साहित्य
बडीशोप- ३ वाट्या
ओवा- ३/४ वाटी
लवंग-अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट)- १ वाटी
तीळ- १ वाटी
ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी
मीठ आणि साखर- चवीपुरते.
कृती
शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.
तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिक्सर मधे बारीक कूटून घ्याव्या.
कूटलेल्या मिश्रणात भाजलेले तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर टाकावी. चवीला किंचित साखर आणि मीठ टाकावे. यात सुपारी नसल्यामुळे लहान मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही , उलट त्यांना पाचक म्हणून चांगलंच आहे.
यात रंगीत शोपेच्या गोळ्या पण टाकु शकता. मस्तं लागतात.
माहितीचा स्रोत: माझ्या सासूबाई.
अरे वा. मस्त. रंगीत गोळ्या न
अरे वा. मस्त. रंगीत गोळ्या न टाकता आवडेल.
हो, खरंतर मी पण नाही टाकत पण
हो, खरंतर मी पण नाही टाकत पण माझ्या मुलींना आवडतं म्हणून त्यांच्यापूरती वेगळी काढून त्यात टाकते.
मस्त! भारत भेटीत माझ्या
मस्त!
भारत भेटीत माझ्या जावेकडे अशाच प्रकारची सुपारी खाल्ली. तिने खोबरे घातले नव्हते.
छान फोटो .. मी पण अशीच करते,
छान फोटो .. मी पण अशीच करते, जिन्नस थोडे कमी जास्त इतकेच ..
मस्तच.. पण सुपारी नै तर
मस्तच..
पण सुपारी नै तर शीर्षकात सुपारी का लिहिलय ?
टीना मसाला सुपारी म्हणजे
टीना
मसाला सुपारी म्हणजे ज्यात आक्चुयल सुपारीची ( बीटल नट) पूड असते ती मसाला सुपारी. खरंतर या माझ्या रेसिपी मधे ही सुपारीची पूड मी टाकलेली नाहीये म्हणजे शब्दश: बघितलं तर तुझा प्रश्न बरोबर आहे. पण आमच्या घरी याला सुपारीच म्हणतात. दूसरं नाव कधी लक्षातच नाही आलं.म्हणून इथेही तेच नाव दिलं.
पद्मावती, मस्तं
पद्मावती, मस्तं पाकृ.
तुम्हाला सुपारी म्हणायचं नसेल तर मुखवास किंवा मुखशुद्धी म्हणू शकता याला.
सुंदर. Gharee kelee tar
सुंदर. Gharee kelee tar bharapur hote.
मस्त लागते ही. बचकभर खाल्ली
मस्त लागते ही. बचकभर खाल्ली तरी काही अपाय नाही
काय सुबकतेने मांडलेत घटक
काय सुबकतेने मांडलेत घटक पदार्थ.. सुंदर प्रेझेंटेशन!
मस्तच.. काय सुबकतेने मांडलेत
मस्तच..
काय सुबकतेने मांडलेत घटक पदार्थ..>>>++११
सुंदर फोटो आणि मस्त लागत
सुंदर फोटो आणि मस्त लागत असणार ही सुपारी.
अशी सुपारी 'सुपारीविना सुपारी' अशा नावानेही प्रसिद्ध आहे
ओहो छानच.. मी धनिया दाल + ओवा
ओहो छानच..
मी धनिया दाल + ओवा + सोप + मिठ + साखर + थंडाई अस सगळ भाजुन मिक्सी मधे फिरवते..छान लागत ते सुद्धा.. झाल तर प्रचि टा़केल नंतर..
सर्व प्रतिसादांचे मन:पूर्वक
सर्व प्रतिसादांचे मन:पूर्वक आभार.
साती आणि अगो पर्यायी नावं खूप छान दिलित. टीना प्रचि जरूर दे.
मस्त. करून पहायला हवी.
मस्त. करून पहायला हवी.
मस्त आहे. फोटोही सुंदर. अगो
मस्त आहे. फोटोही सुंदर.
अगो बरोबर, सुपारीविना सुपारी ह्या नावाने मिळते अशी सुपारी.
मस्त पाककृती. फोटोही छान
मस्त पाककृती. फोटोही छान आहेत.
मी केली ह्या पद्धतीने छान
मी केली ह्या पद्धतीने छान झाली
मला हवी होती पाककृती. करून
मला हवी होती पाककृती. करून बघेन. धन्यवाद.
या पद्धतीने फक्त तीळ न घालता
या पद्धतीने फक्त तीळ न घालता केली. छान चव आहे. धन्यवाद
मला आवर्जून कळवल्याबद्दल मन
मला आवर्जून कळवल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद leenas आणि वेका. खूप दिवसांनी आले इथे म्हणून उत्तर द्यायला उशीर झाला, सॉरी. सगळ्या प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार ___/\___
वाह, खूप छान रेसिपी, सोप्पी
वाह, खूप छान रेसिपी, सोप्पी आणी चविष्ट
छान
छान