामायण, महाभारतातल्या तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखांच्या प्रवेशिका चालतील.
ब) मायबोली आयडीवर प्रवेशिका चालणार नाही.
क) प्रवेशिका डिलिट किंवा बाद करण्याचे सर्वाधिकार संयोजक मंडळाकडे असतील.
२) लेखन विनोदी हवे.
३) शब्दमर्यादा नाही!
४) प्रत्येक आयडीला एकच प्रवेशिका देता येईल.
५) ही स्पर्धा आहे.
वाटतंय ना मजेशीर? तर मग घ्या पाहू लिहायला तुमची प्रवेशिका!
स्पर्धेत भाग कसा घ्याल?
'तेचबूक!' स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवीन लेखनाचा धागा उघडावा लागेल.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून (१७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत (२७ सप्टेंबर २०१५, अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) प्रदर्शित करायच्या आहेत. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१५' पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य झाला आहात.
२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ग्रूप मधील 'गप्पांचे पान', 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नका. )
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
"तेचबूक! - तुम्ही निवडलेल्या पात्राचे नाव".
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये "तेचबूक!" आणि "मायबोली गणेशोत्सव २०१५" हे शब्द लिहा.
५. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
६. Saveची कळ दाबा.
७. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल, तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
८. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पद्धतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंत चतुर्दशीनंतर उघडण्यात येईल.
मस्त उपक्रम! मोरया!
मस्त उपक्रम!
मोरया!
लिहिता येइल की नाही महित नाही
लिहिता येइल की नाही महित नाही , पण वाचायला धम्माल येइल
गारंबीचा बापू'मधला 'बापू',
गारंबीचा बापू'मधला 'बापू', 'झपाटलेला' चित्रपटातला 'तात्या विंचू' किंवा 'होणार सून मी या घरची'मधली 'जान्हवी' या व्यक्तिरेखा चालतील.>>> नक्को... मागच्या वर्षी मराठी मालिकेमधल्या कॅरेक्टर्सवरच बहुतेकांनी लिहिलं होतं. याहीवर्षी त्याच त्याच कॅरेक्टर्सवर नको (आपल्या दुर्दैवानं त्या मालिका वर्षभर चालूच आहेत
)
काहीतरी भन्नाट आणि चक्रावणारं वाचायला मिळू देत ही अपेक्षा. उपक्रम भारीये.
नंदे, उदाहरण आहे गं ते मस्त
नंदे, उदाहरण आहे गं ते
मस्त आहे हे
वाचायला आवडेल आणि १० दिवसात लिहयलाही स्फुर्ती मिळेलच याची खात्री आहे 
भारीये हे फा.फे.चं उदाहरण पण
भारीये हे
फा.फे.चं उदाहरण पण ब्येस्ट ! पटकन काही सुचलं तर इथे लिहिणार! नाहीतर दररोज आधी या स्पर्धेचं पान उघडून वाचणार
पौराणिक पात्र चालतील का?
पौराणिक पात्र चालतील का?
फाफेचं उदाहरण आवडलं. इथे
फाफेचं उदाहरण आवडलं. इथे वाचायला मजा येईल.
हे मस्त वाटलं आपल्या झेपेल
हे मस्त वाटलं आपल्या झेपेल असं.
खूप छान आणि सहज सोपे.
खूप छान आणि सहज सोपे.
लई भारी आहे ही आयडीयेची
लई भारी आहे ही आयडीयेची कल्पना
मस्तय कल्पना.
मस्तय कल्पना.
भारी स्पर्धा आहे ही ! मजा
भारी स्पर्धा आहे ही ! मजा येणार वाचायला.
ही स्पर्धा नक्कीच रंगणार !
ही स्पर्धा नक्कीच रंगणार !
लय भारी होणार हे. वाचायला
लय भारी होणार हे. वाचायला मज्जाच मज्जा!
लिहिता येइल की नाही महित नाही
लिहिता येइल की नाही महित नाही , पण
वाचायला धम्माल येइल+11111111111
अर्रे हे मस्तय! लिहायला सुचेल
अर्रे हे मस्तय! लिहायला सुचेल की नाही माहिती नाही पण वाचायला मज्जाच!
मजा येणार वाचायला..
मजा येणार वाचायला..
मज्जाच मज्जा
मज्जाच मज्जा
मस्त आहे हे ! धमाल येणार
मस्त आहे हे ! धमाल येणार वाचायला.
अरे लिहीलं कुणी तर धमाल येणार
अरे लिहीलं कुणी तर धमाल येणार ना वाचायला?
हमारे हाथ कानून से बंधे हुए है 
हमारे हाथ कानून से बंधे हुए
हमारे हाथ कानून से बंधे हुए है>>> तेच तर, यावर भन्नाट लिहू शकणार्यापैकी ज्युमा तर स्वतःच मंडळात आहेत.
मस्त, कल्पक स्पर्धा. मजा येईल
मस्त, कल्पक स्पर्धा. मजा येईल वाचायला.
वा अभिनव कल्पना! चिमण, मामिं
वा अभिनव कल्पना!
हटके असेल.
चिमण, मामिं यांचे तेचबूक लिखाण वाचायला आवडेल.
रुन्मेष यांनी पण इथे लिहावे. स्वजो,सता यांच्या पिक्चर मधिल पात्रावर आधारित
मस्त उपक्रम व स्पर्धा!
मस्त उपक्रम व स्पर्धा!
भारी आहे ही कल्पना. खूपच
भारी आहे ही कल्पना. खूपच आवडली.
मायबोली आयडी चालतील का?
अरे वा. छान कलपना
अरे वा. छान कलपना
जबराट ह! सयोजक जोरात आहेत,
जबराट ह! सयोजक जोरात आहेत, लेट पण थेट काम दिसतय.
रामायण-महाभारतातल्या
रामायण-महाभारतातल्या व्यक्तिरेखा चालतील का?
(म्हणजे ती खरी माणसं होती की नव्हती ते संयोजकांनी नक्की सांगावं. :P)
अॅक्सेप्टेड
अॅक्सेप्टेड
जबराट ह! सयोजक जोरात आहेत,
जबराट ह! सयोजक जोरात आहेत, लेट पण थेट काम दिसतय.
>>>>>>>>> +१०००
Pages