सस्नेह नमस्कार! सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू होत आहे त्याची माहिती देत आहे.
मागील कामाचा आढावा :
गेली चार वर्षे मेळघाटामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांसाठी अभ्यासपूरक अनेक उपक्रम घेत आहोत. आपली त्यांच्याबरोबर चालू असलेली ही ‘मैत्रीशाळा’ च आहे. गावामधील थोडेसे शिकलेले तरुण, (प्रत्येकी एक ) ज्यांना आपण ‘गावमित्र’ म्हणतो, संपुर्ण शैक्षणिक वर्षात (जुलै ते एप्रिल) शाळा भरण्याच्या आधी मुलांना जमा करुन त्यांचे शाळेचे शिकणे सोपे व्हावे यासाठी काम करतात. काय काय करतात ते?
• सगळ्यात महत्वाचे म्हणजे शाळेत नियमित येण्याची सवय लावणे. सुरुवातीला गावमित्राला पाहून पळून जाणारी मुले आता मात्र एका हाकेसरशी किंवा गावमित्राला जाताना पाहून शाळेत हजर होतात.
• इथल्या मुलांची मातृभाषा आहे कोरकू आणि शाळेचे माध्यम मात्र मराठी. त्यामुळे भाषेचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने गावमित्र त्यांना विविध साधने वापरून, खेळ खेळत त्यांना शिकवतात.
• पुण्यामधून स्वयंसेवकांची एकेक तुकडी आपण पाठवतो या गावमित्रांच्या मदतीसाठी. शिकवण्याबरोबरच हे स्वयंसेवक गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्याचे उपक्रम करतात. गेल्या वर्षी गावामध्ये फलक लावणे, गावनकाशा बनवणे, परसबाग करणे, शाळेत मुलांकडून प्रदर्शन मांडणे, जुन्या कथा मुलांकडून जमा करणे असे उपक्रम स्वयंसेवक व गावमित्रांनी मिळून केले.
• दिवाळीच्या सुट्टीमध्ये चिलाटी व सलिता अशा मेळघाटातील दोन ठिकाणी आपण मुलांसाठी आनंदमेळावा घेतला. प्रत्येक ठिकाणी सरासरी 90मुले सहभागी झाली. योगासने, प्राणायाम, प्रार्थना, थोडा अभ्यास, गाणी, गोष्टी, खेळ, विविध सर्जनशील कृती असे हे आनंदाचे शिबिर होते. पुण्यामधून 10 स्वयंसेवक त्यासाठी गेले होते.
• गेली दोन वर्षे युवक युवतींकरता युवा शिबिर घेतो आहोत. दहावी/ बारावी नंतर काय करता येईल, व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवणे, पोशक आहार, ताणतणावांवर मात, व्यवसाय मार्गदर्शन अशा विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे तसेच विज्ञान प्रयोग, गटचर्चा असे विविध कार्यक्रम यात होतात.
• शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिक अशी सर्व प्रकारची मंडळी स्वयंसेवक म्हणून मेळघाटात जातात आणि शिकवण्याबरोबरच त्यावेळी तिथे गरज असेल ती कामे करतात. हे सगळे स्वत:चा खर्च करुन मेळघाटात येतात आणि राहणे-जेवण याची अगदी साधीशी सोय असलेल्या ठिकाणी उत्तम काम करतात.
• स्वयंसेवक आणि गावमित्र यांच्यामध्ये असतात आपले मैत्रीचे मेळघाटातील प्रकल्प समन्वयक, चिलाटीमधील कार्यकर्ते आणि पुण्यामधील समन्वयक. या सगळ्यांच्या सहभागानेच प्रकल्प पुढे जात आहे, आकार धारण करतो आहे.
• मे च्या शेवटच्या आठवड्यात गावमित्रांबरोबर तीन दिवसाचे एक आढावा व नियोजन शिबिर अमरावती मध्ये आपण घेतले. गावमित्रांमध्ये झालेला बदल लक्षणीय आहे. मराठी भाषा हा जसा मुलांना अडथळा आहे तसाच गावमित्रांसाठीही तो होता. मराठी भाषा समजली तरी बोलताना त्यांना खूप अडचणी यायच्या. आता मात्र ते मराठीमधून छान संवाद करु लागले आहेत. मुलांबरोबरचे त्यांचे नाते पण चांगले तयार झाले आहे. गावातील लोकांचाही गावमित्रांवरचा विश्वास वाढला आहे त्यामुळे आता ख-या अर्थाने ते ‘गावमित्र’ झाले आहेत. कोणत्याही अडचणीच्या वेळी धावून जाणे, आरोग्याच्या कामात मदत करणे, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये भाग घेणे अशा विविध जबाबदा-या ते उचलत आहेत.
• आपण काम करत नसलेल्या गावांमधूनही लोकांची मागणी आहे की शाळेबरोबरचे काम आमच्याकडे सुरु करा. नवीन गावात शक्य तोवर गावमैत्रिण शिक्षणाच्या कामासाठी निवडायची असे आपण ठरवले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अधिक कार्यक्षम होईल याकडे विशेष लक्ष देणार आहोत.
नव्या शैक्षणिक वर्षात (२०१५-१६) मैत्री शाळेचे वेळापत्रक असे
स्वयंसेवकांची बॅच पुण्याहून निघून पुण्यात पोचायच्या तारखा
१. पहिली बॅच - २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर (२६ तारखेला पुण्यातून निघायचे, मेळघाटातून ३ तारखेला निघून ४ तारखेला पुण्यात परत )
२. दुसरी बॅच - २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर ( २४ तारखेला पुण्यातून निघायचे, मेळघाटातून ३१ तारखेला निघून १ तारखेला पुण्यात परत )
३. तिसरी बॅच - १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर ( ही बॅच फुल्ल झाली आहे )
४. चौथी बॅच - २४ डिसेंबर ते १ जानेवारी (२४ तारखेला पुण्यातून निघायचे, मेळघाटातून ३१ तारखेला निघून १ तारखेला पुण्यात परत)
५. पाचवी बॅच - २३ जानेवारी ते ३१ जानेवारी (२३ तारखेला पुण्यातून निघायचे, मेळघाटातून ३० तारखेला निघून ३१ तारखेला पुण्यात परत)
६. सहावी बॅच - २७ फेब्रुवारी ते ६ मार्च (२७ तारखेला पुण्यातून निघायचे, मेळघाटातून ५ तारखेला निघून ६ तारखेला पुण्यात परत)
७. सातवी बॅच - २ एप्रिल ते १० एप्रिल (२ तारखेला पुण्यातून निघायचे, मेळघाटातून ९ तारखेला निघून १० तारखेला पुण्यात परत)
(एखाद्यावेळी या वेळापत्रकात बदल होऊ शकतो)
मेळघाटात जाणार्या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण
तुम्ही जाण्याच्या आधीच्या महिन्यात एका रविवारी प्रशिक्षणाकरता किमान ३ तास यायचे आहे. तुम्ही मेळघाटात गेल्यानंतर काय काय करायचे आहे याबद्दल यावेळी सांगितले जाणार आहे, त्यामुळे हे चुकवू नये. तुम्ही भरून आणायच्या अहवालाचे नमुने तुम्हाला दिले जाणार आहेत. कदाचित तिथे नेण्याकरता काही साहित्य पण तुमच्या बरोबर दिले जाईल.
प्रत्यक्ष काम
मेळघाटात पोहोचणे
स्वयंसेवक, संध्याकाळच्या गाडीने पुण्यामधून निघतील. दुसर्या दिवशी सकाळी ते परतवाडा येथे पोहोचतील आणि सकाळच्या 9 च्या एस. टी. बसने चिलाटीकडे निघतील. चिलाटीला दुपारी 1:30- 2:00 पर्यंत पोहोचतील.
प्रत्यक्ष काम
मुलांना शाळेत जाऊन शिकवणे
मुलांना बरोबर घेऊन गावमित्रांच्या मदतीने गावामध्ये काही काम करणे (शिक्षणाला पूरक असे)
मुलांना गाणी शिकवणे, गोष्टी वाचून दाखवणे
गावमित्रांना काही प्रमाणात मार्गदर्शन करणे
पुण्यात परत येणे
निघण्याच्या दिवशी सकाळी तुम्ही परत येण्याकरता चिलाटीमधून निघाल. त्याच दिवशी संध्याकाळी / रात्री परतवाडा/अमरावती मधून बस /आगगाडीने निघून दुसर्या सकाळी पुण्यात पोहोचाल. चिलाटीला तयार केलेला अहवाल परत आल्यानंतर लगेच दुस-या दिवशी ‘मैत्री’ कार्यालयात पाठवावेत. (कोणी एकाने सर्वांचे आणून दिले तरी चालतात). प्रत्यक्ष येऊन देणे शक्य नसेल तर स्कॅन करुन इमेल द्वारा पाठवावेत. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी हे काम आठवणीने करावे.
आल्यानंतरच्या रविवारी सकाळी जाउन आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी ‘मैत्री शिक्षण’ गटाच्या बैठकीला यावे असे अपेक्षित असते. त्याच दिवशी पुढच्या महिन्यात जाणाऱ्या नवीन बॅचची मंडळी पण हजर असतात. त्यायोगे आपला अनुभव व अभिप्राय त्यांना ऐकायला मिळतो. असे केल्याने तिकडे जाणाऱ्या नवीन स्वयंसेवकांना त्या त्या वेळच्या स्थितीचे नीट आकलन होऊ शकते.
स्वयंसेवकांची नावनोंदणी
• तुमची जाण्याची तारीख निश्चित झाली की ‘मैत्री’ कार्यालयात येऊन तुम्ही तुमची माहिती एका संमतीपत्रात भरून द्यायची आहे. त्याचवेळी तुम्ही नवीन असाल तर मेळघाटाविषयीची माहिती तसेच तिथे काय करायचे, काय टाळायचे हे तुम्हाला सांगितले जाईल.
• तुमचे जाण्यायेण्याचे तिकीट पण लवकरात लवकर काढावे. तसेच मेळघाटामधील राहणे व जेवणाचे शुल्क दर दिवशी रु. १०० /- याप्रमाणे प्रत्येकाने कार्यालयात जमा करावे.
• ‘मैत्री’ कार्यालयात नावनोंदणी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे सोम. ते शुक. 10:00 ते 5:00 किंवा शनिवारी 9:00 ते 12:00 या वेळात केव्हाही तुम्ही जाऊन हे करावे.
संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ ( लीनता ),
अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१
MAITRI : 32, ‘Kalyan’, Nataraj Society, Karvenagar, Pune 411052.
Phone: +91-20-25443134, Office: +91-20-25450882
Email : maitri1997@gmail.com
Regn. No.: E 2898/PUNE.
नेहेमी प्रमाणेच ह्याही वर्षी अनेक मायबोलीकरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख कृतज्ञतापुर्वक करणे औचित्यपुर्ण वाटते. अजूनही असे मायबोलीकर अनेक आहेत ज्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो नाहीये. त्या सर्व हितचिंतकांना भेटण्यास मी व मैत्री परिवार उत्सुक आहोत. त्याच बरोबर मी सर्वच मायबोलीकरांना आवाहन करतो की त्यांनी पुणेस्थित मैत्री-कार्यालयाला जरूर भेट द्यावी.
मायबोलीवर असलेले याआधीचे लेख
http://www.maayboli.com/node/49640
http://www.maayboli.com/node/39286
http://www.maayboli.com/node/44146
http://www.maayboli.com/node/45066
http://www.maayboli.com/node/49301
मायबोलीकरांनो, मान्य आहे सगळ्यांनाच तिकडे जायला जमेल असे नाही तरीपण तुम्हाला मदत करायची ईच्छा आहे तर मेळघाटात न जाता तुम्ही कशी मदत करु शकाल/ कसे सहभागी व्हाल?
स्वयंसेवक म्हणून पुण्यातच सहभागी होऊन – पुण्यातील शिबिरामध्ये मदतीसाठी येणे, शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी मदत करणे, अमरावती अथवा पुण्यामध्ये प्रशिक्षण शिबिरांकरता जागा/जेवणाची व्यवस्था करणे, आपल्याकडील एखादे कौशल्य गावमित्रांना शिकवणे (फलक लेखन, गोष्ट वाचन, हस्ताक्षर, संवाद कौशल्य इ.)
शैक्षणिक साहित्य देऊन – 200 पानी एकरेघी वही, पेन्सिल इ. किंवा स्केचपेन/ रंगीत पेन्सिली, रंग, तेली खडू (क्रेयॉन) इ. किंवा जाड कागद (कार्डशीट),कोरे/ पाठकोरे कागद, ओरिगामी कागद, कात्र्या, फेव्हिकॉल इत्यादी
वाचनपेटी करता पुढील मदत करुन– गोष्टींची पुस्तके, चित्रांची पुस्तके, Children Activity books, मासिकांची (किशोर, चंपक, ठकठक इ.) वर्गणी मेळघाटातील एका/ अधिक गावांसाठी भरणे, स्टीलची पेटी घेण्याकरता आर्थिक मदत देणे
आर्थिक मदत करुन – गावमित्रांचे मानधन, प्रशिक्षण, शिबिरे, छपाई याकरता आर्थिक मदत लागते. तुम्ही त्यात यथाशक्ती हातभार लावावा. (एका मुलासाठी एका वर्षाकरता अंदाजे रु. 3500/- इतका खर्च येतो.)
उत्तम उपक्रम! धाग्याचा दुवा
उत्तम उपक्रम! धाग्याचा दुवा फेबुवर व मित्रमंडळींत शेअर करत आहे. उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद अकु. तर
धन्यवाद अकु.
तर मायबोलीकरांनो, मान्य आहे सगळ्यांनाच तिकडे जायला जमेल असे नाही तरीपण तुम्हाला मदत करायची ईच्छा आहे तर तुम्ही कशी मदत करु शकाल/ कसे सहभागी व्हाल?
स्वयंसेवक म्हणून पुण्यातच सहभागी होऊन – पुण्यातील शिबिरामध्ये मदतीसाठी येणे, शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी मदत करणे, अमरावती अथवा पुण्यामध्ये प्रशिक्षण शिबिरांकरता जागा/जेवणाची व्यवस्था करणे, आपल्याकडील एखादे कौशल्य गावमित्रांना शिकवणे (फलक लेखन, गोष्ट वाचन, हस्ताक्षर, संवाद कौशल्य इ.)
शैक्षणिक साहित्य देऊन – 200 पानी एकरेघी वही, पेन्सिल इ. किंवास्केच पेन/ रंगीत पेन्सिली, रंग, तेली खडू (क्रेयॉन) इ. किंवा जाड कागद (कार्डशीट),कोरे/ पाठकोरे कागद, ओरिगामी कागद, कात्र्या, फेव्हिकॉल इत्यादी
वाचनपेटी करता पुढील मदत करुन– गोष्टींची पुस्तके, चित्रांची पुस्तके, Children Activity books, मासिकांची (किशोर, चंपक, ठकठक इ.) वर्गणी मेळघाटातील एका/ अधिक गावांसाठी भरणे, स्टीलची पेटी घेण्याकरता आर्थिक मदत देणे
आर्थिक मदत करुन – गावमित्रांचे मानधन, प्रशिक्षण, शिबिरे, छपाई याकरता आर्थिक मदत लागते. तुम्ही त्यात यथाशक्ती हातभार लावावा. (एका मुलासाठी एका वर्षाकरता अंदाजे रु. 3500/- इतका खर्च येतो.)
धन्यवाद
महत्त्वपूर्ण उपक्रम! हार्दिक
महत्त्वपूर्ण उपक्रम! हार्दिक शुभेच्छा! सर्व कार्यकर्त्यांना नमन.
अत्यंत स्तुत्य उपक्रम!
अत्यंत स्तुत्य उपक्रम! प्रकल्पासाठी शुभेच्छा!
उत्तम उपक्रम. तुझ्याशी यावर
उत्तम उपक्रम. तुझ्याशी यावर सविस्तर बोलून घेईनच नंतर.
प्रकल्पासाठी शुभेच्छा! हर्पेन
प्रकल्पासाठी शुभेच्छा! हर्पेन तुमची दुसरी पोस्ट - मदत कशी करु शकतो- हेडरमधेच टाकाल का?
छान उपक्रम.. यावेळी सामिल
छान उपक्रम..
यावेळी सामिल होता येणार नाही पन पुढे कधी भाग घ्यायला आवडेल..
उपक्रमासाठी शुभेच्छा..
Uttam upakram. He sagaLe
Uttam upakram. He sagaLe mitranmadhe forward katatoy.
धन्यवाद सुजनहो.. मार्गी -
धन्यवाद सुजनहो..
मार्गी - वर्षभरात कधीतरी जमवा.
धन्यवाद मानुषी. नंदीनी
स्वाती २ - मस्त सुचना करतो तसा बदल...
टीना - नातेवाईक / मित्रमंडळामधे ज्यांना तिकडे जमणार असेल अशा लोकांपर्यंत पोहोचव हे लिखाण. कृपया धन्यवाद.
दिनेशदा - धन्यवाद
खूप छान माहिती.
खूप छान माहिती.
खूप चांगले काम आहे.. सर्व
खूप चांगले काम आहे.. सर्व शुभेच्छा! बँक खात्याच्या डीटेल्स दिल्यास मायबोलीकर खारीचा वाटा तिथे पाठवू शकतील .
भारती आणि इतर
भारती आणि इतर मायबोलीकर,
मैत्रीच्यउपक्रमानांना आर्थिक मदत करण्यासाठी खालील लिंक पहा. त्यात बॅन्केचे डिटेल्स आणि मैत्रीकडून देणगीची पावती मिळण्यासाठी काय माहिती पाठवायची ते सविस्तर दिले आहे. http://www.maitripune.net/PlusYou_contribute.html
धन्यवाद बी, भारती आणि स्वाती२
धन्यवाद बी, भारती आणि स्वाती२
सोम. ते शुक. 10:00 ते 5:00
सोम. ते शुक. 10:00 ते 5:00 किंवा शनिवारी 9:00 ते 12:00 << ह्या वेळात तिथे संपर्क करणे मला थोडे अवघड आहे. माझी ऑफिस ची वेळ ९ ते ६.३० आणि चिंचवड ला असल्या मुळे.
अन्य काही योजना करता येईल का तिथे मदत पोहोचवण्यासाठी. मला शैक्षणीक साहित्य द्यायचे आहे तसेच माझ्याकडे काही पाठकोरे पेपर आहेत त्याचे लहान पॅड मी बनवून देवू शकतो.
स_सा - सर्वप्रथम धन्यवाद.
स_सा - सर्वप्रथम धन्यवाद. आपल्याला कोणा मार्फत ही मदत पाठवता येणार नाही का?
किंवा चालणार असेल तर एखाद्या संध्याकाळी अथवा सुट्टीच्या दिवशी आपण भेटू शकतो आणि मग ते साहित्य मी पुढे देऊ करेन. पाठकोर्या कागदा पासून पॅड बनववण्याची कल्पना मस्तच आहे. पण न जमल्यास ते कागद तसेच दिले तरी चालतील. असे कागद आम्ही (ए-४ आकाराचे असलेले) तर चित्र काढण्याकरता देखिल वापरतो.
उत्तम उपक्रम फेसबुकवर शेअर
उत्तम उपक्रम फेसबुकवर शेअर करत आहे.
हर्पेन, दर वर्षीप्रमाणेच
हर्पेन,
दर वर्षीप्रमाणेच उत्तम उपक्रम! मित्रमंडळींमध्ये लिंक शेअर करत आहे.
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!
स्तुत्य उपक्रम:)
स्तुत्य उपक्रम:)
धन्यवाद शोभनाताई, मो आणि
धन्यवाद शोभनाताई, मो आणि बाळाजीपंत
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
हर्पेन मस्त उपक्रम. अरे
हर्पेन मस्त उपक्रम.
अरे लोकांना इतर अनेक उद्योग (वादविवादाचे धागे) असल्याने ह्या ध्याग्याला फार महत्व नाही.
अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू
अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू आहे. छान माहिती दिलीत.
धन्यवाद वेका, धन्यवाद कापो,
धन्यवाद वेका,
धन्यवाद कापो, चालायचंच ....
झगमगाटाचेच राज्य आहे. एक भुईनळा संपला की दुसरा तयारच असतो पण ते सगळे म्हणजे औट घटकेची करमणूक म्हणून ठीके. कारण उर्जा खूप व्यतीत होते पण चिरस्थायी प्रकाशाकरता त्याचा काही उपयोग नाही.
सगळ्या झगमगाटात लोकांनी आमच्या मिणमिणत्या पणतीकडे दुर्लक्ष करू नये इतकं मात्र नक्कीच वाटतं.
मायबोलीवर हा लेख वाचून असे अनेक वाचक आहेत ज्यांनी मैत्री कडे मदतीचा हात देऊ केला आहे, पण सध्या हे त्यांच्या पर्यंत पोहोचणे देखिल मुश्किल झाले आहे. कथा कादंबरी तरी ठीक आहे पण कोणी, मुद्दाम जाऊन ध्यासपंथी विभाग उघडत असेल असे मला तरी वाटत नाही. म्हणून निदान १०-१२ दिवस तरी हे पहिल्या दोनेक पानावर दिसत राहील याची काळजी घेण्याकरता खटपट चालू आहे.
असो आता पुरे करतो...
उत्तम कार्य! शुभेच्छा!
उत्तम कार्य! शुभेच्छा!
हर्पेन खुप छान उपक्रम..
हर्पेन खुप छान उपक्रम.. मनापासुन शुभेच्छा!
हर्पेन, मायबोलीकर नक्कीच
हर्पेन, मायबोलीकर नक्कीच सहकार्य करतील.
धन्यवाद मंडळी. मायबोलीकर मदत
धन्यवाद मंडळी.
मायबोलीकर मदत करतात हा दर वर्षीचा अनुभव आहे. या वेळेस काही जणांनी हा लेख फेसबुकवरच्या भिंती वर शेअर केलाय. इतक्यातच हा लेख वाचल्याचा संदर्भ देत २-३ नवीन व्यक्तींचे फोन मैत्री कार्यालयात आलेत. धन्यवाद लोकहो.
नुकत्याच कळलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमधे निघणार्या बॅचसाठी कार्यकर्ते मिळाले आहेत. नोव्हेंबर मधे निघणारी बॅच तर या वेळेस आधीच फुल्ल झाल्ये. तर आता ऑक्टोबर मधे जायला जमणारे का कोणाला ?
कृपया मैत्री कार्यालयात संपर्क साधावा.
समाजकार्यासाठी वेळ काढणे फार
समाजकार्यासाठी वेळ काढणे फार मोठी गोष्ट आहे, पैसा एकवेळ असल्यास कोणी काढूही शकतो..
बाकी ही जर पणती असेल तर आम्ही अजून आयुष्यात उदबत्त्याही नाही पेटवल्यात
हर्पेन, माझ्याकडे बरीच
हर्पेन, माझ्याकडे बरीच स्टेशनरी/शैक्षणीक साहित्य आहे. ऑक्टोबरमधे भारतात/पुण्यात पाठवू शकेन. कोणाला कॉन्टॅक्ट करावा म्हणजे ती पुण्यातून पिकअप/ ड्रॉप ची सोय करता येईल?
रार +१ पण मी बहुतेक
रार +१ पण मी बहुतेक फेब्रुवारीत पाठवू शकेन. चालेल का?
Pages