मला नेहमी तोंड येते. तसे जन्मतःच तोंड आहे, जे मी खाण्या व बोलण्यासाठी वापरतो. हे तोंड येणे म्हणजे इंग्रजीतले mouth ulcers. आमच्या फ्यामिली डॉक्टरला विचारल्यावर ते बोलले की काही विशेष नाही, मलाही येतेच अधून मधून. बी कॉम्प्लेक्स च्या कमतरतेमुळे होते असे कधी कधी. वारंवार असे तोंड येऊन तुम्हाला कॉम्प्लेक्स येत असेल तर सरळ बीकॉसूल च्या गोळ्या रात्री जेवण झाल्यावर घ्या. तसे मी घेऊ लागलो. नंतर ते म्हणाले की पोट साफ नसल्यास सुद्धा असे होऊ शकते. तेव्हा अधून मधून एरंडेल पण घ्या.
तर नमनाला चमचाभर एरंडेल झाल्यावर आता मुद्द्याकडे वळतो.
मी महिन्यातून एकदा एक चमचा एरंडेल लिंबू सरबतात मिसळून घेतो. तसं पिताना शेवटी शेवटी कसेसेच होते. मग गुगल केल्यावर समजले की चहात घालून प्यायल्याने जरा कमी त्रास होतो. पण त्या पद्ध्तीने सुद्धा कसेसे होतेच !
कृपया कोणाकडे एरंडेल अजून कोणत्या प्रकारे घ्यावे, त्याचे अजून काय फायदे असतात याची माहिती असल्यास इकडे शेअर करावी.
काय बी धागे काढता राव तुम्ही
काय बी धागे काढता राव तुम्ही बी...
.
.
एरंडेलात इसबगोल घालुन घ्या.
एरंडेलात इसबगोल घालुन घ्या. तोंड साफ, 'तोंद' ही साफ!
भाऊ _/\_
भाऊ _/\_
भ्रमा
भ्रमा
डोक्याचा भुगा झाल्यावर तो
डोक्याचा भुगा झाल्यावर तो भुगा वरवंट्याखाली भरडल्यावर एरंडेल तेल निघते. आणि तुम्हाला फुकटात त्याचे फायदे हवेत, काय बी!
इसबचौकोन, इसबषटकोन, झालच तर इसबवर्तुळ घेऊन पहा.
हे घ्या ... इथे अजून भरपूर
हे घ्या ... इथे अजून भरपूर माहिती मिळेल
http://www.marathimati.com/Health/erandel.asp
एरंडेल तेल गव्हाला चोळुन दळुन
एरंडेल तेल गव्हाला चोळुन दळुन आणने व त्या पिठाच्या पोळ्या खाणे.
पिठीसाखर चमच्यात घेऊन त्यावर
पिठीसाखर चमच्यात घेऊन त्यावर तेलाचे थेंब टाका.ती भिजलेली साखर खा.
एरंडेल नको असेल तर बाळहरडे नावाचे कच्चे हिरवे हिरडे वाळवलेलेअसतात ते काळे टणक असतात.हे हिरडे तुपावर अथवा एरंडेल तेलावर कढईत भाजले की फुलतात ( फुगतात ).ते सुपारीसारखे कुरकुरीत लागतात ते तीन चार खा.एकदा करून बॅाटलमध्ये भरून ठेवता येतात,न्यायला सोपे,पोट साफ होते पण पातळ जुलाब होत नाहीत.
एरंडेल तेल गव्हाला चोळुन दळुन
एरंडेल तेल गव्हाला चोळुन दळुन आणने व त्या पिठाच्या पोळ्या खाणे.
<<
यापेक्षा, कणिक भिजवताना त्यात चमचाभर टाकता येते.
कॉलेजात असताना फार्मसीत कॅस्टर ऑईल इमल्शन नामक प्रकार तयार करायला लागे. यात गम अकॅशिया उर्फ बाभळीच्या डिंकात आधी थोडे पाणी मग नंतर थेंबथेंब कॅस्टरऑईल (एरंडेल तेल) टाकून मॉर्टरपेसल उर्फ चिनीमातीच्या खलबत्त्यात भ-यं-क-र जोरात फेटावे लागे. याने एरंडेल तेलाचे दुधासारखे इमल्शन तयार होई. ज्यात एरंडेलाची चव लागत नसे. (कॉलेजातील फार्मसी हा डायरेक्ट पोशन्सचा क्लास होता... फुल नॉस्टाल्जिआ) अंडे फेटून मेयोनिजसारखे इमल्शनही तयार करण्याची कृती नेटवर आहे.
याप्रकारचे इमल्शन रेडीमेड मिळते की नाही कुणास ठाऊक. विचारून पहा.
तोंड आल्यासाठी पोट साफ करायला वेगवेगळी चूर्णे वा इसबगोलही घेऊ शकता. एरंडेलच घ्यायला हवे असे काहीही नाही.
यापेक्षा, कणिक भिजवताना त्यात
यापेक्षा, कणिक भिजवताना त्यात चमचाभर टाकता येते. >>>अरे हो की
कुठेतरी वाचलेल तसेच लिहिल गेल.
मला नेहमी तोंड येते. तसे
मला नेहमी तोंड येते. तसे जन्मतःच तोंड आहे, जे मी खाण्या व बोलण्यासाठी वापरतो. >>>>>>:हहगलो:
एरंडेल तेल (चमचाभर) + लिंबाचा
एरंडेल तेल (चमचाभर) + लिंबाचा रस (चमचाभर) एवढेच घेऊनही पाहू शकता. एरंडेल तेलाचा गिळगिळीतपणा लिंबाच्या शार्प चवीने व गंधाने जरा सुसह्य होतो. आज्जी हे असे एरंडेल तेल + ताजा लिंबू रस काँबो मी लहान असताना चार-पाच महिन्यांतून एकदा पहाटे उठवून प्यायला द्यायची. मग हवे असेल तर गरम पाणी प्यायचे. पोट साफ होईपर्यंत काही खायला मिळायचे नाही. मग गरम लिंबूपाणी. दिवसभर आसट गुरगुट्या भात तूप मीठ किंवा आठपट पाण्याचा भात यांवर काढायला लागे. रात्री मूग डाळ घालून केलेली तांदळाची मऊसर खिचडी व तूप. त्या दिवशी पोटाला जास्तीत जास्त आराम देण्यावर भर असे.
एरंडेल लिक्विड स्वरुपात न
एरंडेल लिक्विड स्वरुपात न घेता त्याच्या ट्यबलेट घेऊ शकता .गंधर्व हरितकी नावाने आयुर्वेद मेडिकल दुकानात मिळतात.
एरंडोल गावी जाऊन एरंडेल
एरंडोल गावी जाऊन एरंडेल प्यायले तर विशेष फरक पडेलसे वाटते.
-गा.पै.
एरंडेल तेल लहान कपात हवाय
एरंडेल तेल लहान कपात हवाय तेवढ घेवून शेजारी एका बशीत मीठ आणि आल्याचा तुकडा ठेवावा. तेल पटकन पिवून लगेच वर मिठात बुडवलेला आल्याचा तुकडा खाल्ला कि तोंडात तेलाची चव अजिबात राहत नाही आणि मळमळत नाही. एरंडेल तेलाने शरीरातली उष्णता कमी होते अस म्हणून आई घ्यायाला लावायची.