मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते अ‍ॅडमिन यांना विचारा. मी न्यायाधीश नाही. कोण कुणाचे खातो हे बोलणे नीचपणा आहे की नाही? हे स्वतःला विचारा.

टण्या,

>>>तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? मेलेले जनावर खा पण मारुन खाऊ नका? तेसुद्धा विशिष्ट जातीच्या लोकांनीच?<<<

मला ह्यातले काहीच म्हणायचे नाही आहे. मला असे म्हणायचे आहे की गोवंश हत्या बंदी केल्यामुळे गरिबांना स्वस्तात मिळणारा प्रथिनेयुक्त आहार बंद झाला अशी तक्रार नसावी. आवडत्या चवीचे मांस खाता येणार नाही, विकता येणार नाही ह्या तक्रारी समजू शकतो. गोवंश हत्या बंदी हा निर्णय म्हणजे कोणी काय खावे व खाऊ नये ह्यात झालेली घुसखोरी आहे हेही मान्य आहे. पण त्यातून भलतेच कांगावे निघू पाहात आहेत.

गरिबांना स्वस्त प्रथिने काय फक्त गायी मारल्या जात होत्या म्हणूनच मिळत होती का? मेलेली गाय खाल्ली तरी मिळतात. गायीचे मांस नाहीच खाल्ले तरी काही शाकाहारातून व अंड्यातून प्रथिने मिळू शकतातच.

आता मुद्दा विशिश्ट जातीचा - तर अशी मेलेली जनावरे मांग, महार जातीचे लोक प्रामुख्याने खातात हे मी वाचलेले होते. आता त्यांच्या जातीचा उल्लेख केला तर तो तुच्छतेने केला असे नोंदवायला काहीजण उगाच धावतील. ते टाळावे म्हणून 'विशिष्ट जात'! इतर जातीतील लोक सहसा अशी सहज मरून पडलेली जनावरे कापून खात नाहीत इतपत माझी माहिती आहे. ते लोक प्राणी खाण्यासाठी मुद्दाम मारतात किंवा मारवून घेतात.

बेफी हातावर पोट असलेल्याना हे मास खरच परवडत होते.आणि गोमास हे आपल्याकडे पुर्विपासुन खातात.मधुपर्क हि तर आपल्या देशातिल प्रतिष्ठीतान्चि फेवरीट डिश होति.

कुठलाही मेलेला प्राणी खाल्याने फूड पोयसानिंग होऊ शकते इतकी साधी समज नाही का?

विषयाशी किती असंबद्ध पोस्ट टाकावी याला काही सीमा?

मी वाचलेली माहिती-
यज्ञात बळी दिले जाणारे पशु
यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१. बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२. ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.
यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.

बंदी आणली जैन महापौराने. जैनांसाठी.
विषय कुठे चालला आहे? वैदीक काळात "ब्राह्मण" गाय / बैल खात होते याच्या पुराव्यांवर!
व्हेअर इज द संबंध?

पगारे,

तुम्ही भावनिक प्रतिसाद दिल्यासारखे दाखवून खोड्याच काढताय का? 'खरंच परवडत होते' ह्याचा अर्थ काय? ते परवडत नव्हते असे कुठे कोण म्हणत आहे? सरकारने हत्यांवर बंदी आणली हा निर्णय चुकीचा असेल पण म्हणून लोक काय एकदम उपाशी मरू लागले का? किंवा एकदम प्रथिनांना मुकू लागले का? ज्यांना बीफ परवडते त्यांना अंडी अधिक नाही का परवडणार प्रथिनांचाच प्रश्न असेल तर! प्रश्न चवीचा आहे म्हणून बोंबाबोंब आहे. स्वातंत्र्य हिरावून घेतले म्हणून बोंबाबोंब आहे. आणि निर्णय भाजपचा आहे म्हणून बोंबाबोंब आहे. प्रथिनांसाठी बोंबाबोंब नाही आहे, इतकाच मुद्दा आहे.

बाकी जैन लोकांचे मिंधे होऊ नका हा सल्ला कळकळीने प्रत्येक धर्मियाला द्यायला हवा आहे. प्रत्येकाची सर्वश्रेष्ठत्त्वाकडे वाटचाल सुरूच असते. मार्ग वेगवेगळे असतात. काहीजण अतिरेकी बनवतात. काहीजण शुश्रुषा करून धर्म बदलायला भाग पाडतात. काहीजण आपले सरकार आले ह्या संधीचा फायदा घेऊन धर्मांतरणाच्या पूजा करतात. काहीजण पैश्यांनी मिंधे होऊन स्वतःचे ऐकायला लावतात. ह्यातील पैसे फेकण्याचा मार्ग सर्वात अहिंसक मात्र भयानक उपाय आहे.

>>> दुर्योधन | 8 September, 2015 - 22:52 नवीन

कुठलाही मेलेला प्राणी खाल्याने फूड पोयसानिंग होऊ शकते इतकी साधी समज नाही का?

विषयाशी किती असंबद्ध पोस्ट टाकावी याला काही सीमा?
<<<

खाणारे खात आहेत. त्यांना इकडे कोण काय प्रतिसाद देतो ह्यापेक्षा एक मेलेली म्हैस मिळाली ह्याचाच आनंद होत आहे. त्यांना विषबाधा झाल्याचे विशेष ऐकिवात नाही. तसेही, प्राणी मेला की निवांत आठ दहा दिवसांनी त्याचे अवशेष नाही खात ते! प्राणी मेला की गावातले लोक मुद्दाम त्यांना तो घेऊन जायला सांगतात आणि ते तो प्राणी त्वरीत नेतात.

वर एक सुसंगत पोस्ट टाकली आहे त्यावरही बोललात तरी चालेल. अगदी पहिला प्रतिसाद सुसंगत होता, पण तेव्हा तुम्हा सर्वांची ती ह्याची वेळ झालेली नव्हती, त्यामुळे ती वाचनात आली नसावी तुमच्या!

दर वेळी माझ्या ह्याच पोस्टवर कॉमेंट का केली आणि त्या का नाही केली ह्या शिवाय दुसरे काही नाही का?
आणि 'तुम्हा सर्वांची' म्हणजे काय? माझ्या नावानिशी कमेंट लिहिली आहे, नाव घेऊन बोला, कृपयाच!

बाकी विषयाशी संबंधित नाही, त्यामुळे ह्यापुढे माझ्याकडून शून्य response...

बेफि सध्याच्या काळात मेलेले जनावर खाणारे लोक आहेत हे तुम्हि नक्कि सागु शकता?.
वरती सकुरा ह्यांनी उपयुक्त माहिति दिलि आहे.

>>>बेफि सध्याच्या काळात मेलेले जनावर खाणारे लोक आहेत हे तुम्हि नक्कि सागु शकता?.<<<

सर्व काही खाणारी माणसे आहेत.

हायला ... कोणत्या यज्ञात प्राणी समिधा म्हणून टाकतात इतक्यात? फुकट ते पौष्टिक ह्या न्यायाने सगळ्यांनी लायनी लावाबर तिकडे!

गोश्त मिलेगा!

बेफी हातावर पोट असलेल्याना हे मास खरच परवडत होते.आणि गोमास हे आपल्याकडे पुर्विपासुन खातात.मधुपर्क हि तर आपल्या देशातिल प्रतिष्ठीतान्चि फेवरीट डिश होति.>>>>>> सकाळ मध्ये मागे सकाळचे सम्पादक श्री उत्तम काम्बळे यानी एक अनूभव दिला होता. आजकाल पाया सुप जास्त लोकप्रीय आहे. ते एकदा मटन विक्रेत्याकडे गेले तेव्हा एक गरीब बाई ( हातावर पोट असलेली) खुराचे तुकडे मागायला आली होती. पण एका गाडीवाल्याने ( श्रीमन्त गिर्‍हाईक) ते आधीच जास्त किम्मत देऊन घेतले तेव्हा ती बाई रडवेली झाली आणी म्हणाली, चिकन मटन परवडत नाही म्हणून हे नेतो. आता हे पण नेले तर आम्ही काय करायचे? सम्पाद्क स्तब्ध झाले त्यानी त्या दिवसापासुन पाया सुप घेणे सोडले. मला पण हे कसेतरीच झाले. या लोकानी खरच काय करायचे? काहीही घ्यायला जावे तर १०० रु च्या खाली मिळणार नाही, मग काय होणार यान्चे? मी काही स्वा. सावरकर यान्ची मते वाचलेली नाहीत. पण दैनदिन जीवनात जे घडते ते हताश करते.

रश्मी,

तो लेख वाचला होता. तो विषय आणखीनच निराळा आहे बहुधा. त्यातही जातीयवाद आहे असे त्याच लेखात दिलेले होतेही. बकरीच्या शरीरातील उत्तम खाण्यालायक भाग हा वरच्या (!) जातीतले खाणार. आतडीबितडी किंवा टाकाऊ भाग हा खालच्या (!) जातीतल्यांना मिळणार. (त्याला वजडी की काय म्हणतात, आता तर फॅडच निघाले आहे वजडी थाळी असे).

इथे प्रश्न आहे एका धर्माच्या धार्मिक भावनांसाठी इतर धर्मियांनी त्याग करावा की नाही ह्याचा! तसा तर त्याग प्रत्येक धर्मीयच करत असतो भारतात, कमीअधिक प्रमाणात! ताबूत जातात तेव्हा काही धर्मांना त्रास होतो पण सहन केला जातो. तेच गणेशोत्सवात किंवा इतर उत्सवात होते. आता जैनांसाठी सभोवतालच्या स्थानिकांनी मांसाहार करू नये ह्या पातळीला हा त्याग जाऊ लागला आहे. थोडक्यात एकमेकांवर आपला बोजा टाकण्याची एक वरची पायरी आता चढली जात आहे. हा जिना पुढे कुठे जातो हे सूज्ञास सांगणे न लगे! Happy

काहीही घ्यायला जावे तर १०० रु च्या खाली मिळणार नाही, मग काय होणार यान्चे?

>>

अजूनतरी फूड सेक्युरिटी मोदी सरकारनी बंद केली नाहीय न?

महार,मांग ह्या तुम्हि वर उल्लेख केलेल्या जाती सध्या मेलेली जनावरे खातात असे तुम्हि विधान केले आहे हे कुठल्या गावात होते या बद्दलचा विदा असल्यास किवा माहिती असल्यास क्रुपया द्या.कारण मेलेली जनावरे खायची नाहित असे त्या समाजांनी ठरवुन ५०वर्षे झालीत अजुनही असे घडत असल्यास त्या क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांना सांगुन हे थांबविण्याचा मि जातिने प्रयत्न करीन.

बेफिकीर ...

काय सांगताय? इथेही? लीन मटण महाग असते हे माहितीय ... पण तुम्ही सांगितलेला भाग ... बघितला नाही.

पगारे,

माझा खालचा पॅरा नीट वाचा, हा पॅरा मी टण्या ह्यांना उद्देशून लिहिला होता.

>>>आता मुद्दा विशिश्ट जातीचा - तर अशी मेलेली जनावरे मांग, महार जातीचे लोक प्रामुख्याने खातात हे मी वाचलेले होते. आता त्यांच्या जातीचा उल्लेख केला तर तो तुच्छतेने केला असे नोंदवायला काहीजण उगाच धावतील. ते टाळावे म्हणून 'विशिष्ट जात'! इतर जातीतील लोक सहसा अशी सहज मरून पडलेली जनावरे कापून खात नाहीत इतपत माझी माहिती आहे. ते लोक प्राणी खाण्यासाठी मुद्दाम मारतात किंवा मारवून घेतात.<<<

आता मी मला जे माहीत आहे ते लिहिले. तुम्हाला मगाशी एक प्रतिसाद दिला होता तोही नीट वाचा:

>>>

पगारे,

गावाबाहेर राहणारे लोक मेलेली जनावरे खातात हे माहीत आहे. ते मुद्दाम मारत नाहीत. हे बरोबर आहे का?
<<<

त्यावर तुमचे हे उत्तर वाचा पगारे:

>>> सचिन पगारे | 8 September, 2015 - 22:23

काहि कल्पना नाहि.
<<<

आणि आता अचानक तुम्हाला आठवले की हे पन्नास वर्षांपासून बंद झालेले आहे. एक तर तुम्हाला मागून कोणीतरी प्राँप्टिंग करत आहे किंवा तुमची स्मृती अधूनमधून येतीय जातीय, येतीय जातीय! माझी भाषा प्रत्येक प्रतिसादात 'मला इतपत माहिती आहे' अश्या स्वरुपाची व विचारणा केल्यासारखीच राहिलेली आहे. फरक पडत गेला आहे तो तुमच्या प्रतिसादांमागील अदृश्य उर्जास्त्रोताच्या करंटमध्ये!

बेफि महार,मांग हे सध्याच्या काळात मेलेलि जनावरे खातात हे तुम्हि म्हटलेय त्याने फुड पोयझनिग होवु शकते.तुम्हाला असे गाव् माहित असल्यास क्रुपया सांगा आणि गावातले लोक जर मेलेली म्हैस वैगरे ओढायला जबरदस्तिने सांगत असतिल तर हा मोठा गुन्हा ठरेल.तुम्हि फक्त गावाचे नाव सांगा पुढे काय कार्यवाहि करायची ते मि ठरवतो.

चालेल. सांगतो. दरम्यानच्या काळात वर तुम्ही धाग्याशी विसंगत असे काही प्रतिसाद दिलेले आहेत त्यावर इच्छा असल्यास कारवाई करावीत अशी विनंती!

दरम्यानच्या काळात वर तुम्ही धाग्याशी विसंगत असे काही प्रतिसाद दिलेले आहेत त्यावर इच्छा असल्यास कारवाई करावीत अशी विनंती!
>> Rofl
आणि असे विसंगत प्रतिदास देणे "सगळ्याच" धाग्यांवर कमी करण्यासाठि काही व्यायाम, योग वगैरे करत चला!

Pages